बांधकाम कामगार योजना 2022 माहीती , पात्रता, नोंदणी व लाभ – Bandhkam Kamgar Yojana 2022

Table of Contents

बांधकाम कामगार योजना 2022 विषयी माहीती – Bandhkam Kamgar Yojana 2022

मित्रांनो आज आपल्यातील खुप जण आहेत जे बांधकाम क्षेत्रात काम करतात.अशाच बांधकाम क्षेत्रात काम करत असलेल्या गरजु बांधकाम कामगारांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.

आजच्या लेखात आपण ह्याच बांधकाम योजनेविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

सोबत ह्या योजनेचा लाभ कोणास घेता येईल,योजनेसाठी अनुदान किती दिले जाणार,योजनेत सहभागी व्हायला आपणास कोणकोणती कागदपत्रे लागतील,

योजनेचे फायदे काय असतील योजनेसाठी नाव नोंदणी कशी अणि कुठे करायची इत्यादी सर्व महत्वपूर्ण बाबी आपण जाणुन घेणार आहोत.

बांधकाम कामगार योजना काय आहे?

बांधकाम कामगार योजना ही बांधकाम क्षेत्रात काम करणारया कामगार मजदुर वर्गासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.

बांधकाम कामगार योजना कोणत्या राज्यात लागु करण्यात आली आहे?

बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र राज्यात लागु करण्यात आली आहे.

बांधकाम कामगार योजनेची सुरूवात कोणी केली आहे?

बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे.

बांधकाम कामगार योजना राबविण्याचे सरकारचे उददिष्ट काय आहे?

बांधकाम कामगारांच्या हितासाठी लाभदायक योजना राबविणे अणि त्यात त्यांना सहभागी करून घेणे.त्यांना आत्मनिर्भर बनविणे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया मध्ये सुलभता निर्माण करते हे आहे.

See also  लोकमान्य टिळक निबंध अणि भाषण - Lokmanya Tilak essay and speech in Marathi

बांधकाम कामगार योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते?

एखाद्या नवीन इमारतीचे बांधकाम होत असताना त्या इमारतीचे काम सुरू झाल्यापासुन ते बांधकाम पुर्ण होईपर्यत ज्या ज्या कामगार मजदुर वर्गाने तिथे त्या बांधकाम क्षेत्रात काम केले असेल.

अशा सर्व कामगार मजदुरांना ह्या बांधकाम कामगार योजनेत आपली नावनोंदणी करून ह्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

बांधकाम कामगार योजना मध्ये कोणकोणत्या कामगारांचा समावेश होतो?

बांधकाम कामगार योजना मध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणारया प्रत्येक कामगार मजदुराचा समावेश होतो.

● असे कामगार जे इमारतीच्या बांधकामात खुदाई वगैरेचे काम करतात.

● जे कामगार इमारतीत फर्निचर बसवायचे काम करतात तसेच सुतार म्हणुन काम करतात.

● असे कामगार जे एखाद्या बांधकाम क्षेत्रात गवंडी म्हणुन पाटया उचलण्याचे काम करतात.

● असे कामगार जे इमारतीचे बांधकाम क्षेत्रात लाईट फिटिंगचे तसेच इलेक्ट्रीकल काम करतात.

● बांधकाम क्षेत्रात काम करणारे असे मजदुर कामगार देखील ह्या योजनेत लाभ घेऊ शकतात.जे रंग देण्याचे फरशी बसवण्याचे तसेच सेंट्रींग काम करतात.वेल्डिंगचे काम करतात.

इत्यादी

बांधकाम क्षेत्रात काम करत असलेल्या प्रत्येक मजदुर कामगार वर्गाचा ह्या योजनेत समावेश होतो.

बांधकाम कामगार योजना मध्ये सहभागी होण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील?

