भारतातील सर्वात श्रीमंत मंदीरे – Richest Temples In India

भारतातील सर्वात श्रीमंत मंदीरे | Richest Temples In India

आपला भारत देश हा संपूर्ण जगभरात आपल्या आध्यात्मिक तसेच धार्मिक संस्कृती करीता आज ओळखला जातो.

भारत हा एक असा देश आहे जिथे सर्वात जास्त धार्मिक तसेच देवध्यान करणारे श्रद्धावान भाविक भक्तजण दिसुन येतात.

आजच्या लेखात आपण आपल्या भारत देशातील काही अशा मंदिराविषयी माहीती जाणुन घेणार आहोत जे धार्मिक लोकांचे मुख्य तीर्थस्थान म्हणून ओळखले जातात.

अणि ज्यांना भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून देखील दर्जा दिला जातो.कारण तेथे येणारे श्रदधाळु भाविक भक्तगण आपल्या वतीने लाखो तसेच करोडोंचे दान मंदिराच्या उद्धारासाठी दरवर्षी करत असतात.

चला तर मग जाणुन घेऊया भारतातील अशा काही मंदिराविषयी जिथे सर्वात जास्त देणगी दिली जाते.अणि ह्या देणगीच्या पैशामुळे ही मंदिरे भारतातील सर्वात श्रीमंत मंदीरांमध्ये आज गणली जातात.

१) पद्मनाभस्वामी मंदिर –

पद्मनाभस्वामी मंदिर हे भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिरांमध्ये पहिल्या क्रमांकावर गणली जाते.

Sri Padmanabhaswamy Temple, Thiruvananthapuram

पद्मनाभस्वामी मंदिर हे केरळ राज्यात असलेले चमत्कारिक मंदीर आहे.केरळ राज्यामध्ये थिरूव अनंतपुरम येथे हे मंदिर असलेले आपणास पाहावयास मिळते.

भगवान श्री हरी विष्णु यांना समर्पित असलेले हे मंदिर ज्यात भगवान विष्णू यांची सोन्याची मुर्ती असलेली दिसुन येते.हया मुर्तीची किंमत ५०० करोडपेक्षा अधिक आहे.

पद्मनाभ स्वामी ह्या मंदिराचे वार्षिक उत्पन्न हे ९२ हजार करोड पेक्षा अधिक आहे.

२) तिरूपती तिरूमाला व्यंकटेश्वर मंदीर –

तिरूपती तिरूमाला व्यंकटेश्वर मंदीर हे भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते.भगवान श्री हरी विष्णु यांना समर्पित असलेले हे मंदिर आहे.

हे मंदिर भारत देशातील आंध्र प्रदेश ह्या राज्यामध्ये आहे.आंध्र प्रदेश राज्यात असलेल्या तिरूपती नामक शहरामध्ये तिरुमाला नावाच्या हिल्स नजीक हे मंदिर आहे.

तिरूपती तिरूमाला व्यंकटेश्वर मंदीरास भुलोक वैकुंठ असे देखील म्हणतात.व्यंकटेश्वर हे भगवान श्री हरी विष्णु यांचेच एक रूप आहे.

तिरूपती तिरूमाला व्यंकटेश्वर मंदीरामध्ये व्यंकटेश्वराची एक मुर्ती आहे जिला ८०० ते ९०० किलो इतक्या सोन्याने सजविले गेले आहे.

ह्या मंदिरात रोज १ लाखापर्यंत भाविक रोज दर्शनासाठी येत असतात.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ह्या मंदिरात ७० ते ८० करोड इतके पैसे हे फक्त लाडुचा प्रसाद विकुन जमा होतात.यावरून आपणास कळुन येईल की हे किती श्रीमंत मंदिर आहे.

ह्या मंदिराला फक्त एका वर्षात सहाशे बावन्न करोड रुपये इतके डोनेशन प्राप्त होते.

३) संत श्रेष्ठ श्री साईबाबा मंदिर-

संत श्रेष्ठ श्री साईबाबा यांचे हे प्रसिद्ध मंदीर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये त्रितीय क्रमांकावर आहे.

साईबाबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी नावाच्या गावामध्ये आहे.

रोज देशाच्या कानाकोपऱ्यात असलेले साईभक्त इथे दर्शनासाठी येतात अणि लाखोंच्या संख्येत साई बाबांच्या मुर्तीच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसुन येतात.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इथे कुठल्याही एका विशिष्ट धर्मातील भाविक दर्शनासाठी येत नाही तर हिंदु मुस्लिम जैन शीख अशा सर्व धर्मातील लोक मोठ्या श्रद्धेने येथे दुरून दूरून फक्त साईंच्या दर्शनासाठी येतात.

साईबाबा मंदिरांमध्ये सुमारे छत्तीस करोड रुपये इतक्या रूपयांचे सोने तसेच चांदी आहे.

ज्या सिंहासनावर संत श्रेष्ठ श्री साईबाबा यांची मुर्ती विराजमान आहे ती मुर्ती ९६किलो इतक्या शुद्ध सोन्याची बनविली गेली आहे.

अनेक भाविक येथे मोठ्या श्रद्धेने लाखो रुपये तसेच सोने साईबाबा संस्थानाकडे मंदिरासाठी दान करताना दिसतात.

शिर्डी येथील साईबाबा मंदिराचे वार्षिक उत्पन्न हे ४०० करोड रुपये पेक्षा अधिक आहे.

कलौजी म्हणजे काय? – कलौजीचे फायदे – Kalonji meaning in Marathi

४) वैष्णव दैवी माता मंदीर –

वैष्णव दैवी मातेचे हे हिंदु धर्माचे प्रसिद्ध मंदिर जम्मु येथील कटरा नावाच्या शहरामध्ये आहे.हे मंदिर हिमालयाच्या पर्वतामध्ये स्थित आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये चौथ्या क्रमांकावर हे मंदिर आहे.वैष्णव दैवी मातेस दुर्गा मातेचे रूप मानण्यात येते.

