केदारनाथ मंदिर वर्षातुन सहा महिने बंद का ठेवले जाते? – why kedarnath temple closed for 6 months
आपल्या भारत देशात अनेक धार्मिक स्थळे तसेच मंदीरे आहेत पण केदारनाथ मंदिर हे इतर धार्मिक स्थळांपेक्षा मंदिरांपेक्षा थोडे वेगळे रहस्यमयी असे आहे.
कारण इतर मंदीरे भाविकांसाठी वर्षभर सुरू असतात पण केदारनाथ मंदिर हे वर्षातुन फक्त सहा महिने भाविकांना दर्शन घेण्यासाठी उघडले जाते अणि बाकीच्या सहा महिन्यांसाठी हे मंदिर ह्या मंदिरांचे दरवाजे बंद ठेवण्यात येत असतात.
आपल्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की शंकराचे एवढे प्रसिद्ध मंदिर जिथे लाखो करोडो लोक दर्शनासाठी येत असतात ते सहा महिने भाविकांसाठी बंद का ठेवले जाते.
आपल्या मनातील ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखातून आपण जाणुन घेणार आहोत.
केदारनाथ मंदिर वर्षातुन सहा महिने बंद का ठेवले जाते याबाबत सांगितली जाणारी काही प्रमुख कारणे –
याबाबत अनेक कारणे सांगितली जातात असे सांगितले जाते की हे मंदिर हिमालयाच्या कुशीत असल्याने येथे हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टी होते,त्यामुळे येथील जाण्याचे सर्व रस्ते बंद होतात.यामुळेच हया या पवित्र निवासस्थानाला फक्त उन्हाळ्यातच भेट देता येते.
त्यामुळे हिवाळ्यात दिवाळीनंतर या मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांसाठी बंद केले जातात आणि पुन्हा सहा महिन्यांसाठी एप्रिल तसेच मे महिन्यामध्ये भक्तांसाठी उघडले जातात.
केदारनाथ मंदिर नेहमीच बर्फाने झाकलेले असते आणि येथील खराब हवामानामुळे हे मंदिर सहा महिन्यांसाठी बंद ठेवले जात असते.अणि फक्त सहा महिन्यांसाठीच उघडले जाते.
तसेच असे सांगितले जाते की ह्या सहा महिन्यांच्या कालावधीत भगवान शिव इथे उपस्थित नसतात.ते दुसरीकडे विराजमान असतात.मंदिराचा दरवाजा बंद करण्याआधी मंदिरात दिवा लावला जातो.हा दिवा सहा महिने मंदिराचा दरवाजा उघडेपर्यत जळत असतो.असे देखील म्हटले जाते की मंदिराचा दरवाजा उघडल्यावर प्रथमतः जो भाविक ह्या जळणारया दिव्याचे दर्शन करतो त्याला खुप मोठे पुण्य लाभत असते.
तसेच येथील वास्तव्यास असलेले लोक मंदिराविषयी असे सांगतात जेव्हा सहा महिने हे मंदीर बंद केले जाते तेव्हा हया कालावधी दरम्यान कोणालाही मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जात नसतो.मग तो कुठलाही सर्वसामान्य नागरिक असो किंवा मोठा नेता असो कोणासाठीही हया सहा मंदिराची दरवाजे उघडली जात नाही.
ह्या सहा महिन्याच्या कालावधीत मंदिरात कुठलीही साफसफाई देखील करण्यात येत नाही.मंदिरात दिप देखील लावले जात नाही म्हणजे सहा महिने मंदीराचे कामकाज बंद ठेवले जाते.
पण असे सांगितले जाते की सहा महिन्यांच्या कालावधीनंतर जेव्हा मंदिराचा दरवाजा उघडला जातो तेव्हा मंदिरातील दिवे जळताना दिसून येतात.
सहा महिने मंदिर बंद राहुन देखील इथे कुठलीही अस्वच्छता देखील दिसुन येत नाही ही एक आश्चर्य कारक बाब ह्या मंदिरा बाबत आपणास ऐकायला मिळते.
सहा महिन्यांनी जेव्हा ह्या मंदिराचा दरवाजा उघडला जातो तेव्हा भाविक इथे लाखोंच्या संख्येने मोठया श्रद्धेने दर्शनासाठी गर्दी करत असतात.