लाल सिंह चडडा आमीर खानचा चित्रपटb_ Laal Singh chadha Ameer khan movie in Marathi

लाल सिंह चडडा आमीर खानचा चित्रपट Laal Singh chadha Ameer khan movie in Marathi

बाँलीवुड अभिनेता आमीर खान यांच्या लाल सिंह चडडा नावाच्या एका नवीन चित्रपटामुळे सध्या आमीर खान खुपच चर्चेत आहेत.

महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या चर्चेचे कारण चित्रपटाचे प्रमोशन नसुन या चित्रपटाला जनतेकडुन जो विरोध केला जातो आहे त्यामुळे हा चित्रपट सध्या खुप चर्चेत आहे.

११ आँगस्ट रोजी ह्या चित्रपटाला रिलीज केले जाणार आहे.ह्या चित्रपटाचा ट्रेलर देखील लाँच करण्यात आला आहे.

ह्या चित्रपटाचा मुख्य अभिनेता आमीर खान आहे अणि मुख्य अभिनेत्री करीना कपुर असणार आहे.

या चित्रपटाला याचे आँफिशिअल ट्रेलर लाँच झाल्यापासुनच जनतेकडुन मागील एक दोन महिन्यापासुनच मोठया प्रमाणात विरोध केला जात आहे.ह्या फिल्मच्या कास्टला टविटरवर ट्रोल करण्यात येत आहे.

टविटर वर लोक बाँयकाँट लाल सिंह चडडा,बाँयकाँट बाँलीवुड अशी प्रतिक्रिया देत आहे.अशा वादाच्या भोवरयात हा चित्रपट सापडला असताना अचानक फिल्म मेकरकडुन ह्या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर जारी केले गेले आहे.

ज्यात अभिनेता आमीर खान याचा चेहरा नव्हे तर त्याचे पाय दिसत आहेत.असे म्हणण्यात येते आहे की हे असे पोस्टर शेअर करून चित्रपट निर्माता अणि अभिनेता आमीर खान आपल्या पायात घातलेल्या बुटाकडे जनतेचे लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

कँप्शनमध्ये असे देखील लिहिले आहे की लाल सिंह चडडा यांची आई असे म्हणत असे की त्या व्यक्तीची खरी ओळख त्याचे बुट आहे.

हे पोस्टर बघुन लोकांच्या ह्या चित्रपटाविषयीच्या विरोधास याच्या बहिष्काराच्या मागणीस अधिक गती प्राप्त झाली आहे.दुसरया बाजुला काही लोक आमीर खानला पाठींबा देताना देखील टविटरवर दिसून येत आहे.

अशा वेळी आपल्याला प्रश्न हा पडतो की ह्या चित्रपटाला काही लोकांकडुन विरोध केला जाण्याचे कारण काय आहे?

सर्वप्रथम आपण हे जाणुन घेऊ की बाँयकाँट म्हणजे काय?बाँयकाँट कशाला म्हटले जाते?कारण हा इंग्रजी शब्द आपल्या मराठी व्यक्तीसाठी खुपच नवीन आहे.

See also  प्रधानमंत्री किसान मानधन योजना - PM Kisan Mandhan Yojana Marathi

बायकाँट म्हणजे काय?Boycott meaning in Marathi

बायकाँट म्हणजे एखाद्या गोष्टीचा बाबीचा कडवा विरोध करणे,त्यावर बहिष्कार टाकणे,एखाद्या कंपनीचा माल विकत न घेणे त्यावर बहिष्कार टाकणे होय.

म्हणजेच थोडक्यात याचा अर्थ एखाद्या वस्तुचा विरोध करणे किंवा त्यावर बहिष्कार टाकणे असा होत असतो.

बायकाँट लाल सिंह चडडा याचा काय अर्थ होतो?
Boycott lal Singh chadha meaning in Marathi

लाल सिंह चडडाला विरोध करा त्यावर बहिष्कार टाका असा याचा अर्थ होतो.

बायकाँट बाँलिवुड याचा काय अर्थ होतो?
Boycott Bollywood meaning in Marathi

बायकाँट बाँलीवुड म्हणजे बाँलीवुडचा विरोध करणे त्यावर बहिष्कार टाकणे असा होत असतो.

लाल सिंह चडडा चित्रपटाचा थोडक्यात परिचय –

लाल सिंह चडडा हा चित्रपट हाँलीवुड चित्रपट फाँरेस्ट गँप याचा आँफिशिअल रिमेक आहे असे म्हटले जात आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अदैत चंदन यांनी केले आहे.या चित्रपटात आमीर खान अणि करीना हे दोघे प्रमुख भुमिका साकारत आहे.

याचसोबत मोना सिंग अणि नागा चैतन्य हे देखील ह्या चित्रपटात प्रमुख भुमिकेत दिसून येणार आहेत.लवकरच म्हणजे अकरा तारखेला 11 आँगस्ट 2022 ला हा चित्रपट सिनेमा थिएटरमध्ये दाखवला जाणार आहे.

आमीर खानचा चित्रपट लाल सिंह चडडा यावर काही जनतेकडुन आक्षेप का घेतला जातो आहे?यामागचे कारण काय आहे?

आमीर खानच्या लाल सिंह चडडा ह्या चित्रपटाला जनतेकडुन विरोध करण्याला अनेक बाबी कारणीभुत आहेत.

या चित्रपटाला नेपोटिझमचे म्हणजेच वशिलेबाजीचे नाव दिले जात आहे.याचसोबत हा चित्रपट हाँलीवुड चित्रपट फाँरेस्ट गंपचा रीमेक आहे अणि त्यात नवीन काहीच समाविष्ट केले नाहीये हा चित्रपट पुर्णपणे नक्कल करण्यात आला आहे अशी तक्रार लोग करत आहे.

याचसोबत आमीर खान याने याआधी असे काही वक्तव्य केले आहे जे भारतीय संस्कृति अणि सभ्यतेच्या विरोधात आहे.ज्यात तो असा बोलला होता की भारत हा असहिष्णु लोकांचा देश आहे त्यामुळे त्याला भारत देश सोडायचा आहे.

See also  Brain Rules 12 Principles - बुक समरी मराठीत - Brain Rules 12 Principles for Surviving and Thriving at Work, Home, and School

तसेच चिपटाला नेपोटिझमचे नाव दिल्याने करीनाने जे वक्तव्य दिले होते ते लोकांना पटलेले नव्हते करीना असे कठोर भाषेत म्हटली होती हा चित्रपट नेपोटिझम आहे तर नका आमचा चित्रपट बघु ज्यामुळे देखील जनता त्यांच्यावर भडकली होती.