आयसी एम आरचा फुलफाॅर्म काय होतो | ICMR full form in Marathi

आयसी एम आरचा फुलफाॅर्म काय होतो | ICMR full form in Marathi

आयसी एम आरचा फुलफाॅर्म Indian council of medical research असा होतो.

आय सी एम आर म्हणजे काय? ICMR meaning in Marathi

आयसी एम आरचा अर्थ भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद असा होतो.

सध्या सोशल मिडिया अणि न्युज वर जिथे तिथे आपणास आयसी एम आर हा शब्द वाचायला तसेच ऐकायला मिळतो आहे.

कारण h3n2 नावाच्या कोरोनाच्या व्हायरसचा फैलाव सध्या महाराष्ट्रात होताना दिसुन येत आहे.दिवसेंदिवस h3n2 च्या केसेस मध्ये वाढ होताना दिसुन येत आहे म्हणून आय सी एम आर कडुन ह्या व्हायरस बाबद अॅलर्ट देखील घोषित करण्यात आला आहे.

ह्या व्हायरस बाबद काही महत्त्वाच्या गाईडलाईन देखील आयसी एम आर कडुन जारी करण्यात आल्या आहेत.

ICMR full form in Marathi
ICMR full form in Marathi

World Kidney Day 2023 In Marathi : किडनीचा आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

आय सी एम आरने सांगितलेली H3n2 ची काही प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत

  • तीव्र ताप येतो अणि खोकला येतो किमान पाच ते सात दिवस हा ताप राहतो.
  • तीन हप्त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी खोकला असु शकतो.
  • श्वास घ्यायला त्रास होतो.

आयसी एम आर ही बायोमेडिकल संशोधनाची निर्मिती,समन्वय अणि प्रोत्साहन यासाठी भारतातील सर्वोच्च संस्था म्हणून ओळखली जाते.

आय सी एम आर ही आपल्या भारत देशातील फार जुनी अणि सर्वात मोठी वैद्यकीय संशोधन संस्था आहे.

आय सी एम आरचे मुख्यालय कोठे आहे?

आय सी एम आरचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

आय सी एम आरचे सचिव तसेच महानिर्देशक कोण आहेत?

2020 सालापासून डाॅक्टर बलराम भार्गव याचे सचिव तसेच महानिर्देशक आहे.सप्टेंबर २०२२ मध्ये राजीव बहल यांची हया पदासाठी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

आय सी एम आरला निधी देण्याचे काम कोण करते?

आयसी एम आरला भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभाग,तसेच आरोग्य अणि कुटुंब कल्याण मंत्रालय मार्फत निधी देण्यात येतो.

भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक – List Of Women Freedom Fighter Of India In Marathi

आय सी एम आरच्या एकुण किती राष्ट्रीय संस्था आहेत?

ICMR च्या एकुण 26 राष्ट्रीय संस्था आहेत ज्या क्षयरोग,कुष्ठरोग,कॉलरा आणि अतिसार,एड्स,मलेरिया,कालाआजार,वेक्टर कंट्रोल, पोषण,अन्न आणि औषध विषविज्ञान,पुनरुत्पादन, इम्युनो-हॅकेटोलॉजी यासह विषाणूजन्य रोग यासारख्या विशिष्ट आरोग्य विषयांवर संशोधन करण्यासाठी स्वतःला संबोधित करतात.

 वैद्यकीय सांख्यिकी इ.त्याची 6 प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रे प्रादेशिक आरोग्य समस्यांकडे लक्ष देतात.

आय सी एम आरचे उद्दिष्ट काय आहे?

देशाच्या विविध भौगोलिक भागात संशोधन क्षमता बळकट करणे किंवा निर्माण करणे हे आयसी एम आरचे उद्दिष्ट आहे.

भारत देशातील वैद्यकीय संशोधनाला चालना देणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे हे देखील आयसी एम आरचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

 ICMR आजच्या काळात बायोमेडिकल क्षेत्रातही काम करत आहे. देशात राहणार्‍या प्रत्येक व्यक्तीला निरोगी ठेवणे आणि रोगांपासून दूर ठेवणे हे त्यांचे काम आहे.

आय सी एम आरची इतर कार्ये –

आय सी एम आर हया एजन्सीचे मुख्य काम देशाशी संबंधित आरोग्य समस्यांवर लक्ष ठेवणे आणि त्याचे प्राधान्यक्रम पाहून नियंत्रण आणि औषध व्यवस्थापनाचे काम करणे हे आहे.

कुपोषण,पुनरुत्पादक रोग,माता आणि बाळाशी संबंधित आजार,उपासमारीची समस्या यासारख्या देशात पसरलेल्या साथीच्या रोगांसाठी धोरण बनवण्याचे काम ही संस्था करते.

आय सी एम आरची आॅफिशिअल वेबसाईट कोणती आहे?

www.icmr.gov.in ही आय सी एम आरची आॅफिशिअल वेबसाईट आहे.

आय सी एम आरची स्थापणा कधी अणि केव्हा करण्यात आली होती?

आयसी एम आरची स्थापणा १९४९ मध्ये करण्यात आली होती.