भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक – List Of Women Freedom Fighter Of India In Marathi

भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक – List Of Women Freedom Fighter Of India In Marathi

भारताच्या स्वातंत्र्य लढयात स्त्रियांनी दिलेले योगदान हे फार अनमोल होते.ब्रिटीश राजसत्ता विरूद्ध आवाज उठविणारया स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत अनेक वीर महिलांचा देखील समावेश होता.

अनेक शुर महिला स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटीशांविरूदध रस्त्यावर उतरून नारेबाजी सुदधा केली.

आजच्या लेखात आपण अशाच काही शुर अणि धैर्यवान महिला स्वातंत्र्य सैनिकांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढयात आपले मोलाचे योगदान दिले आहे.

1) झाशीची राणी लक्ष्मीबाई –

झाशीची राणी लक्ष्मीबाई हया 1857 मधील उठावातील ब्रिटिश ईस्ट इंडिया विरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य लढाईतील एक अग्रणी सेनानी म्हणून आपणा सर्वांना परिचित आहे

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे पती गंगाधरराव यांचे निधन झाल्यानंतर इंग्रजांनी झाशीवर ताबा प्राप्त करण्यासाठी एक चाल खेळली अणि लक्ष्मी बाई यांचा दत्तक पुत्र लक्ष्मणराव याला उत्तराधिकारी मानण्यास नकार दिला.अणि लक्ष्मीबाई यांना झाशी सोडण्याचा आदेश दिला.

पण इंग्रजांच्या ह्या आदेशाला नकार देत राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांशी मे मेरी झासी नही दुंगी म्हणत एकटीने दोन आठवडे लढा दिला.पण बलाढ्य इंग्रजी सैन्यापुढे त्यांचा जास्त टिकाव लागला नाही अणि 1857 मध्ये त्यांना ग्वाल्हेर नजीक झालेल्या युद्धात वीर मरण प्राप्त झाले होते.

List Of Women Freedom Fighter Of India In Marathi

2) सरोजिनी नायडू –

सरोजिनी नायडु ह्या संविधान तयार करण्यासाठी तयार केलेल्या कमिटीच्या सभासद होत्या.

बंगालच्या फाळणी दरम्यान गांधी नेहरू यांच्या समवेत त्यांनी स्वातंत्र्य लढयात आपले मोलाचे योगदान दिले होते.

परदेशात जाऊन इंग्रजांविरुद्ध भाषणबाजी केली आपल्या भाषण अणि कवितेच्या माध्यमातून लोकांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले.

खिलाफत चळवळ अणि भारत छोडो आंदोलनाकरीता प्रचार करण्याचे काम केले.

जागतिक महिला दिन महत्व अणि इतिहास  | International Women’s Day History And Importance In Marathi

3) बेगम हजरत महाल –

भारताच्या प्रथम स्वातंत्र्य लढयात 1857 ते 1858 दरम्यान बेगम हजरत महाल यांनी फार मोलाची भुमिका पार पाडली होती.

बेगम हजरत महल यांनी तात्या टोपे नानासाहेब पेशवे यांच्या समवेत इंग्रजां विरूद्ध विद्रोह केला होता.

ब्रिटीशांनी जे मंदिर अणि मसजीदी उद्ध्वस्त करण्याचे धोरण अवलंबिले होते त्यास यांनी कडाडुन प्रखरपणे विरोध केला होता.

4) मॅडम भिकाजी कामा –

मॅडम भिकाजी कामा यांनी जर्मनी देशात भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत पहिला भारतीय राष्ट्रध्वज फडकववण्याचे अमुल्य कार्य केले.

स्त्री पुरुष समानतेसाठी यांनी विशेष चळवळ उभारली होती.या चळवळी दरम्यान त्यांनी आपली सर्व संपत्ती अनाथ मुलींसाठी दान केली होती.

5) किटटुर राणी चिन्नमा –

कर्नाटक राज्यातील कितुर गावात वास्तव्यास असलेल्या किटटुर राणी चिन्नमा यांनी देखील ब्रिटीश सत्तेविरुद्ध आपला आवाज उठविण्याचे काम केले.

