सेंद्रिय शेती पद्धतीचे ९ सूत्रे – जैविक शेती माहिती – Future of Agriculture Organic farming – 9 step effective approach
सेंद्रिय शेती सध्या काळाची गरज बनलेली आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतलेल्या शेतमालाला (फळभाज्यांना) ग्रामीण तसेच शहरी मागात मोठ्या प्रमाणात मागणी वाढताना दिसत आहेत. महाराष्ट्र कृषि विभाग कृषि विद्यापीठांच्या समन्वयाने सेंद्रिय शेतीची संकल्पना रुजवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सेंद्रिय कृषिमालाची गुणवत्ताही रासायनिक मालापेक्षा चांगली असून सेंद्रिय मालास भावही चांगला मिळत आहे. शिवाय जमिनीची पोत,
आरोग्य आणि सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे.
वाचा – सेंद्रिय शेती म्हणजे काय
सेंद्रिय शेती पद्धतीचे ९ सूत्रे
रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता किडींचे नियंत्रण
१) खोल नांगरणी :
एप्रिल-मे महिन्यात जमिनीची नांगरणी करावी. दोन वर्षातून एकदा तरी खोल नांगरणी करणे आवश्यक आहे. तसेच दोन महिने कडक उन्हात जमीन तापणे फार महत्त्वाचे आहे.
फायदे : नांगरणीमुळे किडींचे कोष व इतर अवस्था बाहेर येऊन सूर्याच्या तीव्र तापमानामुळे आणि पक्ष्यांनी वेचून (टिपून) खाल्ल्यामुळे कोष नष्ट होतात. त्यामुळे नवीन पतंग तयार होत नाहीत.
२) पिकांची फेरपालट करणे :
एकाच जमिनीवर एकाच प्रकारचे पीक वारंवार घेऊ नये. (कपाशीवर पिकानंतर कपाशी तसेच सोयाबीन पिकानंतर सोयाबीन)
फायदे : जमिनीची पोत सुधारते तसेच नत्र स्थिरीकरण होऊन किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
३) बीजामृत (बीजसंस्कार करणे १०० किलो बियाण्यासाठी):
१) पाणी २० लीटर २) शेण ५ किलो ३) गोमूत्र ५ लीटर ४) चुना २५० ग्रॅम सर्व सामुग्री पेरणी अगोदर दोन दिवस आधी मिश्रण करून घ्यावे आणि २ ते ३ मिनिट घड्याळाच्या काट्याप्रमाणे ढवळावे. नंतर सावलीच्या ठिकाणी झाकून ठेवावे. पेरणीच्या वेळी बियाणे गोणपाटावर पसरूण मिश्रण बियाण्यावर शिंपडावे तसेच रोप लागवडीच्या वेळी रोपांच्या मुळ्या बीजामृत बुडवून नंतर रोपणी करावी.
फायदे : उगवणशक्ती वाढते व जमिनीतील कीडही बियाण्यास इजा पोहोचत नाही. तसेच अंकुर रोगास बळी पडत नाही.
४) आंतरपीक घेणे :
मुख्य पिकात उदा. कपाशीत मुंगी/तूर/उडीद किंवा चवळी यांसारखे आंतरपीक घेणे. फायदे : आंतरपीक घेतल्यास रस शोषणाऱ्या क्रिडी (मावा, तुडतुडे, पांढरी माशी) मुख्य पिकास हानी न पोहोचवता अंतर पिकावर येतात व आंतरपिकाचे कीड व्यवस्थापन करणे सोयीचे कमी खर्चीक होते.
५) सापळा (जाळ) पीक घेणे :
प्रति एकरी दोन ते चार ओळी झेंडूच्या पिवळ्या फुलांचे झाडे सापळा पीक म्हणून लावावे.
फायदे : किडीचे पतंग (बोंडअळी) आपली अंडी झेंडूच्या फुलावर आकर्षित होऊन घालतात व फुले तोडल्यास बाजारात विकल्यास घातलेली अंडी नष्ट होतात.
६) मुख्य पिकाच्या चारही भोवती पिके लावणे :
तीन ते चार तास किंवा पिकांभोवती ज्वारी/बाजरी/मका लावावे.
