ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे काय (प्रवास विमा माहिती) ? Travel insurance Marathi information

Travel insurance Marathi information

ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे काय (प्रवास विमा माहिती)

धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्या सोबतच कुटुंबाची आपली मालमत्ता , व्यवसाय आणि वाहन याची शक्य तितकी काळजी घेत असो , सुरक्षित ठेवत असतो . या करता आपण आरोग्याचा तसेच मालमत्तेचा विमा काढतो त्या करता आरोग्य विमा आणि वाहन पॉलिसी मदतीला असतात .

धकाधकीच्या जीवनात चार आठ दिवस विरुंगळा आपण सहलीला , कुटुंबीया  समवेत फिरायला जास्त असतो . वर म्हटल्या प्रमाणे आपण शक्य तितक सुरक्षितता घेत असतो , अश्या प्रवासादरम्यान  एक विमा असतो , insurance policy असते ती फक्त प्रवसा दरम्यान सुरक्षितता देत असते .

आपल्या वाहनं करता आपण कार इन्शुरन्स चे नाव ऐकलं असेलच तो असतो ,तसेच घरं करता होम इन्शुरन्स चे असो , वा आपल्या करता आरोग्य विमा असतो ;

पण एक Travel insurance policy(ट्रॅव्हल इन्शुरन्स) ही असते तिच्या बाबत आपण जास्त वाचेलेल एकेलेल नसते.

आपण या लेखात ट्रॅव्हल इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे काय ? ,ट्रॅव्हल इन्शुरन्स चे फायदे ? ट्रॅव्हल इन्शुरन्स कसा खरेदी करायचा ?

Travel insurance policy(ट्रॅव्हल इन्शुरन्स) किंवा प्रवास विमा हा असा विमा असतो जो प्रवासात येणाऱ्या  अडचणी धोके या मूळे उद्भवणाऱ्या संकटात होणर्‍या नुकसना पासून आर्थिक कवच देतो , अश्या वेळी झालेले नुकसानाची भरपाई आपल्याला ट्रॅव्हल इन्शुरन्स मधून मिळू शकते

नावात म्हटल्याप्रमाणे हे एक विमा योजना आहे जी एक उपयोगी असे साधन आहे जे देशांतर्गत प्रवास असो की विदेश सहल किंवा कार्यालयीन काम असो ,प्रवास दसरम्यान संभाव्य नुकसान आणि आर्थिक नुकसान झालेच तर हा विमा आपल्या मदतीला धावून येतो.

See also  बॉंड यील्ड म्हणजे काय? What is Bond yields and US job data?

Travel insurance policy खलील बाबी करता काढता येते – Travel insurance Marathi information

  1. सामानाचे नुकसान / वैयक्तिक सामानाचा तोटा
  2. एअरलाइन्स ने विमान कॅन्सल केले / हॉटेल बुकिंग रद्दा झाली
  3. विमाधारकाचा मृत्यू
  4. विमाधारकाला अपंगत्व येणे
  5. आपत्कालीन निर्वासन
  6. विमान चे अपहरण झाले
  7. Passport पासपोर्ट हरवून बसलात
  8. एन वेळी वैद्यकीय गरज निकड / अपघात झाला
  9. सामान गहाळ झाले
  10. Bags पिशव्या किंवा वैयक्तिक सामानाची चोरी
  11. ट्रिप रद्द करणे किंवा विलंब

Travel insurance policy किती प्रकारच्या  असतात

  • सिंगल ट्रिप – ही फक्त एका वेळ प्रवास दरम्यान घेता येते म्हणजे आपण एक प्रवास संपला की हा विमा संपतो
  • अनेक ट्रीप करता – ज्यांना कौटुंबिक किंवा व्यवसाय व नोकरी निम्मित वेळोवेळो प्रवास करावा लागतो अश्या लोका करता हा एक उत्तम विमा आहे.
  • शैक्षणिक प्रवासा करता- विध्यार्थी जे विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाऊ इच्छितात त्यांच्या करता हा खास असा विमा असतो जो अश्या विध्यार्थ्यांनि नक्की घ्यायला हवा
  • ग्रुप विमा योजना- एकाच वेळी बरेच जण सोबत प्रवासाला निघणार असतील हा विमा खूप फायदेशीर ठरतो .परंतु यात जास्तीजास्त किती जण एका ग्रुप पॉलिसी त कव्हर होतात ते पाहिलं पाहिजे. साधारण 5- 7जण बऱ्याच विमा कंपन्या विमा कव्हर देत असतात.
  • या व्यतिरिक्त आपण जर आपल्या काही गरजा मांडून एकादी स्पेशल पॉलिसी  सुद्धा विमा कंपन्या कडून तयार करू शकता.

ट्रॅव्हल इन्शुरन्स आपण 5 दिवसापासून 500 दिवसापर्यंत घेऊ शकतो,मग तो आपण एका दिवसासाठी,महिन्यासाठी किंवा वर्षासाठी घेऊ शकतो.ट्रॅव्हल इन्शुरन्स प्रीमियम ची रक्कम ही आपले वय,आपण कोणत्या देशात फिरायला जाणार आहे त्या देशाचे नाव,या गोष्टींवर अवलंबून असते.ट्रॅव्हल इन्शुरन्स आपण ट्रॅव्हल करत असलेल्या टॅक्सी,बस,रेल्वे किंवा विमान यांचा घेऊ शकतो.

