चेक किती प्रकारचे असतात – Different Types Of Cheques In Marathi
एखादा सरकारी योजनेचा चेक असो किंवा स्काँलरशिपचा चेक असो.बहुतेकदा हे Account Pay Cheque च्याच स्वरूपात असतात कधी हे चेक Cross Cheque च्या स्वरूपात देखील असु शकतात.
अशा वेळी या दोघे Terms मुळे आपण कित्येकदा Confuse देखील होत असतो.ज्यात Account Pay Cheque कशाला म्हणायचे?Cross Cheque कशाला म्हणायचे?याबाबद आपला गोंधळ होत असतो.
म्हणुन आजच्या लेखात आपण Account Pay Cheque आणि Cross Cheque म्हणजे काय? विषयी माहीती जाणुन घेणार आहोत.
Account Payee Cheque म्हणजे काय?Account Pay Cheque का जारी केला जात असतो?
आपण अकाऊंट पे चेक हा चेकचा प्रकार आपण तेव्हा इशु करत असतो जेव्हा आपल्याला डायरेक्ट अशाच व्यक्तीच्या अकाऊंटवर पैसे पाठवायचे असतात ज्याच्या नावाचा चेक आपण इशू केलेला असतो.
फक्त यात आपल्याला याची काळजी घ्यावी लागत असते की आपल्याला डायरेक्ट ज्या व्यक्तीच्या अकाऊंटवर पैसे पाठवायचे असतात त्याच्या बँक अकाऊंटमधील नाव आपण इशु केलेल्या चेकमधील नावाप्रमाणे सारखे असणे गरजेचे असते.
याने आपल्याला हा फायदा होत असतो की समजा नजरचुकीने आपल्याकडुन तो चेक हरवला आणि तोच चेक कोणा तिर्हाईत व्यक्तीच्या हातात लागला तरी त्या व्यक्तीला त्या चेकचा कुठलाही गैरवापर करता येत नसतो.
ही गोष्ट वेगळी आहे की त्या व्यक्तीला अकाऊंट पे चेक हा बँकेत जमा करता येत असतो.पण कँश ही त्याच व्यक्तीच्या खात्यात जमा होते ज्याच्या नावावर चेक इशु केला गेलेला असतो.
Account Payee Cheque कसा तयार केला जातो?
Account Payee Cheque हा चेकचा कुठलाही वेगळा प्रकार नसतो.जो आपला साधा चेक असतो त्यावरच उजव्या बाजुला कोपरयात दोन रेषा ओढुन Account Pay Cheque तयार केला जात असतो.
Account Payee Check तयार करण्याची Processपुढीलप्रमाणे असते :
यात चेक Issue करताना आपल्याला फक्त चेकच्या उजव्या बाजुला कोपरयामध्ये दोन रेषा ओढुन त्याच्या आतमध्ये Account Payee Cheque असे लिहायचे असते.
● ज्या व्यक्तीच्या नावावर आपल्याला पैसे जमा करायचे आहे त्याचे Payee च्यापुढे लिहावे खाली लिहिले तरी काही हरकत नसते.
● चेकवर नाव आणि रक्कम लिहुन झाल्यावर रिकामी जागा अजिबात सोडु नये त्याच रिकाम्या ठिकाणी एक लाईन तसेच रेषा ओढुन घ्यावी.म्हणजे चेक कोणा तिर्हाईत व्यक्तीच्या हातात अकस्मातपणे गेला तरी त्याला त्याचा कुठलाही दुरूपयोग करता येत नाही.
● सोबतच आपणास ज्या अकाऊंटमधुन पैसे कट होणार
● आहेत तो अकाऊंट नंबर,चेक जारी करत असलेल्या व्यक्तीचे नाव तसेच त्याची सही देखील घेणे अनिवार्य असते.
Account Payee Cheque कसा जमा केला जात असतो?
पे चेक जमा करण्याची पदधत ही सिंपल चेकपेक्षा काही वेगळी असते.
• साधारण चेकचे पैसे आपणास बँकेच्या काऊंटरवरून प्राप्त होत असतात.