जे भाविक ह्या मंदिरात दर्शनासाठी येतात.त्यांना कटरा ह्या गावापासून पंधरा ते वीस किलोमीटर इतके पायी चालत जावे लागते.

तरी देखील रोज लाखोंच्या संख्येने भाविक येथे मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी गर्दी करताना दिसुन येतात.

वैष्णव दैवी माता मंदीराचे वार्षिक उत्पन्न हे ६५० करोड रुपये इतके आहे.

५) सिद्धीविनायक मंदिर –

सिद्धीविनायक मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात असलेले हिंदू धर्मियांचे एक प्रसिद्ध मंदिर आहे.

ह्या मंदिरात असलेली गणपतीची मूर्ती ही सुमारे तीनशे ते पाचशे वर्षे इतकी जुनी आहे.

सिद्धीविनायक मंदिरात रोज पाच ते सहा लाख इतके भाविक दर्शनासाठी येत असतात.

सिद्धीविनायक मंदिरात गणेशाच्या मूर्तीवर जे डोम बसविण्यात आलले आहे.ते साधारणपणे पाच ते सहा किलो इतक्या शुद्ध सोन्याने बनविण्यात आले आहे.

ह्या मंदिराचे एकुण वार्षिक उत्पन्न हे ६० ते १३० करोड इतके आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये हे मंदिर पाचव्या क्रमांकावर आहे.

६) स्वर्ण मंदिर –

स्वर्ण मंदिर याला गोल्डन टेंपल असे देखील म्हटले जाते.हया मंदिरात रोज दर्शनासाठी पन्नास ते साठ हजार इतके भाविक रोज येताना दिसुन येतात.अणि जे भाविक येथे दर्शनासाठी येतात त्यांना लंगरचा प्रसाद वितरीत केला जातो.

हे मंदिर शीख धर्मातील सर्वात मोठे गुरूद्वारा म्हणून देखील प्रसिद्ध आहे.यास हरविंदर साहब गुरूद्वार या नावाने देखील संबोधले जाते.

स्वर्ण मंदिर हे पंजाब राज्यातील अमृतसर येथे आहे.हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेले मंदीर आहे.

ह्या मंदिराचे वार्षिक उत्पन्न सुमारे दीडशे ते दोनशे करोड रुपये इतके आहे.

कृतिका नक्षत्र विषयी माहिती – Krutika Nakshatra information in Marathi

७) मदुराई –

मीनाक्षी मंदिर हे तामिळनाडू ह्या राज्यात आहे.तामिळनाडु राज्यातील मदुराई नावाच्या शहरामध्ये हे मंदिर आहे.

(मीनाक्षी मंदिर, मदुराई )

तामिळनाडू राज्यातील मदुराई शहरात असलेल्या ह्या मंदिरात रोज चाळीस ते पन्नास हजार भाविक दर्शनासाठी येतात.

एप्रिल महिन्यामध्ये येथे एक दहा दिवसांच्या कालावधीचा उत्सव साजरा करण्यात येतो.या उत्सवात लाखोंच्या संख्येत भाविक सहभागी होताना दिसुन येतात.

हे भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिरांमध्ये सातव्या क्रमांकावर असलेले मंदीर आहे.हया मंदिराला दरवर्षी भाविकांकडुन सात ते आठ कोटी इतके डोनेशन प्राप्त होते.

८) जगन्नाथ मंदिर –

जगन्नाथ मंदिर हे उडीसा राज्यातील पुरी नावाच्या शहरामध्ये आहे.

जगन्नाथ मंदिर हे हिंदु धर्मातील चार ते दहा धाम ह्या पवित्र तीर्थक्षेत्रापैकी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

ह्या मंदिरात रोज ३५ ते ४० हजार भाविक दर्शनासाठी येतात.

ह्या मंदिराचा क्रमांक भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये आठवा लागतो.

९) काशी विश्वनाथ मंदिर –

हे भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिरांमध्ये नवव्या क्रमांकावर असलेले मंदीर आहे.

हे मंदिर उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथे गंगा नदीच्या काठावर स्थित आहे.

काशी विश्वनाथ मंदिर हे हिंदू धर्मातील पवित्र तीर्थस्थान तसेच पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.इथे भारतातील तसेच परदेशातील लोक देखील विशेष पर्यटनासाठी जाताना दिसतात.

दरवर्षी ह्या मंदिराच्या दानपेटीत चार ते साडे पाच करोड रूपये जमा होतात.

१०) सोमनाथ मंदिर-

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये हे मंदिर दहाव्या क्रमांकावर येते.

सोमनाथ मंदिर हे गुजरात राज्यातील पश्चिम किनाऱ्यावर वेरावळ बंदरानजीक प्रभास पाटण येथे आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार हे भगवान शंकराचे पहिले मंदीर आहे.

ह्या मंदीरावर अनेकदा परकीय आक्रमणे झाली ज्यात हे कित्येकदा तोडण्यात आले याची लुट देखील करण्यात आली तरी देखील आज हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये दहाव्या स्थानावर आहे.दरवर्षी लाखोंच्या संख्येत भाविक येथे दर्शनासाठी येतात.

११) शबरीमाला मंदीर –

हे मंदिर केरळ राज्यात आहे.येथे भगवान अयप्पा यांचे भक्तजण मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात.

भाविकांकडुन ह्या मंदिराला १५ ते वीस कोटी रूपयाचे सोने तसेच १५० ते दोनशे कोटी इतकी रक्कम दरवर्षी दान केली जाते.