बँक आँफ इंडियाच्या स्टार होम लोन योजना विषयी माहीती – Bank of India Star home loan scheme information in Marathi

बँक आँफ इंडियाच्या स्टार होम लोन योजना – Bank of India Star home loan scheme information in Marathi

स्टार होम काय आहे?

स्टार होम लोन ही एक गृहकर्ज योजना आहे जी मुख्यत्वे शेतकरी बांधवांसाठी बँक आँफ इंडियाने सुरू केली आहे.

बँक आँफ इंडिया ही एक शासकीय बँक आहे.बँक आँफ इंडिया स्टार होम लोन ह्या योजनेमार्फत शेतकरींना आपले नवीन घर बांधण्यासाठी तसेच जुन्या घराची रिपेअरींग करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

स्टार होम लोन योजनेचे फायदे?

● स्टार होम लोन ह्या योजनेमार्फत शेतकरींना कमी व्याजदराची आकारणी करून स्वताचे घर तसेच फार्म हाउस बांधायला बँकेकडुन होम लोन दिले जात आहे.

● ज्यांची आर्थिक परिस्थिति अत्यंत हलाखीची आहे ज्यामुळे त्यांच्याजवळ स्वताचे नवीन घर बांधण्यासाठी पैसे नही तसेच आपल्या जुन्या घराची दुरूस्ती करण्यासाठी जवळ पुरेसे भांडवल उपलब्ध नही अशा शेतकरींना ह्या योजनेअंतर्गत गृह कर्ज दिले जाणार आहे.

● स्टार होम लोन योजनेत जी रक्कम मिळेल त्यात शेतकरी आपल्या शेतजमिनीवर फार्म हाउस बांधु शकतात.

● सरकारी नोकरदारांप्रमाणे ह्या योजनेचा लाभ घेत शेतकरींना देखील त्यांच्या स्वप्रातील स्वताचे हक्काचे घर बांधता येणार आहे.

स्टार होम लोन योजनेअंतर्गत शेतकरींना साधारणत किती कर्ज दिले जाणार आहे?

स्टार होम लोन ह्या योजनेच्या मार्फत शेतकरींना किमान एक लाख अणि कमाल ५० लाखापर्यत कर्ज दिले जाणार आहे.

अणि ह्यावर ८.०५ या दराने व्याजदराची आकारणी करण्यात येणार आहे.ज्यात शेतकरींना घरदूरूस्तीकरीता १० लाख दिले जाणार आहे.

See also  Bond म्हणजे काय?what is bond in finance

स्टार होम लोन योजनेअंतर्गत किती कालावधीसाठी कर्ज दिले जाणार आहे?

स्टार होम लोन योजनेअंतर्गत बँक आँफ इंडिया कडून शेतकरींना साधारणत १४ ते १५ वर्षाच्या कालावधीकरीता कर्ज दिले जाणार आहे.

स्टार होम लोन योजने अंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी शेतकरींना आयटी रिटर्न सादर करावा लागेल का?

स्टार होम लोन योजने अंतर्गत कर्ज प्राप्त करण्यासाठी शेतकरींना कुठल्याही प्रकारचा आयटी रिटर्न सादर करावा लागणार नाहीये.

स्टार होम लोन योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?

स्टार होम लोन ह्या गृह कर्ज योजना मार्फत अशाच शेतकरींना कर्ज प्रदान केले जाणार आहे जे शेतीच्या कामात गुंतलेले आहेत अणि ज्यांचे बँक आँफ इंडिया मध्ये केसीसी अकाऊंट आहे.

स्टार होम लोन योजनेचा आँनलाईन अर्ज कुठे करायचा?

पात्र उमेदवार ह्या स्टार होम लोन योजनेचा फायदा प्राप्त करण्यासाठी योजनेत सहभागी होण्यासाठी बँक आँफ इंडियाच्या आँफिशिअल वेबसाइट वर जाऊन आँनलाईन फाँर्म भरून तो सबमीट करून अर्ज करू शकतात.

किंवा आपण आँफलाईन पदधतीने बँकेत जाऊन देखील योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतो.

आँनलाईन अँप्लाय करण्यासाठी आपणास BankofIndia.co.in ह्या बँक आँफ इंडियाच्या आँफिशिअल वेबसाइट वर जावे लागेल.

होम पेजवर आल्यावर आपणास स्टार होम लोन योजनेची लिंक दिसुन येईल त्यावर क्लीक करायचे.

यानंतर अर्जाच्या लिंकवर क्लीक करायचे.यानंतर आपल्यासमोर अर्जाची पीडीएफ ओपन होईल.यानंतर फाँर्म डाऊनलोड करून घ्यायचा अणि त्याची प्रिंट काढुन घ्यायची.

यानंतर फाँर्ममध्ये विचारलेली सर्व माहीती व्यवस्थित भरून घ्यायची आवश्यक ते डाँक्युमेंटस अपलोड करून घ्यायचे अणि शेवटी बँकेत जाऊन तो फाँर्म जमा करायचा.

स्टार होम लोन योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतील?

स्टार होम लोन योजनेसाठी अर्ज करायला आपणास पुढील महत्वाची कागदपत्रे लागतील –

● आपले आय कार्ड तसेच आधार कार्ड

● वय अधिवास प्रमाणपत्र

● अँड्रेस प्रूफ

See also  अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय - म्हत्वाचे मुद्दे -Affiliate marketing information in Marathi

● केसीसी बँक अकाऊंट पासबुक

● पासपोर्ट साईज दोन फोटो

● काँन्टँक्ट नंबर

● शेतजमिनीची काही महत्वपूर्ण कागदपत्रे

STAR LOAN FEATURES- SOURCE

  • Maximum Amount up to 90 of request value
  • Maximum prepayment term up to 360 months
  • Holiday/ Moratorium period up to 36 months
  • EMI starts@Rs. 720/- per Lakh
  • Income ofco-applicant( close relative) considered for eligibility
  • Smart Home Loan( OD installation) for entire limit/ outstanding balance@ROI of Home Loan