बँक अकाऊंट विषयी माहीती
आज आपल्याला आपल्या आर्थिक देवाण घेवाणीच्या व्यवहारासाठी कोणत्या तरी एका बँकेत आपले खाते चालु करणे फार गरजेचे असते.
कारण बँकेत आपण आपले खाते चालु केलेले नसेल तर आपल्याला समोरून एखाद्या व्यक्तीने पाठवलेली मोठी कँश आँनलाईन डिजीटली रिसिव्ह करता येत नसते.
तसेच आपल्या खात्यातुन इतर खात्यात पैसे ट्रान्सफर देखील करता येत नसतात.यावरून आपल्या लक्षात येते की बँकेत अकाऊंट असणे किती महत्वाचे असते.
पण ह्या बँक अकाऊंटचा देखील एक विशिष्ट असा प्रकार नसतो.म्हणुन बँकेत खाते ओपन करत असताना आपल्याला बँक अकाऊंट आणि त्याच्या विविध प्रकारांविषयी माहीती असणे फार आवश्यक असते.
मगच आपण ठरवू शकत असतो की आपल्याला कोणते अकाऊंट ओपन करायचे आहे.
म्हणुन आजच्या लेखात आपण बँक अकाऊंटविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
बँक अकाऊंट म्हणजे काय?
बँक अकाऊंट म्हणजे आपले बँकेतील एक खाते असते.जे आपले पैसे सुरक्षित राहावे यासाठी तयार केले जाते.म्हणजे नंतर आपल्याला आवश्यकता भासेल तेव्हा ते पैसे आपल्याला काढता येत असतात.बँक अकाऊंट द्वारे आपण पैशांची देवाण घेवाण करू शकतो.तसेच इतर आर्थिक व्यवहार देखील पार पाडु शकतो.
आणि आज सर्व काही डिजीटल होत चालले असल्यामुळे आपण युपीआय पिनद्वारेच आपले सर्व ट्रान्झँक्शन करत असतो.
आणि युपी आय पिन नसला तरी आँनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँक अकाऊंट तसेच आय एफ एससी कोडतरी आपल्याला लागतच असतो.
आणि हा युपीआय कोड तसेच बँक अकाऊंट नंबर,आय एफ एससी कोड आपण तेव्हाच समोरच्या व्यक्तीला देणे शक्य होते जेव्हा आपले एखाद्या बँकेत खाते ओपन असते.
बँक अकाऊंटचे किती प्रकार आणि कोणकोणते असतात?
बँक अकाऊंटचे एकुण 6 प्रमुख प्रकार असतात जे पुढीलप्रमाणे असतात : How many types of bank account ?
1)सेव्हिंग अकाऊंट :
2) करंट अकाऊंट :
3) फिक्स डिपाँझिट अकाऊंट :
4) रेकरींग डिपाँझिट अकाऊंट :
5) डिमँट अकाऊंट :
6) एन आर आय अकाऊंट :
1)सेव्हिंग अकाऊंट :
1)सेव्हिंग अकाऊंट :
- सेव्हिंग अकाऊंट हा एक साधारण अकाऊंटचा प्रकार आहे.ज्यात आपल्याला फक्त आपल्या खात्यात समोरून आलेली कँश काढता येत असते.
- नावाप्रमाणेच बचत खाती एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा संयुक्तपणे दोन लोकांकडून पैसे वाचवण्याच्या उद्देशाने उघडली जाऊ शकतात.
- आणि आपल्या सेव्हिंग खात्यात अडीअडचणीसाठी बचत म्हणुन कँश जमा म्हणजेच सेव्ह करता येत असते.आणि त्याच जमा केलेल्या रक्कमेवर बँक आपल्याला थोडेफार व्याज देखील देत असते.
- सेव्हिंग अकाऊंट मध्ये पैसे बचत करण्यासाठी आपण जाँईन अकाऊंट देखील ओपन करू शकतो.
सेव्हिंग अकाऊंटची काही महत्वाची वैशिष्टये :
- ज्यांचे सेव्हिंग अकाऊंट ओपन आहे त्यांना बँकेकडुन डेबिट कार्ड तसेच एटीएम कार्डची सुविधा प्राप्त होत असते.
- सेव्हिंग अकाऊटमध्ये आपल्याला बँकेकडुन जे व्याज दिले जाते ते 4 ते 6 ट्कके पर्यत बदलत असते.
- सेव्हिंग अकाऊंटसाठी अकाऊंट मध्ये किमान शिल्लक राखण्याची कोणतीही अट नसते.
- सेव्हिंग अकाऊंट हे मुख्यकरून स्टुडंट,पेन्शनर,आणि व्यवसायिकांसाठी मुख्यकरून असतेयात आपण कितीवेळा पैसे जमा करावे याची कोणतीही मर्यादा नसते पण आपण कितीवेळा पैसे काढावे यावर मर्यादा लादली जात असते.
