फ्लॅक्स सीडस म्हणजे काय?Flax seeds meaning in Marathi

फ्लॅक्स सीडस म्हणजे काय?Flax seeds meaning in Marathi

फ्लॅक्स सीडसचा अर्थ अळशीची बी तसेच जवसाची बी असा होतो.

अळशी जवस हा एक असा पदार्थ आहे जो आपल्या प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतो.ज्याचे सेवन केल्याने आपल्या मध्ये आजारपणाची लक्षणे दिसुन येत नाहीत.शंभर वर्षांपर्यंत आपणास निरोगी जीवन जगता येईल.अणि आपण अधिक तरूण दिसु.

फ्लॅक्स सीडस मुळे तरूण वयात चेहरयावर येत असलेल्या सुरकुत्या डाग केस गळणे इत्यादी समस्येपासून आपल्याला मुक्ती मिळते.

फ्लॅक्स सीडसचे सेवन केल्याने आपले केस अणि त्वचा नेहमी निरोगी राहतात अणि केसांचे आरोग्य देखील सुधारत असते.

रोज एक किंवा अर्धा चमचा फ्लॅक्स सीडसचे सेवन केल्याने आपल्याला केसांच्या तसेच त्वचेच्या अनेक समस्यांपासून कायमची सुटका प्राप्त होते.

फ्लॅक्स सीडसचे सेवन कोणी करू नये? फ्लॅक्स सीडसचे अधिक प्रमाणात सेवन का करू नये?

ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ज्या महिला बाळाला पाजत आहेत अशा महिलांनी याचे सेवन करणे टाळावे.

अणि जरी याचे सेवन केले तर अधिक प्रमाणात याचे सेवन करू नये.अणि सेवन करण्याआधी डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा.

जे व्यक्ती मधुमेहाची तसेच रक्त पातळ होण्याची औषधे घेत आहेत अशा व्यक्तींनी देखील याचे सेवन करणे टाळावे.किंवा याचे सेवन करणयाआधी तज्ञ डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा.

कारण फ्लॅक्स सीडसचे रोज एक दोन चमच्यापेक्षा अधिक प्रमाणात सेवन केल्याने आपल्या आतड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.तसेच अॅलर्जीक रिअॅक्शन होण्याची किंवा जुलाब होण्याची शक्यता असते.

फ्लॅक्स सीडसचे सेवन करताना आपण भरपुर पाण्याचे सेवन करायला हवे.कारण हा एक गरम प्रकृतीचा पदार्थ असतो.

See also  लिओनार्डो द विंची कोण होते? - Leonardo da Vinci
Flax seeds meaning in Marathi
Flax seeds meaning in Marathi

फ्लॅक्स सीडसचे सेवन करण्याचे फायदे कोणकोणते आहेत?

 • फ्लॅक्स सीडसचे सेवन केल्याने आपली त्वचा हायड्रेटेड तसेच चमकदार बनण्यास मदत होते.आपल्या चेहरयावरील सुरकुत्या देखील नाहीशा होतात.
 • ज्यांची त्वचा गळुन गेली आहे अशा व्यक्तींकरीता फ्लॅक्स सीडस अधिक फायदेशीर ठरते.फ्लॅक्स सीडस मध्ये व्हिटॅमिन बी अणि फॅटस असतात.ज्यामुळे आपल्या त्वचेला पुर्ण पोषण प्राप्त होते.
 • यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते ज्यामुळे आपल्या केसांचे आरोग्य देखील चांगले राहते.आपले केस चमकदार बनतात.अणि केस देखील गळत नाही.
 • फ्लॅक्स सीडसचे सेवन केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात.जसे की डोक्यात खाज येणे,केसात कोंडा होणे केस गळुन टक्कल पडणे इत्यादी.
 • ज्यांना सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवतो अशा व्यक्तींनी याचे सेवन केल्याने यातील ओमेगा तीन फॅटी अॅसिड मुळे आपली बाॅडी डिटाॅक्स होते.ज्यामूळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत असतात.
 • ज्यांना पचनाची समस्या आहे कफ,अॅसिडिटी असेल किंवा पोट साफ होत नाही अशा व्यक्तींनी याचे सेवन केल्याने त्यांची पचनक्रिया सुधारते आणि पोटाशी संबंधित सर्व समस्या नाहीशा होतात.
 • यातील ओमेगा तीन फॅटी अॅसिड आपले कॅन्सर पासुन संरक्षण करते.यामुळे वजन देखील कमी होण्यास मदत होते.
 • डायबिटीस हायपोग्लायसेमिया असलेल्या लोकांनी याचे सेवन करायला हवे पण डायबिटीस वगैरेची औषध घेत असल्यास याचे सेवन करणयाआधी एकदा तरी डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला हवा.
 • यात असलेल्या फायबरमुळे आपली भुक नियंत्रणात राहते.आपणास जास्त भुक लागत नाही थोडेफार जेवन केल्याने देखील पोट भरल्यासारखे जाणवते.
 • ज्या महिलांमध्ये प्रजनन क्षमता कमी आहे अशा महिलांनी याचे सेवन करणे फायदेशीर ठरते यात असलेल्या लिंगनन मुळे महिलांच्या प्रजननासंबंधित समस्या दूर होतात.
 • ज्यांना हदयाशी संबंधित तसेच बीपी स्ट्रोक इत्यादी समस्या आहेत.अशा व्यक्तींना हदयाशी बीपी स्ट्रोकशी संबंधित समस्या निर्माण होत नाही यात असलेले ओमेगा तीन फॅटी अॅसिड अणि मोनो असंतृप्त पाॅली असंतृप्त यांच्या प्रभावाने आपले हदय स्वस्थ राहते.
 • आपल्या धमण्यांमधील बॅड कोलेस्टेरॉल दूर करण्याचे काम देखील फ्लॅक्स सीडस बिया करीत असतात.
See also  दिनविशेष - 5 मे – Din Vishesh 5 May 2023

रात्रभर पाण्यात फ्लॅक्स सीडस बिया भिजुन घालायच्या अणि मग सकाळी उपाशीपोटी ह्या रात्रभर पाण्यात भिजवलेल्या बियांचे सेवन करावे.ज्यांना उष्णतेचा त्रास होतो अशा व्यक्तींनी याचे कमी प्रमाणात सेवन करायला हवे.