बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळयाचा सत्याग्रह का केला? chavdar talyacha satyagraha in Marathi

बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळयाचा सत्याग्रह का केला?

chavdar talyacha satyagraha in marathi
chavdar talyacha satyagraha in marathi

बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यासाठी उच्च नीच्च हे जातीभेद दुर करण्यासाठी अस्पृश्यांना त्यांचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी अनेक महत्वाचे सत्याग्रह केले.

यातील एक महत्वाच्या सत्याग्रहाविषयी आपण सविस्तरपणे आज माहीती जाणुन घेणार आहोत.

१) महाड येथील चवदार तळयाचा सत्याग्रह

महाड येथील चवदार तळयाचा सत्याग्रह –

बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथे चवदार तळयाचा सत्याग्रह केला होता.हया दिवसाला महाडचा मुक्तीसंग्राम तसेच महाडचा क्रांती दिवस म्हणून देखील संबोधित केले जाते.

रायगड जिल्हा येथील महाड येथील सार्वजनिक चवदार तळयाचे पाणी अस्पृश्य जातीतील लोकांना देखील पिता यावे यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी हा चवदार तळयाचा सत्याग्रह केला होता.

ज्या ठिकाणी प्राणी तसेच कुत्रे देखील पाणी पित होते सर्व प्राणीमात्रांना पाणी पिण्यासाठी अधिकार देण्यात आला होता अशा ठिकाणी अस्पृश्य जातीतील लोकांना म्हणजेच मानवाला अस्पृश्यतेच्या नावाखाली पाणी पिण्यास मनाई करण्यात आली होती.

यासाठी ह्या अन्यायकारक वागणुकीविरुदध निषेध व्यक्त करण्यासाठी अस्पृश्यांना त्यांचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी हा चवदार तळयाचा सत्याग्रह केला होता.

भारतीय जातीव्यवस्थे मधील उच्च नीच्च ह्या भेदभावामुळे अस्पृश्य जातीतील लोकांना उच्च जातीच्या लोकांपासून वेगळे ठेवण्यात आले होते.

त्याकाळी अस्पृश्य जातीतील लोकांना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तळयातुन पिण्यासाठी पाणी देखील घेण्याचा अधिकार दिला जात नव्हता.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेत माणसा माणसांमध्ये भेदभाव करणे ही एक चुकीची बाब होती ह्याच करीता समाजातील अस्पृश्य जातीतील लोकांवर केल्या जात असलेल्या ह्या अन्याया विरूद्ध बाबासाहेब आंबेडकर यांनी आवाज उठवला.

चवदार तळयाचे पाणी अस्पृश्य जातीतील लोकांना देखील उपलब्ध करून दिले जावे ह्या पाण्याचा वापर अस्पृश्यांना देखील करता यावा यामागणीच्या पुर्ततेसाठी आंबेडकरांनी हा सत्याग्रह केला होता.

हा सत्याग्रहाचा दिवस समतेची आठवण तसेच समतेचे प्रतिक म्हणून समता दिन म्हणून दरवर्षी २० मार्च रोजी
साजरा केला जातो.

See also  आयसी एम आरचा फुलफाॅर्म काय होतो | ICMR full form in Marathi

बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे चवदार तळे अस्पृश्य जातीतील लोकांसाठी खुले देखील करण्यात आले होते.

स्वता बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या तळयाचे पाणी पिऊन अस्पृश्य जातीतील लोकांना हे पाणी पिण्याचा अधिकार प्राप्त करून दिला.

बाबासाहेब आंबेडकर यांनी हा सत्याग्रह तळ्याच्या पाण्यासाठी केला नव्हता तर समतेसाठी उच्च नीच्च हा जातीभेद निवारण करण्यासाठी अस्पृश्यांना त्यांचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी हा सत्याग्रह केला होता.

याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की चवदार तळ्याचे पाणी पिल्याने आपण काही अमरत्व प्राप्त करणार नाहीये.किंवा हे पाणी न पिल्याने आपण मरू असे देखील नाही.

पण आपण देखील माणुस आहोत आपल्याला देखील इतरांप्रमाणे हे पाणी पिण्याचा अधिकार आहे हे सिदध करण्यासाठी आपणास ह्या तळयाचे पाणी प्यायचे आहे.