दिवाळी सण माहीती -Diwali information in Marathi

दिवाळी सण माहीती (वेबशोध)

दिवाळी हा सण हिंदु धर्मात साजरा केल्या जात असलेल्या सर्व सणांपैकी एक अत्यंत पवित्र सण म्हणुन ओळखला जातो.दिवाळीला दीपोत्सवाचा सण म्हणुन देखील आपण ओळखत असतो.कारण ह्या दिवशी आपण आपल्या घरासमोर अंगणात दिवे लावत असतो.रांगोळी काढत असतो,घराच्या समोरील बाजुस आकाशकंदिल देखील लावत असतो.

दिवाळीमध्ये अनेक प्रमुख दिवसांचा समावेश होत असतो ज्यात वसुबारस,नरक चतुर्दशी,धनत्रयोदशी,लक्ष्मीपुजन,बलिप्रतिपदा,भाऊबीज,गोवर्धन पुजा अशा प्रमुख दिनांचा विशेष समावेश होतो.

दिवाळी च्या 5 दिवसात अगदी आनंदी वातावरण पूर्ण भारतात बघायला मिळते. सगळीकडे छान सकारात्मक ऊर्जा पसरलेली असते, सकाळी सर्व जण लवकर उठून पूजा पाठ करून, एकमेकांना फोन, मेसेजेस करून दिवाळीच्या सुंदर शुभेच्छा देतात.

दिवाळी हा सण काय असतो?

हिंदु धर्मातील प्रत्येक व्यक्ती साजरा करतो असा सण तसेच उत्सव म्हणजे दिवाळी.दिवाळीत आपण घरात घरासमोर अंगणात सर्वत्र दिवे जाळुन दिव्यांनी वातावरण प्रकाशित करत असतो.आणि हे दिवे अंधकारावर प्रकाशाने वाईटावर चांगल्याने मात करण्याचे प्रतीक म्हणुन ओळखले जातात.

दिवाळी हा सण कधी आणि केव्हा आहे? Diwali information in Marathi

हिंदु धर्मातील पंचांगांत दिलेल्या नुसार कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या दिवशी दिवाळी हा सण साजरा केला जात असतो.

2021 मध्ये दिवाळी कधी आणि केव्हा साजरी केली जाईल?

2021 मध्ये दिवाळी हा सण आपण कार्तिक अमावस्येच्या दिवशी म्हणजेच गुरूवारच्या दिवशी ४ नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.

दिवाळी हा सण का साजरा केला जातो?

दिवाळी हा सण साजरा करण्यामागे कोणतेही एक कारण नसुन त्याच्यामागे अनेक कारणांचा समावेश असलेला आपणास दिसुन येतो.म्हणुनच हा दिवस फक्त हिंदुंसाठी नाही तर इतर धर्मीयांसाठी देखील खुप महत्वाचा दिवस आहे.

दिवाळी हा सण आपण का साजरा करतो याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत : Diwali information in Marathi

  • लक्ष्मीचा जन्म :दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता.
  • लक्ष्मी आणि विष्णु यांचा विवाह :

दिवाळी ह्या सणाच्या दिवशीच भगवान श्री हरि विष्णु यांच्यासोबत लक्ष्मी मातेचा विवाह देखील झाला होता.

म्हणुन ह्या दोघांच्या विवाहाचा मंगलमय प्रसंग घरोघरी दिवे लावून साजरा केला जात असतो.जेणेकरून आपले संपुर्ण घर दिव्यांच्या प्रकाशाने भरून जात असते.

See also  श्री बैठकीची सुरुवात कशी झाली? श्री बैठकीचे स्वरूप कसे असते?

3) रामाचा वनवास संपला :

ह्याच दिवशी राम सीता आणि लक्ष्मण हे तिघे आपला चौदा वर्षाचा वनवास संपवुन आयोध्येमध्ये परत आले होते.म्हणुन ह्या तिघांच्या आगमनाच्या आनंदात सर्व आयोध्या नगरी दिव्यांनी प्रकाशमान करण्यात आली होती.

4) पांडवाचा देखील वनवास संपुष्टात आला :

ह्याच दिवशी पांच पांडव यांच्या वनवासाची देखील समाप्ती झाली होती.

