सात बारा – शेतजमीन मोजणी व NA -7/12 information in Marathi
लेखक… सतीश मुकुंद जोशी. ७, अमृतसिद्धी अपार्टमेंट, सिंहगड रस्ता, हिंगणे खुर्द, पुणे ४१००५१-शा. 9921227763
सात बारा माहिती – ? (7/12 information in Marathi)
सात बारा चा उतारा आपणा सर्वांनाच माहीत आहे,पण तो कसा पाहावा, त्यात काय काय असते व त्याला किती महत्त्व द्यावे याबद्दलची माहिती मात्र आपल्याला नसते. या पुस्तिकेत याविषयाची माहिती करून दिली आहे. सुरुवातीला हा उतारा कसा तयार झाला, हे आपण पाहू. सात बाराच्या उताऱ्याचा इतिहास पाहिल्यानंतर आता प्रत्यक्ष या उताऱ्यात नेमके काय काय लिहिलेले असते, याची माहीती घेऊ.
सात बारा (7/12) इतिहास
- भारतावर इंग्रजांचे राज्य असताना इंग्लंडमध्ये अस्तित्वात असलेली महसूल पद्धती इंग्रजांनी थोडाफार बदल करून
- भारतात सुरू केली. महाराष्ट्रात जमीनदारी पद्धत राबवणे सर्वदूर शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन शक्य तेथे रयतवारी पद्धतीच चालू ठेवली. त्यासाठी इंग्रजांनी भारतातील व महाराष्ट्रातील बहुतेक जमिनींचा जमाबंदी केली.
- जमीन मोजणे, जमिनीचे नकाशे तयार करणे, जमिनीच्या हद्द निशाण्या बसवणे, जमिनीच्या मगदुराप्रमाणे जमिनीची सुपीकता लक्षात घेऊन जमिनीचा कर/धारा निश्चित करणे यास जमाबंदी म्हणतात. दर ३० वर्षांनी जमाबंदी करण्याची कायदेशीर तरतूद केली.
- जमाबंदीच्या वेळी जमिनीचे मूळ कागद प्रत्येक गावासाठी तयार करण्यात येतात. या कागदाच्या प्रती मोजणी खात्याकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक तलाठ्याकडे पाठवल्या जातात.
- मोजणी खात्याचा जिल्हा पातळीवरील अधिकारी ‘जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख’ आहे त्यांचेकडे जमाबंदी केलेल्या जमिनीचे मूळ कागद असतात. सात बारा उतारा ज्या मूळ कागदांचा आधार घेऊन तयार केला जातो, ते मूळ कागद म्हणजे –
- शेतवार पत्रक (सूडपत्रक, कडई पत्रक)
- गाव नकाशा
- गट बूक. या कागदपत्रांवरून सात बाराचा उतारातयार झालेला आहे.
- १८९७ मध्ये तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने दुष्काळ आयोग (फॅमिन कमिशन) नेमला होता. त्या काळी शेतजमिनी या आकाराने मोठ्या होत्या. त्यामुळे अशा मोठ्या शेतजमिनीचे तुकडे पडू नयेत, अशी अपेक्षा होती.
- परंतु हिंदू, मुस्लिम व सर्व धर्मांच्या व्यक्तिगत कायद्यांप्रमाणे वारसाहक्क निर्माण होऊन मोठ्या शेतजमिनीचे तुकडे पडू लागले.
- शेतजमिनीची वाटणी (पार्टिशन), प्रत्येक व्यक्तीची आणेवारी, याबाबत तंटे बाढू लागले आणि जमिनीच्या हक््कांमधील फेरफाराची प्रकरणे वाढू लागली.
- याबाबत १९०३ मध्ये पहिला कायदा केला गेला. त्यामध्ये बदल केले गेले, नवीन कायदे केले. शेवटी महाराष्ट्र शासनाने सध्याचा महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ संमत केला.
- त्या आधीच्या मुंबई जमीन महसूल संहिता १८७९ हा कायदा १९६५ पर्यंत मुंबई राज्यात अस्तित्वात होता.
- याच कायद्याअंतर्गत सध्या शेतजमिनीच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणी पुस्तके (रजिस्टर) ठेवलेली आहेत.
- त्यात प्रामुख्याने शेतजमिनीचे हक्क ब पिकांचे रजिस्टर, कुळांबाबतचे रजिस्टर ब मालकी हकक्कांबाबतचे रजिस्टर इत्यादींचा समावेश होतो.
- याच बरोबरीने २१ वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने (व्हिलेज फॉर्म) ठेवलेले असतात. यापैकीच गावचा नमुना ७, ७ अ, आणि १२ चा मिळून सात बाराचा उतारा बनतो.
