Google Scholar विषयी माहीती – Advantages of using Google Scholar

Google म्हणजे काय?

आज लाखो ,करोडो लोक गुगलचा वापर करून इंटरनेटवरून आपल्याला पाहिजे ते माहीती सर्च करत असतात.

आज करोडोंच्या संख्येने लोक इंटरनेटवरून कुठलीही माहीती प्राप्त करण्यासाठी गुगलचा अधिक जास्त वापर करताना आपणास दिसुन येतात.

पण रोज गुगलचा सातत्याने वापर करून देखील आपल्याला गुगल म्हणजे काय?गुगल कशाला म्हटले जाते तसेच गुगलचा मराठीत तसेच इंग्रजीत काय अर्थ होतो?त्याचा फुल फाँर्म काय आहे हे आपल्यांपैकी बहुतेक जणास अजिबात माहीत नसते.

Google चा फुल फाँर्म काय होतो?

गुगलचा फुल फाँर्म Global Organization Of Oriented Group Language Of Earth असा होतो.

पण गुगलचा तसा कुठलाही आँफिशिअल फुलफाँर्म नाहीये.

Google चा मराठीत काय अर्थ होतो?

• गुगल हे एक सर्च इंजिन आहे त्यामुळे त्याला मराठीत शोधयंत्र असे म्हटले जाण्यास कुठलीही हरकत नाही.
• पण गुगल हे एक नाव आहे जे आपण भाषेनुसार चेंज करू शकत नाही.म्हणुन गुगलचा इंग्रजी प्रमाणे मराठीत देखील गुगल हाच अर्थ होतो.
• गुगलचा अर्थ एका वर शंभर पेक्षा अधिकदा केलेला शुन्याचा प्रयोग असा देखील निघतो.
• गुगल हे गुगल कंपनीचेच एक प्रोडक्ट तसेच सर्विस आहे पुर्ण जगातील सर्वात मोठे आणि अत्यंत लोकप्रिय असे हे सर्च इंजिन आहे.
• ज्यावर आपण एखादी माहीती प्राप्त करण्यासाठी एखादा किवर्ड टाईप करत असतो तर त्या किवर्डवर जेवढे रिझल्ट गुगलवर उपलब्ध आहेत असे सर्व रिझल्ट दाखवण्याचे काम गुगलचे सर्च इंजिन करत असते.
• आणि हे सर्च इंजिनचे देखील काही अलगोरिदम असतात ज्यानुसार ते नेहमी वर्क करत असते.

See also  ICC म्हणजे काय? स्थापना, कार्य,इतिहास व सदस्य देश - International Cricket Council Marathi Mahiti

याव्यतीरीक्त देखील गुगल कंपनीचे अनेक प्रोडक्ट सर्विस मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.पण गुगलची कमाई मुख्यकरून जाहीरातीतुनच होते.

Google चे Founder आणि Co-founder कोण आहे?

● लँरी पेज (फाऊंडर)
● सर्जे ब्रिन (को फाऊंडर)

Google कंपनीचे CEO कोण आहे?

सुंदर पिचाई हे गुगल कंपनीचे CEO आहेत.

Google Scholar विषयी माहीती – Advantages of using Google Scholar:

जेव्हा गुगल क्रोममध्ये जाऊन सर्च इंजिनमध्ये एखादा वर्ड टाईप करून सर्च करत असतो.तेव्हा त्या वर्डशी संबंधित अशी कुठलीही न्युज,तसेच इतर कंटेट तसेच आपल्याला आवश्यक नसलेली माहीती आपल्याला दिसुन येत असते.

• गुगलचे अल्गोरिदम आपणास अपेक्षित असा सर्वोतम सर्च रिझल्ट देण्याचा प्रयत्न करीत असतात.पण समजा आपल्याला एखादा संशोधन पेपर , अॅबस्ट्रॅक्ट , ऍकेडॅमिक Research Paper हवा असेल पण जेव्हा आपण इंटरनेटवर तो सर्च करत असतो.

• तेव्हा त्या किवर्डवर आधारीत निरनिराळया प्रकारचे कंटेट आपल्याला सर्च रिझल्टमध्ये दिसुन येत असतात.कारण गुगलवर आज माहीतीचा प्रचंड भांडार उपलब्ध आहे.

• आणि त्यातील बेस्ट कंटेट गुगल आपल्याला दाखवण्यासाठी प्रयत्नशील असते.
• पण गुगलवर जे रिझल्ट आपल्यापुढे शो होत असतात ते संशोधकांसाठी,अभ्यासकांसाठी कुठल्याही उपयोगाचे ठरत नसतात.

