गुगल पे वरून लोन कसे घ्यायचे? How to get loan from google pay in Marathi

गुगल पे वरून लोन कसे घ्यायचे?how to get loan from google pay in Marathi

मित्रांनो गुगल पे चा वापर आपण सर्व जण रोज कोणाला तरी पैसे ट्रान्सफर करायला,कोणाकडुन पैसे रिसीव्ह करायला,कसले तरी बिल पे करायला रिचार्ज वगैरे करायला,आँनलाईन शाँपिंग करायला करीत असतो.

ज्यात आपल्याला डिस्काउंट कुपन वगैरे देखील मिळत असते.पण याव्यतीरीक्त अजुन एक फायदा आहे जो गुगल पे दवारे आपणास आज प्राप्त होत आहे.

तो म्हणजे लोन घेण्याचा आज आपण गुगल पे दवारे पैसे ट्रान्सफर करण्यासोबत विविध प्रकारचे लोन देखील प्राप्त करू शकतो.ज्यात होम लोन,पर्सनल लोन इत्यादींचा समावेश होत असतो.

आजच्या लेखात आपण गुगल पे दवारे लोन कसे घ्यायचे हे जाणुन घेणार आहोत.कारण आपल्यातील खुप जण असतात ज्यांना एमरजन्सीमध्ये कुठल्या ना कुठल्या लोनची आवश्यकता असते.

गुगल पे काय आहे?what is google pay in Marathi

गुगल पे हे गुगल कंपनीचे एक प्रोडक्ट तसेच अँड्राईड अँप आहे.

See also  Henri Fayol - व्यवस्थापन गुरू यांच्याविषयी माहीती - Henri Fayol information in Marathi

गुगल पे दवारे आपण काय काय करू शकतो?benefits of google pay in Marathi

गुगल पे च्या दवारे आपण आँनलाईन पैशांची देवाण घेवाण करू शकतो.कोणालाही घरबसल्या आँनलाईन पैसे पाठवू शकतो कोणाकडुनही पैसे रिसीव्ह करू शकतो.ते ही बँकेत सायबर कँफे वगैरे ठिकाणी न जाता.

आपल्या मोबाइलचा,टिव्हीचा रिचार्ज करू शकतो.एखादे बिल शाँपिंगचे खरेदीचे हाँटेलातील जेवणाचे काँफीचे बिल पे करू शकतो.आँनलाईन तिकिट बुक करू शकतो.

यात आपण पैसे ट्रान्सफर करण्यासाठी युपीआय आयडी तसेच क्यु आर कोडचा,मोबाइल नंबरचा,बँक अकाऊंट नंबर आय एफ सी कोडचा देखील वापर करू शकतो.

कुठल्याही कंपनीकडुन लोन घेताना आपण काय काळजी घ्यायला हवी? Tips before getting any loan

जेव्हा आपण कुठल्याही कंपनीकडुन लोन घेत असतो तेव्हा आपण त्या कंपनीच्या विषयी काही महत्वपूर्ण माहीती जसे की त्यांचे अटी नियम आधी जाणुन घ्यायला हवे.

गुगल पे च्या अँपमध्ये जी कंपनी आपल्याला लोन देऊ करते आहे ती कंपनी कशी आहे?ती कंपनी तिच्या कस्टमरला कसले कोणकोणते लोन देते?त्यांनी लोन देण्यासाठी काय पात्रता योग्यता सांगितली आहे?

लोन घेण्यासाठी ते कोणकोणते डाँक्युमेंट आपल्याकडुन मागतात?किती कालावधीसाठी हे लोन आपणास दिले जाते आहे?किती व्याजदर आकारले जाते?ही सर्व माहीती आपण काढुन घ्यायला हवी.

कारण जरी लोन आपणास गुगल पे अँपवरून मिळत असले तरी लोन हे आपणास गुगल कडुन मिळत नसते तर गुगल पे अँपशी तह केलेल्या इतर फायनान्स कंपन्या देत असतात.

गुगल पे वरून लोन घेण्यासाठी कोणते डाँक्युमेंट लागत असतात?documents required for loan in Marathi

मित्रांनो वेगवेगळया लोन अँप मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्या आपले लोन अँप्रुव्ह करायला विविध डाँक्युमेंटची मागणी करीत असतात.

पण आज आपण काही अशा डाँक्युमेंटची यादी बघणार आहोत जे कुठेही लोन घेत असताना आपणास लागतच असतात.

● आधार कार्ड

See also  Market cap किंवा  market capitalization म्हणजे काय ? What is market capitalization in Marathi  

● पँन कार्ड

● बँक स्टेटमेंट ज्यात आपल्या मागील तीन महिन्याचा व्यवहार दिलेला असतो.