• पण अकाऊंट पे चेकचे पैसे आपल्याला क्लीअरन्स नंतर प्राप्त होत असतात.
चला तर मग जाणुन घेऊ अकाऊंट पे चेक कसा जमा करतात त्याची संपुर्ण प्रक्रिया काय असते:
● सगळयात पहिले आपल्याला बँकेत जाऊन पैसे जमा करण्यासाठी एक स्लीप घेऊन त्यात सर्व महत्वाची माहीती भरावी लागत असते.
उदा.आपल्याला पैसे ज्याच्या खात्यात पाठवायचे आहे त्याचे नाव,त्या व्यक्तीचा बँक अकाऊंट नंबर त्याचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेची शाखा,जारी कर्त्याच्या कोणत्या बँकेतुन कँश इशु केली जाते आहे त्या बँकेचे नाव,चेकचा नंबर,चेकमधुन पाठवली जात असलेली एकुण रक्कम,जो व्यक्ती पैसे जमा करतो आहे त्या जारी कर्ताचा संपर्कासाठी मोबाईल नंबर अँड करावा लागत असतो.
● एवढेच नव्हे तर चेकच्या मागील बाजुला देखील ज्याच्या खात्यात पैसे पाठवायचे आहे बँक खातेधारकाचे नाव,अकाऊंट नंबर,बँक आय एफसी कोड त्याचे ज्या ब्रांचमध्ये खाते आहे त्या ब्रांचचे नाव आणि सोबत आपला एक संपर्क क्रमांक देखील द्यावा लागत असतो.
● आणि मग तो चेक डिपाँझिट स्लीपला जोडुन बँकेत जमा करायचा असतो.किंवा ड्राँप बाँक्समध्ये टाकुन द्यायचा असतो.
● मग बँकेकडून तो चेक क्लीअरींगसाठी पाठवला जात असतो आणि मग पाच सहा दिवसात ते पैसे चेक इशुअरच्या खात्यातुन त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होत असतात ज्याचा नावाने चेक इशू करण्यात आला आहे.
Account Payee Cheque ची Clearing कशी केली जाते?
जेव्हा एखादी व्यक्ती अकाऊंट पे चेक जारी करून बँकेमध्ये जमा करत असते तेव्हा बँकेकडुन तो चेक क्लीअरिंगसाठी पाठवला जात असतो.ही सर्व प्रक्रिया आपण उदाहरणासहित समजुन घेऊया.
समजा एबसीआय बँकेतुन चेक जारी झाला आहे आणि तो आपण जाऊन बँक आँफ बडोदा मध्ये जमा केला आहे.
क्लीअरींगच्या प्रक्रियेत आपण ज्या बँकेत चेक जमा केला आहे ते बडोदा बँक तो चेक एसबीआयकडे पाठवते.
आणि मग एसबीआय बँक त्या चेकविषयी चौकशी करत असते ज्यात योग्य व्यक्तीनेच चेक इशु केला आहे का?चेक इशु करत असलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यात तेवढी रक्कम शिल्लक आहे का?हे सर्व व्हेरीफिकेशन करून झाल्यावर एसबीआय बँक ती रक्कम बँक बडोदा मधील खात्यात जमा करून देत असते.आणि मग बँक आँफ बडोदा ती रक्कम त्या अकाऊंट धारकाच्या खात्यावर जमा करत असते.
Payee Name सोबत Account Number देखील Add करता येतो का?
होय चेक जारी करणारा व्यक्ती पेई नेम सोबत त्यात अकाऊंट नंबर देखील अँड करू शकतो.पण यात देखील एक अडचण असते.याने आपल्याला फक्त अशाच बँक अकाऊंटवर पैसे जमा करता येत असतात.जो नंबर चेकवर समाविष्ट केला गेलेला असतो.
पण याच ठिकाणी फक्त पेई नेम दिलेले असेल तर आपण त्या नावाच्या व्यक्तीच्या कोणत्याही अकाऊंटमध्ये पैसे पाठवू शकतो एवढाच फरक या दोघांमध्ये असतो.जो आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.
Account Payee Cheque चे पैसे किती दिवसात प्राप्त होतात?
