प्री ॲप्रोवड लोन – Pre approved loan in Marathi –
आजच्या लेखामध्ये आपण प्री ॲप्रोवड लोन विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाला सुरवात करूयात.
आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळाव्यात जसे की , कार,घर ,इत्यादी .त्यासाठी आपण लोन काढतो आणि आपल्याला हव्या तो गोष्टी खरेदी करतो आणि जेवढी लोन ची रक्कम असेल तेव्हढी इएमआई द्वारे ती रक्कम बँकेला परत करतो.
जास्तकरून ज्या लोकांचे आर्थिक बॅकग्राऊंड चांगले असते अशाच लोकांना बँक लोन देत असते जर तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे, तर तुम्हाला बँक कडून लोन मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नाहीये ,तर तुम्हाला बँकेकडून लोन मिळण्याची शक्यता कमी आहे.
प्रि ऍप्रोवड लोन आणि रेग्युलर लोन मधील फरक -Difference between pre approved loan and regular loan in Marathi –
प्रि ऍप्रोवड लोन आणि रेग्युलर लोन मध्ये खूप फरक आहे.प्रि ऍप्रोवड लोन मध्ये बँकेकडून तुमची आर्थिक स्थिती लोन घ्यायच्या आधी पाहिली जाते आणि रेग्युलर लोन मध्ये बँकेकडून तुमची आर्थिक स्थिती लोन घेतल्या नंतर पाहिली जाते.
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांना बँक लोन देत असते ,बँक काही वेळा आपल्याला लोन घेण्यासाठी समोरून कॉल करते.बँकेतील माणसे आपल्याला लोन साठी कॉल करतात आणि लोन ची माहिती ,लोन चे फायदे आणि लोन च्या प्रीमियम ची रक्कम ते फोन वरती आपल्याला सांगतात.जर आपल्याला त्या लोन ची ऑफर मंजूर असेल तर आपण ते लोन घेतो ,याच लोन ला “प्रि ऍप्रोवड लोन” म्हणतात.
प्रि ऍप्रोवड लोन काय आहे ? What is the pre approved loan in Marathi ? –
बँक कडून लोन घेण्यासाठी तुम्हाला बँकेतील लोकांचा कॉल येतो ,त्या बँकेतील लोकांना तुमची आर्थिक स्थिती माहीत असते.
त्यांनी तुमच्या आर्थिक स्थिती चे अनालीसिस अगोदरच केलेले असते आणि तुमच्या आर्थिक स्थिती वरून ते तुमची लोन अमाऊंट ठरवतात आणि त्यावरून ते तुम्हाला लोन ऑफर करतात
तुमच्या आर्थिक स्थिती वरून समजते की,आपण किती पर्यंतची लोन रक्कम फेडू शकतो ? त्यामुळे ते तेवढीच लोन रक्कम ऑफर करतात ,जेवढी रक्कम आपण फेडू शकतो .
प्रि ऍप्रोवड लोन घेण्याचे फायदे कोणकोणते आहेत ?Banefits of pre approved loan in Marathi –
प्रि ऍप्रोवड लोन घेण्याचे खूप फायदे आहेत.तुम्हाला जर कोणत्याही बँक कडून प्रि ऍप्रोवड लोन साठी ऑफर आली असेल आणि तुम्हाला जर लोन ची गरज असेल तर तुम्ही त्या बँक कडून प्रि ऍप्रोवड लोन काढू शकता.
प्रि ऍप्रोवड लोन चा सर्वात मोठा फायदा हा की , लोन ची प्रीमियम रक्कम देण्यासाठी तुम्हाला सारखे सारखे बँकेत जावे लागत नाही.तुम्हाला जर समोरून प्रि ऍप्रोवड लोन साठी बँकेचा कॉल आला तर तुम्ही लोन च्या व्याजदरा मध्ये नेगोशिएशन देखील करू शकता.
तुम्ही जर नियमित लोन साठी निवेदन करत असाल तर त्याचा प्रभाव तुमच्या सिव्हिल स्कोर् वरती होतो ,परंतु प्रि ऍप्रोवड लोन चा तुमच्या सिव्हिल स्कोर वरती प्रभाव पडत नाही.
प्रि ऍप्रोवड लोन साठी निकश पात्रता -Eligibility Criteria for Pre approved loan in Marathi –
प्रि ऍप्रोवड लोन घेण्यासाठी तुम्हाला काही निकष पात्रता मध्ये बसावे लागते.प्रि ऍप्रोवड लोन साठी असणाऱ्या काही निकष पात्रता खालीलप्रमाणे :
१) तुम्हाला प्रि ऍप्रोवड लोन देण्या पूर्वी बँक तुमची आर्थिक स्थिती चेक करते ,तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल ,तर तुम्हाला प्रि ऍप्रोवड लोन मिळण्याची शक्यता कमी होते.
२) तुम्ही जर प्रि ऍप्रोवड लोन काढले असेल आणि तुम्ही जर त्याचा हफ्ता वेळेवर भरत नसाल तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट हिस्ट्री वरती होतो.
३) तुमच्या कडे जर क्रेडिट हिस्ट्री नसेल तर प्रि ऍप्रोवड लोन देण्यापूर्वी बँक तुमचा इन्कम सोर्स चेक करतात.
आजकाल प्रि ऍप्रोवड लोन वरून खूप लोग स्कॅम करतात ,त्यामुळे तुम्ही असल्या स्कॅम पासून दक्षता घेतली पाहिजे आणि विश्वासू बँका कडूनच प्रि ऍप्रोवड लोन घेतले पाहिजे.
आजच्या लेखामध्ये आपण प्रि ऍप्रोवड लोन विषयी संपूर्ण माहिती पाहिली,जसे की प्रि ऍप्रोवड लोन चे फायदे ? प्रि ऍप्रोवड लोन काय आहे ? आणि प्रि ऍप्रोवड लोन साठी असणारी निकष पात्रता काय आहे ?,इत्यादी.