माणसाला किती जागेची आवश्यकता असते?- How much land does man need short story in Marathi

माणसाला किती जागेची आवश्यकता असते?- How much land does man need short story in Marathi

प्रेरणादायी कथेविषयी

मित्रांनो आज आपण एक खुप छान अणि प्रेरणादायी कथेविषयी जाणुन घेणार आहोत.
हाऊ मच लँण्ड डझ मँन नीड ही लिओ टाँलस्टाँय यांनी लिहिलेली कथा आहे.ही कथा बी ए तसेच दहावी,तसेच अकरावी बारावीच्या इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमात देखील समाविष्ट करण्यात आलेली आहे.
मित्रांनो ही फक्त एक लघुकथा नाहीये जीवणाचे खर सत्य आहे वास्तव आहे ज्याच्यापासुन आपण सर्व जण आज अनभिज्ञ आहोत.
1886 मध्ये ह्या कथेचे लेखन करण्यात आले होते अणि ही कथा 1886 मध्येच प्रकाशित देखील करण्यात आली होती.रशिया मधील एका रूरल नावाच्या गावामधील ही कथा आहे.
या कथेच्या शीर्षकाचा मुख्य भावार्थ हा आपल्याला कथेचा जो शेवट घडुन येतो त्यातुन प्राप्त होतो.

कथेचा सारांश -short summary of how much land does man need in Marathi

पहोम नावाचा एक गरीब शेतकरी असतो.त्याच्या पत्नीच्या मोठया बहिणीचे लग्न एका मोठया व्यापारीशी झालेले असते.
एके दिवशी पहोमच्या पत्नीची बहिण तिच्या बहिणीला भेटायला पहोमकडे त्याच्या छोटयाशा गावात येते.अणि तिच्या नवरयाच्या श्रीमंतीचे कौतुक करू लागतेकथेचा सारांश -short summary of how much land does man need in Marathi

