इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणती महत्वाची कागदपत्रे लागतात?- What documents are needed for income tax?

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी कोणकोणती महत्वाची कागदपत्रे लागतात?

आता नवीन आर्थिक वर्षाचा आरंभ झालेला आहे याचसोबत आता आयटीआर भरायच्या प्रक्रियेला देखील सुरूवात झाली आहे.

What documents are needed for income tax
What documents are needed for income tax?

म्हणुन आता सुरुवातीपासुनच आपण सर्व कर दात्यांनी उत्पन्नाचे अणि कराचे मुल्यांकन करणे आवश्यक आहे.कारण जितक्या लवकर आपण जेवढया लवकर आपण आपला कर भरला तेवढे चांगले असते.

आजच्या लेखात आपण भारतात इन्कम टॅक्स भरण्यासाठी लागत असलेल्या महत्वाच्या कागदपत्रांची नावे जाणुन घेणार आहोत जेणेकरून इन्कम टॅक्स भरताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही.

जेव्हा आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतो तेव्हा तिथे आपणास आपल्या उत्पन्नाचा तपशील द्यावा लागत असतो.ज्यात आपल्या पेमेंट स्लीप वगैरे बॅक स्टेटमेंट इत्यादी महत्त्वाच्या बाबी समाविष्ट होतात.

आयकर भरण्याचे नियम हे व्यावसायिक अणि पगारदार व्यक्ती या दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे असतात.

म्हणुन पगारदार व्यक्तीला कोणते इन्कम टॅक्स भरण्यासाठी कागदपत्रे लागणार आहे अणि व्यावसायिक व्यक्तीला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे हे आपणास माहीत असणे आवश्यक आहे.

१) फाॅर्म १६ –

आयकर रिटर्न भरण्यासाठी आपणास फाॅर्म १६ जमा करणे बंधनकारक आहे यात करदात्याचे वेतन प्रमाण देण्यात आलेले असते.हा फाॅम कंपनीकडुन जारी केला जात असतो याचे फाॅर्म १६A अणि फाॅम १६B फाॅर्म १६ c असे दोन भाग असतात.

पगार प्राप्त होत असलेल्या व्यक्तीचे वेतन किती आहे त्यात किती कपात केली जात आहे हे सर्व यात दिलेले असते.

फाॅर्म 16A हे एक महत्वाचे टीडीएस सर्टिफिकेट आहे. जेव्हा आवर्ती ठेव मुदत ठेव इत्यादी मधील प्राप्त होत असलेल्या उत्पन्नावर कराची आकारणी केली जाते.तेव्हा आपणास हे कागदपत्र लागत असते.

अणि फाॅर्म 16 बी हा मालमतेची खरेदी करत असताना द्यावा लागत असतो.

फाॅर्म 16 सी हा अशा व्यक्तींना लागतो जे घरमालक आहे अणि त्यांना येत असलेल्या भाडयातुन 50 हजार पेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त होत आहे.

See also  एफडी काढण्यासाठी आर्ज कसा करावा? । Application for Withdrawal of FD In Marathi

2) फाॅर्म 26AS –

ह्या फाॅमध्ये आपले वार्षिक कर विवरण दिलेले असते.यात आपल्या पॅन वर भरलेल्या कराची सर्व डिटेल्स दिलेली असते.याला आपण आपले कर पासबुक देखील म्हणु शकता.

3)पॅन कार्ड –

पॅन कार्ड हे सर्वात महत्त्वाचे डाॅक्युमेंट आहे जे आपणास इन्कम टॅक्स भरण्यासाठी लागत असते.पॅन कार्ड हे कर भरत असलेल्या व्यक्तीचे प्रमुख ओळखपत्र असते.जसे आधार कार्ड आपल्या भारतीय नागरिकत्वाचे प्रमाण आहे तसेच पॅन कार्ड हे आपण कर भरणारा असल्याचा पुरावा आहे.

टीडीएस साठी हे खुप आवश्यक असते.कर परतावा प्राप्त करण्यासाठी देखील हे आपल्या बॅक अकाऊंट सोबत लिंक करणे अनिवार्य आहे.

4) आधार कार्ड –

आयकर कायदा कलम १३९ अंतर्गत कर भरणारया व्यक्तीकडे आधार कार्ड असणे देखील गरजेचे असते.कारण कर भरताना आपणास आपली आधार कार्डची डिटेल्स देखील द्यावी लागत असते.

समजा आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपण आधार नोंदणी साठी आपला अर्ज करायचा आहे अणि आधार नोंदणी केल्यानंतर आपणास एक इनरोलमेंट आयडी दिला जाईल.हा आयडी आपणास कर भरताना लागत असतो.

5) पेमेंट स्लीप –

जे व्यक्ती नोकरदार आहेत पगारदार आहेत म्हणजे ज्यांना महिन्याला वेतन प्राप्त होते अशा व्यक्तींना पेमेंट स्लीप लागत असते.

6) बॅक अकाऊंट तपशील –

यात आपणास आपला बॅक अकाऊंट नंबर आय एफसी कोड द्यावा लागत असतो.बॅकेत आपले जेवढे अकाऊंट ओपन आहेत त्यांचा तपशील द्यावा लागतो.याने देखील आपल्या उत्पन्नाची डिटेल्स प्रमाणित केली जाते.

आयटीआर भरत असताना काही रिफंड म्हणजे पैसे परत मिळणार असले तर हे आपल्या ह्या बॅक खात्यात जमा केले जातात.

यात आपणास आपले बॅक खाते पासबुक देखील लागेल यात हे दिलेले असते की आपणास आपल्या सेविंग अकाऊंट वर किती इंटरेस्ट प्राप्त होत आहे.तसेच फिक्स डिपाॅझिट एफडी वर किती रिटर्न्स मिळत आहे.

See also  तुमचा कार विमा पॉलिसी क्रमांक शोधण्याचे ५ सोपे मार्ग । 5 Easy Ways to Find Your Car Insurance Policy Number In Marathi

7) इन्व्हेस्टमेंट प्रुफ –

ज्या व्यक्तींना आपल्या एखाद्या गुंतवणुकीमध्ये कर सवलत हवी आहे त्यांना आपल्या गुंतवणुकीचा पुरावा दाखल करावा लागत असतो.

फक्त ही सवलत प्राप्त करण्यासाठी आपणास आपण किती गुंतवणुक केली आहे कोठे गुंतवणुक केलेल्या आहे याची सविस्तर माहिती देणे आवश्यक असते.