क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड टोकनाईझेशन म्हणजे काय?Credit card and debit card tokenization meaning in Marathi

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड टोकनाईझेशन माहिती ?Credit card and debit card tokenization meaning in Marathi

क्रेडिट डेबिट टोकनाइझेशन हा क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या दोघांशी संबंधित एक महत्वाचा शब्द आहे.

ही एक सुविधा आहे जी रिझर्व बँक आँफ इंडियाकडुन क्रेडिट कार्ड,डेबिट कार्डदवारे आर्थिक देवानघेवाणीचे व्यवहार करणारया व्यक्तींसाठी सुरू करण्यात आली आहे.

याने आपला क्रेडिट तसेच डेबिट कार्डदवारे केला जात असलेला कुठलाही आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षितपणे पार पडण्यास मदत होत असते.ज्याला कार्ड टोकनाईझेशन असे देखील म्हटले जाते.

आजच्या लेखात आपण ह्याच कार्ड टोकनाइझेशन विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

कार्ड टोकनाईझेशन म्हणजे नेमकी काय असते?card tokenization meaning in Marathi

कार्ड टोकनाइझेशन ही एक प्रक्रिया आहे.ज्यात संवेदनशील डेटाला गैरसंवेदनशील डेटामध्ये रूपांतरीत केले जाते.

कार्ड टोकनाईझेशन मध्ये आपल्या क्रेडिट कार्ड तसेच डेबिट कार्डची वैयक्तीक माहीती एका युनिक कोडमध्ये रूपांतरीत केली जाते.

याने आपण ह्या टोकनचा वापर करून आपल्या मोबाइल मधील एखाद्या थर्ड पार्टी अँपवरून,क्युआर कोडवरून किंवा पाँईट आँफ सेलवरून काँन्टँक्टलेस पदधतीने पेमेंट करू शकतो.

या टोकनाइज पेमेंट सिस्टममध्ये सहभागी असलेली प्रत्येक कंपनी ही आरबीआय अंतर्गत रेजिस्टर असणे आवश्यक असते.

कार्ड टोकनाईझेशन सिस्टम सुरू करण्याचा आरबी आयचा मुख्य हेतु काय आहे?

कार्ड टोकनाईझेशन सिस्टम सुरू करण्याचा आरबी आयचा मुख्य हेतु आर्थिक देवाणघेवाणीचा व्यवहार payment system अधिक सुरक्षित आणि मजबूत करणे हा आहे.

See also  ३० एप्रिल रोजी आयुष्यमान भारत दिवस का साजरा केला जातो? - Ayushman Bharat

कार्ड टोकनाइझेशनचे फायदे कोणकोणते असतात?benefits of card tokenization in Marathi

1)टोकनाईझेशन हे कुठल्याही डेटाचे योग्य स्वरूप आणि संरचना प्रसारीत करण्यास साहाय्य करते.ज्याने जे सायबर अटँक होत असतात त्याचे प्रमाण कमी होत असते.

2) टोकन दवारा आपण जे पेमेंट करत असतो ते पेमेंट प्रोससर व्यतीरीक्त इतर कोणालाही वाचता येत नसते.

3) टोकनाइझेशनमुळे ग्राहकाचे प्रमाणीकरण जो पर्यत होत नाही तोपर्यत कुठलाही आर्थिक देवाणघेवाणीचा व्यवहार होत नसतो.

4) याने आपल्या फाईलचा पासवर्ड,तसेच इतर बँकिंग डिटेल देखील सुरक्षित राहत असते.

टोकनाइझेशनचे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत?

टोननाइझेशन दोन प्रकारचे असतात-

1)फ्रण्ट एंड टोकनाइझेशन :

2) बँक एंड टोकनाइझेशन :

1)फ्रण्ट एंड टोकनाइझेशन :

टोकनाइझेशनच्या हया प्रकाराची निर्मिती ग्राहकाकडुन केली जात असते.ज्यात तो त्याची मुळ ओळख लपवित असतो.आणि डिजीटल स्वरुपात याचा वापर करत असतो.

या टोकनचा वापर करत असलेला व्यक्ती डिजीटली साक्षर असायला हवा.त्याला टेक्निकल ज्ञान असायला हवे.ज्याने त्याला आँनलाईन टोकन कसे तयार करतात हे कळत असते.

2) बँक एंड टोकनाइझेशन :

बँक एंड टोकनाइझेशन तेव्हा वापरले जात असते,जेव्हा आयडेंटीफायर आपले टोकन इतरांसोबत शेअर करत असतो.आणि त्याची मुख्य ओळख इतरांपासुन लपवत असतो.आणि आपल्या डेटाला सिक्युअर करत असतो.