2021 -10 बेस्ट फ्री फोटो एडिटिंग अँप्स -Best free photo editing apps Marathi information

10 बेस्ट फ्री फोटो एडिटिंग अँप्स -Best free photo editing apps Marathi information

आज आपण आपल्या इंस्टाग्राम,फेसबुक,व्हाँटस अँप इत्यादी सोशल साईटस अकाऊंटवर,नियमित आपले फोटो अपलोड करत असतो.

पण काढलेला फोटो आपण जसाच्या तसा लगेच सोशल मिडिया अकाऊंटवर अपलोड करत नसतो.आधी त्या फोटोचा ब्राईटनेस वगैरे चेंज करतो.त्यात नको असलेला भाग क्रोप करतो.

मग व्यवस्थित फोटोला इफेक्ट वगैरे देऊन झाल्यावर ते आपल्या सोशल मिडिया अकाऊंटसवर अपलोड करत असतो.जेणेकरून आपल्या फोटोला जास्तीत जास्त लाईक्स येतील त्यावर लोक चांगल्या कमेंटस करतील.

तसे पाहायला गेले तर मोबाईलच्या कँमेरा मध्ये देखील फोटो काढल्यानंतर लगेच फोटोला इफेक्ट देण्याची,त्याला एडिट करण्याची सुविधा उपलब्ध असते.पण त्यात आपल्याला हवा तसा फोटो,ईमेजस तयार होत नसतात.काहीतरी कमतरता राहुनच जात असते.

अशा वेळी आपण असे काही फ्री आणि बेस्ट फोटो एडिटिंग साँफ्टवेअर तसेच अँप्स शोधत असतो.ज्यावर आपले फोटो आपल्याला विनाशुल्क प्रोफेशनली एडिट करता येतील.

म्हणुन आजच्या लेखात आपण 2021 मधील 10 बेस्ट आणि फ्री फोटो एडिटिंग अँप्स विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

 

2021 मधील 10 बेस्ट अँण्ड फ्री फोटो एडिटिंग अँप्स कोणकोणत्या आहेत?

आज आपण काही अशा फ्री मध्ये उपलब्ध असलेल्या बेस्ट फोटो एडिटिंग अँप्सविषयी जाणुन घेऊया ज्यांचा वापर करून आपण आपले फोटो अत्यंत सहजपणे विनाशुल्क देखील एडिट करू शकतो.

येथे आपल्याला इंटरनेटवर शेअर करण्यासाठी आपले हाय काँलिटीचे स्माँल साईज फोटो ईमेजस तयार करता येत असतात.

2021 मधील 10 बेस्ट आणि फ्री फोटो एडिटिंग अँप्सची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1) कँनव्हा :

2) फोटोर :

3) गुगल फोटोज :

4) फोटो स्केप :

5) कलर सिंच

6) स्नँपसिड :

7) अँडोब फोटोशाँप लाईटरूम :

8) पिक्झलर :

9) बी फंकी :

10) पेंट डाँट नेट :

 

1) कँनव्हा :

कँन्व्हा हे एक बेस्ट फोटो एडिटिंग अँप आहे.इथे आपण ड्रँग आणि ड्राँप करून आपले ईमेज तयार करू शकतो.तसेच फोटो देखील एडिट करू शकतो.

See also  Machine Learning विषयी माहीती - Machine Leaning Marathi Information

इथे फोटो एडिटिंग शिकण्यासाठी आपल्याला प्रोफेशनल एडिटर असण्याची देखील गरज भासत नसते.

कँन्व्हाची वैशिष्टये :

  • यात फ्रोटो स्ट्रेटनर आहे.
  • इमेज क्राँपर आहे ज्याचा उपयोग करून कोणतीही ईमेज क्रोप करू शकतो.
  • 3)इथे आपण टेक्सट देखील अँड करू शकतो.
  • ट्रान्सपरंसी टुल देखील यात दिलेले आहेत.
  • आपण फोटो ब्लरचा वापर करून आपला फोटो अंधुक करू शकतो.
  • यात विविध प्रकारच्या फोटो फ्रेम्स देखील उपलब्ध आहेत.
  • बँजेस,टेक्सचर,स्टीकर देखील असतात.जे आपण आपल्या ईमेजेससाठी फोटोसाठी देखील युझ करू शकतो.

इत्यादी यापेक्षा अधिक फिचर कँन्व्हामध्ये आपणास दिसुन येतात.

