जागतिक महिला दिन महत्व अणि इतिहास  | International Women’s Day History And Importance In Marathi

जागतिक महिला दिन महत्व अणि इतिहास  | International Women’s Day History And Importance In Marathi

जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो?

दरवर्षी ८ मार्च रोजी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो.

जागतिक महिला दिन का साजरा केला जातो?

आपल्या समाजात असलेल्या सर्व स्त्रियांविषयी आपल्या मनात असलेला आदरभाव,सम्मान व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा दिवस संपुर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

सर्व महिलांना आपल्या अधिकाराची जाणीव तसेच आठवण व्हावी आपले महत्त्व कळावे म्हणून दरवर्षी आंतरराष्ट्रीय तसेच जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत असतो.

पहिला महिला दिवस कधी अणि कोठे साजरा करण्यात आला होता?

पहिला महिला दिवस हा न्युयॉर्क ह्या देशात २८ फेब्रुवारी १९०९ रोजी साजरा करण्यात आला होता पण १९१० मधील आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडण्यात आलेल्या सुचनांनुसार दरवर्षी जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जाईल असे निश्चित करण्यात आले होते.

भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक – List Of Women Freedom Fighter Of India In Marathi

पहिली आंतरराष्ट्रीय महिला परिषद कोठे भरविण्यात आली होती?

पहिली आंतरराष्ट्रीय महिला परिषद स्टुअर्ट गार्ड येथे भरली होती.

जागतिक महिला दिन इतिहास –

International Women's Day History And Importance
International Women’s Day History And Importance

८ मार्च १९०८ ला न्युयॉर्क येथील वस्त्रोद्योग महिला कामगारांनी रूटगर्स नामक चौकात जमुन ऐतिहासिक निदर्शने केली होती.

महिला कामगारांना दहा तास काम अणि कामाच्या जागी सुरक्षितता प्रदान करण्यात यावी ह्या मागण्यांसाठी ही निदर्शने महिला कामगारांकडून करण्यात आली होती.

याचसोबत लिंग,वर्ण, शैक्षणिक पार्श्वभूमी मालमत्ता निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री पुरुष यांना मतदानाचा हक्क दिला जावा अशी मागणी देखील ह्या आंदोलनात करण्यात आली होती.

८ मार्च १९०८ रोजी अमेरिका येथील महिला कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या आठवणीत ८ मार्च हा दिवस जागतिक तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून स्वीकारला जावा असा ठराव क्लाराने मांडला होता जो पास देखील झाला.

यानंतर अमेरिका,यूरोप इत्यादी देशांत सार्वजनिक मतदानाच्या अधिकाराकरीता विविध मोहीमा राबविण्यात आल्या.

याचे परिणाम स्वरुप १९१८ मध्ये इंग्लंड ह्या देशात अणि १९१९ साली अमेरिका ह्या देशात ह्या मागणीस मान्यता प्राप्त झाली.

भारत देशात प्रथम जागतिक महिला दिन मुंबई ह्या शहरात ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला होता. तेव्हा पासून दरवर्षी जागतिक महिला दिन एक विशिष्ट थीम ठेवून जगभरात साजरा केला जातो.

International Women’s Day History And Importance

जागतिक महिला दिन विविध देशांत कसा साजरा केला जातो?

बल्गेरिया रोमानिया सारख्या काही देशात हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवशी मुले आपल्या माता भागिनी आजी यांना काहीतरी सप्रेम भेट देत असतात.

या दिवशी इटली ह्या देशात पुरूष महिलांना पिवळया रंगाच्या मिमो सासची फुले भेट म्हणून देत असतात.

भारतात महिलांना पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात.भारतातील महिलांनी प्राप्त केलेल्या यश किर्तीचा आढावा घेऊन त्यांच्या कामगिरीचे त्यांना पुरस्कार वगैरे देऊन कौतुक केले जाते.

देशासाठी योगदान देणाऱ्या महिला स्वातंत्र्य सेनानींची त्यांच्या बलिदानाची आठवण केली जाते.देशाचे नाव मोठे करणार्या महिलांना स्मरण केले जाते.

शाळा महाविद्यालयांमध्ये या दिवशी विविध निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात.भाषणे केली जातात.महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

जागतिक महिला दिनाची पहिली थीम काय होती?

सेलिब्रिटींग द पास्ट प्लॅनिंग फाॅर फ्युचर अशी जागतिक महिला दिनाची पहिली थीम होती.

२०२३ मधील महिला दिनाची थीम काय असणार आहे?

संशोधन तंत्रज्ञान याचा उपयोग लिंगभाव समानतेसाठी ह्या थीमचा हेतु जगभरातील महिला मुली टेक्नॉलॉजी अणि आॅनलाईन शिक्षणामध्ये आपले जे अमुल्य योगदान देत आहे ते ओळखुन आपण त्यांचा यथोचित सन्मान गौरव करायला हवा.

International Women’s Day History And Importance

International Women’s Day History And Importance