LIC IPO – पॉलिसीधारकां करता महत्वपूर्ण माहिती ? – What is LIC IPO’s Policyholder Category

LIC IPO – पॉलिसीधारकां करता माहिती – What is LIC IPO’s Policyholder Category

लाईफ इंशुरन्स काँर्पोरेशन ही भारतातील एक खुप मोठी आणि एकमेव सरकारी विमा कंपनी आहे.ह्या कंपनीची स्थापणा 1956 मध्ये झाली होती.

आणि त्या वेळेस देशात सुमारे 245 विमा कंपनी होत्या.आणि मग ह्या सर्वाचे एकत्रीकरण करून एल आयसीची स्थापणा केली गेली होती.

1990 च्या दशकापर्यत भारतामध्ये विम्याच्या कामामध्ये फक्त एल आयसीचाच एक छत्र नियम होता.

कारण तेव्हा दुसरी कुठलीही एल आयसी पाँलिसी देणारी कंपनी उपलब्ध नव्हती.त्यामुळे विम्याची सर्व कामे बघण्याचे काम एल आयसी कंपनीच करत होती.

पण 1990 नंतर खासगी विमा कंपन्यांसाठी देखील मार्ग खुला केला.आणि मग अनेक खासगी कंपन्यांनी एल आयसी पाँलिसीची सुविधा देणे सुरू केले.

पण तरी देखील आज भारतातील कित्येक लोक डोळे झाकुन LIC policy वर विश्वास ठेवतात.आता एल आयसी आपला आयपीओ देखील जारी करणार आहे.

आपल्यातील खुप जणांच्या मनात हाच एक प्रश्न घुटमळतो आहे की ह्या आयपीओचा विमा पाँलिसी धारकांना कोणता फायदा होणार आहे?आणि तो किती होणार आहे?

आजच्या लेखात आपण याचविषयी थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

LIC IPO काय आहे?

सरकारने एल आयसीमधील आपली किमान पाच टक्के हिस्सेदारी कमी करण्याच्या उददिष्टाने सदर एल आयसी आयपीओ बाजारात आणले आहे.

विमा कंपनीकडुन ह्या आठवडयामध्ये आय पीओ साठी मसुदा कागदपत्रे सादर केली जाऊ शकतात.आणि ह्या महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्यात एल आयसीकडुन आयपीओसाठी DRHP फाईल केले जाऊ शकते.

See also  यशस्वी उद्योजकाच्या अंगी असलेले गुण तसेच वैशिष्टये -Qualities and characteristics of a successful entrepreneur in Marathi

जे व्यक्ती एल आयसी पाँलिसी धारक असतील त्यांना ह्या आयपीओत शेअर्सची खरेदी करण्यासाठी काही अटी तसेच नियमांचे पालन देखील करावे लागणार आहे.ह्या सर्व नियम आणि अटी लवकरच घोषित केल्या जाणार आहे.

एल आयसीने एका पत्रकातुन सर्व पाँलिसी धारकांना आयपीओ मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन देखील केले आहे.आणि सोबत सर्व पाँलिसी धारकांना आयपीओत सहभागी होण्यासाठी त्यांचे पँन अपडेट करण्यास देखील सांगितले आहे.

अधिक माहिती LIC IPO

 

 

तसेच ज्यांना आयपीओ मध्ये सहभागी व्हायचे असेल अशा सर्व पाँलिसी धारकांचे स्वताचे एक डिमँट अकाऊंट असणे देखील गरजेचे असणार आहे.याशिवाय त्यांना आयपीओ खरेदी करता येणार नाही.

म्हणुन ज्यांनी अजुनही डिमंँट अकाऊंट ओपन केलेले नहीये त्यांनी ते ब्रोकरशी संपर्क साधून त्वरीत ओपन करून घ्यावे.

सरकारला ह्या आयपीओचा किती फायदा होऊ शकतो?

आपल्या सगळयांना हे देखील जाणुन घ्यायची उत्सुकता असेल की यातुन सरकारला काय आणि किती फायदा होईल?

