आयुष्यात प्रत्येकाने वाचावी अशी 15 उत्कृष्ट पुस्तके -List of 15 must read books

आयुष्यात प्रत्येकाने वाचावी अशी 15 महत्वाची पुस्तके –List of 15 must read books

 काही पुस्तकांना आपण महान म्हणुन यासाठी परिभाषित करत असतो की ती पुस्तके त्या काळात घडुन गेलेल्या महान साहित्यिकांनी ती लिहिलेली असतात.

ज्यात त्या महान साहित्यिकांनी आपले जीवणानुभव,भावना,विचार,जीवणाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आपल्यासमोर मांडलेला असतो.

आज आपल्या प्रत्येकाला वाचणाची आवड आहे.म्हणुनच वाचनाची नितांत आवड असलेल्या व्यक्तींसाठी तसेच ज्यांना वाचणाची आवड नाही त्यांच्यामध्ये देखील वाचणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी आम्ही काही पुस्तकांची नावे देत आहोत.

आजच्या लेखात आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी वाचावी अशा 15 महत्वाच्या पुस्तकांची यादी आज आपण जाणुन घेणार आहोत.

 

list of the 100 must-read books in a lifetime

 

 

आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी वाचावी अशा 15 महत्वाच्या पुस्तकांची यादी पुढीलप्रमाणे आहे :

 

1)टु कील माँकिंगबर्डहार्पर ली (To Kill Mocking Bird -Harper Lee)

 ही कहाणी 1930 मधील आहे.जेव्हा गोरे लोक काळया लोकांवर अत्याचार करीत होते.अँटिकस पिंच हे एक वकिल होते आणि जेम फिंच आणि स्काँट फिंच ही त्यांची अपत्ये हे पुस्तक स्काँट फिंचच्या म्हणजेच एका लहान मुलीच्या दृष्टीकोनातुन लिहिलेले आपणास दिसुन येते.

ह्या पुस्तकाचे वैशिष्टय हे आहे की हे पुस्तक वंशवाद,वर्णवादावर तसेच सामाजिकतेवर आधारीत आहे.ह्यातुन एक सामाजिक संदेश देखील देण्यात आलेला आहे.

2) 1984 –जोर्रेज आँरवेल (Georage Orwell)

1984 ही जाँर्ज आँरवेल यांनी 1949 मध्ये लिहिलेली एक डिस्टोपियन कादंबरी आहे.ही कादंबरी  राजकारणावर आधारलेली आहे.पक्षाच्या सर्वव्यापी नजरेने हताश तसेच निराश झालेल्या विन्सटन स्मिथच्या जीवणाचे अनुसरण ह्या कांदंबरीत करण्यात आले आहे.

3)  Harry Potter And The Philosopher Stones- Jk Rowling

हँरी पाँटर आणि फिलाँसाँफर स्टोन ह्या कादंबरीचे लेखन ब्रिटीश लेखक जे के राँलिंग यांनी केले आहे.

हँरी पाँटर मालिके मधील पहिली कादंबरी आणि रोलिंगची पहिली कादंबरी हे दोघेही आपल्याला हँरी पाँटर ह्या यंग विझार्डचे अनुसरण करताना दिसुन येतात.

See also  शॉर्ट फॉर्म्स ची यादी- मेसेज करताना वापरले जाणारे - List of Short Forms used in online Chatting

4) The Lord Of The Rings – By Jrr. Tolkins

 द लाँर्ड आँफ रिंग्ज ही जे आर आर टाँल्किन यांनी लिहिलेली कादंबरी आहे.ह्या कथेची सुरूवात मध्य धरतीपासुन एका राक्षसापासुन सुरू होताना आपणास दिसुन येते.ज्याचे नाव सोराँन असे दाखवण्यात आले आहे.जो ब्लँक मँजिक करण्यात अत्यंत तरबेज असतो.

पहिल्या युगात आपणास असे पाहायला मिळते की सोराँन हा मोगोर्थ मेल्काँरच्या देवतांद्वारे हरता हरता वाचत असतो.

