SBI Global International Debit Card माहीती, अर्ज,फायदे लिमिट व फी – SBI debit card information in Marathi

SBI Global International Debit Card माहीती – SBI debit card information in Marathi

आपल्यापैकी जे व्यक्ती एसबीआय ग्लोबल इंटरनँशनल डेबिट कार्डचा वापर करता आहे.त्यांना ह्या कार्डमधुन आपणास स्टेट बँकेकडुन कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तसेच यातुन रोज कँश काढण्याचे कोणकोणते नियम आहेत ज्यांचे आपण पालन करणे गरजेचे आहे.ह्या कार्डचे लिमिट काय असते?

यात आपल्याला बँकेला किती चार्ज द्यावा लागत असतो? तसेच ह्या कार्डचे कोणकोणते फायदे आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.

म्हणुन आजच्या लेखात आपण एसबीआयच्या ग्लोबल इंटरनँशनल डेबिट कार्डविषयी थोडक्यात आणि मुददेसुद माहीती जाणुन घेणार आहोत.

SBI Global International Debit Card काय आहे?

आपल्या सर्वाना माहीतच आहे की स्टेट बँक आँफ इंडिया(SBI) आपल्या कस्टमर्ससाठी नेहमी नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते.त्यातच नवीन खाते उघडल्यावर एसबी आय आपल्या कस्टमर्सला ग्लोबल इंटरनँशनल डेबिट कार्डची सुविधा देत आहे.

हे डेबिट कार्ड तीन प्रकारात उपलब्ध करून दिले जाते आहे रूपे,मास्टर कार्ड,व्हिसा.पण जुलै 2022 पासुन मास्टर कार्ड हे बँन करण्यात आले आहे त्यामुळे हे डेबिट कार्ड रूपे आणि व्हिसा या दोनच प्रकारात उपलब्ध आहे.

म्हणुन आपणास नवीन डेबिट कार्ड घ्यायचे असेल तर आपण फक्त रूपे आणि व्हिसा वाले डेबिट कार्ड घेऊ शकतो.

  • आणि डेबिट कार्ड ही एक अशी सुविधा आहे जी बँकैत खाते उघडत असलेल्या प्रत्येक खातेधारकास बँकेकडुन दिली जात असते.
  • SBI Global International Debit Card हे एक आंतरराष्टीय डेबिट कार्ड आहे ज्याचा वापर आपण ट्रान्झँक्शनसाठी शाँपिंगसाठी भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील करू शकतो.
  • जर आपल्याला देखील बँकेकडुन ही सुविधा देण्यात आली आहे तर आपल्याला कोणते डेबिट कार्ड मिळाले आहे त्यात काय सुविधा आपणास मिळणार आहे.त्या कार्डचे कोणकोणते फायदे आपणास होणार आहे.हे आपण जाणुन घेणे आपले प्राथमिक कर्तव्य आणि हक्क सुदधा आहे.
  • तुम्हाला देखील एसबीआयचे ग्लोबल इंटरनँशनल डेबिट कार्ड प्राप्त झाले आहे तर त्या कार्डचा वापर करून आपण रोज किती आँनलाईन ट्रान्झँक्शन करू शकतो हे आपल्याला माहीत असायला हवे.
See also  शेअर मार्केट म्हणजे काय? (share market information in Marathi ) 3 मुख्य इंडेक्स निर्देशांक

SBI च्या Global International Debit Card चे Daily Withdrawal Limit किती आहे?

एसबीआयच्या ग्लोबल इंटरनँशनल डेबिट कार्डचा वापर करून आपण आपल्या एटीएम मधुन रोज किमान शंभर रूपये इतकी रक्कम काढु शकतो.

भारतीय स्टेट बँक आँफ इंडियाने आपल्या आँफिशिअल वेबसाईटवर असे सांगितले देखील आहे की ह्या डेबिट कार्डचा वापर करून कुठलाही कस्टमर रोज जास्तीत जास्त 40 हजार एवढी रक्कम काढु शकतो.

म्हणजेच ह्या डेबिट कार्डचा डेली Domestic Pos(Point Of Sell)
तसेच आँनलाईन ट्रान्झँक्शनचे Maximum Limit हे 75 हजार इतके आहे.यात डेली 75000 हजार पर्यत आँनलाईन शाँपिंग खरेदी आपल्याला करता येते.यात कस्टमर्सला मिनिमम लिमिटची कुठलीही अट लागु करण्यात आलेली नाहीये.

यात International POS Limit 75000 इतके आहे.आणि International Transaction Limit For Per Transaction Per Month 50000 इतके आहे.

SBI च्या Global International Debit Card कार्डवर Charges किती भरावे लागणार आहेत?

एसबी आयकडुन इंटरनँशनल डेबिट कार्डवर ट्रान्झँक्शन करण्याच्या बदल्यात काही चार्ज देखील घेतले जात असतात.

पण सध्या ह्या डेबिट कार्डवर कुठल्याही प्रकारचा चार्ज लावण्यात आलेला नाहीये.फक्त यात वार्षिक मेंटेनस चार्जच्या रूपात 125 रूपये + जीसटी एवढा आपल्याला भरावी लागत असतो.

आणि ह्या 125 रूपयात जीएसटी अँड करून आपल्याला टोटल 147.5 रूपये लागणार आहेत.आणि हा चार्ज प्रत्येक वर्षी आपल्या खात्यावरून कट केला जात असतो.

आणि जर आपल्याला कार्ड रिप्लेस करायचे असेल तर त्याचा चार्ज 300 रूपये +जीएसटी एवढा आपणास भरावा लागणार आहे.

SBI च्या Global International Debit Card चे फायदे कोणकोणते आहेत?

