ATM Card,Debit Card आणि Credit Card या तिघांमध्ये काय फरक आहे? – Types of Bank Cards and Their Features

ATM CARD,DEBIT CARD आणि CREDIT CARD  संपूर्ण माहिती  – Types of Bank Cards and Their Features

आज आपल्या प्रत्येकाचे बँकेत एक तरी खाते हे आहेच.जेव्हा खातेधारक एखाद्या बँकेत आपले खाते ओपन करत असतो तेव्हा प्रत्येक बँक आपल्या खातेधारकांना काही विशिष्ट सेवा तसेच सुविधा पुरवत असते.

ज्यात एटीएम कार्ड,डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ह्या तीन मुख्य सेवा सुविधा देखील बँकेकडुन प्रत्येक खातेधारकाला दिल्या जात असतात.

आणि आपल्याला प्रत्येकाला एटीएम कार्ड,डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड विषयी एवढेच माहीत आहे की एटीएम कार्डचा वापर आपण एटीएम मशिनमधून पैसे काढण्यासाठी करत असतो.आणि डेबिट कार्ड हे एकदम एटीएम कार्डसारखेच असते.आणि क्रेडिट कार्ड हे आपण आँनलाईन शाँपिंग खरेदी साठी वापरत असतो.

पण याव्यतीरीक्त एटीएम कार्ड,डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या तिघांमध्ये कोणता फरक असतो हे आपल्यापैकी बरयाच जणांना माहीत नसते.तसेच एटीएम कार्ड,डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या तिघांमध्ये काय साम्य तसेच भेद आहे हे देखील आपल्याला माहीत नसते.

म्हणुन आजच्या लेखात आपण एटीएम कार्ड डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड या तिघांमधील फरक जाणुन (difference between a credit card and a debit card) घेणार आहोत.जेणेकरून ह्या तिघांमधील साम्य आणि भेद समजुन घेण्यास आपणास मदत होईल.

एटीएम कार्ड म्हणजे काय असते?

  • एटीएमचा फुलफाँर्म हा (Automated Teller Machine)असा होत असतो.
  • एटी एम कार्ड ही कोणत्याही बंँकेकडुन आपल्या बँक खातेधारकाला एटीएम मशिनद्वारे पैसे काढण्यासाठी दिलेली सुविधा असते.
  • एटी एम कार्डचा वापर करून आपण फक्त आपल्या खात्यातील पैसे कुठल्याही एटीएम मशिनद्वारे आपला एटीएम पिन डायल करून सहज काढु शकतो.
  • एटीएम कार्डमध्ये दिलेला पिन इंटर करून आपण फक्त आपले गुगल पे फोन चालू करू शकतो.याने आपल्याला कुठल्याही प्रकारचे आँनलाईन मनी ट्रान्झँक्शन करता येत नसते.
  • आणि सगळयात महत्वाचे म्हणजे ह्या कार्डमध्ये व्हिझा मास्टर कार्ड तसेच रूपे कार्ड असे काहीही लिहिलेले नसते.
  • क्रेडिट कार्डमध्ये जसे आपल्याला तात्काळ आँनलाईन शाँपिंग तसेच खरेदी करण्यासाठी इमरजन्सी लोन बँकेकडुन घेता येते तसे कुठलेही लोन एटीएम द्वारे आपल्याला मिळु शकत नाही.
  • एटीएम कार्डचा मुख्य उपयोग हा एटीएम मशिनमधुन पैसे काढणे हाच आहे.
See also  शेअर मार्केट गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन - Saarthi App Information

 

माहिती – वाचा –बँक अकाऊंट  किती प्रकारचे असतात ?

 

डेबिट कार्ड म्हणजे काय?