List Of Women Freedom Fighter Of India In Marathi
one of the first Indian rulers to lead an armed rebellion against the British East India company in 1824, against the implementation of the Doctrine of Lapse.

किटटुर राणी चिन्नमा यांचा हा धाडसी पराक्रम कर्नाटक राज्यातील महिलांसाठी खुप प्रेरणादायी ठरला होता.

कृतिका नक्षत्र विषयी माहिती – Krutika Nakshatra information in Marathi

6) कमलादेवी चट्टोपाध्याय –

कमलादेवी चट्टोपाध्याय ह्या एक थोर समाजसुधारक तसेच महिला स्वातंत्र्य सैनिक होत्या.समाज सुधारणेचे काम करत असताना भारतीय स्वातंत्र्य लढयात देखील त्यांनी आपला विशेष सहभाग नोंदविला होता.

स्वातंत्र्य लढ्यातील चळवळीत ब्रिटीश सरकारने त्यांना अटक देखील केली होती.महात्मा गांधीनी उभारलेल्या मीठाच्या सत्याग्रहात देखील ह्या सहभागी झाल्या होत्या.

कमलादेवी यांचे मुख्य उद्दिष्ट स्त्रियांच्या आर्थिक अणि सामाजिक स्तरात सुधारणा घडवून आणने त्या़ंना आर्थिक तसेच सामाजिक दृष्ट्या स्वावल़ंबी बनविणे हा होता.

7) लक्ष्मी सेहगल –

लक्षमी सेहगल यांनी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापित केलेल्या आझाद हिंद सेनेतील महिलांच्या तुकडीचे नेतृत्व केले होते.

कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी आपल्या कार्यातुन हे दाखवुन दिले की महिला हिंसक तसेच अहिंसक दोघे मार्गांनी आपल्या देशासाठी लढा देऊ शकतात.

याचसोबत त्यांनी दुसऱ्या महायुद्धात देखील भाग घेतला होता ज्यात त्यांना कारावासाची शिक्षा देखील झाली होती.

8) अरूणा असफ अली –

ग्रॅण्ड ओल्ड लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरूणा असफ अली यांनी भारत छोडो आंदोलनात राष्ट्रध्वज हातात घेऊन आंदोलनाचे नेतृत्व केले होते.त्यांच्या ह्या कार्यासाठी ब्रिटीशांनी त्यांना कारावासात देखील टाकले होते.

तुरूंगात कैद्यांना तेव्हा अतिशय वाईट वागणुक दिली जात होती म्हणून याविरूदध देखील आवाज उठवत त्यांनी तुरूंगातून इंग्रजां विरूद्ध आंदोलन केले होते.

List Of Women Freedom Fighter Of India In Marathi

9) कनकलता बरवा –

कनकलता बरूवा यांना भारतीय स्वातंत्र्य लढयातील वीर बाला म्हणून ओळखले जाते.

आपल्या राहत्या ठिकाणी आसाम मधुन त्यांनी ह्या आंदोलनात सहभाग घेतला होता.अणि भारत छोडोच्या घोषणा देखील दिल्या होत्या.

पण शांतीच्या मार्गाने आंदोलन करूनही ब्रिटीशांनी काही न ऐकता अचानक केलेल्या जोरदार लाठीचार्ज मध्ये त्यांचे गंभीर जखमी होऊन निधन झाले होते.फक्त अठरा वर्षाची असताना कनकलता यांनी हे धाडसी कार्य केले होते.

10) मातंगिनी हाजरा –

मातंगिनी हाजरा ह्या देखील भारत छोडो अणि असहकार चळवळीत सहभागी होत्या.

कलकत्ता येथील एका चळवळीत राष्ट्रध्वज हातात घेऊन वंदे मातरमच्या घोषणा देत असताना ब्रिटीशांनी केलेल्या फायरींगमध्ये त्या गोळी लागुन गंभीर जखमी झाल्या.

पण स्वतावर एवढा गोळयांचा वर्षाव झाला असताना देखील शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या हातातील राष्ट्रध्वज खाली पडु दिला नव्हता.

११) तारा राणी श्रीवास्तव –

तारा राणी श्रीवास्तव यांनी महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या भारत छोडो आंदोलनात आपल्या पतीसमवेत सहभाग नोंदविला होता.

