Brain Rules 12 Principles – बुक समरी मराठीत – Brain Rules 12 Principles for Surviving and Thriving at Work, Home, and School

पुस्तक परिचय – ब्रेन रूल्स – Book Review – Brain Rules 12 Principles for Surviving and Thriving at Work, Home, and School

Brain Rule – बुक समरी मराठीत

एक सुदृढ मन ,चांगली पुरेशी झोप, व्यायाम आणि आपल्या सर्व मानवी इंद्रियासोबत संवाद साधत कश्या प्रकारे आपण आपल्या व्यावसायिक वा कार्यालयीन जीवनात आणि खाजगी जीवनात उत्पादनक्षमता वाढवू शकता व यशस्वी होऊ शकतात ये तथ्यांच्या आधारे वाचक समोर माहिती ठेवतात

आपल्या हाथच्या मुटठी इतक्या आकाराचा हा भाग आपण रोज काय करतो , आता या क्षणी काय करत आहोत या गोष्टींवर नियंत्रण ठेवत असतो. किती लहान वाटतो मेंदू पण त्याची क्षमता मात्र अमर्याद आहे.

आता प्रश्न हा येतो की यात आपल्याला सकारात्मक बदल ,सुधारणा घडवून आणता येईल का. समज असतो की ठराविक वयानंतर मेंदू ची वाढ होत नाही किंवा त्याला शिकवत येत नाही. परंतु सत्य हे आहे की मेंदू ची निरंतर वाढ होत असते आणि आपण त्यात योग्य त्या सुधारणा घडवून आणू शकतो.

Brain Rules 12 Principles for Surviving and Thriving या पुस्तकात 12 तत्व दिली आहेत ज्यांचा उपयोग आपल्याला घरी, कामात आणि शाळेत होऊ शकतो. यात अश्या सवयी वर चर्चा केली गेलीय ज्या आणुन आपण आपलं जीवन आनंदी आणि सुखी करू शकाल.

 

Brain Rules 12 Principles 3 महत्वाचे धडे

यात 3 महत्वाचे धडे वाचकांसमोर लेखकाने ठेवले आहेत जे आपल्याला आमूलाग्र बदल आपल्या जीवनात आणू शकतात.

  1. व्यायाम- शक्य तितका जास्त प्रमाणात व्यायाम केला पाहिजे जेणेकरून आपल्या मेंदू ची व शरीराची क्षमता वाढेल
  2. झोप- आपल्या नैसर्गिक झोपण्याचा वेळा लक्ष्यात घ्या,आपण न प्रयत्न करता किती वाजता केव्हा सहजरित्या गाढ झोपता ती सायकल ,किंवा झोपेचा पॅटर्न आवर्जून सांभाळा, folllow करा. याने आपला मेंदू व मन कायमस्वरूपी ताजतवान राहून आपली कार्य पार पाडेल.
  3. इंद्रिय- अधिक अधिक इंद्रियचा आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेत समावेश करा. याने जास्त माहिती आपण ग्रहण करू शकाल.
See also  म्हाडा लॉटरी 2023 विषयी माहिती - Mhada lottery 2023 information in Marathi

ब्रेन रूल्स हे पुस्तक लेखक जॉन मदिना यांनी लिहिले आहे आणि या पुस्तकात 12 मेंदू संबंधी असणारे काही अत्यंत म्हत्वाचे नियम सांगितले आहेत.

Buy Brain Rules (Updated and Expanded) 12 Principles for Surviving and Thriving at Work, Home,
Buy Brain Rules (Updated and Expanded) 12 Principles for Surviving and Thriving at Work, Home अमेझोन अधिक माहिती

ब्रेन रुल्स या पुस्तकाचे लेखकांनी म्हणजे जॉन मदिना यांनी आपल्या जीवनात संशोधन क्षेत्रात साहय्यक चे काम केले आहे ,जे की अनुसंधान मानसिक आरोग्यासंबंधी गोष्टीवर काम करते.

