नार्को टेस्ट म्हणजे काय?नार्को टेस्ट का अणि कशापदधतीने केली जाते? What is a narco test?

नार्को टेस्ट म्हणजे काय?नार्को टेस्ट का अणि कशापदधतीने केली जाते?

जेव्हा पोलिसांनी खुप विचारपुस करुनही तसेच थर्ड डिग्री दिल्यावर देखील एखादा गुन्हेगार आपला गुन्हा जेव्हा मान्य करत नसतो आरोपी कडुन समाधान कारक अशी माहिती प्राप्त होत नसते.

तेव्हा गुन्हेगाराकडुन आपल्या केलेल्या गुन्ह्याची खरी कबुली करून घेण्यासाठी अधिक पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांकडुन नार्को टेस्ट ह्या अस्त्राचा वापर केला जातो.

जेव्हा गुन्हेगार आपल्या गुन्हा कबुल करत नसेल तेव्हा पोलिस यंत्रणा न्यायालयाकडे त्याची नार्को टेस्ट करण्याची परमिशन घेत असते.

What is a narco test
What is a narco test

नार्को टेस्ट कशी घेतली जाते?

नार्को टेस्ट याला फसवणूक शोध चाचणी असे देखील म्हटले जाते.

नार्को टेस्ट ही डाॅक्टर,फाॅरेनसिक एक्सपर्ट,अणि सायकोलाॅजिस्ट इत्यादींच्या उपस्थित आरोपीची नार्को टेस्ट घेतली जात असते.

नार्को टेस्ट मध्ये आरोपीला काही विशिष्ट गोळ्या औषधे इंजेक्शन देण्यात येत असतात.ही औषधे किती प्रमाणात द्यायची हे व्यक्तीच्या वय,लिंग आरोग्य वजन ह्या तिन्ही गोष्टींवर अवलंबून असते.

नार्को टेस्ट मध्ये आरोपीला ट्रुथ ड्रग नावाचे एक इंजेक्शन दिले जाते.

ह्या इंजेक्शनच्या नावातच याचा उपयोग देखील सांगितला गेला आहे ट्रुथ ड्रग म्हणजे सत्य कबुल करण्याचे औषध होय.जे दिल्यावर व्यक्ती संमोहन अवस्थेत जाऊन खरे तेच बोलत असते.यात व्यक्ती जाणुन बुजुन खोटे बोलु शकत नाही असे ह्या टेस्ट विषयी सांगितले जाते.

ज्यामुळे आरोपीचे मन हे सुन्न अवस्थेत निघुन जाते.कुठलीही गोष्ट तो समजुन घेऊन विचार करून त्यावर उत्तर देण्याच्या अवस्थेत तो नसतो.

तो यात पुर्णपणे बेशुद्ध अवस्थेत देखील जात नाही अणि शुद्धीत देखील राहत नसतो.हया अवस्थेत आरोपी संथ गतीने बोलत असतात.

See also  सर्दीवर करावयाचे घरगुती उपाय -Home remedies for cold

सुन्न अवस्थेत विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर आरोपीस चलाखीने नीट विचारविनिमय करून देता येत नसते ज्यात तो अनेक वेळा आपल्या केलेल्या गुन्ह्यांची कबुली देखील करत असतो.

पण प्रत्येक बाबतीत असे होतेच असे नाही काही वेळा आरोपी सत्य सांगत देखील नाही.किंवा पुर्णपणे बेशुद्ध अवस्थेत जाऊन लागत असतो.

कारण काही आरोपी चलाख बुदधीचे असल्याने ते ह्या नार्को टेस्ट मध्ये देखील सत्य कबुल करीत नसतात.अणि पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत असतात.

कोणत्याही व्यक्तीची नार्को टेस्ट करण्यापूर्वी त्याच्या काही आवश्यक फिजिकल टेस्ट केल्या जात असतात मगच त्याची नार्को टेस्ट घेतली जाते.

नार्को टेस्ट घेण्यात येत असलेली व्यक्ती आजारी नसावी, वयोवृद्ध नसावी किंवा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दुर्बल देखील नसावी.असे असल्यास तिची नार्को टेस्ट घेतली जात नाही.

नार्को टेस्ट मध्ये व्यक्तीला ओव्हर डोस दिला जाणार नाही याची देखील विशेष काळजी घ्यावी लागते कारण ओव्हर डोस दिला गेल्यास टेस्ट फेल होण्याची व्यक्ती कोमात जाण्याची तिचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते.

म्हणून नार्को टेस्ट ही डाॅक्टर,फाॅरेनसिक एक्सपर्ट,अणि सायकोलाॅजिस्ट इत्यादींच्या उपस्थित एक्स्पर्टससोबत सल्ला मसलत करून घेतली जात असते.

Leave a Comment