  • डेबिट कार्ड हे देखील एटीएम कार्डप्रमाणेच दिसत असते.पण यात त्याच्या वरच्या साईडला अगदी समोर मास्टर कार्ड,व्हिझा कार्ड तसेच रूपे कार्ड असे लिहिलेले असते.जे एटीएम कार्डमध्ये कुठेही लिहिलेले नसते.
  • डेबिट कार्डचा वापर आपण एटीएम कार्डप्रमाणे एटीएम मशिनमधुन पैसे काढण्यासाठी करू शकतो.याचसोबत डेबिट कार्डचा वापर करून आपण कुठलेही आँनलाईन पेमेंट करू शकतो.जे एटीएम कार्डमध्ये आपल्याला करता येत नसते.
  • याचसोबत डेबिट कार्डचा वापर आपण स्वाईप मशिनद्वारे आँनलाईन पेमेंट करण्यासाठी देखील करू शकतो.जो आपण एटीएम कार्डचा करू शकत नाही.
  • डेबिट कार्ड हे आपल्या बँक अकाऊंटशी लिंक असते म्हणुन आपण आपल्या डेबिट कार्डद्वारे पैसे तेव्हाच काढु शकतो जेव्हा आपल्या बँक खात्यात तेवढी रक्कम शिल्लक तसेच जमा असेल.
  • क्रेडिट कार्डमध्ये शाँपिंगसाठी आपले पैसे कमी पडत असल्यास बँकेकडून क्रेडिट लोन घेतल्यावर आपल्याला त्याचे काही व्याज देखील द्यावे लागत असते तसे डेबिट कार्डद्वारे आपण जे पैसे एटीएममधून काढत असतो त्यावर आपल्याला कोणतेही व्याज देण्याची गरज पडत नसते.कारण ते पैसे आपल्या स्वताच्या बँक अकाऊंटमधीलच असतात.
  • डेबिट कार्डद्वारे आपण आँनलाईन मोबाईलचा रिचार्ज करू शकतो तसेच वीज बील देखील भरू शकतो.
  • डेबिल कार्डचा वापर करून आपण भारतामध्येच आँनलाईन ट्रान्झँक्शनचे व्यवहार करू शकतो.आणि भारताबाहेर व्यवहार करण्यासाठी आंतराराष्टीय देवाणघेवाणीसाठी आपले डेबिट कार्ड सक्रीय असणे गरजेचे असते.
  • डेबिट कार्डसाठी जो सर्विस चार्ज बँक आपल्याकडुन घेत असते तो क्रेडिट कार्डच्या तुलनेत फार कमी असतो.
  • डेबिट कार्डचा वापर करून आपण नेटबँकिंग देखील चालु करू शकतो.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

  • क्रेडिट कार्डचा वापर आपण तात्काळ आँनलाईन शाँपिंग तसेच खरेदी करण्यासाठी इमरजन्सी लोन बँकेकडुन घेण्यासाठी करत असतो.आणि जेव्हा आपल्या खात्यात आपण पैसे टाकतो तेव्हा बँक ते लोन दिलेले पैसे आपल्या अकाऊंटवरून कट देखील करत असते.
  • क्रेडिट कार्ड हे सगळयांना दिले जात नसते.म्हणुन हे कार्ड सगळयांकडे आपणास पाहायला मिळत नसते.बँकेत आपण ऑनलाइन अर्ज करू शकतो
  • क्रेडिट कार्डचा वापर आपण बँकेकडून तात्पुरता क्रेडिटच्या स्वरुपात लोन घेण्यासाठी करत असतो याचसोबत याचा वापर आँनलाईन पेमेंट करण्यासाठी देखील केला जात असतो.
  • क्रेडिट कार्डचे देखील एक लिमिट ठरलेले असते त्या लिमिटनुसार आपल्याला क्रेडिट लोन दिले जात असते.आणि ते लोन आपण वेळेवर नाही फेडल्यास बँक आपल्याकडुन लेट पे चा चार्ज देखील वसुल करू शकते.
  • आणि सगळयात महत्वाचे म्हणजे ह्या कार्डचा वापर आपण एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी अजिबात करू शकत नसतो.
  • क्रेडिट कार्ड ही एक अशी सुविधा असते जी प्राप्त करण्यासाठी आपल्याला ज्या बँकेचे कार्ड हवे त्याच बँकेत खाते असणे गरजेचे नसते.
  • क्रेडिट कार्डचा वापर करून आपण भारतामध्ये तसेच विदेशात देखील आँनलाईन ट्रान्झँक्शनचे व्यवहार करू शकतो.
  • क्रेडिट कार्डसाठी जो सर्विस चार्ज बँक आपल्याकडुन घेत असते तो डेबिट कार्डच्या तुलनेत फार अधिक असतो.
  • क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास आपल्याला चांगला डिस्काऊंट मिळत असतो सोबतच रिवाँर्ड पाँईंट बोनस पाँईण्ट तसेच कँशबँक देखील मिळत असतो.
See also  Webinar म्हणजे काय ? What is a webinar information in Marathi