इस्रो (ISRO) संस्था माहिती – (ISRO information in Marathi )

ISRO information in Marathi

इस्रो (ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्था – ISRO information in Marathi

ISRO ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे आणि त्याचे बेंगळुरू (कर्नाटक) या शहरात मुख्यालय आहे. 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापना झालेल्या ISRO ने पूर्वीच्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) या संस्थेची जागा घेतली. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.

भारतीय अंतराळा संशोधन संस्थे ची कार्य देशभरातील विविध केंद्रामधून संचलन होत असतात.

प्रत्येक मिशन ला लागणाऱ्या संवेदकांच विकास हा स्पेस अँप्लिकेशन सेंटर अहमदाबाद हुन होत असतो तर  सॅटेलाईट ची रचना, विकास, जुळणी आणि चाचपण्या ह्या बंगलोर  इथिल यु आर राव  उपग्रह केंद्रात केली जातात.

प्रक्षेपकांचा विकास हा  विक्रम साराभाई स्पेस केंद्र, तिरुवुनंतपुरंम इथे केला जातो तसेच सॅटेलाईट प्रक्षेपण  श्री हरिकोटा येथील सतीश धवन केंद्रातून केले जातात

बरीचशी महत्त्वाची प्रशासकीय कामे  व डेटा मॅनेजमेंट ची काम विविध हसन,भोपाळ आणि हैदराबाद हुन केली जातात.

इसरो  ने आज पर्यंत बरेच अंतराळ यंत्रणा विकसीत केल्या असून,सर्वात महत्त्वाची ही IMSAT प्रणालीचा भारतीय राष्ट्रीय उपग्रह यंत्रणा मुख्यता दुरसंचार, दूरदर्शन, प्रसारण,हवामानशास्त्र व नैसर्गिक आपत्ती बाबत पूर्व सूचना देण्याबाबत उपयोग होतो

संस्थेनी केलेली कार्ये – ISRO information in Marathi

19 एप्रिल 1975 रोजी भारताने सोवियत संघाच्या सहकार्य ने आपला ‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केला.

  1. 1980 साली पुर्णपणे स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञान वर आधारित SLV-3 प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला.
  2. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वीरित्या पार पडली
  3. ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात आणि खूप कमी खर्चात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.
  4. फेब्रुवारी 2017 मध्ये एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात प्रक्षेपक करीत रशियाचा 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढला.ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (GSLV) विकसित केले.
  5. सॅटलाइट सुचालन प्रणाली ‘गगन’ आणि क्षेत्रीय सुचालन उपग्रह प्रणाली ‘IRNSS’ विकसित केल्या गेल्या. काही देशांनी नाकारलेले व यानाला पुढे नेणारे अत्यावश्यक असलेले स्वदेशी ‘क्रायोजेनिक इंजन’  स्व तंत्रज्ञान वर तयार केले.

भारतीय प्रक्षेपक

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात ISRO ने भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम 1970 साली सुरू केले.प्रथम प्रक्षेपण वर्ष 1979 मध्ये झाले.

ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV) – ISRO चा शाश्वत प्रक्षेपक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘धृवीय उपग्रह प्रक्षेपक (PSLV)’ याचा जागतिक अंतराळ स्पर्धेत भारताला आघाडी मिळवून देण्यास मोलाचा वाटा आहे. PSLV हे ISRO चे अष्टपैलू प्रक्षेपण वाहक अग्निबाण आहे. PSLV कडून केल्या गेलेल्या प्रथम यशस्वी 36 प्रक्षेपणांनंतर, PSLV हे ISRO चे ‘वर्कहोर्स लाँच व्हेईकल’ म्हणून उदयास आले आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी खुले करण्यात आले. PSLV हे जगातल्या सर्वात विश्वसनीय प्रक्षेपकांपैकी एक आहे. PSLV-C37 ही PSLV-XL ची एक सुधारित संरचना आहे.