फायदे : शेताबाहेर हवा अडवले जाते त्यामुळे पिकाचे नुकसान होत नाही. तसेच दुसऱ्या शेतातील कीड येण्यास रोखल्या जाते.
७) पक्षी थांबा करणे :
पिकांच्या उंचीपेक्षा १ फूट उंच इंग्रजी (दो टी शब्दासारखे आकाराच्या काड्या लावाव्या.
फायदे : त्यावर पक्षी येऊन थांबतात व ते पिकावरील कीड वेचून (टिपून) खातात.
८) फेरोमन ट्रॅप :
कृषि विभाग किंवा बाजारातून अगदी स्वस्त दरात मिळते व सदर ट्रॅप काठीला बांधून पिकांच्या उंचीपेक्षा १ फूट उंचावर बांधावे.
फायदे : फेरोमन ट्रॅप लावल्यास नर पतंग (अळीचे) सदर सापळ्यात आकर्षित होऊन त्यात पडतात व मरतात. त्यामुळे नर व मादीचे मीलन होत नाही व नवीन अंडी तयार होत नाही.
९) टिनाचे डब्बे किंवा प्लॅस्टिक पेपर वापरणे (चिकट सापळा) :
टिनाच्या डब्ब्यांना पिवळा रंग किंवा कागद लावून त्यावर ग्रीस किंवा एरंडेल तेल लावावे. हा डब्बा काठीच्या साह्याने पिकापासून १ फूट उंचीवर लावावे. प्लॅस्टिक पेपरचा वापरसुद्धा वरील प्रमाणे करू शकता.
फायदे : चिक्रट सापळे म्हणून पिवळे टिनाचे डब्बे किंवा प्लॅस्टिकचा वापर केल्यास पांढरी माशी व इतर रस शोषक किडी आकर्षित होतात व त्याला चिकटून मरतात. निळ्या रंगाचा वापर केल्यास फ़ुल किडी सुद्धा चिकटतात व मरतात.
वनस्पतींपासून पिकांवर कीड व रोगनाशक औषधांची निर्मिती – Future of Agriculture-Organic farming 9 step effective approach
१. निमास्त्र
१) पाणी- २०० लीटर.
२) गोमूत्र- १० लीटर.
३) गाईचे ताजे शेण- २ किलो.
४) कडुनिंबाचा पाला (फांद्यासोबत)- १० किलो.
मिश्रणाला घड्याळाच्या काट्याप्रमाणे ढवळा व त्यावर पोते झाकून
२ ते ४ दिवस सावलीत ठेवावे. त्यावर ऊन किंवा पावसाचे पाणी पडणार नाही, याची काळजी घ्यावी. दिवसातून दोन वेळा सकाळी-सायंकाळ २ मिनिट घड्याळाच्या काट्याप्रमाणे ढवळावे. २ ते ४ दिवसानंतर मिश्रणाला कपड्याने गाळून घ्यावे. (६ महिन्यापर्यंत आपण हे मिश्रण वापरू शकतो तसेच फवारताना मिश्रणामध्ये पाणी मिसळून फवारणी करू नये. फक्त मिश्रण फवारावे.)
फायदे : रस शोषणारे किडी व अंडी यांचे नियंत्रण होते. (पांढरी माशी,मावा, तुडतुडे व लहान अळ्यांसाठी होतो. निमास्त्राने मोठी अळी मस्त नाही.
२- ब्रम्हास्त्र
१) गोमूत्र- २० लीटर.
२) कडुनिंबाच्या पानांची (फांद्यासोबत) चटणी- २ किलो.
३) करंजीच्या पानांची चटणी- २ किलो.
४) बेलाच्या पानांची चटणी- २ किलो.
५) सीताफळाच्या पानांची चटणी- २ किलो.
६) एरंडाच्या पानांची चटणी- २ किलो.
७) आंब्याच्या पानांची चटणी- २ किलो.
८) घाणेरीच्या पानांची चटणी- २ किलो.
यापैकी कोणत्याही पाच वनस्पतींची चटणी घेऊन गोमूत्रात मिसळून उकळवावे. नंतर ४८ तासापर्यंत सावलीत ठेवादे. दिवसातून २ वेळा २ मिनिट घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ढवळावे. नंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. या मिश्रगाचा ६ महिन्यापर्यंत वापर वापर करू शकतो. (१एकरसाठी २०० लीटर पाण्यामध्ये ६ लीटर ब्रज्मास्र मिसळून फवारावे.)