चेक इशु करत असलेली व्यक्तीचे खाते असलेले बँक आणि ज्याच्या खात्यावर पैसे जमा करायचे आहे त्या व्यक्तीचे बँक खाते एकाच जिल्हयात असेल तर अशा लोकल चेकची अमाऊंट खात्यात जमा व्हायला साधारणत तीन चार दिवसांचा कालावधी लागत असतो.
पण त्याच ठिकाणी चेक इशु करत असलेली व्यक्तीचे खाते असलेले बँक आणि ज्याच्या खात्यावर पैसे जमा करायचे आहे त्या व्यक्तीचे बँक खाते एकाच जिल्हयात नसेल तर अशा आऊटस्टेशन चेकची अमाऊंट खात्यात जमा व्हायला साधारणत आठ दहा दिवसांचा कालावधी लागत असतो.
Cross Cheque म्हणजे काय?
क्राँस चेक हा बेरर चेकपेक्षा अधिक सुरक्षित असतो.या चेकमध्ये कोपरयात उजव्या बाजुस दोन समांतर रेषा काढल्या जात असतात.आणि क्राँश केले असल्याचे मेंशन केले जात असते.
असे चेक रोखीने भरले जात नसतात यांना फक्त खात्यामध्ये जमा करता येत असते.म्हणजेच क्राँस चेकचे अमाऊंट एका खात्यातुन दुसरया खात्यात ट्रान्सफर करता येते पण यात आपल्याला यात रोख कँश काढता येत नसते.
म्हणजे यात आपण कुठल्याही व्यक्तीला पैसे हातात न देता त्याच्या खात्यावर जमा करत असतो.
भारतातील एन आय अँक्ट 126 नुसार क्राँस केलेला चेक कोणत्याही परिस्थिती रोखीने भरता येत नाही पण याला प्राप्त करत असलेली व्यक्ती दुसरयाच्या नावाने याला पुढे नेऊ शकते.
Cross Cheque कशा पदधतीने Work करतो?
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला क्राँस चेक बनवुन देत असतो.तेव्हा चेकमध्ये आपण कोपरयात उजव्या बाजुस दोन समांतर रेषा काढुन क्राँस करून हा चेक क्राँस चेक असल्याचे बँकेला मेंशन म्हणजेच सुचित करत असतो.ज्यात अकाऊंट पेई,नाँट नेगोशिबल असे देखील लिहित असतो.
आणि मग तोच चेक घेऊन चेक प्राप्त करणारा एखादा व्यक्ती जेव्हा बँकेत जातो तेव्हा बँकेकडून तो चेक बघितला जातो.आणि मग त्यात जर बँकेला क्राँसची निशानी दिसली तर बँक त्या व्यक्तीला डायरेक्ट कँश हातात देत नसते.तर ते अमाऊंट त्याच्या खात्यात जमा करत असते.
Cross Cheque कसा तयार केला जातो?
यात देखील आपल्याला अकाऊंट पे चेक प्रमाणे स्लीप घेऊन सर्व महत्वाची माहीती भरून घ्यावी लागते.
उदा.आपल्याला पैसे ज्याच्या खात्यात पाठवायचे आहे त्याचे नाव,त्या व्यक्तीचा बँक अकाऊंट नंबर त्याचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेची शाखा,जारी कर्त्याच्या कोणत्या बँकेतुन कँश इशु केली जाते आहे त्या बँकेचे नाव,चेकचा नंबर,चेकमधुन पाठवली जात असलेली एकुण रक्कम,जो व्यक्ती पैसे जमा करतो आहे त्या जारी कर्ताचा संपर्कासाठी मोबाईल नंबर अँड करावा लागत असतो.
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला क्राँस चेक बनवुन देत असतो.तेव्हा चेकमध्ये आपण कोपरयात उजव्या बाजुस दोन समांतर रेषा काढुन क्राँस करून हा चेक क्राँस चेक असल्याचे बँकेला मेंशन म्हणजेच सुचित करत असतो.ज्यात अकाऊंट पेई,नाँट नेगोशिबल असे देखील लिहित असतो.किंवा काही नाही लिहिले तरी चालते.
