गणेश चतुर्थी निबंध – Ganesh chaturthi essay in Marathi

गणेश चतुर्थी निबंध-Ganesh chaturthi essay in Marathi

मित्रांनो लवकरच आता गणपती बाप्पांचे आपल्या जीवणात पुन्हा एकदा ३१ आँगस्ट रोजी आगमन होणार आहे.

गणेश चतुर्थी हा आपल्या भारतातील लोकांचा सगळयात जास्त आवडता सण तसेच उत्सव आहे.

म्हणुन हा सर्वत्र खुपच आनंद अणि उत्साहाने साजरा केला जातो.लहान असो किंवा मोठा सगळयांनाच गणपती आगमनाची आतुरता लागलेली असते.

यंदा २०२२ मध्ये हा सण उत्सव ३१ आँगस्ट रोजी म्हणजेच भाद्रपद महिन्यामध्ये साजरा केला जाणार आहे.

भाद्रपद शुदध चतुर्थीला सनई अणि चौघडा या दोघांच्या आवाजात,ढोल ताशांच्या आवाजात गणपती बाप्पाचे आगमन यादिवशी केले जात असते.

गणेश चतुर्थीस आपण विनायक चतुर्थी असे देखील म्हणत असतो.गणेशोत्सव सुरू होण्याच्या १५ ते २० दिवस आधी बाजारात गणपतीच्या भव्य दिव्य विविध आकाराच्या उंचीच्या मुर्ती विकायला आलेल्या आपणास दिसुन येतात.

घराघरात देवहारयात गणपतीची मुर्ती बसविली जाते.अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपती मंडळ मिळुन एकच मोठी मुर्ती बसवली जात असते.गणपतीस हार,दुर्वा तसेच फुले अपर्ण करण्यात येतात.

गणपती बाप्पाची घरोघरी सर्व कुटुंब मिळुन मनोभावे अणि मोठया श्रदधेने अकरा दिवस सकाळ संध्याकाळ पुजा आरती केली जाते.गणपती बाप्पापुढे मोदक,लाडु,खीर अशा इत्यादी गोडपदार्थाचा नैवैद्य दाखवला जातो.

गणपती सोबत गौरीचे देखील आगमन होत असते.सर्व घरातील महिला वर्ग मोठया श्रदधेने भक्तीने गौरीचे पुजन करतात.तिच्या आगमनासाठी घराची साजसजावट करतात.

हा सण उत्सव गणेश चतुर्थी पासुन अनंत चतुर्दशी पर्यत अकरा दिवसांकरीता मोठया उत्साहात अणि आनंदात जगभर साजरा केला जात असतो.

गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा भारतामध्ये लोकमान्य टिळक यांनी देशातील जनतेला एकत्र आणण्यासाठी संघटीत करण्यासाठी त्यांच्यात ऐक्य निर्माण करण्यासाठी सुरू केली होती.

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिनी जागोजागी विविध गणेश मंडळाकडुन भव्य डेकोरेशन केले जाते.हे डेकोरेशन पाहण्यासाठी लोग लांब अंतरावरून येत असतात.

ह्या डेकोरेशनमध्ये सामाजिक ऐतिहासिक अणि पौराणिक देखावे देखील उभारले जात असतात.यातुन लोकजागृती केली जाते.लोकांपर्यत एखादा चांगला सामाजिक संदेश पोहचवला जातो.

See also  नीरज चोप्रा कोण आहे? World Athletics championship 2023 winner Neeraj Chopra

दहा दिवसानंतर अकराव्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन केले जाते.काही जण आपल्या घरातील गणपती विसर्जित करायला स्वता नदीत जातात तर काहीजण जवळच्याच गणेशमंडळाकडे गणपतीची मुर्ती विसर्जन करण्यासाठी या दिवशी देऊन देतात.

मग रात्री बारा ते दोन पर्यत सर्व गणेशमंडळाकडुन आपापल्या मंडळाच्या गणपतीच्या मुर्तीचे अर्धा लाडु फुटला गणपती बाप्पा उठला,गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा नारा देत नाचत कुदत पाण्यात विसर्जन केले जाते.

Leave a Comment