NOC म्हणजे काय ? संपूर्ण  माहीती  – NOC information in Marathi

NOC म्हणजे काय   माहीती  – NOC information in Marathi

 एन ओ सी हा एक असा शब्द आहे जो आपल्या दैनंदिन जीवणात आपल्याला व्यवहार करताना नेहमी ऐकायला तसेच वाचायला मिळतो.

 खुप जणांच्या तोंडातुन एन ओसी दाखल केले किंवा एन ओसी सर्टिफिकिट तयार केले असे आपल्याला ऐकु येत असते.आपल्याला हा शब्द रोज ऐकू तर येतो पण याचा अर्थ काय होतो हेच आपल्याला माहीत नसते.

 आणि असे म्हटले देखील जाते की कोणत्याही गोष्टीचे ज्ञान नसणे हे त्या गोष्टीचे अर्धवट ज्ञान असण्यापेक्षा अधिक चांगले असते.

 म्हणुन आजच्या लेखातुन आपण एनओसी विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.जेणेकरून एन ओसी विषयी कुठलीही शंका आपल्या मनात राहुन जाणार नाही.आणि त्याबाबद काही गैरसमज देखील आपल्या मनात निर्माण होणार नाहीत.

 NOC म्हणजे काय?

एन ओसीचा फुल फाँर्म आहे (NO Objection Certificate).ज्याला मराठीत विना हरकत प्रमाणपत्र असे म्हटले जाते.

 हे एक कायदेशीर कागदपत्र असते ज्यात एखाद्या संस्थेने,किंवा व्यक्तीने स्पष्टपणे कबुल केलेले असते की त्याला कागदपत्रात दिलेला सर्व मजकुर तसेच तपशील मान्य आहे.त्याबाबद त्याची कुठलीही हरकत तसेच विरोध नाहीये.

 जेणेकरून पुढे जाऊन त्या व्यक्तीने किंवा संस्थेने पुढे जाऊन काही आक्षेप घेतला किंवा आपल्या केलेल्या वायद्यावरून मागे हटुन काही आक्षेप घेतला तर आपण त्याचा आक्षेप एन ओसी दाखवून रदद करू शकतो.

 NOC का तयार केले जाते असते?

जेव्हा आपण कोणताही आर्थिक देवाण घेवाणीचा व्यवहार करत असतो किंवा एखादा महत्वाचा व्यावहारीक करार करत असतो.तेव्हा अशा वेळेला सदर करारास,व्यवहारास समोरच्या पक्षाची सहमती आहे हे दर्शविण्यासाठी एक एन ओसी तयार केला जातो.

See also  प्री ॲप्रोवड लोन संबंधी मराठी माहिती - Pre approved loan in Marathi -

जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण आपल्याला येत नसते.आणि समोरच्याला आपला वायदा तोडला तर आपल्याला कोणतेही नुकसान होत नसते.कारण आपण आधीपासुनच त्याच्यापासुन सदर व्यवहाराची कबुली घेतलेली असते.

याने समोरच्याने जर आपला वायदा तोडला तर तोच अडचणीत येत असतो.आपल्याला कोणतीही अडचण येत नसते.

म्हणुनच आज कोणत्याही उद्योग व्यवसायातील करारात प्राँपर्टी तसेच आर्थिक देवाण घेवाणीच्या व्यवहारात सर्वप्रथम एन ओसी तयार केले जात असते.

 एन ओसी हे एक असे महत्वाचे सरकारी डाँक्युमेंट आहे.जे बँकिंग व्यवहार,इमिग्रेशन,घराची किंवा वाहनाची नोंदणी,घर खरेदी विक्रीचे व्यवहार इत्यादी ठिकाणी महत्वपुर्ण ठरत असते.

 NOC certificate ची आवश्यकता आपल्याला कधी कधी आणि कुठे पडत असते?

एन ओसी हे एक असे सर्टिफिकिट आहे ज्याची आवश्यकता आपल्याला अनेक आर्थिक देवाण घेवाणीच्या व्यवहारात तसेच प्राँपर्टीच्या डिलमध्ये पडत असते.