अणि तिच्या छोटया बहिणीला सांगते की कशाला तु एवढया छोटयाशा गावात जीवन व्यतीत करू राहिली आहेस?आमचे शहरी जीवन बघ आमची लाईफस्टाईल बघ अणि तु राहत असलेल्या ह्या छोटयाशा खेडयातील जीवण बघ.
मग पहोमची पत्नी आपल्याला साधे राहणीमान आवडते असे सांगुन आपल्या साधेपणाविषयी बोलुन स्वताचा बचाव करू लागते.
अणि ती तिच्या बहिणीला सांगते की आमच्याकडे जेवढे आहे जे काही आहे त्यात आम्ही खुश आहे.समाधानी आहे.
लगेच दोघा बहिणींचे संभाषण चालू असताना पहोम देखील मध्ये बोलतो की शेतकरी आहे याचा कोणताच पस्तावा नही.
मी यात आनंदी आहे पण मला जर अजुन थोडी जमीन मिळाली असती तर मी माझ्या कुटुंबाचे अधिक चांगल्या पदधतीने पालन पोषण करू शकलो असतो अणि ह्या जगाला देखील दाखवून दिले असते की मी काय आहे अणि काय करू शकतो?
अणि राक्षस देखील माझे काहीच वाईट करू शकला नसता पहोमचे हे शब्द राक्षसाच्या म्हणजेच डेव्हीलच्या कानी पडतात.
तेव्हा डेव्हील म्हणतो बघ आता मी तुझ्यासोबत काय करतो?तुला जमीन हवी आहे ना तुला जमीनच देतो.अणि एकाचवेळी ती सर्व जमीन तुझ्याकडुन हिरावून देखील घेईल.
पहोमच्याच गावामध्ये एक पैसेवाली महिला म्हणजेच जमीनीची मालकीन राहत असते जिच्या जमीनीवर पहोम शेती करत असतो.
पहोम ज्या जमिनीवर शेती करायचा त्यावर शेती करण्यासाठी त्याला जमीनीच्या मालकीनला नेहमी पैसे द्यावा लागत होते.
म्हणुन एकेदिवशी त्या महिलेला म्हणतो की तुम्ही मला तुमची तीस एकर जमीन विकुन टाका.यासाठी पहोम बँकेतुन कर्ज वगैरे घेतो अणि पैसे जमवतो.
पहोम असा विचार करतो की तो त्याच्या अतिरीक्त जमीनीवर अजुन जास्त काम करेल अणि त्याच्या डोक्यावर असलेले सर्व कर्ज फेडुन टाकेल.
अणि पहोमने जसे ठरवलेले असते तसे त्याच्या मनाप्रमाणे सर्व काही घडते देखील.त्याला त्याच्या कुटुंबाला चांगली जीवण प्रदान करता येते.
पण हळुहळु पहोमचा जमिनीविषयीचा लोभ हा वाढतच जातो त्याला त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करता यावे त्यांना एक चांगले जीवन देता यावे एवढी जमिन संपत्ती त्याच्याकडे संग्रहीत झालेली असताना देखील तो त्यात संतुष्ट राहत नाही.
अणि अजुन जास्त जमीन मिळविण्याचा लोभ करू लागतो.यासाठी पहोम इतर शेतकरयांशी जमिनीवरून भांडण करू लागतो.त्याला वाटते की बाकीचे शेतकरी त्याची जमीन बळकावू पाहत आहे म्हणुन तो त्यांच्यावर कोर्टात केस देखील दाखल करतो.
शेवटी पाहोमच्या स्वभावाला भांडणाला कंटाळुन इतर शेतकरी त्यांची जमीन विकुन ते गाव सोडुन जाण्याचे ठरवितात.मग पहोम त्यांची देखील जमिन खरेदी करण्याचा विचार करतो त्याला वाटते की जेवढी जास्त जमीन माझ्याकडे असेल तेवढा जास्त पैसा मी कमवू शकेल.
अशातच पहोमला एक शेतकरी भेटतो जो त्याला सांगतो की वाँलगर एव्हर नावाच्या एका गावात वास्तव्यास राहणारया एका शेतकरींला 25 एकर जमीन दिली जात आहे.
अणि जर त्याच्या कुटुंबात चार जण असतील त्याला शंभर एकर जमीन दिली जाईल.मग पहोम त्याचे गाव सोडुन वाँलगर एव्हर नावाच्या गावी राहायला जातो.तिथे त्याचे अणि त्याच्या कुटुंबाचे एकदम चांगल्या पदधतीने स्वागत करण्यात येते.
याआधी पहोमला जेवढी जमिन आपल्या गावात मिळाली होती त्यापेक्षा अधिक जमीन त्याला वाँलगर एव्हर मध्ये प्राप्त होते.
पण पहोम यात देखील संतुष्ट नव्हता त्याला अजुन जास्त जमीन हवी होती.तालूक्यातील एक शेतकरी जो पुर्णपणे बरबाद झालेला असतो तो त्याची जमीन विकत असतो.त्याची जमिन खरेदी करण्याची ईच्छा पहोमला होते.अणि त्यांच्यात व्यवहार होणारच असतो.
पण तेवढयातच तिथे एक व्यापारी आपल्या घोडयाला पाणी पाजण्यासाठी येतो.तो व्यापारी पहोमला सांगतो की मी आत्ताच बश्कीर लँड येथून आलो आहे.
तो व्यापारी पहोमला हे देखील सांगतो की त्याने एक हजार रूबल मध्ये तेरा हजार जमीन विकत घेतली आहे.अणि ती जमीन एकदम सुपीक आहे.तेथील लोक खुप श्रीमंत आहे.अणि बकरी प्रमाणे भोळे आहेत काही काम करत नाही मौजमजा करतात,चांगले खाता पितात अणि त्यांना जर आपण काही भेटवस्तु दिली तर ते आपल्याला त्याबदले त्यांची काही जमीन देखील देऊन टाकतात.