एल आयसीमधील किमान पाच टक्के हिस्सेदारी विकली जाईल असे (DIPAM) चे सेक्रेटरी पांण्डेय यांनी याबाबद सांगितले आहे.

सरकारकडुन एकुण किती भाग भांडवल विकला जाईल याचा उल्लेख शेअर विक्रीच्या कागदपत्रात तपशीलवारपणे केला जाणार आहे.

सरकारने ह्या आर्थिक वर्षात 1.75 लाख कोटी रूपयांचे निर्गुंतवणुकीचे ध्येय ठेवले होते जे आता 78 हजार कोटीपर्यत आणले आहे.

पांडे यांनी सांगितले आहे की एल आयसीमधील शेअर्स विक्रीतुन मिळणारी संभाव्य रक्कम लक्षात घेऊन निर्गुंतवणुकीच्या ह्या ध्येयात सुधारणा करण्यात आली आहे.

साधारणत एल आयसीच्या ह्या आयपीओतुन सरकारला साठ हजार कोटी रूपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ह्या आर्थिक वर्षात आत्तापर्यत एअर इंडिया कंपनीचे शेअर्स तसेच इतर सरकारी कंपनींमधील शेअर्समधून सरकारने बारा हजार कोटी एवढी कमाई केली आहे.

LIC policy धारकांना ह्या आयपीओचा फायदा – What is LIC IPO’s Policyholder Category

यात सरकारचे स्पष्ट असे मत आहे एल आयसीचा आयपीओ आणि शेअर्स विक्री केल्याने एल आयसीच्या कामात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता येईल.सेबीमध्ये पेपर दाखल केल्यानंतर याबाबद अधिक सविस्तर माहीती आपणास उपलब्ध होणार आहे.

LIC policy धारकांना आयपीओचा फायदा -Benefits of Policyholder Category

पुढीलप्रमाणे असेल-

● ज्यांच्याकडे एल आयसी पा़ँलिसी असेल अशा व्यक्तींना कंपनीचे शेअर्स डिस्काऊंटमध्ये स्वस्त्यात उपलब्ध होतील.

● यात दहा टक्के हिस्सा हा विमा पाँलिसी धारकांसाठी राखीव ठेवला जाणार आहे.म्हणजेच यात एल आय सी पाँलीसी धारकांना दहा टक्के शेअर्स डिस्काऊंट मध्ये दिले जाणार आहे म्हणुन ज्या विमा पाँलिसी धारकांना आयपीओ खरेदी करायचा असेल त्यांच्याकडे स्वस्त दरात शेअर्स खरेदी करायची ही एक चांगली संधी चालून आली आहे.

● आणि सगळयात महत्वाचे म्हणजे यात गुंतवणुकदारांना सरकारी गँरंटी देखील मिळणार आहे.कारण एल आयसी पाँलिसीवर आज करोडो लोक ट्स्ट करतात तर साहजिक बाब आहे की एल आयसीच्या आयपीओवर लोकांचा ट्रस्ट वाढावा म्हणुन ह्या आयपीओची देखील गँरंटी दिली जाऊ शकते.

याचसोबत ज्या सर्वसामान्य व्यक्तींनी याआधी कधीही शेअर्सची खरेदी विक्री केली नसेल गुंतवणूक केली नसेल अशा व्यक्तींना याने स्वस्त दरात एल आयसीचा आयपीओ खरेदी करता येणार आहे.म्हणजेच सर्वसामान्य व्यक्तीला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणे हा देखील एक महत्वाचा हेतु सरकारचा असलेला आपणास दिसुन येतो.