Cheque Cross करण्याच्या पदधती कोणकोणत्या आहेत?
Cheque Cross करण्याच्या पदधती पुढीलप्रमाणे आहेत :
1)General Crossing :
2) Account Pay Crossing :
3) Not Negotiable :
4) Special Crossing :
1)General Crossing :
हा एक काँमन चेक असतो.ज्यात उजव्या बाजुला दोन समांतर रेषा ओढलेली असते.आणि ह्या दोन ओळींमध्ये आपण कंपनी,अँड को किंवा कुठल्याही शब्दाचे संक्षिप्त रूप लिहु शकतो.किंवा काही नही लिहिले तरी चालते.आणि मग हाच चेक आपण पेईला देत असतो.
हा चेक पेईला कँश करता येत नाही
2) Account Pay Crossing :
चेक क्रास करून यात आपण त्याची सिक्युरीटी वाढवत असतो.जेणेकरून बँकेत समोरचा व्यक्ती डायरेक्ट कँश काढु शकत नाही ते पैसे त्याच्या अकाऊंटवर जमा केले जात असतात.
यात आपण ज्याचे नाव Payee मध्ये लिहिलेले असते त्याच्याच अकाऊंटला हे पैसे जमा होत असतात.
3) Not Negotiable :
याचा अर्थ असा असतो की जर ह्या चेकमध्ये कोणी फसवणुक केली तर यात आपला दोष अजिबात राहणार नाही कारण याची आपणास कुठलीही पुर्वकल्पणा नव्हती म्हणुन आपण हा चेक डायरेक्ट जमा केला आहे.
आणि नेगोशिबल म्हणजे जर त्या चेकमध्ये काही फसवणुक झाली तर तुम्ही जबाबदार असशाल.
म्हणुन चेकवर नेगोशिबल दिले आहे का नाँट नेगोशिबल हे एकदा आपण चेक करूनच चेक बँकेत जमा करावा.
4) Special Crossing :
स्पेशल क्राँसिंगमध्ये क्राँसिंग लाईनच्या मध्ये ड्रा़वरदवारे चेकवर विशिष्ट बँकेचे नाव लिहिले जात असते.जेणेकरून तो चेक त्या बँकेतच वटवला जाऊ शकतो.हा चेक आपल्याला इतर कुठल्याही बँकेत जमा करता येत नाही.
म्हणुन जर एखाद्या व्यक्तीने अशा बँकेच्या नावाने चेक दिला ज्यात आपले खातेच नाहीये तर आपण चेक देत असलेल्या व्यक्तीला दुसरा चेक पाठवण्यास सांगायला हवे.
Cross Cheque कसा Cancel केला जातो?
जर आपल्याला क्राँस चेक कँन्सल करायचा असेल तर चेक वर क्राँस केलेली रेषा कट करून तिथे Pay Cash असे लिहु शकतो.आणि तिथे आपली सही देखील करू शकतो.
याने जो व्यक्ती तो चेक बँकेत जमा करेल त्याला बेरर चेक समजून बँकेतुन रोख कँश मिळुन जाईल.
Bearer Cheque काय असतो?
हा एक प्रकारचा चेकच असतो पण हा सुरक्षित मानला जात नाही कारण ह्या चेकवर कुठल्याही क्राँस केलेला नसतो.त्यामुळे ह्या चेकवरून अनोळखी व्यक्ती देखील कँश काढु शकते.
ह्या प्रकारचा चेक जर आपल्याकडुन हरवला तर दुसरा व्यक्ती ज्याला हा चेक सापडला असेल तो याचा गैरवापर करून तो बँकेत जमा करून कँश काढु शकते.
Order Cheque म्हणजे काय?
हा चेक ज्या व्यक्तीच्या नावावर आपण इशु करत असतो त्याची सही देखील घेतली यात जाते.
हा चेक अशीच व्यक्ती बँकेत जमा करून पैसे काढु शकते ज्याच्या नावावर हा चेक जारी (इशु) करण्यात आला आहे.
Personal Finance शी संबंधित महत्वाचे 25 शब्द