Put Call Ratio विषयी माहीती – Share market PCR information

Put Call Ratio विषयी माहीती

आज कोणताही गुंतवणुकदार आपल्या पैशांची एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा गुंतवणुक करण्याआधी आधी मार्केटमधील हालचाल जाणुन घेत असतात.आणि त्यासाठी ते विविध आर्थिक उपाय शोधत असतात.

Put Call Ratio हे एक असे डेरिव्हीटिव्ह इंडिकेटर असते.ज्याचा वापर करून गुंतवणुकदार मार्केटमधील हालचालीचे एकुण मोजमाप करत असतात.

याने गुंतवणुकदारांना हे कळत असते की मार्केटमधील भाव कधी वाढणार आहे किती वाढणार आहे किंवा मार्केट कधी डाऊन जाणार आहे इत्यादी सर्व बाबी गुंतवणुकदार Put Call Ratio द्वारे जाणुन घेऊ शकतात.

आजच्या Share market PCR information लेखात आपण ह्याच Put Call Ratio विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

 

Put Call Ratio म्हणजे काय?

Put Call Ratio हे एक व्युत्पन्न सुचक (Derivative Indicator) आहे.हे मुख्यकरून गुंतवणुकदारांना मार्केटचे ट्रेंड जाणून घ्यायला मदत व्हावी यासाठी खास तयार करण्यात आले आहे.

यात गुंतवणुकदारांना हे जाणुन घेण्यास मदत होते की बाजार कधी खाली येणार आहे आणि कधी वर जाणार आ.

म्हणजेच PCR द्वारे आज कोणताही गुंतवणुकदार कोणत्याही कंपनीचे स्टाँक कधी वाढणार कधी कमी होणार हे जाणुन घेऊ शकतो.याच्याने बाजारात तेजी किती प्रमाणात आहे आणि मंदीचे प्रमाण किती आहे हे जाणुन घेण्यास मदत होते.

 

Put Call Ratio कसा Calculate केला जातो?

 Put Call Ratio चे Calculation आपण दोन पदधतीने करू शकतो.

 

1) Open Interest Of Specific Time

2) Option Trading Volume

Put Call Ratio Calculation चा फाँर्मुला शिकुन घेण्यापुर्वी आपल्याला आधी गुणोत्तराच्या घटकांविषयी

पर्सनली जाणुन घेणे अत्यंत आवश्यक आहे.

1) Open Interest Of Specific Time :

See also  SBI होम लोन - व्याजदर ,पात्रता व कागदपत्रे - SBI Home loan Interest rate

 ह्या पदधतीने पुट काँल रेशो कँलक्युलेट करण्यासाठी आपल्याला एकाच दिवसामध्ये पुट आँप्शन वर उपलब्ध झालेल्या सर्व ओपन इंटरेस्टसोबत त्याचदिवशी आपल्याला काँल आँप्शन द्वारे उपलब्ध झालेल्या इंटरेस्टसोबत विभाजित करून पुट काँल रेशो कँलक्युलेट करायचा असतो.

 Formula For Calculation :

 (PCR) Put Call Ratio=Put Open Interest/Call Open Interest

 

 2) Option Trading Volume :

 या पदधतीने पुट काँल रेशो कँलक्युलेट करण्यासाठी आपल्याला एका दिवसात जेवढे पुट आँप्शन आपण ट्रेड केले आहेत त्यांचे विभाजन त्याच दिवशी आपण ट्रेड केलेल्या काँल आँप्शन सोबत करावे लागत असते.

 

Formula For Calculation :

PCR) Put Call Ratio=Put Trending Volume /Call Trending Volume

 

अशा पदधतीने वरील दोन पदधतींचा वापर करून आपण पुट काँल रेशो कँल्क्युलेट करू शकतो.

 Put Call Ratio कसा Analyze केला जातो?

 • आपण एक गोष्ट लक्षात घेणे खुप महत्वाचे आहे की पुट आँप्शनचा वापर आपण अशावेळी करत असतो जेव्हा आपल्याला वाटते की मार्केट डाऊन जाणार आहे.
 • म्हणजेच जेव्हा मार्केट मध्ये तेजी येणार असे आपल्याला दिसुन येते तेव्हा आपण काँल आँप्शन बाय करत असतो.
 • आणि जेव्हा मार्केट मध्ये मंदी येणार असे आपल्याला दिसुन येते तेव्हा आपण पुट आँप्शनला बाय करतअसतो.
 • जेव्हा PCR एक पेक्षा कमी असतो तेव्हा आपल्याला हे सुचित केले जाते की काँल व्हाँल्युमचे प्रमाण पुट व्हाँल्युमपेक्षा अधिक जास्त आहे.आणि हेच बाजारात पुढे तेजी येणार आहे याचे चिन्ह असते.
 • जेव्हा PCR एक पेक्षा जास्त असतो तेव्हा आपल्याला हे सुचित केले जात असते की पुट व्हाँल्युमचे प्रमाण काँल व्हाँल्युमपेक्षा अधिक आहे.आणि याच्याने पुढे जाऊन बाजारात मंदी येणार आहे असे आपल्याला सुचित केले जात असते.
 • पण असे असले तरी एक गोष्ट आपण आवर्जुन लक्षात घ्यायला हवी की एकचा पीसीआर हा मार्केटमधील
 • चढ उतार जाणुन घेण्यासाठी खुप महत्वाचा मुददा नसतो.
 • कारण ट्रेडर्स हे पुट आँप्शन खरेदी करण्यापेक्षा काँल आँप्शन अधिक खरेदी करणे पसंद करतात.म्हणुन
 • इक्विटी आँप्शनसाठी PCR 7 हे मार्केटमधील हालचालीचे मुल्यांकन अधिक योग्य असल्याचे आपण मानत असतो.
 • आणि असे देखील म्हणतात की 7 किंवा 1 वर जर पीसीआर असेल तर काँल आँप्शनपेक्षा पुट आँप्शन खरेदी करण्याकडे गुंतवणुकदारांचा मुख्य कल असतो.
 • कारण बाजारात मंदी वाढणार ह्या भावनेत अधिक गुंतवणुकदार आपले पोर्टफोलिओ विक्रीच्या बाबतीत हेज करून टाकत असतात.आणि बाजारात अजुन किती घसरण होते आहे याचा अंदाज घेत असतात.
See also  पोस्ट ऑफिसमधील व्याजदरात वाढ झालेल्या योजना अणि त्यांचे व्याजदर - Post office scheme increased interest rates in Marathi