 

एन ओसीचा वापर पुढील प्रकारच्या व्यवहारात प्रामुख्याने केला जात असतो :

1)बँकेचे कर्ज फेडुन झाल्यावर :

2)बँकेकडुन कर्ज घेत असताना :

3) फायनान्समध्ये घेतलेल्या वाहनांचे इंस्टाँलमेंट पेमेंट करताना :

4) एका राज्यातुन दुसरया राज्यात वाहन नेण्यासाठी :

5) एखादी बिल्डींग तसेच घर बांधत असताना :

  1)बँकेचे कर्ज फेडुन झाल्यावर :

आपल्या आर्थिक अडचणीच्या काळात आपण विविध कारणांसाठी बँकेकडून कर्ज घेत असतो.मग ते घराचे बांधकाम असो किंवा एखादी कार घ्यायची असो इत्यादी कारणासाठी आपण बँकेकडून कर्ज घेत असतो.

जे आपल्याला बँकेने निर्धारीत केलेल्या वेळेत फेडणे फार आवश्यक असते.

आणि आपण बँकेने दिलेल्या निर्धारीत कालावधीत ते कर्ज नाही फेडले तर आपल्याला व्याज देखील आकारले जात असते.म्हणून आपण वेळ असताच बँकेकडुन घेतलेले कोणतेही कर्ज फेडत असतो आणि ते फेडुन झाल्यावर बँकेकडुन आपल्याला एक एन ओसी सर्टिफिकिट दिले जात असते.

ज्यात असे नमुद असते की आपण बँकेने दिलेल्या निर्धारीत वेळेत आपले सर्व घेतलेले कर्ज फेडलेले आहे.आणि त्यावर बँकेचे स्वाक्षरी देखील असते.

See also  म्युच्अल फंडमधील डायरेक्ट प्लँन अणि रेग्युलर प्लँन या दोघांमधील फरक - Difference between direct plan and regular plan in mutual fund

याने आपल्याकडे एक ठोस पुरावा होऊन जातो की आपण आपले पुर्ण कर्ज फेडलेले आहे.

 

2)बँकेकडुन कर्ज घेत असताना :

जेव्हाही आपण कोणत्याही बँकेतुन कर्ज प्राप्त करण्यासाठी अर्ज करत असतो तेव्हा बँकेकडुन काही महत्वाच्या कागदपत्रांची मागणी केली जात असते.

ज्यात एन ओसी सर्टिफिकिटचा देखील समावेश असतो.बँक आपल्याकडुन हे सर्टिफिकिट ह्या कारणासाठी मागत असते की बँकेला ह्या एका गोष्टीची शहानिशा करावयाची असते की याआधी आपण कोणत्या दुसरया बँकेतुन लोन घेतले आहे का नाही?

 

3) फायनान्समध्ये घेतलेल्या वाहनांचे इंस्टाँलमेंट पेमेंट करताना :

जेव्हा आपण फायनान्सद्वारे एखादी कार किंवा बाईक विकत घेत असतो.तेव्हा आपल्याला फायनान्समध्ये कार तसेच बाईक घेण्यासाठी जी रक्कम घेतलेली असते.तिचे दर महिन्याला इंस्टाँलमेंट पे करावा लागत असते.

 म्हणजेच फायनान्समधून जी कार किंवा बाईक आपण घेतलेली असते तिचे सर्व हप्ते आपल्याला दिलेल्या वेळेनुसार फेडावे लागत असतात.नाहीतर फायनान्स कंपनी आपली कार तसेच बाईक देखील वेळेवर हप्ता भरला नही म्हणुन घेऊन जात असते.

 म्हणुन आपण आपले सर्व गाडीचे हप्ते वेळेवर फेडत असतो.आणि मग जेव्हा आपले सर्व हप्ते फेडले जात असतात.तेव्हा फायनान्स कंपनीकडुन आपल्याला एक एन ओसी सर्टिफिकिट दिले जात असते.