ट्रॅव्हल इन्शुरन्स कुठून खरेदी करायचा ? – Travel insurance Marathi information

  • तुम्ही जेव्हा ऑनलाईन फ्लाईट बुक करत असाल ,जसे की Make my trip वरून किंवा खूप अशा ट्रॅव्हल बुकिंग कंपन्या आहेत त्यांच्याकडून तेव्हा तुम्हाला त्या कंपन्या लगेचच ट्रॅव्हल इन्शुरन्स प्रीमियम देतात.
  • ह्या इन्शुरन्स प्रीमियम ची किंमत दिवसाला 200 ते 250 पर्यंत असते.
  • आशा खूप साऱ्या ट्रॅव्हल इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्या देखील आहेत,जिथून आपण ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करू शकतो.
  • HDFC ट्रॅव्हल इन्शुरन्स, भारती ट्रॅव्हल इन्शुरन्स, टाटा ट्रॅव्हल इन्शुरन्स ह्या ट्रॅव्हल इन्शुरन्स देणाऱ्या टॉपच्या कंपन्या पैकी एक आहेत.तुम्ही ह्या कंपनीच्या मदतीने ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करू शकता.
  • आपल्या भारतामधे खूप कमी लोक ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करतात.एका रिपोर्ट नुसार भारतामध्ये फक्त 2 % लोक ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करतात.
  • समजा तुम्ही बाहेरच्या देशात फिरायला गेला आहे आणि तुम्ही कोणत्यातरी अडचणीत सापडलाय,त्यावेळी ट्रॅव्हल इन्शुरन्स तुमची मदत करते.आपल्याला जर जर फिरण्याचे आवड असेल आणि सारखे फिरायला जात असाल, तर तुमच्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स फार गरजेचा आहे आणि तुम्ही जर वर्षातून एकदा बाहेर फिरायला जात  असाल तर तुम्ही ही ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतला पाहिजे.
  • आपण ट्रॅव्हल इन्शुरन्स विदेशात फिरण्यासाठी घेऊ शकतो आणि आपल्या देशात फिरण्यासाठी देखील घेऊ शकतो
See also  Sgx Nifty म्हणजे काय ? SGX Nifty Marathi Mahiti

ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करण्या अगोदर पाहिल्या जाणाऱ्या महत्वाच्या गोष्टी ? :

  • मेडिकल सुविधा – ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करताना सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या प्रीमियम मध्ये मेडिकल सुविधा कव्हर केल्या आहेत का हे पाहिले पाहिजे.समजा तुम्ही बाहेरच्या देशात फिरायला गेला आणि तुम्ही प्रवासामुळे आजारी पडला ,विदेशात मेडिसिन खूप महागड्या आहेत.विदेशातील महागड्या मेडिसिन तुम्हाला परवडणार नाहीत;म्हणून तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना प्रीमियम मध्ये मेडिकल सुविधा कव्हरेज घेतले पाहिजे.
  • अपघाती मृत्यू – न करे नारायण पण समजा एखादा व्यक्ती बाहेरच्या देशात ट्रॅव्हल करत आहे आणि दुर्देवाने त्याचा विदेशात मृत्यू झाला तर.त्याने ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी केलेली कंपनी त्या मृत व्यक्तीला विदेशातून आपल्या देशात आणण्याचा खर्च उचलते.
  • बॅगेज चोरी – आजकाल चोरीचे प्रमाण खूप वाढलय.समजा तुमची बॅग चोरी झाली किंवा तुमचे पाकीट चोरी झाले तर ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतलेली कंपनी तुम्हाला बॅगेज चोरी झाल्याच्या बदल्यात एक विशिष्ट रक्कम देते.
  • ट्रिप कॅन्सललेशन – समजा काही कारणास्तव तुमची ट्रिप कॅन्सल झाली.तर तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतलेली कंपनी प्रीमियम रक्कम रिफड न करता त्यातील काही विशिष्ट रक्कम तुम्हाला देते.

लक्ष्यात असू द्या – Travel insurance Marathi information

  • वरील दिलेल्या गोष्टी तुमच्या ट्रॅव्हल इन्शुरन्स पोलीसी मध्ये आहेत की नाही,हे पाहणे फार गरजेचे आहे.
  • लेखात आपण Travel insurance policy मध्ये ज्या संरक्षण कव्हर केल्या जातात त्या बाबी पाहिल्या या व्यतिरिक्त
  • एक महत्वाची बाब म्हणजे  विमा धारक दारू प्यायला असेल , मद्य, आहारी असेल आणि यातून काही घटना घडली तर विम्याचा फायदा मिळत नाही
  • पूर्वी पासून काही आजार असतील तर तसे विमा काढताना सांगायला हवं.
  • तसेच बऱयाच बारीक सारीक अटी आणि नियम असतात ते प्रत्येक विमा कंपनी नुसार बदलत असतात.
  • तेव्हा विमा घेताना काही बाबी कव्हर आहेत, काय बाबी वगळल्या आहेत हे आवर्जून चेक केलं पाहीजे.
  • पूर्ण अभ्यास आणि दोन चार कंपनी कडून माहिती मागवून त्या बाबत तुलनात्मक माहिती काढून विमा घेणं योगय
See also  ब्रिजिंग लोन म्हणजे काय? - Bridging loan meaning in Marathi

लेखक : Post Author


SIP KNOWLEDGE