टेंभुर्णी फळाची माहिती व आरोग्यदायी फायदे – Tembhurni Marathi information
टेंभुर्णी मूळचे चीन व जपान देशातले १० फूट वाढणारे झाड आहे.चीनच्या डोंगराळ भागात येणारे हे फळे भारतामध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, आसाम, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व महाराष्ट्रामध्ये आढळते.
महाराष्ट्रात टेंभुर्णी फळे हे सातपुडा पर्वत रांगामध्ये आढळते.
सातपुडा पर्वतातील आदिवासी लोक हा फळांचा वापर खाण्यासाठी करतात. या फळाला आदिवासी लोक टेंभुरुन किंवा टेंभुर्णी म्हणतात. उतर भारतात या फळाला लुकाट किंवा लुगाठ या नावाने ओळखले जाते. टेंभुर्णी फळ हे रसदार आंबट व गोड असून आरोग्यवर्धक आहे. या झाडांचा उपयोग औषधामध्ये केला जातो.
टेंभुर्णी फळ हे गोल व अंडाकार आकाराचे असते. हे फळ कड्चे असताना हिरव्या रंगाचे व पिकल्या वर नारंगी, शेंदरी रंगाचेहोते. टेंभुर्णी फळ हे फेब्रुवारी ते मार्चनंतर खायला मिळते. फळे झाडावरच पिकतात. चांगली पिकल्यानंतर ही झाडावरून काढली जाते. फळाची साल नाजूक असल्यामुळे फळे तोडताणी व क्रेटमध्ये भरताना काळजी घेणे गरजेचे असते.
टेंभुर्णी या झाडाचे फळे, पाने, फुले व साल सर्वच भाग औषधी गुणधर्माने नटलेला असून त्यापासून प्रक्रिया पदार्थ सुध्दा बनवलेजातात. यामध्ये काढा, जॅम, कॅन्डी, चटणी, टॉफी बर्फी, रस, वाईन,मुरंबा इत्यादी. टेंभुर्णी फळात सायट्रिक आम्ल व पेक्टीन असते.
पोषक घटक 100 ग्रॅम प्रमाणे
ऊर्जा: ४७ कि./कॅ ७ कर्बोदके : १३. १० ग्रॅम
- चरबी : 0.२ ग्रॅम ७ प्रथिने : ०.४३ ग्रॅम
- जीवनसत्त्वे
- जीवनसत्त्व अ: १ मि.ग्रॅ. ७ थायमिन बी १ : 0.0१८ मि.ग्रॅ.
- नायसिन बी ३ : ०.१८ मि.ग्रॅ. ७ जीवनसत्त्व बी ६ : 0.१ मि.ग्रॅ.
- जीवनसत्त्व सी : ५ मि.ग्रॅ.
खनिजे
- कॅल्शियम : १६ मि.ग्रॅ. ७_ मॅग्नेशियम : १४ मि.ग्रॅ.
- फॉस्फरस : २८ मि. ७ पोटॅशियम : २६८ मि.ग्रॅ.
- सोडियम : २ मि.ग्रॅ.
टेंभुणींचे आरोग्यदायी फायदे
१) टेंभुर्णी पानांचा काढा पिल्याने सर्दी, खोकला, कफ, यासारख्या आजारावर आळा कसतो.
२) टेंभुर्णी फळांचा रस सेवनाने फ्चन संस्थेची समस्या उभारत नाही. तसेच भूक पण जास्त लागते.
३) टेंभुर्णी फळामधील असणाऱ्या अन्टी ऑक्सीडंटमुळे कर्करोग प्रतिबंध करता येत असन हइटयरोग नि्यंत्रणास मदत होते .
४) फळामधील असलेल्या कॅल्शिअममुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. तसेच ताण कमी करण्यास मदत होते.
५) यामध्ये असणाऱ्या खनिजामुळे मुतखडा बरा होण्यास मदत होते. तसेच रसाच्या सेवनाने रक्तभिसरण समस्या कमी होण्यास मदत होते.
६) दमा असणार्या लोकांनी (व्यक्तींनी) पानांचा काढा पिल्यास प्रतिबंध करता येत असून संधिवाताला पण प्रतिबंध करता येत.
