केदारनाथ मंदिराविषयी माहिती – Kedarnath temple information in Marathi

केदारनाथ मंदिराविषयी माहिती kedarnath temple information in Marathi

Kedarnath
केदारनाथ मंदिराविषयी माहिती – Kedarnath temple information in Marathi

केदारनाथ हे एक हिंदु धर्मियांचे पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाणारे भगवान शंकराचे मंदिर आहे.केदार हे भगवान शंकराचेच एक नाव आहे.ज्याचा अर्थ संरक्षक असा होत असतो.

भारत देशातील उत्तराखंड ह्या राज्यामधल्या रूदरप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ नावाच्या गावात मंदाकिनी नदीच्या काठावर उगमस्थानी हे मंदीर वसलेले आहे.

केदारनाथ मंदिर हे हिंदु धर्मातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते.केदारनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.याचसोबत हे पंचकेदार छोटा धाम ह्या पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये देखील एक मानले जाते.

असे म्हटले जाते की हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या ह्या मंदिराचे निर्माणाचे काम पांडवांकडुन करण्यात आले होते अणि आठव्या शतकात आद्य शंकराचार्य यांनी ह्या मंदिरांचे पुनरूज्जीवन केले होते.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वांत जास्त उंचीवर असलेले हे ठिकाण आहे.हया मंदिरात जाण्यासाठी केवळ पायवाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.असे ह्या विषयी सांगितले जाते.

केदारनाथ मंदिराविषयी म्हटले जाते की ह्या मंदिराचे दर्शन केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होत असतो मोक्षाचे दवार आपल्यासाठी खुले होते.

आज भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्तजण पर्यटक मंडळीं इथे खास भगवान शिवाच्या दर्शनासाठी येथील नयनरम्य दृश्याचे परिसराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

केदारनाथ मंदिराला आपण सर्वजण केदारनाथ धाम असे देखील म्हणतो.हे केदारनाथ धाम हिमालयाच्या मध्ये ३५८५ इतक्या फूट उंचीवर आहे.

केदारनाथ मंदिराच्या आजुबाजुचा परिसर हा सर्व भाविकांना भक्तजणांना मंत्रमुग्ध मोहीत करेल असा आहे.मंदिराच्या बाजुला आपणास मंदाकिनी नदी वाहताना दिसते.

मंदिराच्या मागील बाजूस बर्फाच्छादित प्रदेश तसेच जंगल आहे.हे सर्व डोळयांनी बघायला खुप नयनरम्य दृश्य वाटते.

केदारनाथ मंदिर हे खुप उंचावर असल्यामुळे हे मंदीर दर्शनासाठी भाविकांना तब्बल सहा ते सात महिने खुले केले जात असते.

केदारनाथ मंदिर हे हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेले एक प्राचीन मंदिर आहे.असे सांगितले जाते की ह्या मंदिराचे बांधकाम हे राखाडी रंगाच्या दगडांपासुन करण्यात आले आहे.

See also  बजरंग दलाचा इतिहास काय आहे? - Bajrang Dal history.

मंदिराच्या समोरील बाजूस नंदीची मूर्ती बसवण्यात आली आहे.ही मुर्ती मंदिराकडे एकाग्रतेने टक लावुन पाहताना दिसुन येते.

मंदिरात एक गर्भगृह देखील आहे.ह्या गर्भगृहात आपणास महादेव म्हणजेच भगवान शिव यांची एक मुर्ती पाहायला मिळते.

केदारनाथ मंदिराच्या मंडपाच्या विभागात गेल्यास इथे आपणास पांडव कृष्ण कुंती द्रौपदी इत्यादींच्या साकारण्यात आलेल्या भव्य मुर्ती पाहायला मिळतात.

ह्या केदारनाथ मंदिराला आतापर्यंत अनेक प्रकारच्या नैसर्गिक संकटांचा आपत्तींचा सामना करावा लागला आहे पण भुकंट हिमस्खलन यासारख्या सर्व नैसर्गिक संकटांचा विपदांचा सामना करून देखील आज हे मंदिर ठामपणे भरभक्कम रीत्या उभे आहे.

केदारनाथ धामचे दरवाजे २०२३ मध्ये २५ एप्रिल २०२३ रोजी भक्तांना मंदिरात दर्शन घेण्यासाठी खुली करण्यात आली आहे.