प्रयोग शाळेत नत्र स्थिर करणाऱ्या, जमिनीतील स्फुरद विरघळविणाऱ्या व सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या जिवाणूंची स्वतंत्र्यरीत्या वाढ करून योग्य अशा वाहकात मिसळून तयार होणाऱ्या खताला ‘जिवाणू खत”असे म्हणतात.
या जिवाणू खताला ‘जिवाणू संवर्धन, बॅक्टेरिअल कल्चर” अथवा ‘बॅक्टेरिअल इनॉक्युलंट’ असेही म्हणतात.
अधिक उत्पादन मिळवण्यासाठी अधिक उत्पादन देणारी पिके एकाच शेतात घेतली जातात. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता भासते.आपल्याकडील जमिनीत नत्राचे प्रमाण कमी आहे. सेंद्रिय खताद्रारे नत्राचा पुरवठा करणे आवश्यक असते. कारण केवळ रासायनिक खतांद्वारे पुरवठाकरणे जमिनीच्या प्राकृतिक दृष्टीने योग्य नसते, त्यामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म बिघडतात. अशा परिस्थितीत जैविक खतांचा उपयोग करणे महत्त्वाचे ठरते.
त्यातच रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो व पर्यायाने पिकाचे उत्पादन अपेक्षित प्रमाणात मिळत नाही. अशा परिस्थितीत जिवाणू खताच रासायनिक खतांना पूरक खते म्हणून वापर केल्यास अधिक फायदा मिळतो.
खरीप हंगामामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या पिकांसाठी.उपलब्ध असलेली द्रवरूप व लिग्नाईट स्वरूपातील जैविक खते आणि त्यांची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.
जिवाणू खतांच्या वापराने होणारे फायदे- Jaivik khat
नत्रयुक्त जिवाणू खतामुळे हवेतील नत्र शोषले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते.
सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन होते.
बियाण्याचया उगवण क्षमतेत वृद्धी होते.
पिकाची जमदार वाढ होते, तसेच त्याच्या रोगप्रतिकार शक्तीतही वाढ होते. –
धान्य, फुले व फळे याचे भरघोस व दर्जेदार उत्पादन होते.
रासायनिक खतावरील खर्चात कपात होते.
जिवाणू खते नैसर्गिक आहेत, त्यामुळे त्याच्या जास्त मात्रेने देखील
जमिनीवर किंवा पिकावर दुष्परिणाम होत नाही.
जिवाणू खतांचे प्रकार
अ) नत्र स्थिर करणारे जिवाणू खते -Jaivik khat
रायझोबियम : या जिवाणूचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते. हे जिवाणू शेंगवर्गीय पिकांच्या मुळावर ग्रंथी निर्माण करतात. या ग्रंथीद्रारे हवेतील नत्रवायू (नायट्रोजन) शोषून घेऊन मुळावाटे पिकास उपलब्ध करून देतात
एकच रायझोबियम जिवाणू खत सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही. त्यामध्ये वेगवेगळे गट आहेत. वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचे जिवाणूखत पुढीलप्रमाणे वापरावे.
चवळी गट -बवळी, वाल, भुईमूग, गवार, मटकी,तूर, उडीद, मूग, ताग व धैंचा
घेवडा गट – घेवडा
अल्फा गट – लुसर्न
वाटाणा गट- वाटाणा , मसूर हरबरा
लुपिन गट -लुपिन
अँझोटोबॅक्टर : हे जिवाणू जमिनीमध्ये पिकाच्या मुळांभोवती राहून असहजीवी पद्धतीने कार्य करीत असतात. हे जिवाणू मुख्यत: उदासीन किंवा किंचित विम्ल जमिनीत आढळून येतात. ते हवेतील मुक्त नत्र शोषून घेतात व पिकांना उपलब्ध करून देतात. हे जिवाणूखत, शेंगवर्गीय पिके वगळून इतर सर्व एकदल व तृणधान्य पिकांना उपयोगी पडते. उदा.वारी, बाजरी, ऊस, मका, कापूस, सूर्यफूल इ. साठी तसेच टोमॅटो, वागी, मिरची, बटाटा, कोबी इ. भाजीपाला पिकासाठी त्याचबरोबर सर्व फळझाडासाठी व फुलझाडासाठीही वापरता येते.
अझोस्पिरिलम : हे जिवाणू पिकांच्या मुळात किंवा मुळाच्या सभोवतालच्या मातीत राहून नत्र स्थिर करतात. हे जिवाणू अँझोटोबॅक्टर जिवाणू पेक्षा पिकांना जास्त नत्र पुरवितात.
अँसीटोबॅक्टर : हे एक मुक्त नत्र स्थिर करणारे जिवाणू ऊस पिकामध्ये मुळाद्वारे प्रवेश करून उसामध्ये नत्र स्थिरीकरणाचे कार्य करतात. या जिवाणूद्रारे कार्यक्षमरीत्या ५० टक्के नत्र स्थिरीकरण होऊन ऊस पिकाची चांगली वाढ होते तसेच उत्पादनातही १५ ते २० टक्के वाढ होते.