कँन्व्हाचे फायदे :

  • हे अँप सोशल मिडिया मार्केटिंगसाठी फोटो इमेजेस तसेच इंफोग्राफीक्स तयार करण्यासाठी एक बेस्ट अँप आहे.

2) फोटोर :

हे एक बेस्ट एडिटिंग अँप आहे. इथे आपण आपल्या फोटो तसेच ईमेजेसचा कलर, साईज,ब्राईटनेस लाईटनेस इत्यादी बरेच काही अँडजेस्ट करू शकतो.

फोटोरची वैशिष्टये :

  • ईमेजला पाहिजे तसा शेप देऊ शकतो.
  • फोटो ईमेजसचा फंट चेंज करू शकतो.
  • इथे फोटो कोलँज करता येत असतात.
  • इथे आपल्या फोटो ईमेजसला स्टीकर अँड करू शकतो.
  • 5) आपल्या फोटो ईमेजेसला वेगवेगळया अलाईनमेंट देण्याची सुविधा देखील येथे असते.

इत्यादी यापेक्षा अधिक फिचर फोटोरमध्ये समाविष्ट असलेले आपणास दिसुन येते.

3) गुगल फोटोज :

हे गुगलने तयार केलेले फ्री फोटो एडिटिंग अँप आहे.पण ह्या फोटो एडिटिंग अँपमध्ये फोटो एडिटिंगच्या सर्व कँपँसिटी नाहीयेत.जसे की रेड आय रिमुव्ह करणे,ब्लेमिश करेक्शन करणे इत्यादी.

गुगल फोटोजची वैशिष्टये :

  • याचा इंटरफेस एकदम चांगला आहे.आणि हे अँड्राईड मोबाईल सपोर्टिंग आहे.
  • गुगल फोटोजचा वापर करून आपण आपल्या फोटोचा ईमेजेसचा कलर अँडजेस्ट करू शकतो.आपल्या ईमेजेसमध्ये व्हिनेट अँड करता येत असते.
  • आपल्या फोटोला क्राँप तसेच रोटेट करण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे.

4) फोटो स्केप :

फोटो स्केप नवोदित फोटो एडिटिंग शिकत असलेल्यांसाठी बनवण्यात आलेले अँप आहे.इथे आपल्याला पाहिजे तेवढया ईमेजेसला टेम्पलेटचा वापर करून फिल्टर देखील करता येते.

See also  SAMUDRA' App - समुद्र ॲप चे फायदे कोणकोणते आहेत SAMUDRA app

फोटो स्केपची वैशिष्टये :

  • इथे आपण अँनिमेटेड फाँर्ममध्ये जी आय एफ तयार करू शकतो.
  • स्लाईड शो बनवता येतात.
  • यामध्ये बँच प्रोसेसिंग,फंट पेअरींग,डिजीटल आर्ट इत्यादी फिचरचा देखील समावेश करण्यात आला आहे.

5) कलर सिंच :

कलर सिंचमध्ये काही असे अँडव्हान्स्ड फिचर केलेले आहेत ज्यामुळे हे अँप फोटोशाँपच्या बरोबरीने फिचर असलेले अँप ठरते.

यात एक मजेशीर फिचर अँड करण्यात आले आहे जेणे आपण कोणत्याही फोटोला एका क्लीकमध्ये कार्टूनमध्ये रुपांतरीत करू शकतो.

कलर सिंचची वैशिष्टये :

  • यात विविध लेअर्सचा वापर करण्याची क्षमता असते
  • आर्टिस्टीक मास तयार करता येत असतात.
  • फ्रेम्स तयार करता येत असतात.
  • फोटोत असलेले डाग देखील काढता येतात.

याच्या काही फिचर्सचा वापर करण्यासाठी आपल्याला पेड सबस्क्रिप्शन घ्यावे लागत असते.

उदा,प्रिमियम फिल्टर,इंटरफेस इत्यादी

6) स्नँपसिड :

स्नँपसिड हे एक फ्रि आँनलाईन फोटो एडिटर आहे.हे फोटो एडिटिंग अँप प्रोफेशनल फोटो एडिटर्ससाठी खासकरून तयार करण्यात आले आहे.

ह्या अँपचे मुख्य ध्येय इफेक्ट मध्ये चेंज करण्यासाठी फिल्टर प्रोव्हाईड करणे हे आहे.