७) पानांचा काढा पिल्यास वजन नियंत्रणास राहण्यास मदत होते. तसेच त्या पानामध्ये दाह कमी करण्याचे गुणधर्म पण असते.
८) या फळाचा सेवनाने त्वचेवरील सुरकुत्या कमी करते. तसेच काळे डाग कमी होण्यास मदत होते. तसेच केस गळणे थांबवते.
टेंभुर्णी फळापासून प्रक्रिया पदार्थ
गर
- सुरवातीला फळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. त्यानंतर एक स्टीलच्या पातेल्यात थोडेसे पाणी घेऊन मंद आचेवर १० ते १५ मिनिटे वाफवणे.
- त्यानंतर टेंभुर्णी फळाचे चाकूच्या साह्याने वरची साल व आतील बिया काढून घेणे व मिक्सरमध्ये त्या तुकड्याचा गर करून घेणे.
- तयार झालेला गर निर्जंतुक केलेल्या काचेचा भरणीत भरून थंड जागी साठवणूक करणे गराची साठवणूक ३ ते ५ अंश सें.ग्रे. तापमानाला शीतगृहामध्ये केल्यास गर हा ३ महिने टिकतो. या गरापासून आपण भरपूर प्रक्रिया पदार्थ बनवू शकतो.
जॅम
- पिकलेली टेंभुर्णींची फळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. त्यातील बी वेगळे करून फळाला कापून मिक्सरमधून गर तयार करून घ्यावा.
- गराच्या वजनाएवढी साखर घेऊन त्यात मिसळून घ्यावी त्यात प्रतिकिलो जॅमसाठी २ ते ३ ग्रॅम सायट्रिक असिड मिसळावे व ते मिश्रण एकजीव करावे
- तयार झालेला जॅम हा निर्जंतुक काचेच्या मरणीत भरावा, भरणीची साठवणूक थंड व कोरड्या ठिकाणी करावी.
स्क्लॅश
- १ लीटर पाणी घेऊन त्यामध्ये १० ते १५ ग्रॅम सायट्रिक असिड व १.५० किलो साखर घेऊन पूर्णपणे मिसळून घ्यावे.
- मिश्रणामध्ये १ किलो गर मिसळून एकजीव करावे. मिश्रणाला १० ते १५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घेणे. मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये ७ ग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फेट मिसळून चांगले विरघळून घ्यावे.
- तयार झालेला मिश्रण मस्लीन क्लॉथ (पांढरा कपडा) मधून गाळून घेणे. तयार झालेले स्क्रॅश निर्जंतुकीकरण केलेल्या काचेच्या भरणीत भरावे. तयार झालेला स्क्रॅशची साठवणूक थंड ठिकाणी करावी,
जेली
- जेली बनविण्यासाठी १ किलो गर घेऊन त्यामध्ये दीड किलो साखर मिसळून त्यामध्ये ७ ग्रॅम सायट्रिक असिड मिसळावे.
- मिश्रणाला मंद आधेवर तापवावे. मिश्रण तापवत असताना त्यामध्ये ५ ग्रॅम पेकटीन टाकावे व २ ग्रॅम के.एम.एस. मिसळावे. तापवत असताना ब्रिक्स तपासून पहावा.
- ६७.५ ब्रिक्सचे प्रमाण झाल्यावर जेली तयार झाल्याचे समजून उष्णता देणे बंद करावे. तयार झालेली जेली निर्जंतुक बाटल्यात भरून झाकण लावून हवाबंद करावी.
वाळलेले सुके काप
- १ किलो स्वच्छ फळे धुऊन घ्यावीत व त्याचे वरचे साल व आतील बिया काढून घ्यावा. त्यानंतर पांढऱ्या कपड्यामध्ये टेंमुणीचे तुकडे बांधून २ टक्के के.एम.एस. च्या द्रावणामध्ये अर्धा तास ठेवावे.
- त्यानंतर एका अँल्युमिनियमच्या ट्रेमध्ये तुकडे पसरावीत. त्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये २ ते ३ दिवस ती वाळवावी.
