आंतरराष्ट्रीय यंग इको हिरो पुरस्कार -International young eco hero award information in Marathi
2023 यंग इंटरनॅशनल यंग इको हिरो पुरस्कार प्राप्त करण्यासाठी जगभरातील 17 किशोरवयीन पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये भारतातील पाच तरुणांची नावे देण्यात आली आहेत.
ह्या तरुणांनी जगातील काही सर्वात महत्त्वाच्या पर्यावरणीय आव्हानांना समस्यांना सामोरे जाण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
ज्या भारतातील पाच युवा पर्यावरण योदधांना आपल्या प्रयत्नांसाठी अमेरिका देशात स्थित असलेल्या अॅक्शन फाॅर नेचर ह्या ना नफा संस्थेकडुन मान्यता देण्यात आली आहे त्या भारतातील पाच पर्यावरण योदधांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-
१)ईहा दिक्षित-
ईहा दिक्षित भारतातील मेरठ येथील १० वर्षांची मुलगी आहे जिने आंतरराष्ट्रीय यंग इको हिरो पुरस्कार प्राप्त केला आहे.ईहा दिक्षित हिने ह्या वर्षीच्या यंग इको हिरो पुरस्कारा मध्ये प्रथम स्थान पटकावले आहे.
ईहा दिक्षित पर्यावरण क्षेत्रात खुप प्रदीर्घ कालावधी पासुन काम देखील करत आहे.ईहा चार वर्षांची असल्यापासून पर्यावरणाच्या रक्षणासाठी ती वृक्ष लागवड करीत आहे.
ईहा दिक्षित हिने तिच्या घरी एक प्लांट बॅक देखील स्थापित केले आहे.यात अशा वृक्षांची देखभाल केली जाते ज्यांची देखभाल करणे लोकांनी बंद केले आहे.
२) मान्या हर्ष-
मान्या हर्ष हिने तिच्या पुस्तके, ब्लॉग आणि YouTube चॅनल The Little Inner Mentalist द्वारे पर्यावरणीय समस्या आणि हवामान कृतींबद्दल जागरूकता वाढवण्याचे मिशन सुरू केले आहे.
३) निर्वाण सोमानी-
निर्वाण सोमानी हिने १३ ते १६ वर्ष वयोगटात दुसरे स्थान प्राप्त केले आहे.
निर्वाण सोमानी फॅशन उद्योगाच्या पर्यावरणीय परिणामांना आणि विशेषतः टाकून दिलेल्या डेनिममुळे होणारा कचरा हाताळण्यासाठी प्रोजेक्ट Zeiss ची संस्थापक आहे.
४) मन्नत कौर-
मन्नत कौरने 13 ते 16 वयोगटात तिसरा क्रमांक पटकावला आहे.गोड्या पाण्याचा पुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया यांच्याशी निगडीत पाण्याची टंचाई आणि कार्बन उत्सर्जन दूर करणे हे मन्नत कौर यांच्या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
५) कर्णव रस्तोगी –
कर्णव रस्तोगी यांनी प्लॅस्टिक कचरा कमी करण्याचे आणि वातावरणातील बदलांना समर्थन देण्यासाठी जागरूकता आणि कृती करण्याचे वचन दिले आहे.त्यांनी ह्यावर दोन पुस्तके देखील लिहिली आहेत.
आंतरराष्ट्रीय इको हिरो पुरस्कार म्हणजे काय?हा पुरस्कार का दिला जातो?
आंतरराष्ट्रीय इको हिरो पुरस्कार हा अमेरिकेतील अॅक्शन फाॅर नेचर ह्या ना नफा संस्थेकडुन आयोजित केला जातो.
- हे काम करण्याचे मुख्य उद्दिष्ट असते हे बघणे की जगभरात आज जेवढेही तरूण मुले मुली आहेत त्यांना जागतिक पातळीवरील पर्यावरणाशी संबंधित विविध समस्येवर उपाय योजना करता येते किंवा नाही.
- त्यांना जगाची किती चिंता आहे अणि पर्यावरण विषयक जागतिक पातळीवरील समस्येविषयी त्यांना उपाय शोधता येतो किंवा नाही हे बघण्यासाठी हे काम करण्यात येत असते.
- आज आपल्या देशात असे अनेक युवा उद्योजक दिसुन येत आहे जे वेगवेगळ्या क्षेत्रात काही ना काही नवीन संशोधन करून नवीन बिझनेस आयडिया तयार करत आहेत.
- जर आपल्याकडे देखील असा एखादा जागतिक पातळीवरील पर्यावरण समस्येला दूर करणारा महत्वाचा प्रकल्प तसेच बिझनेस आयडिया आहे तर आपणास हा पुरस्कार जिंकता येऊ शकतो.
- यात ८ ते १६ ह्या वयोगटातील कुठल्याही देशातील मुला मुलींना सहभाग घेता येतो.
- जागतिक पातळीवरील पर्यावरणाशी संबंधित समस्या दुर करणारा एखादा निर्मितीशील पर्यावरणीय प्रकल्प तयार केलेल्या किंवा अशी एखादी बिझनेस आयडिया असलेल्या मुलांना ह्या मध्ये भाग घेता येईल.
- आपल्याकडे असलेला पर्यावरणाशी संबंधित एखादा जागतिक पातळीवरील समस्या दूर करणारा महत्वाचा प्रकल्प किंवा बिझनेस आयडिया त्या विषयीचा व्हिडिओ इत्यादी जे काही आपल्याकडे कंटेट आहे ते आपणास ह्या अॅक्शन फाॅर नेचर संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन अपलोड करायचे आहे.
यानंतर आपणास आपल्या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास कॅश प्राईज अणि प्रमाणपत्र देखील दिले जाते.