स्नँपसिडची मुख्य वैशिष्टये :

  • प्री मेड फिल्टर्स प्रोव्हाईड करते.
  • याचा लुक हे ह्याचे दुसरे फिचर आहे.
  • आणि याचे तिसरे फिचर हे आहे की हे अँप प्रोफेशनल फोटो एडिटर्ससाठी अधिक उपयुक्त ठरते.

7) अँडाँब फोटोशाँप लाईटरूम :

फोटो गेममध्ये अँडाँब हे एक फेमस नाव म्हणुन ओळखले जाते.ज्याचे काम फोटोमध्ये सुधारणा करणे एडिटिंग करणे हे आहे.

अँडाँब फोटोशाँप लाईटरूम हे एक असेच अँप म्हणुन ओळखले जाते.येथे आपण आपल्या फोटो तसेच ईमेजेसचे बँच अँड करू शकतो.त्यांना एकत्र एडिट देखील करता येते.

तसेच आपण आपल्या फोटोला शेअर तसेच अँपमधुन आपल्या फोटोला डिव्हाईसमध्ये सिंक देखील करू शकतो.

अँडाँब फोटोशाँप लाईटरूमची वैशिष्टये :

  • यात राँ एडिटिंग फिचर अँड करण्यात आले आहेत.
  • क्लाऊड स्टोरेज देखील आहे.
  • वापरण्यास सोपे आहे आणि चांगला इंटरफेस प्राप्त होतो.
See also  कार प्रदूषण प्रमाणपत्र ऑनलाइन कसे मिळवायचे? | How to Get a Car Pollution Certificate Online In Marathi

8) पिक्झलर :

पिक्झलर हे एक बेस्ट फोटो एडिटर आहे ज्यात आपण आपल्या बोटाच्या टोकावर देखील प्रोफेशनल लुक असलेल्या ईमेजस तयार करू शकतो.

पिक्झलरची वर्किग कँपँसिटी आणि युझर इंटरफेस GIMP सारखी असल्याची आपणास दिसुन येते.

पिक्झलरची काही प्रमुख वैशिष्टये :

  • टेक्सट
  • फंट
  • अँडजेस्टमेंट
  • डिजीटल पेंटिंग
  • कलर रिप्लेसिंग
  • फोटो कोलाज
  • फोटो इफेक्ट

9) बी फंकी :

हे सुदधा एक चांगले फोटो एडिटिंग अँप आहे.हे अँप आपल्याला फोटो एडिट करण्यासाठी तसेच त्याचा कोलाज करण्यासाठी हाय काँलिटीचे इफेक्ट प्रोव्हाईड करत असते.

इथे असलेल्या बहुसंख्य कोलाज,ले आऊट आणि डिझाईन फिचरचा वापर करून आपण फेसबुक इंस्टाग्रामसाठी बँनर देखील तयार करू शकतो.

बी फंकीची वैशिष्टये –

  • यात फोटो कोलाजचे फिचर दिले आहे.
  • फोटो ईमेजसाठी डिजीटल आर्टसचा वापर करता येतो.
  • फोटोचा आकार बदलण्यासाठी साईज चेंजिंगचे आँप्शन देखील असते.
  • आपण आपल्या मोबाईलमध्ये वाँलपेपर सेट करण्यासाठी वा़ँलपेपरचा वापर करू शकतो.
  • आणि सगळयात महत्वाचे म्हणजे वापरायला एकदम सहज आणि सोपे असते.

10) पेंट डाँट नेट :

पेंट डाँट नेट हे सुदधा बेस्ट फोटो एडिटिंग अँप आहे जे आपल्याला स्वच्छ लेआऊट आणि पावरफुल टुल्स प्रदान करते.

पेंट डाँट नेटची वैशिष्टये :

  • यात स्पेशल इफेक्टसचा वापर आपण करू शकतो.
  • अनेक पाँवरफुल टुल्सची सुविधा यात आपल्याला प्राप्त होते.
  • याचा इंटरफेस देखील इनोव्हेटिव्ह आहे.

काही इतर बेस्ट आणि फ्री फोटो एडिटिंग अँप्सची नावे :

  • इंस्टा साईज :
  • इन पिक्झिओ :
  • रिसाईजिंग अँप्स :
  • अँडोब फोटोशाँप एक्सप्रेस एडिटर :
  • फोटो पाँझ प्रो :

अशा पदधतीने आज आपण 2021 मधील 10 बेस्ट अँण्ड फ्री फोटो एडिटिंग अँप्स कोणकोणत्या आहेत आणि त्यांची वैशिष्टये कोणकोणती आहेत हे सविस्तरपणे जाणुन घेतले आहे.