 

Put Call Ratio चे महत्व काय आहे?

Put Call Ratio हे एक Derivative Indicator आहे आणि हे बाजारातील हालचाल जाणुन घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते.

Put Call Ratio चे महत्व पुढीलप्रमाणे आहे :

 • हे एक असे साधन तसेच माध्यम आहे ज्याचा वापर करून आपण बाजारात कधी तेजी येणार आणि कधी मंदी येणार हे जाणुन घेऊ शकतो.
 • PCR द्वारे गुंतवणुकदारांना अंतर्निहित सिक्युरीटीच्या किमतीच्या दिशेमध्ये काय बदल तसेच हालचाल होते आहे हे जाणुन घेता येते.
 • बाजारात जेवढे गुंतवणुकदार आहेत ते पुट काँल रेशोद्वारे बाजारात काय ट्रेंड चालू आहे हे विश्लेषण करून जाणुन घेऊ शकतात.

 

Put Call Ratio च्या मर्यादा कोणकोणत्या असतात?

पुट काँल रेशोचा वापर गुंतवणुकदार बाजारातील तेजी आणि मंदीचे स्टेटस जाणुन घेण्यासाठी करत असतात.

याने गुंतवणुकदारांना बाजा़र कधी वर येणार आणि कधी खाली जाणार हे सुचित होत असते.

पण पुट काँल रेशोच्या देखील काही मर्यादा आहेत ज्या आपण जाणुन घेणे फार गरजेचे आहे.

Put Call Ratio च्या मर्यादा पुढीलप्रमाणे आहेत :

 • पुट काँल रेशोच्या अनेक मर्यादामध्ये त्याची पहिली मर्यादा ही आहे पुट काँल रेशो म्हणजेच(PCR) मार्केटमध्ये होत असलेल्या प्रमुख घडामोडींचे एकदम बारकाईने निरीक्षण करून गुंतवणुकदारांना दर्शवत नसतो.
 • पुट काँल रेशोचे वाचन कसे करावे याचे ज्ञान सर्व गुंतवणुकदारांना असायला हवे.कारण येथे एखादी लहान सहान शिफ्टदेखील बाजारातील हालचालीची महत्वपुर्ण सुचना देत असते.
 • Put Call Ratio हे एक विरोधाभासी सुचक असते ज्याचा वापर आपण बाजारातील हालचाल जाणुन घेण्यासाठी करत असतो पण कोणत्याही शेअरवर पैसे लावण्यापुर्वी गुंतवणुकदाराने एकदा इतर बाबींचे देखील समतोल प्रमाणात वजन करून पाहायला हवे.

 

Put Call Ratio विषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न

 1)Put Call Ratio हे एक चांगले Indicator आहे का?

See also  आपले Financial Status एका वर्षात कसे बदलायचे? - Finance tips Marathi

बाजारात भविष्यामध्ये तेजी येणार आहे का मंदी शेअर्सचे भाव वाढणार आहेत का कमी होणार आहे हे दर्शवण्याचे काम पुट काँल रेशो करत असते.

याने गुंतवणुकदारांना एक दिशा मिळते की त्यांनी कधी पुट आँप्शन खरेदी करायला हवे आणि कधी काँल आँप्शन खरेदी करायला हवे.याने गूंतवणुकदारांचा वेळ देखील वाचत असतो.आणि मार्केटचे ट्रेंड देखील त्यांना समजण्यास मदत होत असते.

याकारणामुळे पुट काँल रेशोला एक चांगले इंडिकेटर म्हणण्यास आपणास कोणतीही हरकत वाटत नाही.

2) समान PCR चा अर्थ काय होत असतो?

 जर पीसीआर 1 असेल तर पुट काँल रेशो आपल्याला हे सुचित करत असते की गुंतवणुकदारांचा समान कल काँल आँप्शन प्रमाणेच पुट आँप्शन खरेदी करण्याकडे देखील आहे.

याने भविष्यात मार्केटमध्ये तटस्थपणे ट्रेड चालणार आहे हे आपल्याला सुचित होत असते.

0.7 हा पीसीआर मजबुत तेजीची भावना मानला जात असतो.तर एकपेक्षा अधिक पीसीआर भविष्यात अधिक मंदी येण्याचे चिन्ह असते.