चालु घडामोडी मराठी 12 मे २०२३- Current Affairs in Marathi

१२ मे २०२३ रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी – Current Affairs in Marathi

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी मागील काही दिवसांत ३७ शौर्य पुरस्कार प्रदान केले आहेत.
  • पाॅवर फायनान्स महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परमिंदर चोप्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महारत्न कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या ह्या पहिल्या महिला आहेत.
  • जागतिक बाॅक्सिंग चॅम्पियन मध्ये भारत देशाने तीन पदके जिंकली आहेत.इतिहासात पहिल्यांदा अशी गोष्ट घडली आहे.
  • लाॅरिअस स्पोर्टसमन आॅफ द इअर २०२३ हा पुरस्कार लायोनेल मेस्सी यांना भेटला आहे.
  • झारखंड राज्याने सामान्य लोकांसाठी पहिली एअर अॅम्बयुलन्स सेवा सुरू केली आहे.
  • २०२२-२०२३ मध्ये आरबीआयचा सोन्याचा साठा ४.५ टक्के इतका वाढुन ७९४.६४ टन इतका झाला आहे.
  • तुंगनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्यात स्थित आहे.तुंगनाथ मंंदीर उत्तराखंड राज्यातील रूदरप्रयाग जिल्ह्यात आहे.३६८० मीटर इतक्या लांब उंचीवर असलेले हे जगातील सर्वात मोठे शिव मंदिर आहे.
  • केंद्र सरकारने नुकतीच एक अधिसूचना जारी केली आहे ज्यात तुंगनाथचे प्राचीन मंदिर राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केले आहे.
  • शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनाइझेशनने एस ईओ मध्ये संवाद भागिदार म्हणून कुवैत,म्यामनार,मालदीव,युएई इत्यादी देशांचा समावेश करण्यात आला आहे.
  • शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनाइझेशनची स्थापणा २००१ मध्ये चीन देशातील बिजिंग येथे स्थापित करण्यात आले होते.याचे महासचिव झांग मिंग चीन आहे.
  • शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनाइझेशनचे सभासद राष्ट्रांमध्ये एकूण ९ देशांचा समावेश होतो.ज्यात इराण,चीन,भारत, कझाकस्तान, पाकिस्तान,किरगिस्तान,रशिया, ताजिकिस्तान,उझबेकिस्तान इत्यादी देशांचा समावेश होतो.
  • उत्तर प्रदेश राज्यातील ललितपुर जिल्हा येथे देशातील पहिले फार्मा पार्क होणार आहे.
  • इंडोनेशिया ह्या देशामध्ये ४२ वी आसियन म्हणजेच (दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना)शिखर परिषद सुरू झाली आहे.
  • दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्राच्या संघटनेचे एकुण सदस्य देश ११ आहेत.म्यामनार,मलेशिया,सिंगापुर,कंबोडिया, इंडोनेशिया,ब्रुनेई,लाओस,फिलीपिन्स,थायलंड, व्हिएतनाम पुर्व तिमोर इत्यादी देशांचा समावेश होतो.
  • आशियन संघटनेचे मुख्य उद्दिष्ट हे आपल्या सर्व सभासद राष्ट्रांमध्ये आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे.दक्षिण पुर्व आशिया मध्ये शांतता अणि स्थिरता प्रस्थापित करणे अणि समान हेतुने परकीय सत्तेशी संबंध प्रस्थापित करणे हे आहे.
  • पहिल्या ट्रान्सजेंडर वकिल ठरल्या केरळ राज्यातील ठरल्या आहेत.
  • अमेरिकेचे न्युयाॅर्क हे राज्य अमेरिकेतील प्रथम राज्य बनले आहे.इथेच नवीन इमारतींमध्ये गॅस स्टोव्हचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
See also  चालु घडामोडी मराठी - 17 मे 2022 Current affairs in Marathi

उत्तर प्रदेश राज्य सरकारने डिजनी लॅडच्या धर्तीवर रामलॅडचा विकास करण्याची योजना आखली आहे.