2) करंट अकाऊंट :
- करंट अकाऊंट म्हणजे हे आपले एक चालु खाते असते.ज्याला आपण झिरो बँलन्स अकाऊंट असे देखील म्हणत असतो.
- करंट अकाऊंटमध्ये एखाद्या उद्योजक,व्यापारी किंवा एखादी संस्था आपले खाते ओपन करत असते.कारण ह्या अकाऊंटद्वारे त्यांना अधिकाधिक पैशांची देवाण घेवाण करता येत असते.
- एवढेच नाही तर करंट अकाऊंटमध्ये आपण एका दिवसात आपल्याला जेवढे ट्रान्झँक्शन करायचे असेल तेवढे ट्रान्झँक्शन करू शकतो.फक्त यात त्रुटी एकच आहे की ह्यात आपल्याला बँकेकडुन कोणतेही व्याज दिले जात नसते.
3) फिक्स डिपाँझिट अकाऊंट :
- फिक्स डिपाँझिट अकाऊंट हा अकाऊंटचा एक असा प्रकार आहे जिथे आपण आपले पैसे जमा केल्याने आपल्याला बँकेकडुन एक निश्चित व्याजदर प्राप्त होत असते.
- आणि यात आपल्याला सेव्हिंग अकाऊंटपेक्षा अधिक व्याज प्राप्त होत असते.फक्त यासाठी आपल्याला एफ डी मध्ये आपल्या पैशांची थोडया दिर्घकाळासाठी गुंतवणूक करावी लागत असते.
- पण यात एक त्रूटी देखील आपल्याला दिसुन येते की आपण एका ठाराविक निश्चित कालावधीसाठी एफ डी मध्ये पैसे जमा केल्यानंतर जर इमरजन्सीसाठी दिलेल्या कालावधीच्या आधीच पैसे काढुन घेतले तर आपल्याला त्या पैशांवर थोडे कमी व्याज देखील मिळत असते.
4) रेकरिंग डिपाँझिट अकाऊंट :
- रेकरिंग डिपाँझिट अकाऊंट मध्ये आपण कोणतीही जमा करावयाची रक्कम टप्याटप्याने म्हणजेच एक महिन्यात किंवा तीन महिन्यात देखील जमा करत असतो.
- फक्त यात एक त्रुटी आहे की यात फिक्स डिपाँझिट पेक्षा कमी व्याजदर आपल्याला प्राप्त होत असते.
5) डिमँट अकाऊंट :
- डिजीटल स्वरुपात शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी आँनलाईन ट्रेडिंग करण्यासाठी आणि सिक्युरीटीसाठी डिमँट अकाऊंट ओपन केले जात असते.
- अशा प्रकारचे बँक अकाऊंट मँनेज करण्याचे काम नँशनल सिक्युरीटी डिपाँझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपाँझिटरी सर्विस लिमिटेड करत असते.
6) एन आर आय अकाऊंट :
- एन आर आय हे अकाऊंट अशा व्यक्तींसाठी असते जे भारतातीलच मुळ रहिवासी आहेत पण सध्या परदेशात वास्तव्य करीत आहेत.
- या अकाऊंटमध्ये आपल्याला सेव्हिंग अकाऊंट,फाँरेन करंसी अकाऊंट देखील ओपन करता येत असते.
बँक अकाऊंटचे महत्व काय आहे?
आपल्या संपत्तीची पैशांची आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी बँक अकाऊंट हे फार महत्वाचे असते.
बँक अकाऊंटचे महत्व पुढीलप्रमाणे असते :
- बँकेत आपले अकाऊंट असेल तर अडीअडचणीत आपण केव्हाही आपल्या खात्यातुन आपले पैसे काढु शकतो किंवा ते इतर कोणाला आँनलाईन गुगल पे फोनपे सारख्या माध्यमांचा वापर करून अर्जट ट्रान्सफर देखील करू शकतो.
- बँकेत खाते असल्याने आपण आपला मेहनतीचा पैसा सुरक्षित आपल्या बँक खात्यात ठेवू शकतो.आणि बँक स्वता आपल्या पैशांची काळजी देखील घेत असते.
- आणि बँकेच्या हलगर्जीपणामुळे जर आपले पैसे चोरीला गेले तर त्याची हमी देखील बँकेकडुन घेतली जात असते.म्हणजेच आपल्या पैशाला एक सुरक्षितता प्राप्त होत असते.
- खुप बँका आपल्याला फ्री तसेच कमी किंमतीत चांगल्या सर्विसेस देखील देत असतात ज्यांचा आपण लाभ उठवू शकतो.
- सेव्हिंग अकाऊटमध्ये पैसे जमा केल्याने बँकेकडून त्या पैशावर आपल्याला थोडेफार का होईना व्याज देखील प्राप्त होत असते.