जॉन मदिना यांनी ब्रेन रुल्स या पुस्तकात सांगितलेले 12 नियम खालीलप्रमाणे :Brain Rules 12 Principles

व्यायाम
1. व्यायाम
मेंदूला निरोगी ठेवतो.नियमित, सात्यत्याने व्यायाम करण्याचे असंख्य फायदे असतात त्यामुळे आपण नियमिय व्यायाम हा आपल्या दिनचर्या चा भाग असला पाहिजे.व्यायाम केल्याने आपल्या मेंदूला योग्य प्रमाणात नियमित रक्ताचा पुरवठा होत असतो. आठवड्यातून फक्त दोन दिवस व्यायाम केल्याने मानसिक आजार होण्याचा धोका कमी मोठ्या प्रमानावर कमी होतो आणि आपण जर नियमित व्यायाम केलात तर अल्झायमर सारख्या आजारचा धोका 60% ने कमी होतो.

2. मानवी मेंदूचा विकास -टिकून राहणे
देखील निरंतर विकास होत राहत असतो . evolution म्हणजे उत्क्रांती नाव येते तेव्हा आपल्या डोळ्या समोर फक्त मानवी शरीर येते , आपण शिकत अलोत की आपले पूर्वज ही आधी माकड होते आणि हळू हळू आपल्या शरीरामध्ये आमुलाग्र बदल होत गेले आणि उत्र्क्रांती सिद्धता नुसार आपण मानव झालो.हे आपल्या सगळ्याना माहीत आहे;परंतु तुम्हाला हे माहीत आहे का ,की आपल्या मेंदूचा देखील विकास होतो.आपण जर हजारो वर्षे मागे गेलो तर मानवी मेंदूला भावना समजत न्हवत्या;परंतु आताच्या मानवी मेंदूला भावना समजतात.आणि भावना समजतात म्हणूनच समाजाची निर्मिती झाली आणि आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, माया, पासून तर राग, द्वेष ,तिरस्कार अश्या भावना निर्माण झाल्या,पृथ्वीवर माणुसकी शिल्लक राहिली.आपल्याला या सर्व भावना नसत्या तर आपण जगात सर्वात शक्तिशाली प्राणी झालो नसतो.

See also  पर्पल डे ऑफ एपिलेप्सी काय आहे । महत्त्व । इतिहास । Purple Day of Epilepsy 2023 In Marathi

 

Brain Rules 12 Principles

3. पुरेशी झोप –
आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी जशी पुरेशी झोप हवी असते,तशीच आपल्या मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते.झोप आपल्या मेंदूला आणि आपल्या शरीराला विश्रांती देते आणि झोपून उठल्यानंतर आपला मेंदू अगदी ताजातवाना ,फ्रेश होतो आणि आपले काम आपण अधिक फोकस, मन लावून एकाग्रतेने ने करतो.आपण जेव्हा जागरण करतो तेव्हा आपल्याला अशक्तपणा वाटतो आणि आपण आपल्या कामावर पूर्ण एकाग्रतेने काम करू शकत नाही, मन लागत नाही.असेच आपल्या मेंदूसोबत होते.त्यामुळे आपले शरीर आणि आपला मेंदू निरोगी ठेवण्यासाठी आपण पुरेशी झोप ही घेतलीच पाहिजे.जॉन मदिना यांच्या मते आपला मेंदू आपण झोपेत असताना आराम करत नाही तर तो आपले काम करत असतो;पंरतु पुरेश्या झोपेमुळे मेंदू योग्य रीतीने काम करतो.

4. तणाव
आपल्याला दुर्बळ बनवतो.आपण जेव्हा तणावात असतो तेव्हा आपला मेंदू योग्यरीत्या काम करत नाही.आपण जेव्हा तणावात असतो तेव्हा आपण समस्यांपुढे झुकतो.तुम्ही एका गोष्टीचे निरीक्षण केले असेल की,आपण जेव्हा तणावात असतो तेव्हा आपण छोट्या समस्यांना एक मोठी समस्या समजतो आणि त्याचा सारखा विचार करून नाराज होतो.आपल्याला जर निरोगी जीवन जगायचे असेल तर आपण कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार केला नाही पाहिजे.

5. बदल
प्रत्येकाचा मेंदू वेगळा असतो.आपला मेंदू वेळेबरोबर बदलत असतो ,तसेच आपण कोणत्या गोष्टी शिकतो किंवा कोणत्या गोष्टी करतो यावरून देखील आपला मेंदू बदलत असतो.प्रत्येक व्यक्तीचा मेंदू वेगळा असतो आणि तो आपण मरेपर्यंत वेळेबरोबर बदलत असतो.आपला IQ लेव्हल पाहण्यासाठी गुगल वर बऱ्याच IQ टेस्ट उपलब्द्ध आहेत.