5) देवी लक्ष्मीची सुटका :

भगवान श्री हरि विष्णु यांनी त्यांचे पाचवे रूप धारण करून कार्तिक अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची राजा बळीच्या तुरूंगातुन सुटका केली होती.

6) नरकासुराचा वध :

ह्याच दिवशी श्री कृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.

7) महावीर स्वामींचे निर्वाण :

जैन धर्माचे चौविसावे तिर्थकर महावीर स्वामी यांचा निर्वाण दिन देखील ह्याच दिवशी साजरा केला जातो.

8) लाल पत्र दिवसाची संस्थापणा :

शीखांचे धर्मगुरू गुरू अमर दास यांनी लाल पत्र दिवसाची संस्थापणा दिवाळीच्याच दिवशी केली होती.ह्या दिवशी सर्व शिख आपल्या गुरूचे आशिर्वाद प्राप्त करीत असतात.

9) राजा विक्रमादित्य यांचा राज्य तिलक :

राजा विक्रमादित्य यांचा राज्य टिळक पण ह्याच दिवशी केला गेला होता.

10) पिकांच्या उत्पादनाचा सण :

ह्या दिवशी पिकांच्या पहिल्या उत्पादनाची कापणी केली जाते.म्हणुन हा दिवस शेतकरी वर्गासाठी खुपच महत्वाचा दिवस मानला जातो.

संपुर्ण महाराष्टात दिवाळी कशी साजरी केली जाते? – Diwali information in Marath

 

संपुर्ण महाराष्टात दिवाळी कशी

दिवाळी हा एक दिव्यांचा सण असतो ज्यात आपण आपल्या घरात,घरासमोरील अंगणात दिवे प्रकाशित करत असतो.ह्याच दिवशी घराची साजसजावट केली जाते.घरासमोरील अंगणात नक्षीदार रांगोळी काढली जाते.नवीन कपडयांची,फटाक्यांची खरेदी केली जाते.

दिवाळीमध्ये लाल शेव पिवळी शेव,मुरमुरयांचा चिवडा,रव्याचे लाडु,शंकरपाळे,बर्फी भाजके पोहे इत्यादी व्यंजन फराळासाठी बनवले जाते.याचसोबत एकमेकांना दिवाळीच्या फराळासाठी आमंत्रित करत असतो.

एकमेकांना दिवाळीच्या मनपुर्वक शुभेच्छा देत असतो.घरासमोर विविध फटाके फोडुन,आपण आपला आनंद साजरा करत असत.

दिवाळीचे महत्व :

1)दिवाळी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस आहे.अंधकारावर प्रकाशाने मात करण्याचा दिवस आहे.कारण ह्याच दिवशी अनेक महत्वाच्या शुभ घटना घडल्या जसे की रामाची आयोध्येत वापसी,नरकासुराचा वध,लक्ष्मी नारायणाचा विवाह इत्यादी.

2) दिवाळीत जर आपण लक्ष्मीचे पुजन केले तर आपल्याला पैशांची टंचाई कधीच जाणवत नसते.आणि आपणास भरपुर धन देखील प्राप्त होत असते.

महाराष्ट व्यतीरीक्त इतर विविध विभागात तसेच प्रांतात दिवाळी कशी साजरा केली जाते?

1)चेन्नई :

चेन्नई येथे दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचे दैवत कुबेर यांची पुजा तसेच आराधना केली जात असते.याचसोबत नरक चतुर्दशीला नरकासुराच्या पुतळयाचे दहन देखील केले जात असते.

See also  जगातील टॉप १० श्रीमंत शहरांची यादी | List of Top 10 Richest Cities in the World

2) पंजाब :दिवाळीच्या सणालाच शिखांचे गुरू गोविंदसिंह यांची मोगलांच्या तावडीतुन सुटका झाली होती.म्हणुन पंजाबमध्ये दिवाळी हा सण खुप जल्लोषात भांगडा वगैरे नृत्य करून साजरा केला जातो.

3) कोलकत्ता :कोलकत्ता शहरात दिवाळीमध्ये देवी महाकालीची पुजा तसेच आराधना केली जात असते.ह्याच दिवशी महाकाली देवीच्या मंदीरात पुजा अर्चना तसेच भक्तीमय वातावरण निर्माण झालेले दिसुन येते.