आंदोलना दरम्यान इंकलाब जिंदाबादच्या घोषणा सुरू झाल्या अणि पोलिसांनी फायरींगला सुरूवात केली ज्यात तारा राणी यांचे पती गोळी लागुन गंभीर जखमी झाले अशा परिस्थितीत पतीच्या जखमेवर साडी फाडुन पटटी केली पण तारा राणी श्रीवास्तव यांनी अखेरपर्यंत माघार घेतली नाही अणि आपला मोर्चा सुरू ठेवला होता.

गोळी लागल्यामुळे तारा राणी श्रीवास्तव यांचे पतीचे निधन झाले पण ताराराणी जोपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत ह्या आंदोलनात सहभागी होत्या.

१२) सुचेता कृपलानी –

सुचेता कृपलानी ह्या एक गांधीवादी विचारसरणी असलेल्या महिला स्वातंत्र्य सेनानी होत्या.

सुचेता कृपलानी यांनी देखील भारताच्या स्वातंत्र्य लढयात विशेष सहभाग घेतला होता.

कलौजी म्हणजे काय? – कलौजीचे फायदे – Kalonji meaning in Marathi

१३) अॅनी बेझंट –

अॅनी बेझंट ही महिला मुळची भारतीय वंशाची नव्हती तरी देखील त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयात भाग घेतला अणि आपले अनमोल योगदान दिले त्यांनी स्वातंत्र्य लढयात दिलेले योगदान फार मोलाचे आहे.

काॅग्रेसच्या सभासद झाल्यानंतर त्यांनी इंग्रजां विरूद्ध आवाज उठविण्यास प्रारंभ केला होता.त्यांनी होमरूल चळवळ सुरू केली.न्यु इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले अणि ह्या वृत्तपत्रा मार्फत ब्रिटिश शासनाकडे स्वराज्याची मागणी केली.

अॅनी बेझंट ह्या काॅग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या.

१४) उषा मेहता –

उषा मेहता यांनी रेडिओ स्टेशन सुरू केले अणि त्याच्या माध्यमातून त्या कुठे स्वातंत्र्य लढा सुरू आहे त्यात कोण कोण सहभागी झालेले आहे ब्रिटीशांनी कुठे लाठीचार्ज केला कुठे अणि कोणावर अन्याय झाला ह्या सर्व बातम्या स्वातंत्र्य लढया दरम्यान रेडिओ वरून देण्याचे काम त्यांनी केले.

१५) देवी दुर्गावती –

देवी दुर्गावती यांना दुर्गा भाभी ह्या नावाने ओळखले जाते.दुर्गा देवी हया देखील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील खुप महत्वाचा हिस्सा होत्या.

१६) विजया लक्ष्मी पंडित –

विजया लक्ष्मी पंडित यांनी भारतीय स्वातंत्र्य लढया दरम्यान सविनव कायदेभंग चळवळीत भाग घेतला होता त्यामुळे त्यांना तुरूंगवासाची शिक्षा देखील भोगावी लागली होती.पण त्यांनी न घाबरता चळवळीचे कार्य सुरू ठेवले.

१७) कस्तुरबा गांधी –

दक्षिण आफ्रिका मध्ये जेव्हा भारतीयांविरूदध अन्याय केला जात होता तेव्हा त्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी गांधीजींनी चळवळ उभारली होती ज्यात कस्तुरबा गांधी ह्या देखील सहभागी होत्या.

ह्या चळवळी दरम्यान त्यांना कारावासाची शिक्षा देखील भोगावी लागली होती.

भारतीय स्वातंत्र्य लढयात आपले अनमोल योगदान देणाऱ्या इतर महिला स्वातंत्र्य सैनिकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

● कल्पणा दत्ता –

● प्रीतीलता-

● महादेवी वर्मा –

● सावित्रीबाई फुले –

● बसंती देवी –

● मुलमाती –

● झलकारी बाई –

● कमला नेहरू –

● उडा देवी –

● अममु स्वामीनाथन –

● उमाबाई कांदापुर –

● बेगम रोईका –

● दुर्गा बाई देशमुख –