See also  २०२३ मधील मणिपूर नीट परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे NEET exam date 2023 postponed in Marathi

PSLV ची वैशिष्ठ्ये –

  • उंची- 44 मीटर
  • व्यास= 2.8 मीटर
  • स्टेज ची संख्या- 4
  • वाहून नेण्याची क्षमता- 320 टन (XL)
  • प्रकार- 3 (PSLV-G, PSLV – CA, PSLV – XL)
  • प्रथम उड्डाण-20 सप्टेंबर 1993

भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक (GSLV) – GSLV हे प्रामुख्याने पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत उपग्रहाच्या INSAT वर्गातल्या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याकरिता विकसित केले गेले. GSLV हे उपग्रहाच्या GSAT मालिकेच्या प्रक्षेपणासाठी वापरले जात आहे. GSLV मध्ये तीन टप्पे आहेत – घन इंधन वापरणारे रॉकेट मोटर स्टेज, अर्थ स्टोअरेबल लिकुइड स्टेज आणि क्रायोजेणीक स्टेज. या वाहनाची 49.13 मीटर उंची आहे. GSLV चे प्रथम उड्डाण 18 एप्रिल 2001 रोजी केले गेले होते.

2017 साली तयार करण्यात आलेले ‘जियोसिंक्रोनस सॅटलाइट लॉंच व्हेइकल मार्क-III’ (GSLV Mk-III) हे भारताने आतापर्यंत बनविलेले सर्वात उच्च तंत्रज्ञान असलेलं अग्निबाण आहे आणि हे सर्वाधिक वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. याला ‘फॅट बॉय’ असे टोपणनाव दिले गेले. त्याचे वजन जवळपास 640 टन आहे. हा अग्निबाण पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या परिभ्रमन कक्षेत 8 टन वजनापर्यंतचे अंतराळ केंद्र पोहोचवण्यास सक्षम आहे.

इस्रोने 2020 मध्ये प्रक्षेपित केलेले – अंतराळयान- ISRO information in Marathi

2020 साली इस्रोने एकूण तीन अंतराळयान खाली नमूद केल्याप्रमाणे प्रक्षेपित केले:

  1. जीसॅट-30 जी सॅट 30
  2. ईओएस-०१
  3. सीएमएस-01
  1. जीसॅट-30: 17 जानेवारी 2020रोजी फ्रेंच गयाना बाय एरियन-5 व्हीए-251 प्रक्षेपण वाहन द्वारे कौरू लाँच बेसवरून जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (जीटीओ) मध्ये लाँच केले. हा भारताचा दूरसंचार उपग्रह आहे आणि इन्सॅट-४ए अंतराळयान सेवांच्या जागी वाढीव कव्हरेज सह प्रक्षेपित करण्यात आला होता. सी आणि कु बँडमधील जिओस्टेशनरी कक्षेतून दळणवळण सेवा प्रदान करण्यासाठी हा उपग्रह उपयोगात येत आहे
  • लाँच मास: ३३५७ किलो
  • मिशन लाइफ: 15 वर्षांहून अधिक एरियन-5 व्हीए-251
  • उपग्रहाचा प्रकार: संवाद
  • उत्पादक: इस्रो
  • उपयोग : संचार दळवळ्न
  • ऑर्बिट प्रकार: जीएसओ
  1. ईओएस-01 : 7 नोव्हेंबर 2020 रोजी पीएसएलव्ही-सी49/ईओएस-01 प्रक्षेपण वाहनाद्वारे सतीश धवन अंतराळ केंद्र (एसडीएससी) एसएचएआर, श्रीहरीकोटा येथून ईओएस-01 ला अर्थ ऑर्बिटमध्ये (एलओई) यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. हा भारताचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे आणि कृषी, वनीकरण आणि आपत्ती व्यवस्थापन बाबतीत ह्याचा उपयोग होतो .
  • इस्रोने पृथ्वी निरीक्षण उपग्रह ईओएस-01 प्रक्षेपित केला
  • प्रक्षेपण वाहन: पीएसएलव्ही-सी 49/ईओएस-01
  • उपग्रहाचा प्रकार: पृथ्वी निरीक्षण
  • उत्पादक: इस्रो
  • उपयोग: आपत्ती व्यवस्थापन व पृथ्वी निरीक्षण
  • कक्ष प्रकार: एलआयओ