फायदे : सर्व प्रकारच्या अळ्या व किर्डीवर नियंत्रण होते. (मोठ्या अळ्यांसाठी )
३. अग्नि पंख
१) गोमूत्र- २० लीटर.
२) कडुनिंबाच्या पानांची फांद्यासोबत चटणी- २ किलो.
३) तंबाखू पावडर- १ ते २ किलो.
४) हिरव्या मिरचीचा ठेचा- १ ते २ किलो.
५) लसूण चटणी- २५० ग्रॅम.
सर्व मिश्रणावर झाकण झाकून उकळून घ्यावे. मिश्रणाला ४८ तासांपर्यंत सावलीत ठेवावे. दिवसातून २ वेळा सकाळ-सायंकाळ २ मिनिटे ढवळावे. ४८ तासांनंतर कपड्याने गाळून घ्यावे. (या अग्निअस्त्राचा ३ महिन्या पर्यंत वापर करू शकतो. एक एकरासाठी २०० लीटर पाण्यामध्ये ६ लीटर अग्नीअस्त्र मिसळून फवारावे.)
फायदे : या औषधाचा उपयोग रामबाण उपाय म्हणून करावा. म्हणजेच अगदी मोठी अळी आढळल्यास फवारणी करावी.
टीप- या औषधाचा उपयोग एकदाच करावा. यात मित्र कीटकांचा सुध्दा नाश होऊ शकतो.
४. दशपर्णी अर्क
१) पाणी- २०० लीटर.
२) गोमूत्र- २० लीटर.
३) देशी गाईच शेण- २ किलो.
४) हळद- ५०० ग्रॅम.
५) अद्रक चटणी- ५0०० ग्रॅम.
६) हिंग पावडर- १० ग्रॅम.
७) तंबाखू पावडर- १ किलो.
८) हिरव्या मिरचीची चटणी- १ किलो.
९) लसूण चटणी- ५०० ग्रॅम.
वनस्पती
१) कडुनिंबाची पाने फांद्यासोबत- ५ किलो.
२) करंजीचे पाने- २ किलो.
३) एरंडोचे पाने- २ किलो.
४) सीताफळाची- २ किलो.
२) बेलाची पाने- २ किलो.
६) तुळशीची पाने- २ किलो.
७) झेंडूची पाने- २ किलो.
८) आंब्याची पाने- २ किलो.
९) रुईची पाने- २ किलो.
१०) जांबाची पाने- २ किलो.
११) डाळिंबाची पाने- २ किलो.
१२) कारल्याची पाने- २ किलो.
१३) जास्वंदाची पाने- २ किलो.
१४) कन्हेराची पाने- २ किलो.
१५) हळदीची पाने- २ किलो.
१६) अट्रकाची पाने- २ किलो.
१७) तरोट्याची पाने- २ किलो.
१८) पपईची पाने- २ किलो.
यापैकी कोणत्याही १० वनस्पर्तीची पाने (प्राथमिकता सुरवातीच्या १० वनस्पती)
सर्व मिश्रण एकत्रित करून लाकडी काठीच्या सहायाने ढवळून घ्यावे. त्यावर पोत्यांनी झाकून ३० ते ४० दिवस सावलीत ठेवावे. सूर्यकिरणांपासून द पावसाच्या पाण्यापासून बचाद करावा. दिवसातून २ वेळा सकाळ-
सायंकाळ ढवळावे. त्यानंतर कपड्याने गाळून पूर्ण लगदा पिळून घ्यावा. (६ महिन्यापर्यंत अर्क वापरता येतो.)
वापरण्याचे प्रमाण : १ एकरसाठी २०० लीटर पाण्यात ६ लीटरदशपर्णी अर्क मिसळून वापरावा.
रासायनिक खताचा वापर न करता पिकायोग्य जमीन तयार करणे.
१. जीवामृत
१) पाणी- २०० लीटर.
२) देशी गाईंचे गोमूब्र- ५ ते १० लीटर.
३) काळा किंवा लाल गूळ- २ किलो.
४) कडधान्याचे पीठ (बेसन)- २ किलो.
