शेअर बाजार का कोसळले ? घसरण होण्याचे प्रमुख कारण काय?(Why stock market crash )

शेअर बाजार का कोसळले ? घसरण होण्याचे प्रमुख कारण काय?(why stock market crash in Marathi )

 

काल भारतीय शेअर बाजारात खुप मोठी घसरण झालेली आपणास पाहायला मिळाली.यात सेन्सेक्स काल 1400 अंकांनी घसरलेला आपणास पाहायला मिळाला.

आणि निफ्टी देखील 450 अंकानी घसरला आहे.यामागील कारणाचा खुलासा करताना काही तज्ञांनी असे सांगितले आहे की जगभरात कोरोना व्हारयरसचा जो नवीन स्ट्रेन सक्रिय झाला आहे तो ह्या सर्वामागे कारणीभुत आहे.

याबाबत सविस्तर वृत असे आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोना व्हायरसचे एक नवीन स्ट्रेन आढळुन आले आहे.ज्यामुळे आज जगभरात पुन्हा एकदा जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील एक विषाणु शास्ञज्ञ ज्यांचे नाव टुलिओ डी अलँलिव्हेरा असे आहे यांनी असा खुलासा केला आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये multiple mutation covid आढळुन आले आहे.

विषाणु शास्त्रज्ञ टुलिओ डी अँलिव्हेरा यांच्या ह्या मोठया खुलाशानंतर अमेरिका,भारत तसेच इतर सर्व देशांनी आफ्रिकेतील उड्डाणे आपल्या देशात येणे तात्पुरता स्थगित देखील केले आहे.

  • कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे जगभरात भीतीचे वातावरण तर निर्माण झालेच याचसोबत शेअर बाजारालाही याचा खुप मोठा फटका काल बसताना दिसुन आला.
  • भारतीय बाजारपेठेत आँटो,उर्जा,बँक इत्यादी क्षेत्रातील शेअर्सला खुप मोठा फटका बसताना दिसुन आला.
  • यात फक्त निफ्टी फार्मा इंडेक्स हाच एक निर्देशांक असा दिसुन आला जो वेगाने धावत होता.
  • काल आँटो कंपन्यांचे शेअर्स एकामागुन एक घसरताना आपणास दिसुन येत होते.यामध्ये टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये खुप अधिक घसरण झाल्याचे विश्वसनीय सुत्रांकडुन सांगितले जाते आहे.
  • टाटा मोटर्सचा स्टाँक आज 5.33 टक्क्यांनी घसरताना दिसुन आला आणि हा 466 वर व्यवहार करताना दिसुन येत होता.

शेअर बाजाराच्या घसरणीची कारणे कोणकोणती आहेत?

 

शेअर बाजाराच्या घसरणीचे प्रमुख कारण दक्षिण आफ्रिकेत आढळुन आलेला कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेन आहे.ज्याचा शेअर मार्केटवर देखील खुप मोठा प्रभाव पडलेला दिसुन आला.

See also  ट्रीपल आर चा फुल फाँर्म काय होतो?- RRR movie full form in Marathi

बाजार तज्ञांकडुन असे सांगितले जात आहे की भारतीय शेजर बाजारात घसरण होण्यास जबाबदार अनेक आंतरराष्टीय कारणे आहेत.

शेअर बाजाराच्या घसरणीची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत :

1)कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन

 2) कच्चा तेलात झालेली घसरण

 3) आशियाई बाजारात झालेले मोठे नुकसान

1)कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन :

जागतिक आरोग्य संघटना(world health organization) यांच्याकडुन असे कळविण्यात आले आहे की दक्षिण आफ्रिकेत विषाणुचा एक नवा स्ट्रेन शोध तपासाअंती आढळुन आला आहे.आणि हा विषाणु कोरोनापेक्षा अधिक भयंकर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडुन सांगितले जात आहे.