• अशा वेळी आपण खुप निराश होत असतो कारण आपल्याला एखादी महत्वाची संशोधनपर माहीती हवी असते?आणि इतर व्यर्थ माहीती आपल्यासमोर येऊन लागलेली असते.

• यावर उपाय म्हणुन गुगलने 2004 मध्ये एक गुगल स्काँलर नावाची सर्विस सुरू केली आहे.

आपण गुगलच्या ह्याच सर्विस तसेच फिचरविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.ज्याचा वापर केल्याने आपण इंटरनेटवरील निरर्थक माहीती वाचण्यात आपला जो अमुल्य वेळ वाया जात असतो तो वाचवू शकतो त्याची बचत करू शकतो.

Google Scholar काय आहे? Google Scholar चा उपयोग

गुगल स्काँलर हे गुगलने सुरू केलेले एक नवीन फिचर तसेच सर्विस आहे.जे गुगलने 2004 मध्ये सुरु केले होते.

See also  मराठीत ब्लॉग म्हणजे काय ?-what is Blog in Marathi

• गुगल स्काँलर हा शोध निबंध तसेच प्रबंध यांचा एक उत्तम संग्रह आहे.विदयार्थी,संशोधक,यांचा इंटरनेटवरील एक दिशा दर्शक,मार्गदर्शक तसेच उत्तम मित्र देखील आहे.

• गुगल स्काँलर हे वेबवर सर्व अनुक्रमित असलेली माहीती न शोधता फक्त महत्वाचे प्रकाशक,विद्यापीठ आणि विद्वान वेबसाईटवरील संशोधनपर,अभ्यासपुर्ण माहीतीचा भांडार शोधण्याचे काम करते.

• गुगलच्या सर्च बारमध्ये गुगल स्काँलर असे टाईप करून आपण ह्या गुगल स्काँलरच्या वेबसाईटवर जाऊ शकतो.
• मग इथे ह्या वेबसाईटवर गेल्यावर आपल्याला हवी ती संशोधनपर माहीती आपण शोधू शकतो.

• आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे ह्या वेबसाईटवर जाऊन सर्च केल्यावर आपल्याला जी माहीती दिसुन येत असते ती सर्व माहीती Research Paper मधील माहीती असते.इतर कुठलीही वायफळ माहीती इथे आपल्यासमोर दाखवली जात नाही.

• या वेबसाईटचा अजुन एक फायदा असतो तो म्हणजे एखाद्या रिसर्च पेपरला किती साईटेशन प्राप्त आहे हे देखील इथे आपणास दाखवले जाते ज्याने आपल्याला त्या रिसर्च पेपरची उपयुक्तता किती आहे हे लक्षात येते.

• ह्या वेबसाईटवर आपणास Google Scholar Metric देखील आपणास उपलब्ध करून देण्यात आले आहे.ज्यातुन टाँपचे शंभर प्रकाशने आपल्याला दाखवली जात असतात.

• पाच वर्षामधील एच इंडेक्स आणि एच मेडियन इंडेक्स च्या बेसवर पब्लिकेशन शो केले जात असते.याचसोबत ह्या साईटवर आपण आपल्या आवडीच्या विषयांवरील सर्व प्रकाशने शोधू शकतो.

• यात आपल्याला कोणता रिसर्च पेपर कुठल्या साली प्रकाशित करण्यात आला आहे त्यानुसार देखील सर्च करता येत असते.

• आणि यात जेव्हा आपण एखाद्या किवर्डवर सर्च करत असतो तेव्हा त्याच्याशी निगडीत इतर विषय देखील गुगकडुन आपणास सुचवले जात असतात.या देखील गुगल स्काँलरचा एक चांगला फायदा आहे.

• उदा जर आपण सर्चबार मध्ये इकोनाँमिक असे देखील सर्च केले तरी त्याच्या इतर उपशाखा गुगल आपल्याला Suggest करत असते.

See also  वाय प्लस अणि झेड प्लस सुरक्षा मध्ये काय फरक असतो?Difference between z+ and y+ security in Marathi

• म्हणजेच गुगल स्काँलरदवारे आपण कुठलीही शैक्षणिक माहीती प्राप्त करू शकतो.

Google Scholar कोणासाठी आहे?गुगल स्काँलरचा वापर कोण करू शकते?

जे विदयार्थी,संशोधक,प्राध्यापक,लेखक,साहित्यिक एखाद्या विषयावर संशोधनपर प्रबंध तसेच ग्रंथ लिहित आहेत.पीएचडी करीत आहेत तसेच ज्यांना Research Paper मध्ये, संशोधनपर लेखणात Interest आहे अशी प्रत्येक व्यक्ती संशोधनपर माहीती प्राप्त करण्यासाठी ह्या वेबसाईटचा वापर करू शकते.