आणि दुसरे युगात आपणास असे दाखवले आहे की सोराँन संपुर्ण जगाचा बादशाह बनण्याची स्वप्रे बघू लागत असतो.

5) The Great Gats -F Scott Fitzerland

द ग्रेट गँटस ही कादंबरी एफ स्काँट फिजर लँण्ड यांनी लिहिलेली आहे.ह्या कादंबरीचे प्रकाशन 10 एप्रिल 1925 रोजी करण्यात आले होते.

यात मुख्य पात्र नीक,डेझी,टाँम,गँटस बे हे असलेले आपणास दिसुन येतात.

ही कथा ग्रेट गँटस नावाच्या व्यक्तीवर आधारलेली आहे.जो खुप रहस्यमयी असतो.ज्याला प्रत्येक शनिवारी मोठमोठया मेजवाण्या द्यायची सवय असते.

6) Pride And Prejudice -Jane Austen

प्राईड आणि प्रिजुडाईज ही जेन आँस्टँन ह्यांनी लिहिलेली कादंबरी आहे.ही कादंबरी जगातील दोन विरूदध पात्रांच्या अशा प्रेमसंबंधाचे तपशीलवार वर्णन करताना आपणास दिसुन येते.ज्यात शिष्टाचार आणि सौजन्य खुप महत्वाचे मानले जाते.

7) The Diary Of Young Girl -Anne Fank

ह्या पुस्तकाची लेखिका अँनी फ्रँक ह्या आहेत.

 अँनी फँक ह्या तरूण मुलीला खुप एकटेएकटे जाणवत असते.तिच्या आजुबाजुला परिवारातील सदस्य तसेच मित्र मैत्रीणी असतात तरी तिला असे वाटते की तिच्याशी बोलायला जवळचे कोणीच नाहीये.अशा वेळेस ती तिच्या भावना एका डायरीत लिहण्याचे ठरवत असते.

8) The Book Thief -Markus Zusak

द बुक थीफ ही एक मार्कस झूक्स यांनी लिहिलेली ऐतिहासिक कादंबरी आहे जी 2005 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती.हे पुस्तक 65 भाषांमध्ये अनुवादित करण्यात आल्याचे आपणास दिसुन येते.एवढेच नही तर ह्या पुस्तकाला एक आंतरराष्टीय बेस्ट सेलिंग बुक म्हणुन देखील गौरविण्यात आले आहे.

See also  शेतात बोअरवेल घेण्यासाठी शासन देते आहे ८० टक्के अनुदान - Borewell Yojna Maharashtra In Marathi

ह्याच कादंबरीवर चित्रपट देखील काढण्यात आलेला आपणास दिसुन येतो.

9)The Hobbit -Jrr Tolkin

द हाँबीट ही जे आर आर टाँल्किन यांनी लहान मुलांवर लिहिलेली एक कल्पणेत रमवणारी कांदंबरी आहे.

ह्या कादंबरीला सर्वोत्कृष्ट किशोर वयीन कथा तसेच कार्नेगी पुस्स्कारासाठी नामांकित देखील करण्यात आले होते.

10) Little Women-Loria May Alcott

लिटल वुमन ह्या कादंबरीचे लेखन अमेरिकन कादंबरीकार लुसिया मे अल्कोट यांनी केलेले आहे.

ही कादंबरी 1868 आणि 1869 मध्ये दोन खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे.

ही कथा चार बहिणी मेग,जो,बेथ,एमी यांच्या जीवणाचे अनुसरण करताना आपणास दिसुन येते.यामध्ये ह्या चारही बहिणींच्या बालपणापासुन स्त्रित्वापर्यतच्या प्रवासाचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे.

11) Fahrenheit 451 -Rey Bradbury

फँरेनहिट 451 ही रे ब्राडबुरी यांनी लिहिलेली कादंबरी आहे.

ह्या कादंबरीतुन भविष्यातील अमेरिकन समाजाचे सादरीकरण करण्यात आलेले आपणास दिसुन येते.

जिथे पुस्तके बेकायदेशीर मानली जातात.आणि जिथे दिसुन येतात ती जाळुन टाकली जातात.

