रोबोटिक्स म्हणजे काय? Robotics basic information Marathi

रोबोट माहिती

आज पाहायला गेले तर प्रत्येक विदयार्थी आपल्या करिअरच्या बाबतीत अत्यंत चिंतित असताना आपणास दिसुन येते.आणि आता एकविसावे शतक लागले आहे ज्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खुप प्रगती होताना आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळते आहे.

याचमुळे रोबोटिक्स सायन्स तसेच इंजिनिअरींग ह्या नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्राला उत्तम करिअरच्या दृष्टीने खुप वाव मिळताना आपणास दिसुन येते आहे.

कारण ह्या क्षेत्रात आपल्याला दिर्घकाळ करिअरची संधी आणि एक चांगले वेतन देखील उपलब्ध होत आहे आणि भविष्यात ह्या क्षेत्राला अधिक जास्त मागणी देखील वाढणार आहे.

म्हणुन आजच्या लेखात आपण रोबोटिक्स मुलांकरिता एक खात्रीचे नवीन करिअर क्षेत्र ह्या विषयावर माहीती जाणुन घेणार आहोत त्या पूर्वी थोडी मूलभूत माहिती – Robotics basic information Marathi  पाहुयात

रोबोटिक्स म्हणजे काय?

रोबोट विषयीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे अध्ययन करणे ह्यालाच रोबोटिक्स असे म्हटले जाते.

रोबोटिक्स इंजिनिअरींग हे एक असे अध्ययन क्षेत्र आहे ज्यात आपण रोबोटची रचना कशी केली जाते?त्याची निर्मिती कशी होते?त्याला आँपरेट कसे केले जाते?इत्यादींचा अभ्यास करत असतो.

ही एक अशी शाखा आहे जिच्यामध्ये इलेक्ट्राँनिक,कंप्युटर सायन्स,नँनो टेक्नाँलाँजी,आर्टिफिशल इंटलिजन्स,बायो टेक्नाँलाँजी इत्यादींचा समावेश होत असतो.

म्हणजेच रोबोटिक्स हे एक असे विस्तृत क्षेत्र आहे.ज्यात आपण विविध बाबींचा अभ्यास करू शकतो.

रोबोट म्हणजे काय?

 रोबोट हा एक माणुस नसुन एक यंत्र असते.जे आपण त्याची जशी कँप्युटरद्वारे प्रोग्रँमिंग करून त्याला सुचना देतो तशा पदधतीने तो कार्य करत असतो.

रोबोटचे प्रकार किती कोणकोणते असतात?Robotics basic information Marathi  

 तसे पाहायला गेले तर रोबोटचा विविध क्षेत्रात आपण वापर करत असतो.म्हणुनच त्याच्या विविध क्षेत्रातील वापरानुसार त्याचे विविध गटांत वर्गीकरण देखील केले जाते.

See also  ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय? - Graphics designing career opportunities

रोबोटचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :

  • घरगुती कामासाठी वापरले जाणारे रोबोट :
  • औद्योगिक कामकाजासाठी वापरले जाणारे रोबोट :
  • मिलिटरी मध्ये वापरले जाणारे रोबोट :
  • वैद्यकीय तपासणीसाठी वापरले जाणारे रोबोट :
  • अंतराळ संशोधनासाठी वापरले जाणारे रोबोट :
  • वेगवेगळया सेवा सुविधांसाठी वापरले जाणारे रोबोट :
  • मानवी रोबोट :
  • सोबतीसाठी,साहचर्यासाठी वापरले जाणारे रोबोट :

1) घरगुती कामासाठी वापरले जाणारे रोबोट :

घरगुती रोबोट हा एक असा रोबोट असतो ज्याचा वापर आपण आपल्या घरगुती कामासाठी म्हणजेच घराची साफसफाई,स्वच्छता इत्यादीसाठी करत असतो.

ह्यामध्ये घरगुती मनोरंजनासाठी तसेच शिक्षणासाठी देखील रोबोटस वापरले जात असलेले आपणास आता दिसुन येते.

2) औद्योगिक कामकाजासाठी वापरले जाणारे रोबोट :

 औद्योगिक क्षेत्रामध्ये रोबोटसचा वापर एखादे सामान उचलण्यासाठी,त्याची पँकेजिंग करण्यासाठी,वस्तुंची उत्पादनांची साफसफाई करण्यासाठी,उत्पादन एकत्र करण्यासाठी देखील केला जातो.

यासाठी आपण ह्या रोबोटला विशिष्ट प्रकारचा हात देखील जोडत असतो जेणेकरून तो आपले ठाराविक काम करू शकेल.

3) मिलिटरी मध्ये वापरले जाणारे रोबोट :

 सैन्यामध्ये देखील आता रोबोटसचा वापर केला जातो.

सैन्यामध्ये कधी रोबोटसचा वापर लढाईसाठी,तर कधी बाँम्ब शोधण्यासाठी आणि त्याला डिफ्युज करण्यासाठी केला जातो.

4) वैद्यकीय तपासणीसाठी वापरले जाणारे रोबोट :

 वैद्यकीस क्षेत्रात देखील रोबोटसचा वापर आपण रूग्णांची देखभाल करण्यासाठी,त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी,त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी इत्यादी करता करत असतो.

 5) अंतराळ संशोधनासाठी वापरले जाणारे रोबोट :

असे देखील रोबोटस असतात ज्यांचा वापर आपण अंतराळ संशोधनासाठी तसेच विविध परग्रहांवर जाऊन संशोधन करण्यासाठी वापरत असतो.

