ज्वारीच्या आहाराचे 15 फायदे -Health Benefits of Jowar in marathi

ज्वारीची पौष्टिकता -Amazing health benefits of jowar in marathi

  • ज्वारी पिकाची लागवड आणि उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.त्यामुळे ज्वारी धान्याची पौष्टिकता इतर तृणधान्याच्या मानाने कशी आहे हे तुलनात्मकदृष्ट्या पाहणे गरजेचे आहे.
  • ज्वारीची भाकरी गोडसर चवीची,चांगल्या टिकवण क्षमतेची, आकर्षक पांढऱ्या रंगाची असते.
  • ज्वारीच्या भाकरी तील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक (रेझिस्टंट स्टार्च) शर्करा आणि खनिज द्रव्ये अधिकतम प्रमाणात आढळतात.
  • ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत अनेक भौतिक, रासायनिक आणि प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबीवरती अवलंबून असते. आपल्याकडे प्रामुख्याने ज्वारीचा उपयोग ज्वारीची भाकरी म्हणूनच मोठ्या प्रमाणावर करतात.

तथापि काही वाणांचा उपयोग इतर अनेक खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी केला जाते.

इतर तृणधान्यांप्रमाणे उदाहरणार्थ गहू किंवा तांदूळ याप्रमाणे ज्वारीपासून त्याचे पीठ किंवा सुजी तसेच त्यावर प्रक्रिया करून इतर पदार्थ तयार करण्याचे उद्योग उपलब्ध नसल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला नाही.

ज्वारीची पौष्टिकता

  •  इतर तृणधान्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली आणि अधिक प्रमाणात आहे.
  • ज्वारीमध्ये असणाऱ्या खनिज पदार्थाचे आणि तंतुमय पदार्थाचे प्रमाण अधिक असून त्यांचा उपयोग मधुमेह आणि शरीराची जाडी कमी करण्यासाठी होतो.
  • तसेच ज्वारीमध्ये असणाऱ्या स्टार्चचे विघटन हळुवारपणे होते. त्यामुळे मानवाचे बरेचसे आजार कमी करण्यासाठी ज्वारीचा वापर होऊ शकतो. हा नवीन विचार खेडोपाडी आणि शहरी भागांतील लोकांना पटू लागल्यामुळे ज्वारीचा वापर खाद्यान्न म्हणून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.
  • ज्वारीमध्ये ग्लुटेन नावाचे प्रथिने नसते, त्यामुळे ज्वारीच्या पिठाच्या कणकीचे एकसंघ चिवट गोळे तयार होत नाहीत. यामुळे त्यापासून गव्हासारखी चपाती तयार करता येत नाही.
  • परतु अशाप्रकारच्या (ज्वारीच्या) पिठाचा वापर मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी करता येतो आणि असे पदार्थ विविध प्रकारचे आजार बरे करण्यासाठी वापरता येतात.
  • तसेच ज्या लोकांना ग्लुटेनची ऑलर्जी आहे, त्यांना प्रमुख खाद्यान्ञ पदार्थ म्हणून उपयोगात  आणता येतात. या व्यतिरिक्त ज्वारीपासून थायामिन, रिबोफलेव्हीन नायासिन ही जीवनसत्त्वे आणि ऊर्जा अधिक प्रमाणात मिळते.
  • तसेच कॅल्झियम, स्फुरद, लोह अशा प्रकारची खनिजद्रव्ये मिळतात
  • ज्वारीमध्ये अधिक तंतुमय घटक पदार्थ, भरपूर रेझिस्टंट स्टार्च, अनेक प्रकारची फायटोकेमिकल्स, न्युट्रसुटिकल्स गुणधर्म असल्यामुळे आपल्याला त्यापासून लो-कॅलरीज अन्नपदार्थ तयार करता येतात
  • ज्वारीची पौष्टिकता वाढविण्यासाठी मिश्रित अन्नधान्याचा आटा/ मैदा तयार करण्याचे काही प्रमाणात प्र्त्न करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी (५0-६० टक्के) गहू, तांदूळ, मका, रागी, बाजरी, सोयाबीन, शेंगदाणा पीठ, मूगडाळ यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
  • या मिश्रित पिठापासून उत्कृष्ट प्रतीची भाकरी/ रोटी तयार कर्ता येते.
  • मिश्रित धान्याच्या पिठापासून तवार करण्यात आलेल्या भाकरीची चव अतिशय उत्कृष्ट असून तिची पौष्टिकता सुद्धा वाढविली जाते तसेच प्रथिनांची उपलब्धता वाढते.
  • अशा प्रकारच्या विविध अन्नधान्य मिश्रित पिठा मार्फत आपण संतुलित आहार निर्माण करू शकतो.
  • अशा पौष्टिक संतुलित आहाराचा वापर आपण आपल्या देशातील कुपोषण आणि त्यामुळे निर्माण होणारे आजार घालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात करू शकतो.
  • शाळेतील मुलांना पौष्टिक आणि सर्व अन्न घटकांचे संतुलन असणारा आहार दुपारचे जेवण म्हणून देऊ शकतो.
  • ज्वारी या तृणधान्याचा उपयोग खाद्यान्न म्हणून केल्यास त्यापासून मानवी शरीरास होणारे फायदे पुढील प्रमाणे आहेत.
See also  हिमोग्लोबिन शरीरातील महत्व - Hemoglobin Importance Marathi Information