4) जम्मु काश्मीर :जम्मु काश्मीर मध्ये दिवाळीत दाल सरोवरामध्ये दिवे पेटवून ते वाहिले जातात.

दिवाळीत आपण कोणकोणते महत्वाचे दिवस साजरा करत असतो? Diwali information in Marathi

दिवाळीत आपण अनेक महत्वाचे दिवस साजरा करत असतो.ज्यात वसुबारस,धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी,लक्ष्मीपुजन,बलिप्रतिपदा,भाऊबीज आणि गोवर्धनपुजा हे अत्यंत महत्वाचे दिवस मानले जातात.

1)वसुबारस :

वसुबारस यालाच गोवत्स दादशी असे देखील संबोधिले जात असते.हिंदु धर्मात गाईला मातेचा दर्जा दिला जात असतो.याचसोबत भारत देश हा शेतकरींचा देश असल्याने शेतकरी आणि गाय बैल यांचा खुप घनिष्ठ संबंध असलेला आपणास दिसुन येतो.

ह्या दिवशी मुख्यकरून खेडेगावात गाईंची तिच्या वासरांची पुजा करतात.स्त्रिया ह्या गायीचे चरण धुवतात त्यावर हळद,कुंकु,तांदुळ टाकुन तिच्या चरणांची पुजा करतात.आणि मग पुजा करून झाल्यावर गाईच्या गळयात माळ घालुन तिला नमस्कार देखील करतात.

मग केळीची पाने अंथरून त्यावर गाईला पुरणपोळी,दाळ भात इत्यादींचा नैवेद्य खाऊ घालत असतात.

2)धनत्रयोदशी :

 

धनतेरस

ह्या दिवशी आपण घरात ठेवलेले सर्व धन मग त्या नोटा असो किंवा दागिने ते बाहेर काढत असतो.आणि त्याची साफसफाई करत असतो.आणि साफसफाई करून झाल्यावर ते धन पुजत असतो.

जैन धर्मात देखील धनत्रयोदशीला खुप महत्व आहे.याला जैन धर्मात ध्यान तेरस असे संबोधतात.

कारण ह्याच दिवशी भगवान महावीर यांनी योगनिद्रेत प्रवेश केला होता.आणि मग सलग तीन दिवस योग निद्रा करून झाल्यावर त्यांना निर्वाण प्राप्ती झाली असे म्हटले जाते.

3)नरक चतुर्दशी :

नरकासुर एक भयानक राक्षस होता ज्याला साक्षात ब्रम्ह देवाकडून त्याची हत्या कोणी करू शकणार नाही असे वरदान मिळाले होते.याचाच गैरफायदा घेत तो निष्पाप निरागस देवता तसेच मानव यांच्यावर अत्याचार करू लागला.अशा बिकट परिस्थितीमध्ये सगळयांच्या हितासाठी भगवान श्री हरी विष्णुंनी सृष्टीच्या कल्याणासाठी त्याचा वध केला होता.

तेव्हापासुन हा दिवस नरक चतुर्दशी म्हणुन साजरा केला जाऊ लागला.

नरक चतुर्दशी म्हणजेच पाप,वासना,अहंकार यांचा नायनाट करणारा दिवस असे देखील आपण याला संबोधित असतो.

 

लक्ष्मीपूजन

4) लक्ष्मीपूजन

:दिवाळीत आपण लक्ष्मीची पुजा करत असतो ज्याने लक्षमीचा वास आपल्या घरात सदैव राहतो.आपल्या हातात पैसा आणि डोक्यावर वैभव तसेच धनधान्य लक्ष्मीचा आशिवार्द तिची कृपा दृष्टी सदैव राहत असते.

See also  स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार - Powerful inspirational Quotes of Swami Vivekananda in Marathi

5) बलिप्रतिपदा :

बलिप्रतिपदेला पत्नी आपल्या पतीच्या अंगाला उंटणे लावत असते आणि त्याची तेलाने मसाज करून त्याला अंघोळ घालत असते.आणि औक्षण करून झाल्यावर पती आपल्या पत्नीला प्रेमपुर्वक एखादी भेटवस्तु देत असतो.

