Neo bank विषयी माहीती – NEO bank information in Marathi  

Neo bank विषयी माहीती NEO bank information in Marathi  

 आज अलीकडे फिन टेक ह्या कम्युनिटीमध्ये एक नवीन गुढ शब्द बनलेला आहे ज्याचे नाव निओ बँकिंग असे आहे.

आणि आपणास असे दिसुन येते आहे की न्युज चँनल्स आणि मिडियामध्ये एचए चर्चेत असल्यामुळे ह्या शब्दाला अधिक गती देखील प्राप्त होत आहे याचबरोबर निओ बँकेकडुन फिनटेक ह्या उद्योग व्यवसायावर जागतिक स्तरावर ताबा देखील घेतला जात आहे.

पण हे सर्व काय आहे अद्यापही आपल्याला माहीत नाहीये.म्हणुन आजच्या लेखातुन आपण निओ बँकेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

NEO Bank म्हणजे काय? NEO bank information in Marathi  

निओ बँक ही एक अशी वेगळया पदधतीची बँकिंग सुविधा देत असलेली स्टार्ट अप कंपनी तसेच डिजीटल बँक आहे जिची कोणतीही शाखा नाही. म्हणजे कोणत्या लोकेशन , जागेवर स्थित नसून ,निओ बँक च अस्तित्व हे फक्त एक आँनलाईन बँक आहे.जिथे आपल्याला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची कोणतीही आवश्यकता नसते.

निओ बँक हे एक आर्थिक सेवा सुविधा प्रदान करत असलेले क्षेत्र आहे.जे आजच्या मोबाईल इंटरनेट तसेच टेक्नाँलाँजी विषयी अधिक आवड असलेल्या तरूण पिढीच्या कस्टमरसाठी सुरू करण्यात आली आहे.

निओ बँकला फिन टेक फर्म असे देखील म्हटले जाते ज्यात सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा दिल्या जात असतात.ज्यात सेव्हिंग अकाऊंट,इन्व्हेस्टमेंट,पैशांची देवाणघेवाण,कर्ज देणे इत्यादी सुविधा प्रदान केल्या जातात.

ह्या निओ बँकेकडे कोणताही बँकिंग परवाना नाहीये.म्हणुन ह्या फिनटेक कंपन्या अशा बँकेसोबत पार्टनरशिप करतात.ज्यांना मान्यता प्राप्त आहे.आणि मग त्या बँकेप्रमाणेच किंवा तिच्यापेक्षा जास्त सेवा ह्या कंपनी आपल्या ग्राहकांना देत असतात.

See also  रिपेमेंट अणि प्रिपेमेंट म्हणजे काय? Repayment and prepayment meaning in marathi

सोबतच अशा देखील काही निओ बँक असतात ज्यांच्याकडे बँकिंगचा परवाना असतो.पण त्या आपल्या शाखा तयार करत नाही.

पण आता पांरपारीक बँक देखील स्वताच आपल्या निओ बँक स्थापण करीत आहे.आणि आपल्या ग्राहकांना निओ बँकची सुविधा उपलब्ध करून देत आहे हे करण्यामागचे त्यांचे एकच उददिष्ट आहे जास्तीत जास्त कस्टमरने आपल्याकडे यायला हवे आणि आपला कस्टमर बेस वाढायला हवा.

निओ बँक सुरू करण्यामागचे कारण काय ? NEO bank information in Marathi  

 आज मागील काही वर्षात अर्थव्यवस्थेत खुप मोठा बदल तसेच उतार आपणास पाहायला मिळाला आहे.

डिजीटल भारत मोहीम सुरू झाल्यापासुन मोठया प्रमाणात आँनलाईन नेट बँकिंग,डिजीटल पेमेंटकडे लोक वळु लागले आहे.

आज ग्राहकांना फिजिकल बँकेपेक्षा आँनलाईन बँक अधिक सोपी आणि सोयीस्कर वाटत आहे.याचा परिणाम फिजीकल कँश पेमेंटवर फार मोठया प्रमाणात होत आहे आणि जनता जनार्दन फिजीटल पेमेंट करण्यापासुन दुर जात आहे.