आणि हा विषाणु वातावरणात झपाटयाने पसरत देखील आहे.आणि चिंतेची बाब ही आहे की जागतिक आरोग्य संघटनेने असे सांगितले आहे की विषाणुच्या ह्या नवीनतम प्रकारापुढे कोरोना व्हायरसची लस देखील कुचकामी ठरू शकते.

याचकरिता जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत चर्चा करण्यासाठी एक तातडीची बैठक देखील आयोजित केली आहे.

ह्यामुळे जनतेमध्ये पुन्हा एकदा भीतीचे सावट निर्माण झाले आहे.याचकरिता ब्रिटन या देशाकडून खबरदारी म्हणून अनेक देशांमधील विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे.

साजिद जाविद जे (united kingdom)चे आरोग्य सचिव आहेत त्यांनी काल आपल्या टविटर अकाऊंटवरून टविट देखील केले होते की आरोग्य संघटनांकडुन ह्या विषाणुविषयी कसुन चौकशी केली जात आहे.

यावर दक्षता म्हणुन दुपारीच सहा आफ्रिकन देशांच्या फ्लाईटला तात्काळ बंदी घालण्यात आली होती.

2) कच्च्या तेलात अचानक झालेली घसरण :

शेअर बाजार घसरण्यामागचे दुसरे कारण कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घसरण सुदधा सांगण्यात येत आहे.

कारण कच्चा तेलाच्या किंमतीचा परिणाम हा भारतीय बाजारपेठेवर देखील होत असतो.आणि नुकतेच आंतराराष्टीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात घट झालेली आहे.त्यामुळे देखील शेअर बाजार घसरल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

3) आशियाई बाजारात झालेले मोठे नुकसान :

कोरोनाचा नवीन स्ट्रेन सक्रीय झाल्यामुळे युरोपात देखील पुन्हा एकदा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

See also  BPSC 68th Prelims Result 2023 PDF Download । BPSC ६८ वी प्रिलिम्स निकाल २०२३

यामुळे युरोपातील अनेक देशांकडून उड्डाणे रदद केली जात आहे.

आणि याचा मोठा फटका उद्योग व्यवसायांवर देखील पडताना दिसुन येत आहे.विमान प्रवास स्थगित करण्यात आल्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये निराशेचे वातावरण आपल्याला दिसुन येत आहे.

आणि गुंतवणुकदार हतबल असल्याचा सगळयात मोठा फटका हा आहे की आशियाई बाजारात मोठी घसरण झालेली आहे.

याचेच परिणाम स्वरूप जपानी निकी 225 मध्ये 800पेक्षा अधिक प्रमाणात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

Australian s&p asx 200 यात देखील मोठया प्रमाणात घसरण झालेली आहे.एवढेच नाही तर शांघाय कंपोझिट इंडेक्स देखील 0.7 टक्क्यांनी घसरले आहे.

गूंतवणुकदारांनी अशा परिस्थितीत काय करायला हवे?

  • तज्ञांकडुन असा सल्ला दिला जातो आहे की बाजारात अचानक झालेल्या ह्या मोठया घसरणीमुळे गुंतवणुकदारांनी जास्त त्रास करून घेऊ नये.
  • देशांतर्गत आर्थिक सुधारणा मार्गावर आहे आणि भारतात लसीकरण देखील विपुल प्रमाणात घडुन येत आहे.त्यामुळे बाजार पेठेनी पुढे जाऊन एक नवीन उच्चांक गाठण्याची तयारी करायला हवी.
  • ज्या गुंतवणुकदारांनी अजून फारशी गुंतवणुक केलेली नाहीये त्यांनी ह्या घसरणीकडे एक एंट्री पाँईट म्हणुन बघायला हवे.
  • आणि तज्ञांकडुन असे देखील सांगण्यात आले आहे की दिर्घकालीन गुंतवणुकदारांनी घाबरून जाऊन आपले होल्डिंग कोणालाही विकत बसू नये.
  • ज्या गुंतवणुकदारांचे गुंतवणुकीचे मुख्य ध्येय पुर्ण झाले असेल आणि त्यांना निधीची आवश्यकता असेल अशाच गुंतवणुकदारांनी असे करावे.