अतिसार प्रमुख कारण, लक्षणं व उपचार – डॉ जि एम पाटील – Diarrhea Symptoms, causes and Treatment Marathi

अतिसार माहिती

हा आजार बालकांमध्ये खूप प्रमाणात आढळतो.याचे मुख्य कारण दूषित अन्न व पाणी आहे.अतिसार म्हणजे वारंवार व पातळ शौचास होणे.जगात दरवर्षी 5 वर्षाखालील 15 लाख बालके या आजाराने दगावतात.नुमोनिया नंतर ह्या आजारामुळे बालकांच्या जीवितास धोका असतो.याची प्रामुख्याने करणे म्हणजे ,

अतिसारच प्रमुख कारण

 • अतिसारच प्रमुख कारण म्हणजे विषाणू मुळे होणार संसर्ग, ह्या संसर्गच प्रमुख कारण हे दूषित पाण्याचा वापर. आपल्या सभोवताली,घरात स्वच्छ पाण्याचा अभाव असला किंवा घरातील स्वयंपाक करताना  किंवा दैनंदिन वापरा करता नकळत म्हणा किंवा स्वच्छ पाणी  उपलब्द नसल्यामुळे  जेव्हा अश्या दूषित पाण्याचा वापर केला जातो तेव्हा अतिसार सारख्या आजारांची शक्यता बळावते. 
 • दोन प्रमुख विषाणू मुळें अतिसारचा संसर्ग होत असतो, जसे की Rotavirus and Escherichia coli या शिवाय अन्य दोन परजीवी ही या आजारास  कारणीभूत असतात जसे cryptosporidium and shigella जीव.

या व्यतिरिक्त बालकांच कुपोषण हे ही काही प्रमाणात एक कारण दिसुन येत असते.

अतिसारच प्रमुख लक्षणे कोणती असतात ?

 • ताप येणे
 • सर्दी खोकला
 • मळमळ उलट्या अनि जास्त प्रमाणात पातळ संडास होणे.
 • ह्यात बालकांना खूप तहान लागते व जास्त अतिसार असल्या लघवीचे प्रमाण कमी होते व भूक कमी होते
 • लक्षणे लघवी गडद व कमी होते व dehydration म्हणजे निर्जलीकरण जास्त झाल्यास व वेळीच उपचार न केल्यास बाळाचा मृत्यू होऊ शकतो.
 • निर्जलीकरण होणे म्हणजे बाळ निस्तेज होते त्वचेवर सुरकुत्या पडतात बाळ अन्न व पाणी घेत नाही बेशुद्ध होऊ शकते वजन घटते.
 • कुपोषयी मुलांमध्ये निर्जलीकरण लवकर व वेगात होते.
 • काही बालकांमध्ये संडासात रक्त जाते पोट फुगते झटके येतात.
See also  डीएनए टेस्ट म्हणजे काय? DNA test meaning in Marathi

अतिसारवरील  प्राथमिक व योग्य उपचार कोणते ?:

 • स्वच्छता :वारंवार हात स्वच्छ धुणे
 • घरातील व परिसरातील स्वच्छता माशा व कीटकांना प्रतिबंध करणे.
 • लसीकरण 6 महिन्याचे आत बालकांना rotavirus लस देणे
 • ही लस आता प्राथमिक आरोग्य केंद्र ;उपकेंद्र ग्रामीण रुग्णालयात व सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध आहे तीन डोस 6 महिन्याच्या आत घेतले पाहिजेत.

.अतिसार झाल्या नंतर निर्जलीकरण कसे टाळाल?-Diarrhea Symptoms, causes and Treatment Marathi

 • यासाठी ORS WHO मेडिकल दुकानात अथवा सरकारी रुग्णालयात सहज उपलब्ध होते हे पावडर 200ml उकळून गार केलेल्या पाण्यात हळूहळू द्यावे 24 तासानंतर उरलेले पाणी टाकून द्यावे व नवीन तयार करावे.
 • घरी बनविलेले मीठ साखर पाणी पण देऊ शकतात.तसेच बाळास सकस आहार खीर लापशी फळांचारस द्यावा बाळ आईचे दूध घेत असल्यास ते अवश्य सुरू ठेवावे
 • हा आजार बरे होण्यास 6 ते 7 दिवस लागू शकतात बाळाला लघवी भरपूर होत असल्याचे दिसले तर ते चांगलेलक्षण आहे
 • बाळ हळूहळू खायला लागते,खेळकर बनते.हा तात्पुरता पण धोकेदायक आजार आहे वेळीच उपचार केल्यास आपण नक्कीच बाळास आजाराच्या गुंतागुंतिपासून वाचवू शकतो.

ह्या व्यतिरीक्त अतिसार सारखे आजार दूर सारण्या साठी आपण समाज म्हणून खालील गोष्टी भर दिला पाहिजे

 • रोटो व्हायरस वॅसिंनेशन
 • शुद्ध पिण्याचा पाण्याची उपलब्धता
 • सर्व ठिकाणी स्वच्छता पाळणे
 • हाथ स्वच्छ धुणे
 • पहिल्या सहा महिने नवजात बाळांना आईच् दुध जास्त दिलं जाईल या  विषयी प्रभोधन करणे.
 • आरोग्य शिक्षण वर भर देणे ,जेणेकरून लोकांना कळेल की आजाराचं संक्रमण कसें,आजार कैसे पसरतात.

वाचा – समतोल आहार

लेखक –


डॉ जि एम पाटील
नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ - Pediatrician 
अमळनेर जि जळगाव 
पत्ता - Address- ग्रामीण रुग्णालय ,
स्वामी नारायण मंदिर मागे , 
LIC ऑफिस जवळ अमळनेर
Rural Hospital, Amalner 
Address: 
Behind Swaminarayan Temple, 
Near LIC Office,
Amalner, Maharashtra 425401