● इन्कम स्टेटमेंट

● आपला मोबाइल नंबर

● ईमेल

● एक सेल्फी फोटो

वरील सर्व महत्वाचे डाँक्युमेंट आपल्याकडे लोन घेताना असायलाच हवेत.

गुगल पे वरून लोन घेण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे?eligibility criteria required for loan in Marathi

● आपण भारताचे मुळ रहिवासी असणे गरजेचे आहे येथील नागरीक असायला हवे.

● आपले वय हे कमीत कमी 21 ते 22 असणे गरजेचे आहे.

● आपले मंथली इन्कम हे कमीत कमी 12 ते 13 हजार इतके असायला हवे.

● आपल्याकडे इन्कमचे एक फिक्स सोर्स असायला हवे मग ते नोकरी व्यवसाय उद्योग व्यवसाय काहीही असले तरी चालेल

गुगल पे वरून लोन घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?how to apply for loan google pay in Marathi

● सगळयात पहिले आपल्या मोबाइल मध्ये डाउनलोड केलेले गुगल पे अँप ओपन करायचे.

● आपण जर गुगल पे अँप डाउनलोड केलेली नसेल तर आपण गुगल प्ले स्टोअर मधुन डाउनलोड करू शकतो.

● मग यानंतर आपण गुगल पे अँपवर आपल्या मोबाइल नंबर तसेच इमेल आयडीने लाँग इन करून घ्यायचे.

● मग होम पेजवर आल्यावर बिझनेस अणि बिल मेन्यूच्या बाजुला एक्सप्लोर नावाचे एक आँप्शन आपणास दिसुन येईल.

● एक्सप्लोअर आँप्शनवर क्लीक केल्यावर आपणास बिझनेस सेक्शनमध्ये ट्रेंडिंग,फुड,फायनान्स,डेली इसेन्शिअल, ट्रँव्हल आँफर,शाँपिंग,लोकल सर्विस,गेम्स,कम्युनिटी डोनेशन इत्यादी आँप्शन दिसुन येतील.

● यात आपण फायनान्स मध्ये गेल्यावर आपणास विविध लोन अँप दिसुन येतील.यापैकी आपल्याला हवे त्या प्रकारचे लोन हव्या त्या कंपनीला आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो.

● मग त्या सिलेक्ट केलेल्या कंपनीच्या नावावर क्लिक करायचे.

● आपल्या ईमेल आयडी अणि मोबाइल नंबर दवारे लाँग इन करायचे.

● आपली सर्व बँक डिटेल पर्सनल माहीती यात व्यवस्थित भरायची.आवश्यक ते डाँक्युमेंट देखील सबमीट करायचे.

यानंतर लोन देणारी कंपनी आपली सर्व बँक डिटेल भरलेली वैयक्तिक माहीती व्यवस्थित चेक करते.मग चेक करून झाल्यानंतर कंपनीकडुन आपल्याला लोन मंजुर झाले आहे हे सांगायला काँल येतो.मग आपल्या बँक खात्यावर आपले लोनचे पैसे जमा केले जात असतात.

See also  पैशांची बचत कशी करावी - How To Save Money In Marathi

गुगल पे वरून लोन घ्यायला किती व्याजदर भरावे लागु शकते?

जेव्हा आपण गुगल पे वरून लोन घेत असतो तेव्हा प्रत्येक कंपनी आपापले वेगळे व्याजदर आकारत असते.

म्हणुन आपण लोनसाठी अँप्लाय करण्याआधी त्यांच्या टर्म अणि कंडिशन वगैरे नीट वाचुन घ्यावे किती व्याजदर लावले जात आहे?किती दिवसात लोन फेडायचे इत्यादी.

गुगल पे वरून लोन घेण्याचे फायदे –

● गुगल पे वरून लोनसाठी अँप्लाय केल्यावर आपल्या लोनला लगेच चटकन अँप्रुव्हल मिळत असते.

● गुगल पे वरून आपणास फक्त डिजीटल केवायसी करून झटपट लोन प्राप्त होत असते.

● कुठल्याही कागदी कारवाईंची आवश्यकता आपणास राहत नाही.

● यावर लोन देणारया सर्व लोन कंपन्या आरबी आय अणि एनबीएससी ची मान्यता प्राप्त कंपन्या आहेत.यात प्रिफर लोन,आय आय एफ एल लोन,मनी व्युव्ह लोन,पेई मी इंडिया,इंस्टा मनी,कँश ही इत्यादी लोन कंपन्यांचा समावेश आहे.