बलिप्रतिपदा हा शेतकरी संस्कृतीतुन जन्माला आलेला दिवस मानला जातो.शेतकरी वर्गासाठी हा दिवस खुपच महत्वाचा मानला जातो.

6) भाऊबीज :

भाऊबीज हा बहिण भावाच्या नात्याचा गोड दिवस ओळखला जातो.ह्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो तिथे गोडधोड जेवण करत असतो.मग संध्याकाळी बहिण त्याला ताटाने ओवाळत असते आणि भावाकडुन तिला ओवाळणी दिली जाते.

7) गोवर्धनपुजा

:गोवर्धन पर्वताची पुजा बलिप्रतिपदेच्या दिवशी मथुरेत वास्तव्य करणारे लोक करताना आपणास विशेषकरून दिसुन येत असतात.

दिवाळीत रांगोळी आणि आकाशकंदिलाचे काय महत्व आहे?

आज घरोघरी आपल्याला दिवाळीत प्रत्येक घराच्या अंगणात रांगोळी काढलेली दिसुन येते.याचे देखील एक कारण आहे.

दिवाळीत रांगोळीचे महत्व :

दिवाळीत आपण अंगणात रांगोळी ह्यासाठी काढत असतो की याने सर्व देवी देवतांचे स्वागत करत असतो.आणि विशेषकरून लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळी काढली जात असते.आणि रांगोळी पवित्र आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते ज्याने नकारात्मक शक्ती आपल्यापासुन नेहमी दुर राहत असते.

दिवाळीत आकाश कंदिलाचे महत्व :

दिवाळीत आकाशकंदील घराबाहेर लावल्याने नकारात्मक उर्जा घरात प्रवेश करत नसते.

दिवाळीत फटाके फोडताना आपण कोणती विशेष काळजी घ्यायला हवी?

1)आपले संपुर्ण शरीर झाकले जाईल असेच वस्त्र फटाके फोडताना आपण परिधान करावे.

2) लहान मुलांनी फटाके फोडताना कोणीतरी मोठया व्यक्तीने त्यांच्याकडे लक्ष द्यावे त्यांना फटाके फोडण्याबाबद मार्गदर्शन करावे.

3) नायलाँनचे कपडे लवकर पेट धरतात म्हणुन फटाके फोडताना नायलाँनचे वस्त्र परिधान करू नये.

,4) लहान मुलांना जास्त आवाजाचे मोठे फटाके फोडायला देऊ नये.

5) फटाके फोडताना नाका तोंडाला रूमाल बांधावा याने फटाक्यांचा धुर आपल्या नाकातोंडात जात नाही.

दिवाळीत तेलाच्या पणत्या आणि तुपाचे निरांजन करताना आपण कोणती काळजी घ्यावी? Diwali information in Marathi

दिवाळीत आपले घर आणि अंगण दिव्यांनी प्रकाशमान करण्यासाठी असंख्य पणत्या तसेच दिवे आपण आपल्या घराच्या अंगणासमोर लावत असतो.

पण दिवाळीत तेलाच्या पणत्या तसेच तुपाचे निरांजन करताना आपण खालील काळजी घ्यावयाची असते :

1)समईची वात सर्वसाधारणत लांब असते आणि निरांजनाची वात बसक्या आकाराची तसेच गोल असते

निरांजणात आपण एक वात आणि समईत एकापेक्षा अधिक वाती लावत असतो.यात आपण कधीही बदल करू नये.

2) देवापुढे लावलेल्या दिव्यात तेल आणि तुप व्यतीरीक्त इतर कोणताही आगीने पेट धरणारा पदार्थ टाकु नये.

दिवाळी विषयी जाणुन घ्यावयाची काही रोचक तथ्ये :

1) दिवाळी हा एक असा सण आहे जो संपुर्ण भारतभर प्रत्येक धर्मात वेगवेगळया कारणांसाठी साजरा केला जातो.

2) भारतच नव्हे तर परदेशातही दिवाळी हा सण साजरा केला जातो.

3)दिवाळी हा सण प्रत्येक प्रांतात विविध पारंपारीक पदधतीने साजरा केला जातो.

4) दिवाळीला नवीन वर्षाची सुरूवात म्हणुन देखील ओळखले जाते.

3 thoughts on “दिवाळी सण माहीती -Diwali information in Marathi”

Comments are closed.