ज्यात स्पष्टपणे नमुद केलेले असते की आपण फायनान्स कंपनीचे सर्व हप्ते वेळेवर फेडले आहेत.आणि त्यावर फायनान्स कंपनीचा शिक्कामोर्तब देखील केलेला असतो. याने आपण सिदध करू शकतो की आपण आपले सर्व हप्ते वेळेवर फेडले आहेत.

 

4) एका राज्यातुन दुसरया राज्यात वाहन नेण्यासाठी :

ज्या आपल्याला एका राज्यातुन दुसरया राज्यात एवतीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आपले वाहन घेऊन जायचे असेल तर अशावेळी आपल्याला आरटीओच्या मोटार वाहन नियमांनुसार आरटीओ कडुन एक एन ओसी सर्टिफिकिट प्राप्त करावे लागत असते.

जेणेकरून आपण तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी दुसरया राज्यात आपले वाहन घेऊन वास्तव्यास असलो तरी आपल्यावर कोणतीही कारवाई होत नाही.किंवा आरटीओ कडुन आपली गाडी देखील जमा केली जात नसते.

See also  इंशुरन्स,इंशुअर्ड अणि इंशुरर म्हणजे काय? What is insurance,insured,insurer and insurance premium

 कारण आपल्याकडे आरटीओचे एन ओसी सर्टिफिकिट उपलब्ध असते.

 5) एखादी बिल्डींग तसेच घर बांधत असताना :

समजा आपण एखाद्या क्षेत्रात बिल्डिंग किंवा घर बांधत असु तसेच एखाद्या रस्त्याच्या शेजारी स्वताचे हाँटेल,दुकान,सोसायटी तसेच माँल तयार करत असु तर अशा वेळी आपल्याला महानगरपालिकेकडून तसेच वाहतुक विभागाकडुन याबाबद एक एन ओसी सर्टिफिकिट प्राप्त करावे लागत असते.

 ज्यात असे नमुद केलेले असते की महागरपालिकेचा आपण बांधत असलेल्या घराला तसेच इमारतीला कोणताही विरोध नाहीये.म्हणजे पुढे जाऊन आपले घर तसेच बिल्डिंग अवैध्य ठरवुन नगरपालिका ते हटवू शकत नसते.

 NOC तयार करण्यासाठी आपल्याला साधारणत किती खर्च लागतो?

वेगवेगळया कारणासाठी तसेच विविध व्यवहारीक कार्यांसाठी आज आपल्याला एन ओसी लागत असतो.त्यामुळे क्षेत्रात एन ओसी बनवण्याचा खर्च वेगळा  असु शकतो.

 NOC चे फायदे कोणकोणते असतात?

NOC चे फायदे पुढीलप्रमाणे  असतात :

एन ओसी सर्टिफिकिट आपल्या हातात असल्याने आर्थिक देवाण घेवाणीच्या व्यवहारात,व्यवसायिक करारात तसेच कोणत्याही महत्वाच्या व्यवहारात पुढे जाऊन आपल्यावर कोणतेही संकट येत नसते.

 

  • एन ओसी हा आपल्याकडे असलेला व्यवहार पुर्तीचा एक सरकारी पुरावा असतो.ज्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही.

 

NOC  विषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न

1)एन ओसी प्राप्त करायला किती दिवस लागतात?

एन ओसी साठी अर्ज केल्यानंतर 10 ते 15 दिवसांत आपल्याला एन ओसी सर्टिफिकिट प्राप्त होत असते.

पण विविध क्षेत्रात आज एन ओसी प्राप्त होण्याचे वेगळे  वेळापत्रक असु शकते.

 2) एन ओसी सर्टिफिकिटची मर्यादा काय असते?

बँकेचे एन ओसी सर्टिफिकिटची मर्यादा 90 दिवस आणि आरटीओच्या एन ओसीची मर्यादा 6 ते 7 महिन्यांची असते.

 3) विद्याथ्यांना देखील एन ओसी सर्टिफिकिटची आवश्यकता असते का?

होय विदयार्थी तसेच कर्मचारी यांना देखील परदेशात प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणुन एन ओसी सर्टिफिकिट लागत असते.

 अशा पदधतीने आज आपण एन ओसी विषयी सविस्तर माहीती आज जाणुन घेतली आहे.