पोस्ट आँफिस फ्रेंचायची योजना २०२२ विषयी माहिती – Post office franchise scheme 2022 information in Marathi

पोस्ट आँफिस फ्रेंचायची योजना २०२२ विषयी माहिती Post office franchise scheme 2022 information in Marathi

मित्रांनो डाक विभाग हे जगातील सर्वात मोठे विश्वासु प्लँटफाँर्म मानले जाते.डाक विभाग नेहमी आपल्यासाठी टपाल सेवेचे काम करते

तसेच इतर देखील विविध सेवा सुविधा पोस्ट ऑफिस आपल्यासाठी घेऊन येत असते.

आपल्यातील ज्या व्यक्तींना २०२२ मध्ये फ्रेंचायजीचा आपला स्वताचा उद्योग व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांच्यासाठी पोस्ट आँफिस एक चांगली संधी घेऊन आले आहे.जिचे नाव आहे पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी.

आजच्या लेखात आपण ह्याच योजनेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण पोस्ट आँफिस फ्रेंचाइजी स्कीम नक्की काय आहे?

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष काय ठेवण्यात आले आहेत.ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज कसा अणि कुठे करायचा?अर्ज करताना आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागतील इत्यादी महत्वाच्या बाबींचा आढावा घेणार आहे.

पोस्ट आँफिस फ्रेंचाइजी योजना काय आहे?

पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी ही एक पोस्ट आँफिसकडुन प्रदान करण्यात येत असलेली एक विशेष योजना तसेच महत्वचा उपक्रम आहे.ह्या योजनेच्या मार्फत आपणास फक्त ५ ते ६ हजारामध्ये स्वताचा फ्रेंचाइजी बिझनेस ओपन करता येणार आहे.

पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी योजना का सुरू करण्यात आली होती?

देशभरातील मूलभूत टपाल सुविधांमध्ये प्रवेश वाढविण्याची सार्वत्रिक सेवा जबाबदारी भारतीय पोस्टकडे सोपवण्यात आली आहे.

See also  १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता राष्ट्रीय एडस संशोधन संस्थेमध्ये डेटा एंट्री ऑपरेटरची भरती सुरू

1.55 लाख टपाल कार्यालये,ज्यापैकी 89% ग्रामीण आहेत,जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क भारतात असूनही, टपाल कार्यालयांची मागणी कायम आहे.

विशेषत: नव्याने विकसित होणाऱ्या शहरी भागात अधिक पोस्ट ऑफिस सुरू करण्याची ग्राहकांकडून सतत मागणी होत आहे.

ग्राहकांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी,इंडिया पोस्टने फ्रेंचायझी योजना सुरू केली होती.

पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी योजनेचा फायदा –

● पोस्ट आँफिस फ्रेंचाइजी स्कीम ह्या योजनेचा लाभ घेत नवोदित उद्योजकांना कमी पैशांची गुंतवणुक करून स्वताचे आँफिस,दुकान टाकता येणार आहे.स्वताचा फ्रेंचाइजी व्यवसाय सुरू करता येईल.

पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी स्कीम ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष काय ठेवण्यात आले आहेत?

● आपण भारताचे नागरीक असणे गरजेचे आहे.

● योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे वय ३०पेक्षा अधिक असु नये.पण एस सी एस टी ओबीसी कँटँगरी मधील उमेदवारांना यात सुट देण्यात आली आहे.म्हणजेच एस सी एसटी ओबीसी कँटँगरी मधील उमेदवार ३० वयापेक्षा अधिक वय असुन देखील योजनेसाठी अर्ज करू शकतात.

● अर्जदाराने एखाद्या मान्यता प्राप्त बोर्डामधून किमान दहावी बारावीपर्यतचे शिक्षण पुर्ण केलेले असावे.

पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी स्कीम ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने अर्ज कसा अणि कुठे करायचा?

ज्या उमेदवारांना पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी स्कीमचा लाभ घ्यायचा आहे.असे उमेदवार आँनलाईन अणि आँफलाईन म्हणजेच पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ह्या दोघे पदधतीने अर्ज करू शकणार आहेत.

आँनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार indiapost.gov.in ह्या वेबसाइट वर जाऊ शकतात.अणि सदर योजनेसाठी आपली नावनोंदणी करू शकतात.

Indiapost.gov.in वर जाऊन आपण आपली नाव नोंदणी केल्यानंतर आपल्याला मोबाइल नंबर तसेच ईमेलदवारे एक युझर आयडी अणि आपला लाँग इन पासवर्ड दिला जातो.

ह्या युझर आयडी लाँग इन पासवर्डचा वापर करून अर्जदार ह्या योजनेसाठी अर्जही करू शकतील अणि ह्या पोर्टलला भेट देऊन सदर योजनेविषयी अधिक सविस्तर पणे माहीती देखील मिळवू शकणार आहे.

See also  TAIT स्कोअर कार्ड डाऊनलोड करताना इनवॅलिड लाॅग इन क्रेडेनशिअल येत असल्यास काय करायचे?Invalid login credentials problem solution in Marathi

उमेदवाराच्या अर्जाला स्वीकृती दिल्यावर उमेदवाराला पी एस एफ मार्फत फ्रेंचाइजी करारावर सही करणे आवश्यक आहे.

या करारामध्ये आपणास पीएस एफ मार्फत पोस्ट ऑफिस कसे चालविले जाते त्याच्या अटी अणि नियम काय असतील हे दिलेले असते.

उमेदवाराला पी एस एफ कडुन ठरवलेल्या गाईडलाईन्स अणि नियमांचे पालन करण्यास सहमती देणे बंधनकारक असणार आहे.करारावर सही करून झाल्यानंतर उमेदवाराला आपल्या स्टार्ट अप बिझनेससाठी किट दिले जाते.ज्यात उमेदवाराला आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी लागत असलेली सर्व सामग्री असते.

उमेदवाराला पी एस एफ आँफिसर कडुन व्यवसायाबाबतीत योग्य ते प्रशिक्षण देखील यात दिले जात असते.

पीएस एफ अंतर्गत योजनेसाठी अर्ज करायला पात्रतेच्या कोणत्या अटी अणि नियम लागु करण्यात आले आहे?

● उमेदवार मुलत भारतीय नागरीक असावा.

● योजनेसाठी अर्ज करणारया उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष असायला हवे.

● उमेदवाराचे कुठलेही जुने क्रिमिनल रेकाँर्ड वगैरे नसावे.

● आपल्या व्यवसायाचा अचुक पत्ता आपला योग्य काँन्टँक्ट नंबर देणे गरजेचे आहे.

पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी स्कीमसाठी अर्ज करायला काही फी लागते का?उमेदवाराकडुन काही शुल्क आकारले जाते का?

होय पोस्ट ऑफिस फ्रेंचाइजी स्कीमसाठी अर्ज करायला ४ ते ५ हजार इतके शुल्क आकारले जाते.हे शूल्क उमेदवार डीडी दवारे नवी दिल्ली येथे पोस्ट ऑफिस सहायक महासंचालकांना पाठवू शकतो.

एससी एसटी कँटँगरीमधील महिला तसेच ज्या उमेदवारांची आधीच निवड करण्यात आली आहे त्यांना शुल्क भरण्याची कुठलीही आवश्यकता नाही.

फ्रेंचायझी आउटलेटद्वारे काय काय ऑफर केले जाऊ शकते?

● स्टॅम्प आणि स्टेशनरीची विक्री.

● नोंदणीकृत लेखांचे बुकिंग, स्पीड पोस्ट लेख, मनी ऑर्डर.

● पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI) साठी एजंट म्हणून काम करणे आणि प्रीमियम संकलनासह विक्रीनंतरची सेवा प्रदान करणे.

● किरकोळ सेवा जसे की बिल/कर/दंड संकलन/विभाग पेमेंट सेवा.

● ई-गव्हर्नन्स आणि नागरिक केंद्रित सेवांची सोय करणे.

See also  पेडागोजी म्हणजे काय - What is the meaning of pedagogy in Education?

विभागाकडून भविष्यात त्याच्या आउटलेट्सद्वारे सुरू करण्यात येणारी इतर कोणतीही सेवा.

Leave a Comment