अल जवाहिरी कोण होता?who is al jawahiri in Marathi

अल जवाहिरी कोण होता?who is al jawahiri in Marathi

मित्रांनो काल नुकतीच अशी एक बातमी आपणास न्युजवर ऐकायला तसेच वाचायला मिळाली की अमेरिकेने अल जवाहिरीचा खात्मा केला आहे.

अशा वेळी आपल्या मनात नक्कीच हा एक प्रश्न निर्माण झाला असेल की हा अल जवाहिरी नक्की आहे तरी कोण?अणि अमेरिकेने याचा खात्मा का केला?

आजच्या लेखात आपल्या मना निर्माण झालेल्या ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणुन घेणार आहोत.

अल जवाहिरी हा कोण होता?

अल जवाहिरी हा अल कायदा ह्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता.

अल-कायदाचा प्रमुख अल जवाहिरी याचा अमेरिकेने खात्मा का केला?

अल कायदा ही एक दहशतवादी संघटना आहे अणि अल जवाहिरी ह्याच संघटनेचा म्होरक्या आहे.जो जगातील टाँप टेन दहशतवादींपैकी एक मानला जातो.

अमेरिकेत झालेल्या 911 दहशतवादी हल्लयांचा तो मास्टरमाईंड होता.त्यामुळे ओसामा बिन लादेन प्रमाणेच अल जवाहिरी हा देखील अमेरिकेसाठी मोस्ट वाँन्टेड होता.

अमेरिकेत झालेल्या ह्या हल्लयात अनेक निरपराध नागरीकांचा बळी देखील गेला होता.म्हणून अमेरिकेने अल जवाहिरीचा खात्मा केला आहे.

अमेरिकेने अल जवाहिरीचा खात्मा कशा प्रकारे केला?

अमेरिकेने अल कायदाचा प्रमुख अल जवाहिरी याला निंजा मिसाईलच्या साहाय्याने ठार मारले आहे असे सांगितले जात आहे.

अमेरीकेचे ज्यो बायडेन यांनी अल जवाहीरीचा खात्मा झाल्याची घोषणा केली आहे.

31 जुलै रोजी अमेरिकेने अल जवाहिरी थांबलेल्या असलेल्या काबुल येथील एका सेफ हाऊसवर हवाई हल्ला म्हणजेच ड्रोन स्ट्राइक करण्यात आले.ज्यात अल जवाहिरी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाला.

निंजा मिसाईल म्हणजे काय?

निंजा मिसाईल हे हेलफायर ह्या मिसाईलचे एक अँडव्हान्सड रूप आहे.ड्रोनच्या आधारे ह्या मिसाईलने अल जवाहिरीला मारण्यात आले आहे.

See also  किटकनाशके फवारतानाची काळजी(safe spraying of pesticides)

निंजा मिसाईल हे कुठलाही स्फोट विध्वंस घडवून न आणता शत्रुला ठार करते.या मिसाईलमधून पाच ते सहा ब्लेड बाहेर येत असतात.हे ब्लेड त्यांच्या समोरील टारगेटला जिवंतपणे चिरून टाकत असतात.

आपण ज्याला टारगेट करतो त्या व्यक्तीच्या वाचण्याची फार कमी शक्यता यात असते.अमेरिकेने अल जवाहिरीचा ह्याच्याच साहाय्याने खात्मा केला आहे.

अमेरिकेने अल जवाहिरीला पकडुन देण्यासाठी किती बक्षिसाची घोषणा केली होती?

अमेरीकेने अल जवाहिरी ह्या दहशतवादीला पकडुन देणारयास 25 दशलक्ष पौंड दिले जाईल अशी अमेरिकेमध्ये घोषणा केली होती.