6) वेगवेगळया सेवा सुविधांसाठी वापरले जाणारे रोबोट:

 आज रोबोटसचा वापर आपण वेगवेगळया प्रकारच्या सेवा सुविधा पुरविण्यासाठी देखील करत असतो.

एखाद्या कार्यालयीन कामकाजासाठी,तसेच ग्राहक सेवेसाठी विविध माँल मध्ये देखील आता रोबोटसचा वापर केला जातो.

7) मानवी रोबोट :

हा एक रोबोटचा असा प्रकार आहे जो दिसायला मानवासारखाच असतो.त्याला माणसाप्रमाणेच बोलता येते,चालता येते.तसेच माणसाप्रमाणे त्याला दोन हात दोन पाय डोके असे अवयव देखील असतात.

See also  गुड फ्रायडे म्हणजे काय? सणाचे महत्त्व काय ? कसा साजरा करतात. - What is Good Friday - 2023 Date its Meaning

8) सोबतीसाठी,साहचर्यासाठी वापरले जाणारे रोबोट :

 हा रोबोट आपल्या सोबत राहत असतो,आपली काळजी घेत असतो.आपला मित्र तसेच परिवाराचा एक घटक म्हणुन आपल्यासोबत वास्तव्य करत असतो.

 रोबोट कशापदधतीने कार्य करत असतो?Robotics basic information Marathi   

  • जेव्हाही आपण एखादा रोबोट तयार करतो तेव्हा आपण त्याची एक संरचना तयार करत असतो.मग त्या संरचनेनुसार त्याच्यात विविध प्रकारची यंत्रे लावत असतो.
  • प्रत्येक रोबोटमध्ये एक आर्टिफिशल इंटलिजन्स सेट केले जात असते.जेणेकरून आपण त्याला जी कमांड देत असतो ती त्याला कळायला हवी.
  • रोबोट तयार करताना त्याच्यामध्ये आपण एक मस्कल सिस्टमचा देखील वापर करत असतो ही मस्कल सिस्टम व्यवस्थित कोणतेही कार्य करण्यास मदत करत असते.
  • ज्या पदधतीने मानवाला कोणतेही कार्य करण्यासाठी उर्जेची गरज असते.त्याचप्रमाणे रोबोटला देखील आपली सर्व कार्ये पुर्ण करण्यासाठी मुबलक उर्जेची आवश्यकता असते.याचसाठी आपण रोबोटमध्ये पाँवर रिसोर्स देखील सेट करत असतो.
  • आपण रोबोटमध्ये देखील ब्रेन सिस्टम सेट करत असतो.जेणेकरून आपण त्याची प्रोग्रँम सेटिंग करतो आहे तसेच त्याला कमांड देतो आहे ती त्याच्या लक्षात यावी.

 रोबोटचे प्रमुख घटक कोणकोणते असतात?

 1)सेंसर

2) अँक्युएटर मोटर

3) मँनीप्युलेटर

4) कंट्रोल सिस्टम

5) पावर सोर्स

6) आर्टिफिशल इंटलिजन्स

7) ब्रेन सिस्टम

8) मसल सिस्टम

 रोबोटचा उपयोग कुठे आणि कसा केला जातो?

 1) औद्योगिक क्षेत्रात

2) घरगुती कामासाठी

3) वैदयकीय चिकित्सेसाठी उपचारासाठी

4) सैन्य दलात

5) अंतराळ संशोधनासाठी

6) कृषी क्षेत्रात

7) वेगवेगळया माँल्स कार्यालया मध्ये सर्विसेससाठी

इत्यादी.

भारतातील प्रमुख रोबोट कोणकोणते आहेत ?

 1)मानव

2) रोबोकाँप

3) मित्र

4) दक्ष

5) इंड्रो

1) मानव :

मानव हा भारतातील असा रोबोट आहे जो दिसायला एकदम मानवासारखाच दिसतो.याची लांबी 7 ते 8 सेंटीमीटर इतकी आहे.आणि वजन 2 ते 3 किलोग्रँम इतके आहे.आणि सगळयात महत्वाचे हा रोबोट माणसाप्रमाणे बघु तसेच ऐकु देखील शकतो.

See also  SOP म्हणजे काय ? SOP full form in Marathi

2) रोबोकाँप :

रोबोकाँप हा रोबोट वाहतुक नियंत्रण तसेच पोलिस यंत्रणा कारवाईसाठी मुख्यत्वे वापरला जातो.रोबोकाँपचा वापर मोठमोठया कार्यालय तसेच माँल्समध्ये सुरक्षेच्या कार्यासाठी केला जातो.

3) मित्र :

मित्र हा रोबोट आपल्यासोबत विविध भाषेत समजुन उमजून बोलण्याचे काम करतो.हा आपला चेहरा लक्षात ठेवू शकतो.सोबतच ये जा देखील करू शकतो.

4) दक्ष :

ह्या रोबोटची निर्मिती डिआर डीओ द्वारे करण्यात आली आहे.याचा उपयोग बाँम्ब शोधण्यासाठी आणि त्याला डिफ्यूज करण्यासाठी देखील केला जातो.

5) इंड्रो :

इंड्रो रोबोटचा वापर मनोरंजन शिक्षण तसेच घरगुती कामांसाठी केला जातो.

 रोबोटिक्स या क्षेत्रात असलेल्या career opportunities बाबत आपण पुढील लेखात माहिती घेवूयात ,

 

 

1 thought on “रोबोटिक्स म्हणजे काय? Robotics basic information Marathi”

Comments are closed.