आपले मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण काय करावे -Tips for mental health

आपले मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण काय करावे -Tips for mental health

मित्रांनो आज आपली आपल्या आरोग्या प्रती जागरूकता असणे फार गरजेचे झाले आहे.
कारण दिवसेंदिवस नवनवीन आजार रोगराई हे जागोजागी पसरताना आपणास दिसून येत आहे.

आरोग्य म्हटले की आधी आपल्याला फक्त शारीरीक स्वास्थ,शारीरीक आरोग्य हेच माहीत होते पण आता दिवसेंदिवस जे मानसिक ताणतणाव वाढत आहे अणि त्यामुळे आपणास ज्या विविध प्रकारच्या मानसिक आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे

हे सर्व लक्षात घेता आता फक्त शारीरीक दृष्टया नव्हे तर आपण मानसिक दृष्टया देखील फीट अणि तंदुरूस्त निरोगी असणे गरजेचे झाले आहे.

हेच कारण आहे की लोकांमध्ये आता मानसिक आरोग्याविषयी दिवसेंदिवस जागरूकता वाढत आहे.
आपण आपल्या शारीरिक आरोग्यासमवेत मानसिक आरोग्याला देखील विशेष प्राधान्य देत आहे.

आजच्या लेखात आपण शारीरीक आरोग्यासोबत आपले मानसिक आरोग्य देखील नेहमी उत्तम राखण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात हेच सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

आपले मानसिक आरोग्य नेहमी उत्तम राखण्यासाठी आपण काय उपाय करायला हवे?

आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टींमुळे कारणांमुळे ताणतणावात चिंतेत राहत असतो.ज्याने आपले शारीरिक तसेच मानसिक आरोग्य बिघडत असते.

पण यावर काही असे छोटे छोटे उपाय आहेत जे आपण केले तर आपले मानसिक स्वास्थ्य कधीच खराब होणार नाही.

1)ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत त्यांचा अजिबात विचार करू नये –

ज्या गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये आहेत तसेच ज्या गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये नाहीयेत यांची एक यादी तयार करावी.

ज्या गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये आहेत अशा समस्या संकटांवर,अडचणींवर मात करण्यासाठी त्यातुन बाहेर पडण्यासाठी उपाय शोधावेत.जेणेकरून लवकरात लवकर आपणास त्यातुन बाहेर पडता येईल.

पण ज्या गोष्टी आपल्या अजिबात हातातच नाहीयेत ज्याविषयी आपण काहीच करू शकत नाही अशा समस्या अडचणी संकटे यांविषयी विचार करणे,चिंता करणे,ताणतणाव घेणे आपण सोडुन द्यायला हवे.

See also  Hydroponics - हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान -चारा

कारण आपण कितीही चिंता केली,विचार केला,ताणतणाव घेतला तरी ती समस्या अडचण आपल्या जीवनातुन दुर होणार नसते.मग विनाकारण टेंशन घेऊन आपण आपले मानसिक आरोग्य तरी कशाला खराब करून घ्यायचे.

2) मन हलके करायला हवे –

आपण आपल्या मनातील गोष्टी विचार भावना तगमग मनातच दाबून न ठेवता कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करायला हव्यात.

याने आपले मन हलके होत असते.तसेच आपल्या अडचणीवर समस्येवर एखादा चांगला उपाय देखील आपणास आपल्या जवळच्या व्यक्तीकडून मिळु शकतो.

म्हणजेच आपण आपल्या मनातील विचार,भावना तगमग मनातच दाबुन न ठेवता व्यक्त करणे शिकायला हवे.

मग व्यक्त होण्यासाठी आपण आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत याविषयी बोलायला हवे.किंवा इतरांशी बोलायला आपले प्राँब्लेम,मनातील गोष्टी शेअर करायला आपल्याला आवडत नसेल तर

आपण स्वताची एखादी वैयक्तिक डायरी लिहु शकतो ज्यात लिहुन आपण आपल्या मनातील भावना विचार तगमग व्यक्त करू शकतो.याने आपल्या मनावरचा भार देखील कमी होतो.अणि आपण व्यक्त देखील होत असतो.

3) मेडिटेशन तसेच योगा –

आपण रोज सकाळी किमान अर्धा तास तरी मेडिटेशन तसेच योगा करायला हवा.याने आपले शरीर फिट राहते आपल्याला कुठलाही शारीरिक आणि मानसिक आजार जडत नाही.ताणतणाव जाणवत नाही अणि आपले मन देखील नेहमी शांत,प्रफुल्लित,प्रसन्न अणि एकाग्र राहत असते.

4) नेहमी आपल्या जीवणात घडणारया सकारात्मक अणि चांगल्या गोष्टींवर घटना प्रसंगांवर लक्ष केंद्रित करावे

आपल्या जीवणात रोज अनेक ७५ टक्के चांगल्या अणि सकारात्मक गोष्टी घटना प्रसंग घडत असतात.पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो अणि आपल्या जीवनात ज्या २५ टक्के वाईट नकारात्मक गोष्टी घडत असतात त्याकडे अधिक लक्ष केंद्रित करत असतो.

याने कधीही आपल्याला वर्तमानात आनंदी समाधानी अणि खुश राहता येत नसते.

म्हणुन आपण जीवनात ज्या २५ टक्के वाईट,चुकीच्या अणि नकारात्मक गोष्ठी घडल्या आहे किंवा घडत आहेत त्याकडे दुर्लक्ष करून,तसेच ज्या काही गोष्टींची आपल्या जीवणात कमतरता आहे त्या विसरून

See also  लॉजिकल रिजनिंग म्हणजे काय? Logical reasoning in Marathi

७५ टक्के बाबी ज्या आपल्या जीवनात चांगल्या अणि सकारात्मक घडता आहे त्याकडे आपण आपले अधिक लक्ष केंद्रित करायला हवे.

जे आपल्या जीवणात आज वर्तमानात आपल्याकडे उपलब्ध आहे त्याची कदर करायला हवी.त्याचा आनंद अणि आस्वाद घ्यायला हवा.

5) नेहमी चांगले अणि सकारात्मक विचारच आत्मसात करावे –

आपल्याला जर आपले मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर आपण नकारात्मक विचार ऐकणे टाळायला हवे

किंवा नकारात्मक विचार असलेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात राहणे देखील टाळायला हवे.नकारात्मक बोलणे ऐकणे देखील बंद करायला हवे.

सकारात्मक विचार आत्मसात करायला हवे,सकारात्मक विचार असलेल्या लोकांच्या सान्निध्यात राहायला हवे,सकारात्मक विचार ऐकायला हवे आत्मसात करायला हवे.चांगली सकारात्मक विचार असलेली पुस्तके वाचायला हवी.

Leave a Comment