ज्वारीच्या आहाराचे 10 फायदे –amazing health benefits of jowar in marathi

  1. ग्लुटेन नसलेल्या पदार्थाची निर्मिती ज्वारीच्या पिठापासून करून मानवास खाद्य अन्नपदार्थ म्हणून उपलब्ध होते.
  2. ज्वारीच्या आहारामुळे सेलिक आजार कमी केले जातात.त्वचेचे होणारे आजार कमी करण्यासाठी ज्वारी खाद्य अन्नपदार्थाचा उपयोग होतो.
  3. मानवी पचन संस्थेतील जठरा मधील आम्लता कमी करण्यासाठी ज्वारीच्या खाद्य अन्नपदार्थाचा उपयोग होतो.
  4. ज्वारीचे अन्न मऊ आणि मुलायम असते.ज्वारीचे खाद्यात्र पचनास हलके आणि सुलभ असते.
  5. ज्वारीच्या खाद्यान्न पदार्थामुळे कोणत्याही प्रकारची अलर्जी निर्माण डोल नाही.
  6. ज्वारीचे खाद्यान्न संपूर्णपणे पचविले जाते.ज्वारीच्या खाद्यान्न पदार्था मार्फत डायटरी फायबर भरपूर प्रमाणात शरीरास उपलब्ध करून दिले जातात.
  7. ज्वारीच्या पदार्थांपासून खनिज पदार्थ आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात.
  8. कॅन्सरसारखे रोग रोखण्यासाठी अन्टी ऑक्सिइन्ट्स ज्वारीच्या खाद्यात्र पदार्थांपासून भरपूर प्रमाणात मिळतात.
  9. शौचास साफ होण्यासाठी माल्टेड ज्वारीपासून तयार केलेले पेय अतिशय उपयुक्‍त ठरत आहे.
  10. हृदय विकार, रक्‍तदाब व इतर आजार आटोक्यात ठेवण्यासाठी मानवी आहारात तंतुमय पदार्थाचे योग्य प्रमाण पुरविण्यासाठी ज्वारीच्या अन्नपदार्थांचा उपयोग होतो.
  11. काही ठरावीक ज्वारीचे वाण मानवास आवश्यक असणारे लायसिनअमिनो आम्ल योग्य प्रमाणात पुरवितात.
  12. कावीळ झालेल्या व्यक्तीस ज्वारीचा आहार अतिशय उपयुक्‍त ठरतो.ज्वारीच्या आहारामुळे मानवी आहारातील ग्लायसिमिक्स निर्देशांक कपी ठेवण्यास मदत होते.
  13. पानवाचा लठ्ठपणा कमी करण्यास आणि तो नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्वारीच्या आहाराचा उपयोग होतो.
  14. मानवी पचनसंस्थेतील इन्सुलिनची कार्यक्षमता आणि उत्पादकता कायम आणि सुयोग्य प्रमाणात राहण्यासाठी ज्वारीच्या खाद्यान्नाचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो.
  15. मधुमेहाचे नियंत्रण करण्यासाठी ज्वारीच्या आहाराचा सतत वापर करणे फायदेशीर ठरतो.
  16. हृदयाचे विविध विकार कमी करण्यासाठी ज्वारीच्या खाद्यान्नाचा उपयोग प्रभावीपणे होतो.
  17. मानवी शरीरातील रक्‍त वाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारीच्या आहाराचा उपयोग होतो.
  18. ज्वारीच्या खाद्यान्नामुळे भूक लगेच किंवा वारंवार लागत नाही पोट भरलेले राहते.
  19. महिलांमधील पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोमचा आजार कमी करण्यासाठी ज्वारीच्या खाद्यपदार्थांचा उपयोग होतो,
  20. ज्वारीच्या आहारामुळे पोटातील आम्ल आणि अल्कली यांचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत होते.
  21. ज्वारीच्या अज्नामुळे पोटाचे सर्व आजार रोखण्यास मदत होते.
  22. ज्वारीच्या आहारामुळे बद्धकोछता नष्ट होण्यास मदत होते.
  23. दूध भाकरीचा आहार बालकांना आणि वयस्कर व्यक्‍तींना दिला जातो. याचे कारण त्यांच्या आतड्यांना जास्त ताण न होता हे अन्न पचविले जाते आणि शरीरास आवश्यक असणारी अन्न द्रव्ये आणि ऊर्जा सुलभतेने पुरविली जातात.
  24. आजारी व्यक्‍तीला किंवा लहान ब्रालकास ज्वारीच्या भाकरी दुधाची रबडीचा आहार द्यावा, असा सल्ला डॉक्टर देतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा आहार फ्चनास सुलभ असून त्यापासून पचनाचे कोणतेही प्रश्‍न निर्माण होत नसून त्यापासून त्वरित ऊर्जा शरीरास पुरविली जाते.
See also  रोपवाटिका - Seedling plant nursery and license

 

आरोग्यासाठी भुईमूग – Health benefits of in Groundnut

httzing health benefits of jowar in marathi

trueFOOD™ 100% Natural Jawar Sorghum Whole | Cholam | Jonna | (1.8 KG)

आरोग्यासाठी भुईमूग – Health benefits of in Groundnut