- त्यानंतर फळातील पाण्याचे प्रमाण १० ते २० टक्के झाल्यास टेंभुर्णी फळे सुकली आहे असे समजावे.
- सुकलेली फळे थंड करून ते दाबून घ्यावेत. त्यानंतर तयार झालेले, सुकलेली टेंभुर्णी फळे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करावे. तयार झालेले टेंभुर्णी काप हे वर्षभर टिकतात.
टॉफी
- एक किलो फळाचा गर घेऊन त्यामध्ये १५० ग्रॅम वनस्पती तूप टाकून मिसळून घेणे व मिश्रणाला शिजवून घेणे.
- मिश्रण शिजत असताना त्यात ८0 ग्रॅम दूध पावडर, ६५० ग्रॅम साखर, ३ ग्रॅम सायट्रिक आम्ल, द्रवरूप ग्लुकोज ७० ग्रॅम टाकून मिश्रण एकजीव करून घेणे.
- तयार मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये सेट होण्यासाठी पसरून ठेवावे. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे 0.५ ते १ सें.मी. जाडीचे काप (तुकडे) करून घ्यावेत.
- तयार झालेली टॉफी ही बटर पेपरमध्ये पॅक करावी. टॉफीची साठवणूक थंड व कोरड्या ठिकाणी करावी.
चटणी
- चटणी बनविण्यासाठी स्वच्छ धुतलेले १ किलो फळे घेऊन त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे.
- त्यानंतर मिक्सरमध्ये प्युरी करुन त्यामध्ये १५० ग्रॅम साखर, २० ग्रॅम मीठ, १० ग्रॅम कोथिंबीर, २० ग्रॅम आल्याची पेस्ट, १० ग्रॅम जिरे व ५ हिरव्या मिरच्या टाकून पुन्हा मिक्सरमध्ये दळून घेणे.
- तयार झालेल्या मिश्रणाला मंद आचेवर ५ मिनिटे शिजवावे. तयार झालेली चटणी थंड करून घ्यावी.
गोड लोणचे
- सुरवातीला १ किलो टेंभुर्णी स्वच्छ धुतलेली फळे घेऊन त्यातील बी वेगळे करून फळाला चाकूने कापून त्याच्या छोट्या छोट्या फोड्या करुन घेणे,
- त्यानंतर स्ट्रीलच्या पातेल्यामध्ये १.५० किलो साखर घेऊन तीन तारी पाक तयार करून घ्यावा.
- त्यामध्ये फोड्या टाकून घ्याव्या व ५ मिनिटे त्यांना मंद आचेवर साखरेच्या पाकामध्ये शिजवून घेणे.
- त्यानंतर मिश्रणामध्ये १०० ग्रॅम आल्याची पेस्ट, ५० ग्रॅम मनुका य १० ग्रॅम मीठ घालून मिश्रण एकजीव करून घेणे. तयार झालेले लोणचे निर्जंतुक केलेल्या काचेच्या भरणीत भरावे व कोरड्या ठिकाणी साठवणूक करावे.
बंद डब्यांतील टेंभुणीचे फळे
- अर्ध पिकलेले फळ घेऊन त्याची साल व आतील बिया काढून घेणे.
- एका पातेल्यात ३० टक्के साखरेचा पाक व ३ टक्के सायट्रिक असिड द्रावण घ्यावे. हे मिश्रण मंद आचेवर ३५ ते ४० अंश सें.ग्रे. तापमानाला १० ते १५ मिनिटे ठेवणे,
- टेंभुर्णीची फळे निर्जंतुक केलेल्या डब्यांमध्ये वरच्या काठापासून ५ ते६ मि.मी. म्हणजेच पाव इंच सोडून ठेवणे.
- नतर ते डवे कॅन शीठर मशीनच्या साह्याने सीलबंद कॅन ही अँटोकेव्ह (कुकर) मध्ये २० मिनिटे निर्जंतुक करण्यासाठी ठेवणे. त्यानंतर त्या डब्यांना थंड करून कोरड्या जागेत ठेवावे.
संदर्भ – शेतकरी मासिक महाराष्ट्र