समुद्र ॲप चे फायदे कोणकोणते आहेत samudra app benefits in Marathi
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या एक विभाग भारतीय राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्राने नुकतेच एक नवीन मोबाईल अॅप्लीकेशन लाॅच केले आहे.ह्या अॅप्लीकेशनचे नाव समुद्र असे आहे.
ह्या ॲप च्या माध्यमातून आपणास समुद्राशी संबंधित सर्व प्रकारची व्यापक माहीती तसेच समुद्राशी संबंधित सर्व प्रकारच्या महत्वाच्या हालचाली इत्यादींचा डेटा प्राप्त होईल.
हया ॲप वरून प्राप्त होत असलेल्या माहितीमुळे समुद्रात जहाज चालवणारया नाविकांना अणि समुद्रात मासे पकडुन मासेमारीचा मासे विक्रीचा व्यवसाय करणारया मासेमारांना खुप फायदा होणार आहे.
हे ॲप समुद्रात आलेले सुनामी तुफानी तसेच वादळी लाटा,भरती,इत्यादी नैसर्गिक संकटा विषयी वास्तविक म्हणजे रिअल टाईम अपडेट तसेच कुठल्याही समुद्री संकटा विषयी गंभीर इशारा इत्यादी माहिती देण्याचे काम करणार आहे.
ह्या ॲप मुळे नाविक तसेच मासेमारी व्यवसाय करत असलेल्या मच्छीमारांच्या समुदायाला नैसर्गिक संकटाच्या विपदेच्या काळात आवश्यक ती खबरदारी घेण्यास मदत प्राप्त होणार आहे.
हे समुद्र मोबाईल ॲप मासे पकडत असलेल्या समुदायासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
कारण ह्या ॲप मुळे संभाव्य मासेमारी क्षेत्र सल्ला प्रसारित केला जातो हे अॅप मच्छीमारांना संभावित मासे एकत्रीकरण स्थानासाठी योग्य ते मार्गदर्शन देखील करेल.
हे समुद्र मोबाईल ॲप भारतीय तटरक्षक नौदल आणि विविध शिपिंग उद्योग व्यवसाय इत्यादी अशा विविध सार्वजनिक संस्थांना देखील सेवा देण्याचे काम करते.
Incois चा फुलफाॅम काय होतो? incois full form in Marathi
आय एन सीओ आय एसचा फुलफाॅम indian international centre for ocean information services असा होतो.
यालाच मराठी मध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र असे देखील म्हणतात.
आय एन सीओ आय एसची स्थापणा १९९९ मध्ये करण्यात आली होती.अणि ई एस एस ओची स्थापणा २००७ मध्ये करण्यात आली होती.
हे भारत सरकारच्या अंतर्गत येणारे जागतिक पातळीवरील मान्यता प्राप्त असलेली एक स्वायत्त संस्था संघटना आहे.
आय एन सीओ आय एस ही संस्था earth system science and organisation (Esso) पृथ्वी प्रणाली विज्ञान संघटनेचे एक युनिट आहे.
आय एन सीओ आय एस ही संस्था ई एस एस ओ सोबत मिळुन काम करते.
Incois चे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
आय एन सीओ आय एसचे मुख्य उद्दिष्ट हे देशाला महासागराशी समुद्राशी संबंधित सर्व सुचना महत्वाची माहीती कुठलेही शुल्क न घेता निःशुल्क पद्धतीने प्रदान करणे हे आहे.
Incois चे मुख्यालय –
आय एन सीओ आय एस याचे मुख्यालय हैदराबाद येथे स्थित आहे.याचे मंत्रालय पृथ्वी विज्ञान मंत्रालय हे आहे.
Incois कडुन कोणकोणत्या सेवा पुरविल्या जातात?
आय एन सीओ आय एस कडुन आपणास तीन महत्वाच्या प्राथमिक सेवा पुरविल्या जातात.
1) tsunami early warning services -सुनामी पुर्व सुचना सेवा
2) ocean state forecast service- महासागर राज्य अंदाज सेवा.
3) potential fishing zone advisory services संभाव्य मासेमारी क्षेत्र सल्लागार सेवा