● पासपोर्ट साईज दोन फोटो

● रेजिस्ट्रेशन फाँर्म

● रेशन कार्डची प्रत

● आधार कार्ड किंवा मतदान कार्ड

बँकेचे खाते पासबुक प्रत

● आपण बांधकाम कामगार असल्याचे सर्टिफिकेट जे ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवकाकडून दिले जाते.

● नियोक्ताचे इंजीनियर तसेच ठेकेदार सर्टिफिकेट 90 दिवसांहून अधिक दिवस काम केल्याचे प्रमाण तसेच दाखला

● बांधकाम कामगार असल्याचे मनपा कडुन प्राप्त सर्टिफिकेट

बांधकाम कामगार योजना मध्ये सहभागी होण्याचे फायदे कोणकोणते आहेत?

बांधकाम कामगार योजना मध्ये सहभागी होण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत –

● ज्या बांधकाम कामगाराने ह्या योजनेत आपले नाव नोंदवले असेल अशा कामगारांना बांधकामासाठी जे साहित्य लागत असते ते साहित्य खरेदी करायला तीन वर्षातुन एकवेळेस पाच हजार रुपये दिले जाणार आहे.

See also  FSSAI फुल फॉर्म मराठी - FSSAI  संपूर्ण माहिती - FSSAI full form in Marathi

● ज्या बांधकाम कामगाराने ह्या योजनेसाठी आपले नाव नोंदविले असेल त्यांना घरातील पहिले लग्न होत असताना मुला मुलीच्या लग्नासाठी तीस हजारापर्यतची रक्कम दिली जाणार आहे.फक्त यासाठी विवाह नोंदणी सर्टिफिकेट असणे गरजेचे असेल.

● ह्या योजनेसाठी आपले नाव नोंदणी करणारया बांधकाम कामगाराच्या पत्नीला नैसर्गिक प्रसुती करण्याकरीता पंधरा हजार अणि आँपरेशन दवारे केल्या जाणारया प्रसुतीसाठी वीस हजार दिले जाणार आहे.फक्त प्रसुतीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

● ह्या बांधकाम योजनेसाठी आपले नाव नोंदणी करणारया बांधकाम कामगाराच्या किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिले जातील.

● सदर योजना साठी आपली नाव नोंदणी केलेल्या बांधकाम कामगाराच्या पहिले ते सातवी पर्यतच्या मुलासाठी शिक्षणाकरीता दरवर्षी दोन हजार पाचशे रूपये दिले जाणार आहे.फक्त यासाठी आपल्या पाल्याची शाळेत 75 टक्के हजेरी असणे गरजेचे आहे.

● तर आठवी ते दहावी पर्यत असलेल्या मुलाला दरवर्षी पाच हजार दिले जाणार आहे.इथे देखील मुलाची 75 टक्के हजेरी असलेले प्रमाण द्यावा लागेल.

● जर तो पाल्य अकरावी किंवा बारावीला असेल तर दरवर्षी त्याला ह्या योजनेअंतर्गत दहा हजार दिले जातील.तो पाल्य जर पदविकेचे शिक्षण घेत असेल तर त्यासाठी त्याला वीस हजार दिले जाणार आहे.इंजिनिअरींगला असेल तर इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी साठ हजार अणि वैद्यकीय शिक्षण घेत असेल तर एक लाख दिले जाणार आहे.

● सदर योजना मध्ये सहभागी असलेल्या बांधकाम कामगार एखादा कंप्यूटरचा कोर्स एम एस सीआयटी वगैरे कोर्स करत असेल तर त्याची फी देखील त्याला दिली जाणार आहे.फक्त कोर्स पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.

● जर त्या बांधकाम कामगाराने एक मुलगी जन्माला आल्यानंतर कुटुंब नियोजनासाठी आँपरेशन केले असेल तर त्या बांधकाम कामगाराच्या मुलीच्या नावावर तिचे अठरा वर्ष होईपर्यत १,००,००० मुदत बंद ठेव केले जातील.