हे ऐकुन पहोमच्या मनामध्ये अजुन जास्त जमीन मिळविण्याचा लोभ निर्माण होत असतो.मग पहोम त्याच्या कुटुंबाला लगेच घेऊन न जाता आधी स्वता एकटा ती जागा बघण्यासाठी एकेदिवशी तिथे जातो.
तिथे गेल्यावर तेथील लोक पहोमचे खुप चांगल्या पदधतीने स्वागत करतात.बश्कीर लोक हे नेहमी कुमित नावाची दारू पित असतात.जी त्यांनी पहोमला देखील दिली.
मग पहोम बश्कीर लोकांना काही भेटवस्तु देतो.मग जेव्हा बश्कीर लोक खुश होऊन पहोमला विचारतात की तुला याबदले आमच्याकडून काय हवे आहे तर पहोम त्यांच्याकडे काही जमीनीची मागणी करतात.
ज्यावर बश्कीर लोक म्हणतात की आमचा लीडर अँडलर बश्कीर आहे त्याला विचारून आम्ही तुला याबाबद आमचा निर्णय सांगु.
मग अँलडर बश्कीर तिथे येतो अणि तो पहोमला त्यांची पुर्ण जमीन दाखवतो.अणि सांगतो की तुला जेवढी जमीन हवी तेवढी आम्ही देऊ.त्यासाठी तुला तेवढे चालत जावे लागेल पण याव्यतीरीक्त देखील आमच्या काही अटी आहेत.
ह्या जमिनीचा एका दिवसाचा भाव एक हजार रूबल इतका राहील.अणि इथून तू जेवढे अंतर चालत जाशील तेवढे अंतर पार करून तुला पुन्हा जिथून चालायला सुरूवात केली त्या स्टार्टिग पाँईण्टवर सुर्यास्त होण्याच्या आधी यावे लागेल यात तु जेवढे अंतर चालत गेलेला असशील अणि तिथुन सुर्यास्त होईपर्यत परत आलेला असशील तेवढी जमीन कायमची तुझी होईल.
पहोम बश्कीरांची अट मान्य करतो अणि आपल्या निवास्थानी झोपायला जातो.रात्रभर त्याला जमिनीच्या मोहात झोपच लागत नाही अणि थोडी झोप लागते त्यातही झोपेत त्याला एक भयानक स्वप्र पडते.
त्याला जो व्यापारी भेटतो अणि बश्कीर लोकांविषयी त्याला सांगतो तो अणि बश्कीर लोक एक राक्षसाचे रूप धारण करतात.अणि हे सर्व मिळुन पहोमच्या मृतदेहाकडे बघुन जोरजोराने हसत आहेत.
पण पहोम त्याला पडलेल्या स्वप्राकडे दुर्लक्ष करतो अणि दुसरया दिवशी जमिन प्राप्त करण्यासाठी तो पुर्ण करायच्या त्याच्या टारगेटकडे पाहतो.
अणि तो जिथुन धावायला सुरूवात करतो तिथे त्याच्या फावडयाच्या साहाय्याने एक निशानी तयार करतो.अणि त्याच्या मुख्य ध्येयाकडे वेगाने धावायला लागतो.
पण सकाळपासुन धावत असताना दुपारच्या वेळी त्याला उन्हाच्या झळा लागु लागतात.जमिनीचे जेवढे दहा मील अंतर त्याने पार केले तिथे पहोम एक निशाणी बनवित होता.ज्याने त्याला कळेल की त्याने आतापर्यत एवढे अंतर पार काले आहे एवढी जमीन जिंकली आहे.
मग जेव्हा संध्याकाळ होऊन सुर्यास्त होऊ लागतो तेव्हा पहोम जेवढी जमीन अंतर त्याने पार केले आहे तिथे एक निशानी बनवितो अणि स्टार्टिंग पाँईण्टवर सुर्यास्त होण्याच्या आधी पोहचण्यासाठी वेगाने धावू लागतो.
मग शेवटी स्टार्टिंग पाँईण्टपर्यत पोहचताना त्याचे पाय पुर्णपणे अनवाणी पणे धावून जखमी झालेले असतात.त्याचे शरीर पुर्णपणे दमोदम झाले होते.
पण एवढे होऊन देखील पहोम थांबत नाही त्याला जमीन हवी होती म्हणुन तो थांबला नाही.स्टार्टिंग पाँईण्टच्या दिशेने अजुन वेगाने धावतो.
धावता धावता खुप दमोदम झाल्याने त्याच्या डोळयापुढे अंधारया येऊ लागतात.अणि त्याला त्याने गाठलेले त्याचे स्टार्टिंग पाँईण्ट अंधुकपणे दिसु लागते.जिथे बसलेले बश्कीर त्याला अजुन धावण्यासाठी प्रोत्साहित करीत असतात.
म्हणुन जीवाची पर्वा न करता पहोम अजुन जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी समोर दिसत असलेल्या स्टार्टिंग पाँईण्टकडे जोरात धावु लागतो पण सकाळपासुन धावून धावून दमोदम झालेल्या शरीराने अखेर त्याची साथ सोडली.
अणि स्टार्टिंग पाँईण्टवर पोहचताच पहोम धाडकन जमीनीवर पडतो अणि त्याच्या तोंडातुन रक्त देखील वाहु लागते.अणि त्यातच त्या जमिनीवर पडुन पहोमचा मृत्यु होतो.
शेवटी ते बश्कीर लोक त्याला उचलतात अणि त्याच्याच फावडयाने एक खडडे खोदुन तिथे छोटयाशा जमीनीत त्याला गाडुन टाकतात.
अशा पदधतीने अति जमीन,संपत्ती,धन प्राप्त करण्याच्या लोभामुळे पहोमला अखेर त्याचे प्राण गमवावे लागतात.
अणि कथेच्या शीर्षकाचा माणसाला शेवटी किती जमिनीची आवश्यकता असते याचा भावार्थ देखील आपणास लक्षात येतो.

