टॉपच्या प्रायव्हेट बँक मधील एफ डी रेटस – Top private Banks FD rates in Marathi –

टॉपच्या प्रायव्हेट बँक मधील एफ डी रेटस –
Top private Banks FD rates in Marathi –

आजच्या लेखामध्ये आपण देशातील टॉप प्रायव्हेट बँक्स मध्ये मिळणारा एफ डी वरती रिटर्न या विषयी माहिती पाहणार आहोत.या लेखामध्ये आपण देशातील मोठ्या प्रायव्हेट बँक जसे की ,एचडीएफसी बँक ,आईसीआईसीआई बँक ,ॲक्सिस बँक आणि यस बँकेच्या एफ डी वरती मिळणाऱ्या व्याजदरा विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

गुंतवणुकीचे महत्व – Importance of Investment in Marathi –


आजच्या युगात जर आपल्याला श्रीमंत बनायचे असेल तर आपण गुंतवणूक केली पाहिजे.आपण फक्त नोकरी च्या भरोषा वरती आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाही

.आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक केलीच पाहिजे.काही जण गुंतवणुकीमध्ये शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात ,तर काही लोक मुच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतत.

परंतु आजही काही लोकांना शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे वाटते ,ते अजूनही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायला घाबरतात.त्यांना आजही एफ डी मध्ये गुंतवणूक करणे सोपे आणि कमी रिस्क चे वाटते ,त्यामुळे आजही भारतातील भरपूर लोक एफ डी मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.


एफ डी वरती भारतातील भरपूर प्रायव्हेट बँक्स चांगला रिटर्न देत आहेत.काही सरकारी बँक च्या एफ डी वरील रिटर्न पेक्षा ,देशातील काही प्रायव्हेट बँक्स त्यांच्या एफ डी वरती चांगला रिटर्न देत आहेत.

See also  गुगल फोटो लाँक फोल्डर कसे वापरावे? Google Photos Locked Folder how to set up it?

एफ डी (फिक्स्ड डीपोजीट )मध्ये गुंतवणूक आणि त्यातून मिळणारा रिटर्न – Investment in FD and what is return we get from FD in Marathi –

Top private BANK FD RATES in marathi
Top private BANK FD RATES in marathi


एफ डी म्हणजे (फिक्स्ड डीपोजीट ) हा बँक द्वारे दिली जाणारी सुरक्षित आणि सर्वात जुनी गुंतवणूक योजना आहे.आजकाल बँका ७ दिवसांपासून ते १० वर्षा पर्यंतच्या एफ डी देते.आणि देशातील प्रत्येक बँकांचे एफ डी वर मिळणारे व्याजदर देखील वेगवेगळे असतात.

चला देशातील वेगवेगळ्या बँकांमध्ये एफ डी वरती असणार इंटरेस्ट रेट (व्याज दर ) – Top 4 private banks which gives maximum return on FD in Marathi –

Top 4 private banks which gives maximum return on FD in Marathi –

HDFCBANK FD Rate

१) एचडीएफसी बँकेत एफ डी वरती असणारा इंटरेस्ट रेट (व्याजदर ) – एचडीएफसी बँक ही भारतातील एक मोठी प्रायव्हेट बँक आहे आणि ही बँक त्यांच्या कस्टमर साठी विविध लोन योजना घेऊन येत असते.या बँकेमध्ये सामान्य नागरिकाला एफ डी वर ३% पासून ७.२५% पर्यंत व्याज मिळू शकतो .७.२५ % व्याज लोकांना ४ वर्ष ७ महिन्या पासून ते १० वर्षा पर्यंत असणाऱ्या एफ डी च्या प्लॅन वरती भेटू शकतो.एचडीएफसी बँकेमध्ये वरिष्ठ नागरिकांना एफ डी वर ७.७५ % पर्यंतचा व्याजदर मिळू शकतो.

ICICI BANK FD RATES
२) आईसीआईसीआई बँकेत एफ डी वरती असणारा इंटरेस्ट रेट (व्याजदर) – आईसीआईसीआई ही देखील भारतातील मोठी प्रायव्हेट बँक आहे.ह्या बँकेमध्ये सामान्य लोकांना ७ दिवसा पासून १० वर्षा पर्यंतच्या एफ डी प्लॅन वरती ७.१० % व्याजदर मिळू शकतो.त्यांच्या वेबसाईट नुसार ,ह्या बँक संबंधी असणारा व्याजदर हा २४ फेब्रुवारी २०२३ पासून लागू झाला आहे.

AXIS BANK FD RATES
३) ॲक्सिस बँकेत एफ डी वरती असणारा इंटरेस्ट रेट (व्याजदर ) – ॲक्सिस बँक देखील देशातील प्रसिद्ध प्रायव्हेट बँक पैकी एक बँक आहे.ही बँक सामान्य नागरिकांना एफ डी वर ३.५० % ते ७.१० % पर्यंतचा व्याजदर देते.एचडीएफसी बँकेच्या वेबसाईट नुसार एफ डी वरती मिळणारा व्याजदर हा १८ मे २०२३ पासून लागू केला आहे.

See also  EMI म्हणजे काय, त्याचे फायदे - What is EMI?

YES BANK FD RATES
४) यस बँकेत एफ डी वरती मिळणारा इंटरेस्ट रेट (व्याजदर ) – यस बँक ही देखील देशातील प्रसिद्ध बँक असणारी एक बँक आहे.ही बँक सामान्य नागरिकाला ४ दिवस ते १० वर्षांच्या एफ डी प्लॅन वरती ३.२५ % ते ७.७५% पर्यंतचा व्याजदर देते. यस बँकेच्या वेब साईट नुसार , यस बँके मध्ये मिळणारा एफ डी वरती व्याजदर हा २ मे २०२३ पासून लागू केला आहे.

आजच्या लेखामध्ये आपण देशातील टॉप प्रायव्हेट बँक्स मध्ये मिळणारा एफ डी वरती रिटर्न या विषयी माहिती पाहिली.या लेखामध्ये आपण देशातील मोठ्या प्रायव्हेट बँक जसे की ,एचडीएफसी बँक ,आईसीआईसीआई बँक ,ॲक्सिस बँक आणि यस बँकेच्या एफ डी वरती मिळणाऱ्या व्याजदरा विषयी संपूर्ण माहिती पाहिली.