● भारतामधील 52 लाखापेक्षा अधिक मर्चट आऊटलेटमध्ये तसेच जगभरातील तीन करोडपेक्षा अधिक आऊटलेटसवर ह्या कार्डदवारे आपणास शाँपिंग करण्याची संधी प्राप्त होते.

● एसबी आयच्या ह्या ग्लोबल इंटरनँशनल डेबिट कार्डचा वापर करून आपण मुव्हीचे तिकिट बुक करू शकतो,इंटरनेटदवारे आँनलाईन पेमेंट करू शकतो,बिल पे करू शकतो.

See also  Market cap किंवा  market capitalization म्हणजे काय ? What is market capitalization in Marathi  

● ह्या कार्डचा वापर करून कस्टमर भारतामध्ये तसेच संपुर्ण जगभरात कुठेही एसबी आय एटी एमदवारे किंवा इतर कुठल्याही एटीएमदवारे पैसे काढु शकतात.

● यात आपण Nfc Terminal वर डेली पाच हजार पर्यतचा पैशांच्या देवानघेवानीचा व्यवहार कुठलाही पिन नंबर इंटर न करता Contactless Transition दवारे करू शकतो.यात पुर्ण दिवसासाठी Maximum 5 Contactless Transaction ची सुविधा देखील आपणास देण्यात येत आहे.

● आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ह्या ग्लोबल इंटरनँशनल डेबिट कार्डचा वापर करून आपणास Secure Online Shopping तसेच E Commerce Transaction करता येते.

● ह्या कार्डदवारे कुठलीही शाँपिंग खरेदी केल्यावर आपल्याला रिवाँर्ड पाँईटण्ट देखील मिळत असतो.यात जर आपण 200 रूपयाची शाँपिंग ट्रँव्हल बुकिंग केली तर आपणास दोन एसबीआर रिवाँर्ड पाँईण्ट प्राप्त होतात.

● ह्या डेबिट कार्डवरून सुरूवातीचे तीन ट्रान्झँक्शन एक महिन्यात आत केल्यास आणि ते ही फास्ट पुर्ण केल्यावर आपणास 200 रूपये बोनस पाँईण्ट दिला जातो.

● रिवाँर्ड पाँईटचा वापर करून आपण एखादे गिफ्ट व्हाऊचर खरेदी करू शकतो किंवा एसबीआयच्या साईटवरून शाँपिंग करता येत असते.तसेच रिचार्ज देखील करता येतो.

SBI चे Global International Debit Card घेण्यासाठी तसेच (Apply) करण्यासाठी काय करावे?

आपणास जर हे डेबिट कार्ड घ्यायचे असेल तर आपण आँनलाईन देखील यासाठी अँप्लाय करू शकतात.ज्यात आपण एसबीआय नेट बँकिंगदवारे,तसेच योनो स्पेदवारे ह्या कार्डसाठी अँप्लाय करू शकतो.

● सगळयात पहिले आपण एसबीआयच्या आँफिशिअल वेबसाईटला व्हीझिट करावे.

● आणि आपले नाव आणि पासवर्ड टाकुन त्यात लाँग इन करून घ्यावे.

● मग एसबीआयच्या होम पेजवर जावे जिथे E Service नावाचे एक आँप्शन आपणास दिसुन येईल.त्यावर ओके करावे

● E Services वर ओके केल्यावर एक एटीएम कार्डचे आँप्शन दिसुन येते त्यावर ओके करावे.

● मग एटीएम कार्ड आँप्शनवर क्लीक केल्यावर त्याच्या Service Menu मध्ये आपल्याला 6 Option दिसुन येतात ज्यात आपण Request
Atm आणि Debit Card ह्या आँप्शनला सिलेक्ट करावे.

See also  बिटकॉईन म्हणजे काय? बिटकॉईन मायनिंग काय असते ? सोप आणि साध !!

● मग यात आपल्याला आपले Primary Account विचारले जाते यात आपण आपले बँक अकाऊंट सिलेक्ट करून घ्यावे.

● खाली स्क्रोल केल्यावर आपल्याला कार्डची Category विचारली जाते जिथे आपण Debit Card Select करावे.

● मग आपल्याला Name Of The Card मध्ये आपल्याला जे नाव हवे आहे ते टाईप करायचे असते.

● त्यानंतर खाली Select Type Of Card मध्ये दिलेल्या कार्ड लिस्टमधून कुठलेही एक इंटरनँशनल डेबिट कार्ड सिलेक्ट करून घ्यावे.

● कार्ड सिलेक्ट करून I Accept वर ओके करून Submit Button वर ओके करावे.

● मग आपल्याला पुढे Delivery Address(डेबिट कार्ड ज्या पत्यावर हवे आहे तो) विचारला जातो यात आपण बँकेला दिलेला Register Address पण सिलेक्ट करू शकतो किंवा नवीन अँड्रेस देखील टाकु शकतो.अँड्रेस फिल केल्यानंतर Submit Button वर ओके करावे.

● मग शेवटी आपल्या मोबाईलवर एक ओटीपी सेंड केला जो आपण तिथे इंटर करायचा असतो आणि सबमीट वर ओके करायचे असते.

मग यानंतर आपल्याला आपले डेबिट कार्ड रिक्वेस्ट रेकार्ड करण्यात आली आहे असा मँसेज डिस्पले होतो जो अँड्रेस आपण फिल केलेला असतो त्यावर आपल्याला हे कार्ड पाठवले जाते.

ATM Card,Debit Card आणि Credit Card या तिघांमध्ये काय फरक आहे?

 

ATM Card,Debit Card आणि Credit Card या तिघांमध्ये काय फरक आहे? – Types of Bank Cards and Their Features