      3. सीएमएस-01:श्रीहरीकोटा सेंटर (एसडीएससी) एसएचआर, येथून सीएमएस-01 ला         जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये (जीटीओ) यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. हा भारताचा दळणवळण उपग्रह आहे ज्यात भारत, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटां करता सेवा देण्या करता उपयोग केला जातो.

  • मोहीम आयुष्य : 7 वर्षे
  • शक्ती: १५०० डब्ल्यू
  • प्रक्षेपण वाहन: पीएसएलव्ही-सी50/सीएमएस-01
  • उपग्रहाचा प्रकार: संवाद
  • उत्पादक: इस्रो
  • उपयोग: संचार दळणवळण
  • ऑर्बिट प्रकार: जीएसओ

इस्रो ने येत्या काही वर्षांत इस्रोच्या नियोजित केलेल्या काही मोहिमा- ISRO information in Marathi

१ चांद्रयान-३:

ही मोहीम २०२१ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि चांद्रयान-२ मोहिमे ची ही पुढची स्टेप असून,हे मिशन चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल, इस्रोच्या मते चांद्रयान-3 मोहिमेची एकूण किंमत 600 कोटींपेक्षा ही जास्त असेल

See also  ट्रेडिंग अणि इन्वहेस्टटींग मधील फरक- Difference between Trading and investing in Marathi

२ गगनयान:

२०२१ मध्ये ही मोहीम भारताची पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे,गगनयान तीन भारतीय अंतराळवीरांना पाच ते सात दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (२,००० किमी) घेऊन जाणार आहे.

हे अंतराळयान संयुक्तपणे इस्रो आणि HUL बनवले आहे. 12 संभाव्य अंतराळवीरांची रशियात प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.

3 ल्युपेक्स:

 इस्रोचे चंद्र ध्रुवीय अन्वेषण मोहीम जेएएक्सए (जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी) यांच्या मदतीने 2024 मध्ये आरंभ केले जाईल.,भविष्यात चंद्राच्या भूभागवर असलेल्या पाण्याच्या प्रमाण आणि प्रकारांशी संबंधित वास्तविक माहिती मिळवणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट असणार आहे.

आदित्य-एल १:

ही भारताचे पहिले सौर मोहीम आखण्यात आलेली आहे आणि २०२० मध्ये आरंभ होण्याची अपेक्षा होती परंतु COVID -१९ साथीच्या रोगामुळे हे प्रक्षेपण लांबणीवर पडले आहे आणि आता २०२२ मध्ये च कदाचित पुन्हा मोहीम सुरू होवू शकते. या मोहिमे अंतर्गत अदृश्य मानल्या जाईल आणि आयआर बँडच्या जवळ सौर कोरोनाचा अभ्यास करणे आहे.आदित्य एल १: इस्रोच्या पहिल्या सौर मोहिमेबद्दल सर्व काही जाणून घ्या

५- रिसॅट-१ए:

२०२१ मध्ये ही मोहीम इस्रोद्वारे सुरू होण्याची अपेक्षा आहे. हा रडार-इमेजिंग उपग्रह आहे आणि रिसॅट-1 उपग्रहसारखाच असणार आहे -मातीच्या आर्द्रते बद्दल  भूप्रदेश मॅपिंग आणि जमीन, समुद्र आणि पाण्याच्या पृष्ठभागाचे विश्लेषण करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे .

६- निसार:

3 वर्ष कालावधी असलेली ही मोहीम २०२२ मध्ये नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार (निसार) नासाच्या (यूएस स्पेस एजन्सी) मदतीने इस्रोद्वारे आखण्यात आलेली आहे. ह्या मोहिमेत जागतिक पर्यावरणीय बदल आणि नैसर्गिक आपत्तींचा अभ्यास करण्यात येणार  आहे आणि हा पहिला ड्युअल-बँड (एल आणि एस) रडार इमेजिंग उपग्रह असणार आहे .

ह्या मोहिमेतील निसार उपग्रह हा जगातील आजवरचा सर्वात महागडा पृथ्वी-इमेजिंग उपग्रह असनर असून असून त्याची किंमत १.५ अब्ज डॉलर संभावित आहे.

७.मंगळयान-२:

इस्रोने मंगळावर आखलेली  ही भारताची दुसरी आंतरग्रहीय मोहीम आहे.मंगळयान २ ज्याला मार्स ऑर्बिटर मिशन २ (एमओएम २)  असेही म्हणतात ते २०२४ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

यात ऑर्बिटर असेल आणि त्यात लँडर आणि रोव्हर समाविष्ट करू शकतात

८- शुक्रयान-१:

2025 मध्ये इस्रो ही आंतरग्रहीय मोहीम सीएनईएस (नॅशनल सेंटर फॉर स्पेस स्टडीज) यांच्या सहकार्याने सुरू करणे अपेक्षित आहे ह्यात मुख्यत शुक्र ग्रहाच्या वातावरणाचा अभ्यास करणे प्रस्तावित आहे -.इस्रो ,फ्रेंच स्पेस एजन्सीच्या सहकार्याने  2025 मध्ये आपले व्हीनस मिशन सुरू करणार आहे