आँनलाईन गुगल पे फोन पे वाँलेट द्वारे आज लोक डिजीटली पेमेंट करणे अधिक पसंद करत आहेत.आणि दिवसेंदिवस ह्यात अधिकच वाढ होताना दिसुन येत आहे.

ज्यामुळे फिजीकल बँकाना याचा तोटा सहन करावा लागत आहे.यावरून आपणास समजून जाते की आज निओ बँकची संभाव्य क्षमता किती वाढली आहे?आता पांरपारीक बँक देखील ह्याच कारणामुळे स्वताच आपल्या निओ बँक स्थापण करीत आहे.आणि आपल्या ग्राहकांना निओ बँकची सुविधा उपलब्ध करून देत आहे

आणि निओ बँक आपल्या कस्टमरला अशा काही सोयी सुविधा देखील देत असतात ज्या कस्टमरला पारंपारीक बँकेकडुन उपलब्ध करून दिल्या जात नाही.म्हणुन आज कस्टमर निओ बँककडे अधिक वळताना दिसुन येत आहे.

निओ बँक कशापदधतीने कार्य करते?

 निओ बँकची कार्य करण्याची पदधत ही इतर पारंपारीक बँकापेक्षा भिन्न असते.पण पारंपारीक बँका जशा आपल्या कस्टमरला कर्ज देण्याच्या,विविध बँकिंग सुविधा देण्याच्या बदल्यात नफा प्राप्त करत असतात एकदम त्याचप्रमाणे ह्या निओ बँक देखील आपला नफा कमवित असतात.

See also  SBI एफडी व्याज दर २०२३ । वैशिष्ट्ये आणि पात्रता निकष । SBI FD Interest Rates 2023 in Marathi

आणि निओ बँकची सुविधा आँनलाईन असल्यामुळे यात कस्टमरला कमी शुल्क आकारले जात असते.निओ बँक ह्या कस्टमर्सला अनेक पर्सनल सर्विसेस देखील प्रदान करत असतात.ज्या आँनलाईन तंत्रज्ञानाचा वापर करून कस्टमरला दिल्या जात असतात.याला कारण ह्या बँका ग्राहककेंद्रित असतात ज्यात कस्टमरला पहिला प्रिफरन्स दिला जात असतो.म्हणुन कस्टमरला अधिकाधिक टेक्नाँलाँजी बेझिड डिजीटल सर्विसेस ह्या बँक देण्यासाठी अधिक प्रयत्नशील असतात.

आणि ह्या बँकेचे प्लँटफाँर्म देखील डिजीटल आणि लेटेस्ट टेक्नाँलांँजीवाले असल्याने त्यांना कस्टमरचा डेटा कलेक्ट करणे,तो अँनेलाईज करणे सोपे जात असते.आणि आपले कस्टमर निओ बँक इकोसिस्टममध्ये कशा पदधतीने वर्तन करता आहे हे देखील समजत असते.

आणि यात जसे कस्टमरचे वर्तन त्यांना दिसुन येत असते त्यानुसार आपल्या कस्टमरचे ते समुह तयार करीत असतात.

निओ बँकिगचे फायदे कोणकोणते असतात?

 निओ बँकिंग ही एक डिजीटल बँक असते जिचे आपल्याला अनेक फायदे होत असतात.

निओ बँकचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :

1)त्रास मुक्त खाते निर्मिती :

आपल्याला तर माहीतच आहे की पारंपारीक बँकेत खाते उघडायला आपल्याला

किती दगदग आणि किती धावपळ करावी लागत असते.ही धावपळ ही दगदग आपली निओ बँकेत खाते उघडल्याने कमी होत असते.

थोडीफार आँनलाईन प्रोसेस असते पण यात आपल्याला फिजीकली कोणतीही धावपळ करण्याची गरज पडत नसते.किंवा बँकेत जाऊन रांगेत उभे राहुन अर्ज करण्याची देखील गरज नसते काही स्टेप फाँलो करून आपण आपल्या मोबाईलवरूनच दोन मिनिटांत आपले खाते तयार करू शकतो.