ब) स्फुरद विरघळणारे जिवाणू खते
उदा. बुरशी – अस्परजीलस अवमोरी, पनिसिलीयम डीझीटॅटम, जिवाणू – बॅसिलस पॉठीमिक्य़ा, प्स्युडोमोनस सियाटा हे जिवाणू पी.एस. बी. या संक्षिप्त नावानेही ओळखले जातात. जमिनीत स्थिर झालेला स्फुरद विरघळविला जाऊन पिकांना उपलब्ध करून दिला जातो. तसेच वापरलेला स्फुरद कार्यक्षमरीत्या उपयोगात आणला जातो. हे जिवाणू खत सर्व प्रकारच्या पिकांना वापरता येते
क) सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जिवाणू खते – Jaivik khat
उदा. बुरशी – ट्रायकोडर्मा, अस्पर्जीलस, जिवाणू – बॅसिलस असे अनेक प्रकारचे जिवाणू सेंद्रिय पदार्थाचे विघटन घडवून आणतात.कंपोस्ट जिवाणू खत – १ टन सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी १ किलो या प्रमाणात वापरावे.
कंपोस्ट खत तयार करणे ही एक जीवशास्त्रीय प्रक्रिया असून तिच्यामध्ये न कुजलेल्या सेंद्रिय पदार्थाचे सूक्ष्म जिवाणू मार्फत विघटन होते आणि कार्बन : नायट्रोजन यांचे गुणोत्तर कमी होते. अशा विघटन झालेल्या पदार्थांना कंपोस्ट खत असे म्हणतात. शास्त्रीय पद्धतीने उत्तम प्रतिचे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खड्डा आणि ढीग पद्धतीचा वापर करतात.
खड्डा पद्धत : खड्डा पद्धतीमध्ये जिवाणू सेंद्रिय पदाथाचे विघटन हे हवा विरहीत वातावरणात करतात, त्यास अहवेष्णू विघटन म्हणतात. ही पद्धत कमी पाक्साच्या प्रदेशात वापरतात. खड्डा निवडताना तो उंच जागी असावा, खडड्याभोवती बांध घालावा, त्यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यात जाणार नाही. कंपोस्ट तयार करण्यासाठी खड्ड्याची रुंदी २ मीटर, खोली १ मीटर आणि लांबी ४ मीटर पासून १०मीटरपर्यंत सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेनुसार ठेवली तरी चालते.
ढीग पद्धत: या पद्धतीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे विघटन जिवाणू हवेच्या सानिध्यात घडवून आणतात त्यास हवेष्णू विघटन म्हणतात. dhiगाची लांबी ४ मीटर तर रुंदी २ मीटर असावी. ढीग तयार करताना तो वरच्या बाजूस निमुळता असावा. ढिगाच्या वरच्या पृष्ठभागाची रुंदी पायापेक्षा ६० सें मी. कमी असावी. ही पद्धत जास्त पावसाच्या प्रदेशात वापरतात.
खड्डा आणि ढीग भरण्याची पद्धत सर्वप्रथम उपलब्ध सेंद्रिय पदार्थ, काडी- कचर्याचे शक्य तेवढे बारीक तुकडे करावेत
एका ड्रममध्ये पाणी घेऊन प्रती टन सेंद्रिय पदार्थांसाठी १०० किलो जनावरांचे शेण मिसळावे. यासाठी शेणकाला करताना शेण व पाणी १:५ प्रमाणात वापरावे. त्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन करणारे जिवाणू एक किलो प्रती टन सेंद्रिय पदार्थांसाठी याप्रमाणे मिसळावेत.
दुसऱ्या ड्रममध्ये २०० लीटर पाणी घेऊन प्रती टन सेंद्रिय पदार्थांसाठी ८ किलो युरिया व १० किलो सुपर फॉस्फेट मिसळावे.
% यानंतर खड्डा किंवा ढीग तयार करण्यासाठी सुरवात करावी. प्रथम १५ ते २० सें.मी. जाडीचा सेंद्रिय पदार्थांचा थर द्यावा.
युरिया आणि सुपर फॉस्फेटचे द्रा्ण शिंपडून नंतर जिवाणू मिश्रित शेणकाला थरावर सारख्या प्रमाणात टाकावा. व नंतर आवश्यकतेनुसार जादा पाणी टाकावे. अशा पद्धतीने थरावर थर देऊन खड्डा किंवा ढीग तयार करून मातीने झाकून घ्यावा. यामुळे खड््यातील पाण्याचे बाष्प उडून जाणार नाही.
साधारणपणे दीड ते दोन महिन्यांनी खडा उघडावा व धरामधील सेंद्रिय पदार्थ चांगले मिसळून घ्यावेत. त्या वेळी थोडे पाणी शिंपडावे व खड्डा पुन्हा चिखलमातीने बंद करावा.
१० अंश ते ६० अंश सेंग्रे. असावे. या पद्धतीने एक टन सेंद्रिय पदार्थांपासून ४ ते ४.५ महिन्यात उत्तम कंपोस्ट तयार होते. त्यात नत्र १ ते १.५ टक्के, स्फुरद 0.८५ टक्के व कर्ब : नत्र प्रमाण २०:१ टक्के असे राहते. कंपोस्ट खतास तपकिरी-काळसर रंग येतो व ते सहज कुस्करले जाते.