इस्रो अंतराळ यान यादी – ISRO information in Marathi

  1. Aryabhata      April 19, 1975
  2. Bhaskara-I   June 7, 1979
  3. Rohini Technology Payload (RTP)    August 10, 1979-Launch Unsuccessful
  4. Rohini Satellite RS-1    July 18, 1980
  5. Rohini Satellite RS-D1 May 31, 1981
  6. APPLE        June 19, 1981
  7. Bhaskara-II    November 20, 1981
  8. INSAT-1A     April 10, 1982-Launch Unsuccessful
  9. Rohini Satellite RS-D2 April 17, 1983
  10. INSAT-1B      August 30, 1983
  11. SROSS-1     March 24, 1987-Launch Unsuccessful
  12. IRS-1A       March 17, 1988
  13. SROSS-2     July 13, 1988-Launch Unsuccessful
  14. INSAT-1C     July 22, 1988-Launch Unsuccessful
  15. INSAT-1D     June 12, 1990
  16. IRS-1B       August 29, 1991
  17. SROSS-C     May 20, 1992
  18. INSAT-2A     July 10, 1992
  19. INSAT-2B     July 23, 1993
  20. IRS-1E       September 20, 1993-Launch Unsuccessful
  21. SROSS-C2   May 4, 1994
  22. IRS-P2       October 15, 1994
  23. INSAT-2C     December 7, 1995
  24. IRS-1C       December 28, 1995
  25. IRS-P3       March 21, 1996
  26. INSAT-2D     June 4, 1997-Launch Unsuccessful
  27. IRS-1D       September 29, 1997
  28. INSAT-2E     April 3, 1999
  29. Oceansat(IRS-P4)       May 26, 1999
  30. INSAT-3B    March 22, 2000
  31. GSAT-1      April 18, 2001
  32. The Technology Experiment Satellite (TES)       October 22, 2001
  33. INSAT-3C     January 24, 2002
  34. KALPANA-1       September 12, 2002
  35. INSAT-3A     April 10, 2003
  36. GSAT-2       May 8, 2003
  37. INSAT-3E     September 28, 2003
  38. IRS-P6 / RESOURCESAT-1   October 17, 2003
  39. EDUSAT      September 20, 2004
  40. HAMSAT     May 5, 2005
  41. CARTOSAT-1     May 5, 2005
  42. INSAT-4A     December 22, 2005
  43. INSAT-4C     July 10, 2006-Launch Unsuccessful
  44. SRE-1        January 10, 2007
  45. CARTOSAT-2     January 10, 2007
  46. INSAT-4B     March 12, 2007
  47. INSAT-4CR         September 2, 2007
  48. CARTOSAT – 2A April 28, 2008
  49. IMS-1        April 28, 2008
  50. Chandrayaan-1    October 22, 2008
  51. RISAT-2      April 20, 2009
  52. Oceansat-2   September 23, 2009
  53. GSAT-4       April 15, 2010-Launch Unsuccessful
  54. CARTOSAT-2B    July 12, 2010
  55. GSAT-5P     December 25, 2010-Launch Unsuccessful
  56. YOUTHSAT       April 20, 2011
  57. RESOURCESAT-2      April 20, 2011
  58. GSAT-8       May 21, 2011
  59. GSAT-12     July 15, 2011
  60. Megha-Tropiques October 12, 2011
  61. RISAT-1      April 26, 2012
  62. GSAT-10     September 29, 2012
  63. SARAL     February 25, 2013
  64. IRNSS-1A July 1, 2013
  65. INSAT-3D   July 26, 2013
  66. GSAT-7     August 30, 2013
  67. Mars Orbiter Mission Spacecraft     November 5, 2013
  68. GSAT-14   January 5, 2014
  69. IRNSS-1B April 4, 2014
  70. IRNSS-1C October 16, 2014
  71. GSAT-16   December 7, 2014
  72. Crew module Atmospheric Re-entry Experiment (CARE) December 18, 2014
  73. IRNSS-1D March 28, 2015
  74. GSAT-6     August 27, 2015
  75. Astrosat    September 28, 2015
  76. GSAT-15   November 11, 2015
  77. IRNSS-1E January 20, 2016
  78. IRNSS-1F   March 10, 2016
  79. IRNSS-1G April 28, 2016
  80. CARTOSAT-2 Series Satellite June 22, 2016
  81. INSAT-3DR       September 8, 2016
  82. SCATSAT-1       September 26, 2016
  83. GSAT-18   October 6, 2016
  84. RESOURCESAT-2A     December 7, 2016
  85. INS-1B     February 15, 2017
  86. INS-1A     February 15, 2017
  87. Cartosat -2 Series Satellite    February 15, 2017
  88. GSAT-9     May 5, 2017
  89. GSAT-19   June 5, 2017
  90. Cartosat-2 Series Satellite     June 23, 2017
  91. GSAT-17   June 29, 2017
  92. IRNSS-1H August 31, 2017-Launch Unsuccessful
  93. INS-1C     January 12, 2018
  94. Cartosat-2 Series Satellite     January 12, 2018
  95. Microsat    January 12, 2018
  96. GSAT-6A   March 29, 2018
  97. IRNSS-1I   April 12, 2018
  98. GSAT-29   November 14, 2018
  99. HysIS       November 29, 2018
  100. GSAT-11 Mission December 5, 2018
  101. GSAT-7A   December 19, 2018
  102. Microsat-R January 24, 2019
  103. GSAT-31   February 6, 2019
  104. EMISAT    April 1, 2019
  105. RISAT-2B   May 22, 2019
  106. Chandrayaan2     July 22, 2019
  107. Cartosat-3 November 27, 2019
  108. RISAT-2BR1      December 11, 2019
  109. GSAT-30   January 17, 2020
  110. EOS-01     November 7, 2020
  111. CMS-01    December 17, 2020
See also  फ्रेंडशीप डे संदेश,कोटस,शुभेच्छा- Friendship day messages,quotes and wishes


Check more- ISRO information in Marathi