6. नाविन्यता
आपला मेंदूला नविन गोष्टी आवडतात.म्हणजे जेवढे जेवढे नवीन शोज ,नवीन पिक्चर आहेत तेवढे आपण पाहतो, परन्तु आपण जुने पिक्चर क्वचितच पाहतो.तुम्ही कधी मेडिटेशन केलं आहे का?तुम्ही जर मेडिटेशन केलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट आढळली असेल की,मेडिटेशन करताना आपले मन/मेंदू एका जागेवर लागत नाही.काही वेळातच ते नवीन गोष्टी शोधायला प्रयत्न करते.आपण संभाषण करताना दर दहा मिनिटाला नवीन विषय किंवा नवीन विचार काढला पाहिजे,कारण मेंदूला नवीन गोष्टी आवडतात आणि त्याचे ध्यान जुन्या गोष्टींपेक्षा नवीन गोष्टीवर जास्त लागते.

See also  महाराष्टातील दहा किल्यांची माहीती -10 forts information in Marathi

7. उजळणी
गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी त्या गोष्टीची सारखी 94220 47369 रिविजन , उजळणी करा.आपला मेंदू हा एकाद्या मशीन नाही किंवा टेप रेकॉर्डर नाहीये की एकदा कोणती गोष्ट शिकली की ती गोष्ट जीवनभर लक्ष्यात राहील.आपल्याला कोणतीही गोष्ट लक्ष्यात ठेवण्यासाठी सतत त्या गोष्टीची उजळणी करायला हवी.आपण परिक्षेचा अभ्यास करताना देखील आपण एक प्रश्न पहिल्यांदा पाठ करतो आणि त्याची नंतर त्याची रिविजन करतो.असे केल्यामुळेच तो प्रश्न आपल्या लक्षात राहतो.

8. सखोलता –
आपण जेव्हा जास्त क्रिया एकावेळी करतो तेव्हा आपला मेंदू चांगल्या प्रकारे काम करतो.समजा तुम्ही अभ्यास करत आहात,तेव्हा एक प्रश्न फक्त वाचू नका किंवा पाठ करू नका,तर तो प्रश्न वाचा ,बोला आणि त्या प्रश्नावर विचार करा.असे जर केले तर तो प्रश्न तुमच्या लक्ष्यात सहज राहील.

9. डोळे -इइंद्रिय -Visualization
आपले डोळे इतर इंद्रियांपेक्षा शक्तीशाली आहेत.तुम्ही एका गोष्टीचे निरीक्षण केले आहे का की आपण जेव्हा विडिओ पाहतो किंवा कोणतातरी प्रश्न डोळ्याने पाहतो,तेव्हा ती प्रश्न किंवा विडिओ आपल्या पटकण लक्षात राहतो.

10. संगीत -सेंसरि अवयव
आपल्या मेंदूवर संगीताचा परिणाम होतो.जगात विविध प्रकारचे संगीत आहे त्यातील काही संगीत आपल्या मेंदूला फ्रेश करते तर काही संगीत आपल्या मेंदूला दुःखी करते.आपण चांगले संगीत ऐकून आपल्या मेंदूला फ्रेश केले पाहिजे.

11. स्त्री आणि पुरुषाच्या
मेंदूमध्ये खूप फरक असतो.स्त्री आणि पुरुषाच्या शरीराच्या मांडणीमध्ये कसा फरक असतो, तसाच फरक त्यांच्या मेंदूमध्ये असतो.त्यामुळे स्त्री आणि पुरुष एका घटनेवर वेगवेगळ्या रीतीने प्रतिक्रिया देतात, रिऍक्ट करतात.

12. सामर्थ्य –
आपला मेंदू खूप शक्तीशाली आहे.ह्यामुळेच जगामध्ये दररोज नवनवीन टेक्नॉलॉजी,तंत्रज्ञान, आविष्कार अवगत होत आहेत.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीतील सर्व शब्दांचे मराठी अर्थ

 

https://www.webshodhinmarathi.com/health-insurance-glossary-marathi/

1 thought on “Brain Rules 12 Principles – बुक समरी मराठीत – Brain Rules 12 Principles for Surviving and Thriving at Work, Home, and School”

Comments are closed.