- बँकेत आपले अकाऊंट असल्यास आपल्याला बँकेकडुन एटी एम कार्ड,क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड,नेट बँकिंग विविध प्रकारचे लोन्स जसे की होम लोन,कार लोन,एज्युकेशन लोन इत्यादी लोन सुविधा देखील मिळत असतात.
कोणतेही बँक अकाऊंट ओपन करण्यासाठी लागणारे महत्वाचे डाँक्युमेंटस कोणकोणते असतात?
- कोणतेही बँक अकाऊंट ओपन करण्यासाठी आपल्याला पुढील दिलेल्या काही महत्वाच्या डाँक्युमेंटसची नितांत आवश्यकता असते :
- आयडेंटीटी प्रुफसाठी -पँन कार्ड
- आधार कार्ड इत्यादी
- पासपोर्ट साईज दोन फोटो
- अँड्रेस प्रुफ साठी- रेशन कार्ड तसेच इत्यादी डाँक्युमेंटस.
पण एक गोष्ट आपण गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी की वेगवेगळया प्रकारचे अकाऊंट अलग अलग डाँक्युमेंटची आवश्यकता आपल्याला असते म्हणुन आपण त्यानुसारच योग्य ते डाँक्युमेंट जोडणे अधिक योग्य ठरेल.
बँक अकाऊंट धारकांना येत असलेल्या अडचणी कोणकोणत्या असतात?
- बँक अकाऊंट धारकांना बँकिंग व्यवहार करत असताना येत असलेल्या अडचणी पुढीलप्रमाणे असतात :
- बँकेचे सर्वर जर जाम असेल किंवा काही कारणास्तव ते बंद पडलेले असेल अशा वेळी सर्वर पुन्हा चालु होईपर्यत आपण आँनलाईन पैशांची देवाण घेवाण करू शकत नसतो.
- एक फिक्स लिमिट ठरवून आपल्याला त्या लिमिटमध्येच मनी ट्रान्झँक्शन करावे लागत असते.
- तसेच एटी एम मधुन आपल्याला पुन्हा पुन्हा पैसे काढता येत नाही.
- आपली बँक डिटेल तसेच एटी एम कार्ड क्रेडिट कार्ड नंबर कोणाकडे गेला तर तो आपल्या अकाऊंटमधून पैशांची चोरी देखील करू शकतो.
- सरकारचे आपल्या पैशांवर काटेकोरपणे लक्ष असते ज्यामुळे आपल्या इन्कम पेक्षा जास्त अधिक मोठा व्यवहार केल्यावर आपल्याला सरकारला इन्कम टँक्स भरावा लागत असतो.
बँक अकाऊंटविषयी बँक खाते धारकांकडुन वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न –
1) बँक अकाऊंट हे किती प्रकारचे असतात?
जसे की आपण वरील लेखात बघितले की बँक अकाऊंटचे एकुण सहा प्रकार आहेत ज्यात सेव्हिंग अकाऊंट,करंट अकाऊंट,फिक्स डिपाँझिट अकाऊंट,डिमँट अकाऊंट,एन आर आय अकाऊट तसेच रेकरिंग डिपाँझिट अकाऊंट अशा सहा अकाऊंटसचा समावेश होत असतो.
2) डिमँट अकाऊंटचा फुल फाँर्म काय आहे?
डिमँट अकाऊंटचा फुलफाँर्म dematerialized account असा होत असतो.
3) डिमँट अकाऊंट काय असते?
डिजीटल स्वरुपात आपल्याला कोणत्याही कंपनीच्या शेअर्सची खरेदी विक्री करायची असेल किंवा आँनलाईन ट्रेडिंग करायची असेल तेव्हा सिक्युरीटीसाठी आपल्याला डिमँट अकाऊंट ओपन करावे लागत असते.
आणि अशा प्रकारचे बँक अकाऊंट मँनेज करण्याचे काम फक्त नँशनल सिक्युरीटी डिपाँझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपाँझिटरी सर्विस लिमिटेड करत असते.
4) एन आर आय अकाऊंटचे प्रकार किती आणि कोणकोणते असतात?
एन आर आय अकाऊंटचे खालीलप्रमाणे तीन प्रकारात विभाजन केले जात असते.
- एन आर ओ (non resident ordinary rupees
- एन आर ई(non resident externally rupee)
- एफ सी एन आर (foreign currency nonresident account)
5) दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी तसेच देवाण घेवाणसाठी कोणत्या प्रकारचे बँक अकाऊंट उत्तम ठरत असते?
- करंट अकाऊंट हे डेली ट्रान्झँक्शनसाठी अधिक उत्तम ठरते.
- कारण ह्या अकाऊंटद्वारे आपल्याला अधिकाधिक पैशांची देवाण घेवाण करता येत असते.
- एवढेच नाही तर करंट अकाऊंटमध्ये आपण एका दिवसात आपल्याला जेवढे ट्रान्झँक्शन करायचे असेल तेवढे ट्रान्झँक्शन करू शकतो.
Thanks for this information this is very helpful and understandable for us
Thank you
good