12) Jane Eyre-Charlotte Bronte

जेनी आयरी ही कादंबरी लेखिका चार्लोट ब्राण्टे यांनी लिहिलेली आहे.

जेनी आयरी ह्या कादंबरीत एका अनाथ मुलीची कहाणी दिलेली आहे.जी खुप लहान असताना तिच्या आईवडिलांचे निधन झालेले असते.

ही कादंबरी 16 आँक्टोंबर 1847 मध्ये सर्वप्रथम छापण्यात आली होती.ह्या कादंबरीत एकुण 38 धडयांचा समावेश केला गेलेला आहे.

13) Animal Farm -George Orwell

अँनिमल फार्म ही कादंबरी जाँर्ज आँरवेल यांनी 1945 मध्ये लिहिली होती.

ह्या कादंबरीत असे दाखवण्यात आले आहे की माणसाकडुन प्राण्यांना योग्य वागणुक दिली जात नाही म्हणुन त्याविरूदध काही प्राणी माणसाच्या तावडीतुन आपली सुटका व्हावी म्हणुन संघर्ष करीत असतात.आणि मँन्स फार्मच्या ठिकाणी अँनीमल फार्म उभारले जाते आणि माणसांची प्राण्यांकडुन तिथून हकालपटटी करण्यात येते.

मग अँनिमल फार्म चालवण्यासाठी काही नियम आखले जातात ज्यात सर्व प्राणी समान आहेत असा नियम करण्यात आला.पण सर्व प्राण्यांमधील नेपोलियन नावाचा प्राणी ज्याला सर्व प्राण्यांचे नेतृत्व करायचे असते.

See also  अकाऊंटंट बनण्यासाठी कोणता कोर्स,डिप्लोमा करायला हवा?Which course and diploma best for accounting jobs in Marathi

तो त्या प्राण्यांचा नेता बनुन त्यांच्यावर हुकुमशाही करायला लागतो.आणि त्या सर्व प्राण्यांना आधीपेक्षा वाईट अवस्थेत जीवण व्यतीत करावे लागते.

14) Gone With The Wind-Margaret Mitchell

गाँन विद द वाईण्ड ही मार्गारेट मिचेल यांनी लेखन केलेली उपासमार,खुन,दरोडे,बलात्कार आणि गुलामगिरीवर आधारलेली कथा आहे.

15) The Catcher In Raye -J.D Salinger

द कँचर इन राए ही जे डी सेलिंगर यांनी लिहिलेली कादंबरी आहे.

जी 1945-1946 मध्ये मालिकेच्या स्वरूपात प्रकाशित झाली होती.आणि 1951 मध्ये कादंबरी म्हणुन देखील प्रकाशित झालेली आपणास दिसुन येते.

ह्या कादंबरीचा नायक कोलफिल्ड हा किशोरवयीन बंडखोरांसाठी आदर्श असलेला आपणास दिसुन येतो.

खरे तर ही कादंबरी प्रौढांसाठी लिहिली गेली आहे पण त्यातील राग,परकेपणा,किशोरवयात केलेली बंडखोरी यासाठी मुलांनी देखील ही कादंबरी वाचणे अधिक पसंद केले.

इतर नक्की  वाचण्यासारख्या पुस्तकांची नावे :

 

  • Charlotte Web- E B White
  • The Lion Wich And Wardrobe-Cs Levis
  • Graph Of Wrath -John Stenbeck
  • Lord Of Flies-Wiliam Golding
  • The Kite Runner-Khaled Hosini
  • Of Mice And Men-John Stenback
  • The Tale Of Two Cities-Chalrles
  • Romeo And Juliet-Wiliam Shakespeare
  • The Hichhikers Guide To Galaxy -Dougle Adam
  • Wuthering Height- Emile Bronte
  • The Color Purple-Alice Walker
  • Alies In Wanderland-Levis Carol
  • Frankestin-Marry Shelly
  • The Adventure Of Hucklebery Finn- Mark Twain
  • Slaughter House Five-Kurt Vonnegut

SOURCE – AMAZON 100 BOOKS TO READ ONLINE