See also  बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळयाचा सत्याग्रह का केला? chavdar talyacha satyagraha in Marathi

ह्या कथेपासुन आपणास काय शिकायला मिळते?

1)ही कथा आपल्याला सांगते की अत्याधिक धन प्राप्तीच्या इच्छेमुळे लोभामुळे आपण आपल्याकडे सध्या जे काही पर्याप्त धन उपलब्ध आहे ते सर्व सुदधा गमावू शकतो.
2)गरजेपुरता पर्याप्त धन आपल्याकडे असताना देखील विनाकारण आपण जास्तीत जास्त जमीन पैसा मिळवण्याच्या मोहात इतके गुंगुन जातो की कधी कधी आपण आपल्याच जीवाला विनाकारण धोक्यात टाकत असतो अणि आपल्याला जे सुंदर आयुष्य प्राप्त झाले आहे ते देखील गमावून बसत असतो.
3) जेव्हा आपली गरज लोभाचे रूप धारण करते तेव्हा काय चुकीचे आहे अणि काय बरोबर आहे आपली गरज किती आहे?एखादी गोष्ट आपणास किती हवी आहे?याचे देखील आपणास भान राहत नाही.
4)माणुस आयुष्यभर भरमसाठ पैसा कमविण्यामागे दिवसरात्र वेडया सारखा धावत राहतो पण शेवटी एक क्षण असा येतो की सर्व कमावलेले धन पैसा संपत्ती इथेच सोडुन त्याला हे जग सोडुन रिकाम्या हाती जावे लागते.
5) ह्या कथेतुन आपणास हे देखील शिकायला मिळते की माणसाने कधीही कुठल्याही गोष्टीचा जास्त लोभ लालुच करू नये मग ती संपत्ती असो किंवा एखादी सुखवस्तु.

अश्याच प्रेरणादायी आणि मानवी नैतिकमूल्यां वरील कथा वाचण्याकरिता Moral stories in Marathi इथे नक्की भेट द्या.