इतर महत्वाच्या जाणुन घ्यावयाच्या बाबी : LIC Policyholder Category Important Things

  • ● आय पीओची ओपनिंग डेट आणि क्लोजिंग डेट अजुन घोषित करण्यात आलेली नाहीये.
  • ● एल आयसीच्या आयपीओची लाँट साईज मिनिमम क्वांटीटी ही आयपीओ येण्याच्या आधी सेबीमध्ये कागदपत्र दाखल करताना समजुन येईल.
  • ● आयपीओची अलाँटमेंट डेट आय पीओ लाँच होण्याची डेट देखील अजुन निश्चित सांगण्यात आलेली नाहीये.
  • ● एल आयसीचा आयपीओ कुठे लिस्टेड होईल याबाबत देखील अजुन काही माहीती उपलब्ध झालेली नाहीये.
  • एल आयसी पाँलिसी धारकाने आपले पँन कार्ड एल आयसी स्टेटस कसे चेक करावे?
  • ● एल आयसी पाँलिसी धारकाने आपले पँन एल आयसी स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus  वर जावे.
  • ● इथे जाऊन आपला पाँलिसी नंबर,डेट आँफ बर्थ,पँन कार्डची माहीती भरून आणि तिथे दिलेला कँप्च्या कोड जसाच्या तसा भरून सबमीट बटणवर क्लीक करावे.
  • ● वरील सर्व प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर आपले स्टेटस स्क्रीनवर display होत असते.

 पँन कार्ड एल आयसी पाँलिसीला लिंक कसे करावे? –Link Lic Policy To Pancard

विमा पाँलिसी धारकांनी आपले पँन कार्ड एल आयसी पाँलिसीला लिंक करण्याची प्रोसेस पुढीलप्रमाणे आहे:

● ज्या पाँलिसी धारकांचे पँन कार्ड एल आयसी पाँलिसीला लिंक नसेल त्यांनी ते लिंक करून घ्यावे.यासाठी पाँलिसीधारकांनी https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/ वर जावे.

● आणि मग होम पेजवर मग तुमच्यासमोर एक online pan registration चे आँप्शन दिसुन येईल तिथे क्लीक करावे.मग online pan registration पेजवर आपणास एक proceed बटण दिसुन येईल त्यावर क्लीक करावे.

● यानंतर आपला ईमेल आयडी,मोबाईल नंबर,एल आयसी पाँलिसी नंबर इंटर करावा.

● मग आपल्यासमोर एक कँपच्या कोड येत असतो तो जसाच्या तसा तिथे भरावा.

● यानंतर आपल्या रेजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी सेंड केला जात असतो तो देखील तिथे जसाच्या इंटर करावा आणि सबमीट बटणवर क्लीक करावे.

याव्यतीरीक्त आपण आँनलाईन एखाद्या एल आयसी एजंटची मदत घेऊन आँनलाईन देखील आपले पँन कार्ड एल आयसी पाँलिसीला लिंक करू शकतो.

LIC policy details ला अपडेट करण्यासाठी काय करावे? – How to update LIC policy

समजा आपला आपला अँड्रेस,ईमेल आयडी मोबाईल नंबर इत्यादी चेंज झाले आहे आणि आपल्याला ही आपल्या एल आयसी पाँलिसी अकाऊंटशी लिंक असलेली सर्व डिटेल अपडेट करावयाची असेल तर आपण पुढील पदधतीने करू शकता-

● एल आयसी वेब साईटवर जाऊन प्रथमत आपल्या अकाऊंटवर लाँग इन करावे.

● E services नावाचे एक आँप्शन आपणास दिसुन येईल त्यावर क्लीक करावे.

● मग खाली आपल्याला kyc update हे आँप्शन दिसुन येईल.त्यावर क्लीक करावे.

● यानंतर आपले सर्व नवीन कागदपत्रे यात अपलोड करावीत.

● मग यानंतर एल आयसी आँथरीटीकडुन आपले हे अपलोड केलेले सर्व नवीन कागदपत्रांची तपासणी केली जाते.

● आणि मग सर्व तपासणी करून झाल्यावर आपली KYC details update केली जात असते.

See also  आय एफ एस्सी अणि एम आय सी आर कोड म्हणजे काय? - IFSC AND MICR code meaning in Marathi