द्रवरूप जिवाणू खते – (Jaivik khat)
द्रवरूप जिवाणू खते ही फायदेशीर आहेत. कारण सध्या शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करीत आहेत. यामुळे द्रवरूप जिवाणू खते वापरल्यास शेतकऱ्यांना ती ठिबक सिंचनाद्वारे देणे फायदेशीर ठरते तसेच द्रवरूप जिवाणू खतांमध्ये जिवाणूंचे प्रमाण अधिक असल्याने ते स्थायुरुप जिवाणू खतांपेक्षा फायदेशीर ठरतात.
बीजप्रक्रिया : २५ मि.ली. किंवा २५ ग्रॅम प्रती किलो बियाणे
ठिबक सिंचन : २ लीटर प्रती एकर
पुनलगिवड (रोपे बुडविणे) : ५०० मि.ली. प्रती एकर
जमिनीत देण्यासाठी २ लीटर द्रवरूप जिवाणूखत ५० किलो शेणखतात मिसळून शेतामध्ये समप्रमाणात टाकावे.
जिवाणू खते – (Jaivik khat) वापरण्याच्या पद्धती
बीज प्रक्रिया : जिवाणू संवर्धक पाण्यामध्ये मिसळून बियाण्याला हळुवारपणे अशा पद्धतीने लावावे की, सर्व बियावर सारख्या प्रमाणात लेप बसेल व बियांचा पृष्ठभाग खराब होणार नाही किंवा बियाणे ओलसर करून घेऊन संवर्धन सारख्या प्रमाणात लावावे. जिवाणू संवर्धन लावलेले बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे आणि ताबडतोब पेरणी करावी.२)
गेषाच्या मुळावर अंतरीक्षीकरण – रोपाची ॥जण करता एकं बाढली पाण्यामध्ये जिवाणू संवर्धक टाकावे. असे मिश्रण चागले ढवळावे व रोपाची मुळे या मिश्रणात बुडवून लावण करावी. उदा. भात, मिरची, वांगी, टोमॅटो, कोबी.३) उसाच्या कांड्यावर अंतरीक्षीकरण : ५० लीटर पाण्यात अँसीटोबॅक्टर आणि पी. एस. बी. किंवा अझोस्थिरीलमची ६ ते ८ पाकिटे (१.५ ते २.० कि.) प्रत्येकी मिसळून द्रावण तयार करावे. उसाची लागण करतेवेळी तयार केलेले द्रावण बादलीमध्ये घ्यावे व उसाची कांडी बादलीतील द्रावणात बुडवून लगेच लावावी.
मृदा : काही कारणामुळे जिवाणू खत बियाण्याला प्रकिया करावयाची राहून गेल्यास पिशवीतील जिवाणूखत शेतात अंदाजे २० ते २५ किलो बारीक मातीमध्ये मिसळून हे मिश्रण पिकामध्ये हाताने टाकावे नंतर खुरप्याने जपीन हलवून पिकास पाणी द्यावे. २ लीटर द्रवरूप जिवाणूखत ५० किलो शेणखतात मिसळून शेतामध्ये समप्रमाणात देता येतात.
फळपिकास आळवणी : ५० ग्रॅम अँझोटोबॅक्टर अ ५० ग्रॅम पी.एस.बी. शेणाच्या स्लरीत अथवा शेणखतात मिसळून प्रत्येक झाडाला द्यावे.
ठिवक सिंचन : द्रवरुप जिवाणू खत २ लीटर प्रती एकर या प्रमाणात
जिवाणू संवर्धकाच्या बाटलीचे किंवा पाकिटाचे सूर्यप्रकाश व उष्णता यापासून संरक्षण करावे ते नेहमी सावलीत ठेवावे.
जिवाणू संवर्धन लावलेले बियाणे रासायनिक खतात किंवा इतर औषधामध्ये मिसळू नये.
बुरशीनाशक किंवा कीटकनाशक लावाक्याची असल्यास अगोदर अशी प्रक्रिया पूर्ण करून शेवटी जिवाणू खत लावावे.
ठिबक सिंचनाद्वारे द्रवरूप जिवाणू संवर्धके रासायनिक खतात किंवा इतर औषधामध्ये मिसळू नयेत.
स्थिर करणाऱ्या, स्फुरद विरघळविणाऱ्या व सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या जिवाणूंचा वापर शेतीसाठी केला तर कमी खर्चामध्ये जास्तीतजास्त उत्पादन घेता येईल.
व्यापारी पद्धतीने शेती करावयाची झाल्यास कमीतकमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन कोणकोणत्या बाबीमुळे येऊ शकते याचा अभ्यास केल्यावर हा एक बहुगुणी पर्याय आपल्या डोळ्यासमोर येतो. रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करताना आपली सुरुवातीची पावले जिवाणू संवर्धनाच्या- (Jaivik khat) वाटेवर पडली तर निश्चितच आपले पथक्रमण यशस्वी होईल, यात शंका नाही.
खुप सुंदर माहिती