● जर बांधकाम कामगाराच्या कुटुंबाला काही गंभीर आजार झाला असेल तर त्याच्यावर उपचार करायला १,००,०००लाखापर्यतचे अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत प्रदान केले जाणार आहे

See also  प्रेमपत्र - Love Letters In Marathi

● जर बांधकाम कामगार आपले व्यसन मुक्त करण्यासाठी व्यसन मुक्ती केंद्रात जाऊन आपला उपचार करत असेल तर त्यास उपचारासाठी सहा हजार पर्यतचे अर्थसाहाय्य प्रदान केले जाणार आहे.

● बांधकाम कामगाराला कामादरम्यान काही अपंगत्व आले तर उपचारासाठी २,००,००० दिले जाणार आहे.

● जर त्या बांधकाम कामगाराचे निधन झाले तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी दहा हजारापर्यतचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

● बांधकाम कामगाराचा मृत्यु झाल्यावर त्याच्या विधवा बायकोला सलग पाच वर्षे चोवीस हजारापर्यतचे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

● बांधकाम कामगार योजना मध्ये नाव नोंदणी केलेला कामगार जर काम करताना मृत झाला तर त्याच्या परिवाराला त्याच्या मृत्युनंतर ५,००,०००

● बांधकाम कामगाराला स्वताचे घर बांधायला ४,५०,००० अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.ज्यात केंद्र शासनाकडुन २,००००० अणि कल्याणकारी मंडळातर्फे २,५०,००० एवढे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

● ह्या योजनेसाठी नाव नोंदणी केलेल्या कामगारास महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा तसेच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ देखील उठविता येणार आहे.

● याच सोबत योजनेत सहभागी उमेदवाराला प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत देखील लाभ दिला जाणार आहे.

● बांधकाम कामगार योजना ह्या योजनेच्या लाभाची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा केली जाते.

● योजनेत सहभागी कामगारास मोफत मध्यान्ह जेवण दिले जाईल.

● मोफत सुरक्षा संच अणि आवश्यक असे संच देण्यात येतात.

● पात्र कामगाराला पुर्व शिक्षण अणि ओळख प्रक्षिक्षण दिले जाणार आहे.

बांधकाम कामगार योजना मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे?

बांधकाम कामगार योजना मध्ये आपले नाव नोंदविण्यासाठी उमेदवारास आँनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी आपली नाव नोंदणी कशी आणि कोठे करायची?

ह्या बांधकाम कामगार योजनेत सहभागी होण्यासाठी आपणास इमारत तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या आँफिशिअल साईटवर mahabocw.in वर व्हिझिट करावे लागेल.

● वेबसाइटच्या होम पेजवर जाऊन बांधकाम कामगार म्हणुन आपली नाव नोंदणी करावी.

● मग आपल्यासमोर एक नवीन पेज येईल तिथे आपली सर्व माहीती व्यवस्थित भरायची.मोबाईल नंबर,आधार नंबर जिल्हा

● मग प्रोसेस टु फाँर्मवर क्लीक करावे.बांधकाम कामगार नोंदणीचा अर्ज आपल्यासमोर येईल.यात आपली फँमिली डिटेल,पर्सनल डिटेल,बँक डिटेल इमपलाँई डिटेल भरायची असते.

● सर्व माहीती भरून खाली दिलेल्या सेव्ह बटणावर क्लीक करायचे.

बांधकाम कामगार योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी वयाची अट किती आहे?

18 ते 60 वयोगटातील लोक ह्या योजनेचा लाभ प्राप्त करू शकतात.

बांधकाम कामगार योजनेचे नोंदणी शुल्क किती आहे?

योजनेची नोंदणी फी 25 रूपये आहे.

 

ज्येष्ठ नागरीक बचत योजना SCSS माहीती – Senior Citizen Saving Scheme Details In Marathi

4 thoughts on “बांधकाम कामगार योजना 2022 माहीती , पात्रता, नोंदणी व लाभ – Bandhkam Kamgar Yojana 2022”

Comments are closed.