2) इंटरनँशनल पेमेंटची सुविधा :

पारंपारीक बँकेतुन आपल्याला आपले डेबिट कार्ड जगात कुठेही किंवा आंतरराष्टीय पातळीवर वापरण्याची मुभा नसते.येथे अपग्रेड करण्यासाठी बँकेत आधी विचारपुस करावी लागते.भरपुर विनंती करावी लागते मग आपल्याला इथे आंतरराष्टीय स्तरावर डेबिट कार्डचा वापर करता येत असतो.

पण निओ बँकमध्ये असे अजिबात नसते इथे आपण सध्याच्या दरात खरेदी करू शकतो आणि परदेशात असताना डेबिट कार्डचा वापर करून आँनलाईन व्यवहार देखील करू शकतो.

See also  सीबीटीने सुरू केली आयकर विभागाची नवीन वेबसाईट ह्या वेबसाईटचा करदात्यांना काय फायदा होईल? CBDT new income tax portal benefits for taxpayers

3) ग्राहकास अनुकुल इंटरफेस :

निओ बँककडुन कस्टमरला उत्तम अनुभव प्राप्त करून दिला जातो.

निओ बँकचा युझर इंटरफेस अत्यंत चांगला आहे यात सिस्टमला असे डिझाईन केलेले आहे जेणे कस्टमरला आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी त्वरीत प्रतिसाद प्राप्त होत असतो.

आणि याची अँपदेखील वापर करण्यास अत्यंत सोपी आहे.

4) स्मार्ट रिपोर्ट सिस्टम :

जे व्यवहार आपण निओ बँकद्वारे करतो ते त्वरीत होत असतात आणि झालेल्या सर्व व्यवहाराची संपुर्ण डिटेल माहीती देखील त्वरीत भरण्यात येते.

 आपले पार पडलेले सर्व व्यवहाय उर्वरीत शिल्लक रक्कम येथे आपण अँपद्वारे चेक करू शकतो.आणि हे सर्व आपण एका जागेवर बसुन मोबाईल द्वारे करू शकतो.यासाठी आपल्याला पायपीट करत बँकेत जाण्याची गरज पडत नसते.

5) व्यवसाय उद्योगासाठी उत्तम :

निओ बँकचा अजुन एक महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे आपण जर एखादा बिझनेस करत असु आणि आपल्याला त्यात रोज आपल्या एम्पलाँईचे पेमेंट करायचे असेल तर यासाठी आपल्याला पैसे ट्रान्सफर करायला कुठल्याही बँकेत जावे लागत नाही.

आपण एका ठिकाणी बसुन फक्त मोबाईल इंटरनेटचा वापर करून मोठयात मोठे आर्थिक व्यवहार पार पाडु शकतो.

6) विविध बँकिंगच्या सुविधा प्राप्त होणे :

विविध आँनलाईन बँकिंग तसेच ट्रान्झँक्शनच्या सुविधा आपल्याला प्राप्त होत असतात.याचसोबत एटीएम कार्ड,क्रेडिट कार्ड, वाँलेट सारख्या अनेक सुविधा यात आपल्याला मिळत असतात.

 

निओ बँकविषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न

 1)भारतात किती निओ बँक आहेत ?

भारतात अनेक निओ बँक आहेत ज्यात राझोर पे एक्स,ओपन,निओ इत्यादींचा समावेश आहे.

2) भारतीय रिझर्व्ह बँकेकडून निओ बँकला परवानगी मिळाली आहे का?

नही भारतीय रिझर्व्ह बँकेकडुन अद्याप निओ बँकला सहमती देण्यात आलेली नाहीये याचमुळे निओ बँक इतर पारंपारीक बँकासोबत पार्टनरशिपमध्ये काम करून आपल्या सेवा कस्टमरला देत असते.

अशा पदधतीने आज आपण निओ बँकविषयी एकदम सविस्तरपणे माहीती जाणुन घेतली आहे.