सात बारा (7/12) चा म्हणजे काय?
सात बाराचा उतारा म्हणजे जमिनीची इत्यंबूत माहिती . आपण सात बाराचा उतारा वाचला तर प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, जमिनीबाबतचा सर्व तपशील, दुवे , लहान सहान माहिती आपणास कळू शकतो. सात बाराच्या उताऱ्यावरून आपणास
- जमिनीचा भूमापन क्रमांक,
- गावाचे नाव,
- जमिनीचे क्षेत्रफळ,
- जमिनीचा भूतकाळ
- वर्तमानकाळातील मालकी याविषयची माहिती मिळू शकते.
प्रत्येक गावचा तलाठी गाबातील सर्व जमिनींच्या संदर्भात वेगवेगळ्या नोंदणी वह्या ठेवत असतो. या नोंदणी वह्यांना (रजिस्टर) वेगवेगळे अनुक्रमांक दिलेले आहेत. यालाच ‘गाव नमुना’ असे संबोधतात .
असा गावचा नमुना नंबर ७ आणि गावचा नमुना नंबर १२ हे एकत्र करून त्यातील माहिती सात बाराच्या रूपात दिली .जाते. सबब सात बाराचा उतारा म्हणजे गाव नमुना नंबर ७ न १२ यामधील उतारा (एक्स्ट्रॅकट) असतो. म्हणून त्याला ७/१२चा उतारा म्हणतात.
याचबरोबरीने सात बारा उताऱ्यात गावचा नमुना नंबर ७ अ मधील माहितीही समाविष्ट असते.
कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कांचा इतिहास तपासून पाहायचा असेल तर आजच्या दिनांकापासून सात बाराचा उताण ब फेरफार उतार््यापासून सुरुवात करावी.
ही तपासणी करीत मागे जावे. या तपासणीची अखेर शेतवार पत्रक म्हणजे सूडपत्रक वा कडई पत्रकापर्यंत मालकी हक्काचा शोध घेऊनच संपते. हा महसुली दस्तेबजाचा शोध घेणे होय.
७/१२ म्हणजे हक्क नोंद ब पीक पाहणी पत्रकजमीन आणि महसुलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक तलाठ्याला जे वेगवेगळे ‘गावनमुने’ ठेवावे लागतात, त्यापैकीच ७/१२ उतारा हे दोन गाब नमुने आहेत. ७ ब १२ हे दोन मुख्य भाग (नमुने) एकाच कागदावर असतात म्हणून त्याला ‘सात बारा’ म्हणतात.
गाव नमुना सात (७) हे हक्क (अधिकार) पत्रक’ आहे, तर गाव नमुना बारा (१२) हे ‘पीक पाहणी पत्रक’ आहे.
‘७ अ’
याच उताऱ्यामध्ये ‘७ अ’ नमुन्याचा सुद्धा समावेश असतो. हा नमुना कुळवहिवाटीची माहिती देतो.
प्रत्येक जमीनमालकास किंबा भूधारकास स्वत:कडे असलेली जमीन किती आणि कोणती हे दाखविणारा सात बारा हा एक कागद आहे. जमिनीची मालकी, कब्जा वहिबाट, वा अन्य अधिकार हा उतारा दाखवितो. या उताऱ्याप्रमाणे जमिनीवरील भोगवट्यास पोलीस ब महसूल खात्याकडून संरक्षण मिळते. नेहमी उपयोगी पडणारा हा उतारा असल्याने प्रत्येक जमीनमालकासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो.
आता सात बारा उताऱ्यातील दोन्ही भागांची (नमुन्यांची) सविस्तर माहिती आपण घेऊ -7/12 information in Marathi-
१) गाव नमुना सात (हक्क अधिकार पत्रक)-या भागामध्ये (नमुन्यामध्ये) गावाचे व तालुक्याचे नाव पत्रकाच्या बर दिलेले असते.
अ) उताऱ्याच्या डाव्या बाजूस जमिनीची भूमापन/सर्व्ह/गट नंबर व हिस्सानंबर दाखविलेला असतो.
भूमापन क्रमांक
सरकारने प्रत्येक गावातील जमिनींना अथवा जमिनीच्या गटाला एक नंबर दिलेला आहे, त्यालाच भूमापन क्रमांक किंवा सर्व्हे नंबर किंवा गट नंबर म्हणतात.
तसेच त्या भूमापन क्रमांकातील सदरील जमिनीचा हिस्सा कितवा आहे, हे हिस्सा नंबरमध्ये दाखविलेले असते.