५) झाडाखालची जिवाणू माती- १ किलो.
६) देशी गाईचे शेण- १० किलो.
सर्व साधनसामुग्री एकत्र मिश्रण करून ढवळून घ्यावे. त्यावर पोते झाकून सावलीत ठेवावे. पावसाचे पाणी त्यात पडणार नाही, याची काळजी घ्यावी. ४८ तासांपर्यंत ते तसेच राहू द्या. सकाळ-सायंकाळ दिवसातून २ वेळा मिश्रण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ढवळावे.
२ वेळा मिश्रण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ढवळावे. जीवामृत तयार झाल्यानंतर १४ दिवसांपर्यंत वापरू शकतो. तसेच ७ ते १० दिवसांपर्यंत वापरात आणल्यास सर्वोत्तम परिणाम दिसून येतो.
फायदे :
१) जमिनीत सूक्ष्मजिवांची संख्या वाढते. त्यामुळे सर्व अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होतात.
२) जमिनीची सच्छिद्रता वाढल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
३) जमिनीत असलेल्या गांडुळाचे हालचाल वाढते त्यामुळे पिकास पाहिजेत असे पोषक अन्नद्रव्ये गांडूळ मिळवून देतात.
४) जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्यामुळे जमीन अधिक सुपीक होते.
वापरण्याची पद्धत : सदर जीवामृत सामग्री १ एकर क्षेत्रासाठी असल्यामुळे एक एकर क्षेत्रात पुरेल असे द्यावे.
- ओलीत पिकासाठी वाफ्यांची संख्या विचारात घेऊन समप्रमाणात प्रत्येक वाफ्यात डब्याने किंवा आपल्या सोयीने टाकावे. किंवा पाण्याच्या मुख्य प्रवाहात थोडे थोडे डब्याने किंवा पाइपने सोडावे.
- ठिबक सिंचन असल्यास ठिबक चोक होऊ नये म्हणून २ वेळा कापडातून गाळून घ्यावे व नंतर नितळ पाणी (जीवामृत) व्हेन्चुरीतून द्यावे.
२. घनजीवामृत
१) प्रति एकर गाईचे शेण- १०० किलो.
२) गूळ- १ किलो.
३) बेसन १ किलो.
सर्व सामुग्री ते मिश्रण करून त्यावर कापड झाकून ठेवा. त्यावर ऊन व पाऊस पडणार नाही, याची काळजी घ्यावी. वातावरणाचे तापमान कमी असेल तर गोणपाट झाका आणि ४८ तासांपर्यंत ठेवा. ४८ तासानंतर २ वेळा खाली-वर करावे व उन्हात वाळत ठेवावे. हे मिश्रण वाळल्यानंतर त्याला बारीक करून घ्यावे. पोत्यात भरून ठेवावे. घनजीवामृत एक वर्षांपर्यंत वापरता येते.
वापरण्याची पद्धत : सदर घनजीवामृत सामुग्री १ एकर क्षेत्रासाठी असल्यामुळे १ एकर क्षेत्रात पुरेल असे द्यावे. तयार झालेल्या घनजीवामृतामध्ये १०० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून पेरणीच्या वेळी किंवा पीक फुलावर असताना द्यावे.
३. आच्छादन
१) शेतातील पिकाचे अवशेष न जाळता साठवून ठेवणे. व ते पिकास आच्छादन (जमीन झाकून ठेवणे) म्हणून वापर करणे.
२) निंदणी केल्यानंतर निघालेले तण (ज्या तणांचे पुनर्जीवन होत नाही असे) यांचा वापरही आच्छादन म्हणून करता येतो.
फायदे :
१) जमिनीतील पाण्याचे बाष्पीपवन होत नाही व जमिनीचा ओलावा टिकून राहतो.
२) पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची शकती वाढते.
३) आच्छादन कुजल्यास त्याचे जमिनीत खत तयार होते.
४) तण नियंत्रणास मदत होते.
शेतकरी मासिक – महाराष्ट्र शासन
नक्की वाचा -जैविक खते म्हणजे काय? प्रकार व 10 फायदे ( Jaivik khat)
आशुतोष सुरेंद्र चिंचोळकर, सचिन भा. सेलगावकर, वनस्पती विकृतीशास्त्र विभाग, यवतमाळ