त्याच जवळच जमीन ज्या ज्या प्रकारांनी धारण केलेली असते, तो धारणाप्रकार किंवा भू धारण पद्धती दाखविलेली असते. सदरची जमीन संबंधित व्यक्तीकडे कशी आली, त्यालाच धारणाप्रकार किंवा भू धारण पद्धती असे म्हणतात.
क) खालसा – किंबा यालाच ‘भोगवटादार वर्ग १’ असेही म्हणतात. याचा अर्थ ही जमीन पूर्वापार वंशपरंपरेने चालत
आलेली, ‘मालकी’ हक्क असलेली स्वत:ची जमीन आहे.
ख) भोगवटादार वर्ग २ – सरकारने भूमिहीनांना किंबा अल्प भू धारकांना कसण्यासाठी दिलेल्या जमिनी या प्रकारात
मोडतात. जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली तरच अशा जमिनींचे हस्तांतरण, बिक्री, भाडेपट्टा, गहाण, दान या पद्धतीने करता
येते. याआधी आपण शिकलेल्या गाव नमुना एक-क मध्ये वर्ग-२ मध्ये सामाविष्ट केलेल्या जमिनीची यादी मिळते.
ग) सरकारने भाडेपट्ट्याने बा विशिष्ट शर्ती अर्टीबर विशिष्ट कामांसाठी, विशिष्ट मुदतीसाठी दिलेली भू धारण पद्धती ३ मध्ये मोडते.
दुमाला
ज्या शर्ती अटींबर जमीन दिली असेल त्या शर्ती अटींचा भंग झाल्यास शासन अशा जमिनी काढून घेते. या ‘इनाम किंवा वतन’ वर्गातल्या जमिनी असतात. त्याला ‘दुमाला’ असेही म्हणतात.
दुमाला किंवा इनाम जमिनींचे पश्चिम महाराष्ट्रात तीन वर्ग (वर्ग १ – सरंजाम इनाम, वर्ग ३ देवस्थान इनाम आणि वर्ग ७ – संकीर्ण) आहेत.
विदर्भ ब मराठवाड्यात दुमाला जमिनींचा वर्ग ७ (संकीर्ण) हा एकच वर्ग अस्तित्वात आहे. संकीर्ण म्हणजे महसूल माफीच्या जमिनी.
अशा जमिनी शाळा महाबिद्यालये, हॉस्पिटल किंबा काही धार्मिक वा दानधर्म करणाऱ्या संस्थांना दिलेल्या असतात. मात्र दिलेल्या कारणाकरता जमिनीचा वापर झाला नाही तर ती जमीन सरकार परत घेते. देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनी बहिवाटदाराव्यतिरिक्त इतर कोणाच्या नावे होत नाहीत. थोडक्यात ”या जमिनी हस्तांतरणीय नाहीत.”
भूमापन क्रमांकाचे स्थानिक नाव या रकान्यात शेतकऱ्याने आपल्या जमिनीला नाव दिलेले असल्यास (उदा.आंब्याचे वावर/खाचर) त्याचा उल्लेख असतो. जमिनीचा भूमापन क्रमांक लक्षात राहिला नाही तर जमीन मालकाने दिलेले स्थानिक नाब तलाठी ब शेतकरी दोघांच्या दृष्टीने सोयीचे ठरते.
त्याखालील कलमात जमिनीचे *नागवडीचे योग्य क्षेत्र एकर/हेक्टर व गुंठे/आरमध्ये दाखविलेले असते. यात जिरायत, बागायत व भातशेतीचे क्षेत्र किती याची एकूण नोंद असते.
त्याखाली ‘पोटर्बराखा’ (लागवडीस पूर्णत: अयोग्य अशी जमीन) क्षेत्र दाखविलेले असते. यातही दोन प्रकार आहेत.
- बर्ग अ’ मध्ये शेतातील बांध, नाले, खंदक, खाणी इत्यादींची नोंद येते, तर “
- वर्ग ब’ मध्ये रस्ते, कालवे, तलाव इत्यादी काही विशिष्ट कामांसाठी राखून ठेवलेल्या जमिनीची नोंद असते.
संपूर्ण माहिती वाचण्या करिता कृपया -esahitya ह्या संकेत स्थळा वर जावून शेतजमीन मोजणी व NA-लेखक. सतीश मुकुंद जोशी. हे पुस्तक downlaod करावे
ऑनलाइन सात बारा कढण देखील सोप झाले असून , आपण घरी बसल्या सहजच एका क्लिक वर 7/12 extract संगणका वरून काढू शकता.
खालील लेख वाचून आपण सहजच ऑनलाइन सात बारा उतारा काढू शकता.
वडिलोपार्जित शेती जमीन संपत्ति मध्ये मुलाचा वारस हक्क.