Personal Finance – बँकिंग,इन्कम वं इन्श्युरंस क्षेत्रातली 25 म्हत्वाचे शब्द – Useful Personal Finance terms in Marathi

Personal Finance – 25 म्हत्वाचे शब्द – Useful Personal Finance terms in Marathi

आपल्याला नेहमी आपल्या दैनंदिन जीवणात बँकेचे आर्थिक व्यवहार करावे लागतात.पण जेव्हा आपण बँकेत एखाद्या आर्थिक व्यवहारासाठी जातो तेव्हा बँकर काही असे Terms बोलत असतो ज्याविषयी आपण पुर्णत अज्ञात असतो.

एवढेच नव्हे तर जेव्हा आपण एखादी विमा पाँलिसी काढायला जातो.तेव्हा तिथे देखील विमा एजंटच्या तोंडुन आपण काही असे महत्वाचे Terms ऐकत असतो जे आपल्यासाठी एकदमच नवीन असतात.ज्याचा अर्थ काय होतो हे देखील आपणास माहीत नसते.

अशा पदधतीने बँकेचे आर्थिक व्यवहार,विमा पाँलिसी काढताना,तसेच रीअल इस्टेटचे व्यवहार करताना इत्यादी ठिकाणी आपल्याला असे काही Personal Finance Terms ऐकु येत असतात.ज्यांचा आपल्याला अर्थ माहीत नसतो.

पण आजच्या दैनंदिन जीवणात जर आपल्याला अशा बँकिंग,विमा पाँलीसी,रिअल इस्टेट,इन्वहेस्टमेंट इत्यादी क्षेत्रात आर्थिक व्यवहार करणे शिकायचे आहे.

अर्थ साक्षर बनायचे आहे तर आपल्याला यात नेहमी वापरले जाणारे काही अत्यंत महत्वाचे Personal Finance Related Terms माहीत असणे फार आवश्यक असते.

म्हणुन आजच्या लेखात आपण Personal Finance संबंधित काही अशा महत्वाच्या Terms विषयी जाणुन घेणार आहोत.

जे माहीत असल्याने आपल्याला बँकेचे व्यवहार करण्यास,चांगली विमा पाँलीसी काढण्यास पैशांची योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यास,मनी मँनेजमेंट करण्यास मदत होणार आहे.आणि आपणास आर्थिक व्यवहार करताना कुठलीही अडचण देखील येणार नाही.

Banking क्षेत्रात वापरले जाणारे Personal Finance Terms कोणकोणते आहेत?

Banking क्षेत्रात वापरले जाणारे Personal Finance Terms पुढीलप्रमाणे आहेत :

1) Saving Account(बचत खाते)
2) Current Account(चालु खाते) :
3) Compound Interest(चक्रवाढ व्याज) :
4) Asset (संपत्ती):
5) Liabilities(दायित्व) :
6) Net worth :
7) Money Market Account :
8) Capital Gain/Loss(भांडवलामधील नफा तोटा):
9) Fixed Interest Rate(निश्चित व्याजदर) :
10) Variable Interest Rate(बदलत जाणारे व्याज दर) :
11) Loan(कर्ज) :
12) Collateral :

1) Saving Account(बचत खाते) :

Saving म्हणजेच बचत.आणि Saving Account चा अर्थ बचत खाते असा होतो.हे आपले बँकेतील असे एक खाते असते ज्याचा वापर आपण आपल्या कमवलेल्या पैशांची बचत करण्यासाठी तसेच पैशांची देवाण घेवाण करण्यासाठी करत असतो.

याचसोबत आपण आपल्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये जे पैसे जमा करत असतो त्यावर आपल्याला बँकेकडुन व्याज देखील प्राप्त होत असते.

See also  शेअर मार्केट उत्तम ट्रेडिंग एप्स - Best Trading App Information In Marathi

आणि हे व्याज आपल्याला तिमाही,सहामाही,वार्षिक स्तरावर दिले जाते.फक्त हे व्याज एफडीच्या तुलनेत खुप कमी प्रमाणात दिले जात असते.

2) Current Account(चालु खाते) :
Current Account ला आपण Business Account तसेच Finance Account असे देखील म्हणत असतो.कारण ह्या अकाऊंटचा वापर करून बँक खातेधारक पाहिजे तेवढया पैशांचे Transaction करू शकतो.

Current Account हे अधिककरून मोठमोठया इन्वहेस्टर्ससाठी,कंपनीसाठी,फर्मसाठी विशेषकरून असते.

कारण मोठमोठया इन्हेस्टर्सला कंपनींना बँकेसोबत असे अनेक आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार रोज करावे लागत असतात.

आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे जसे आपण सेव्हिंग अकाऊंटचा वापर आपल्या पैशांची बचत करण्यासाठी तसेच त्यावर व्याज प्राप्त करण्यासाठी करतो.तसा कुठलाही प्रकार Current Account मध्ये नसतो.इथे आपल्या पैशांवर आपणास कोणतेही व्याज देखील मिळत नाही.

म्हणजेच Current Account Open करण्याचा आपला मुख्य हेतु हा फक्त मोठमोठे आर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहार करणे हाच असतो.

अशा प्रकारच्या अकाऊंटसमध्ये आपणास काही Service Charge देखील Pay करावा लागत असतो.

3) Simple And Compound Interest(साधे आणि चक्रवाढ व्याज) :
जेव्हा बँक आपल्याला काही पैसे कर्जाच्या स्वरूपात देत असते.तेव्हा त्या पैशांचा वापर करण्यासाठी बँकेकडून काही चार्जेस तसेच फी आकारली जात असतात.त्याला Interest असे म्हणतात.

Simple Interest :

Simple Interest हा एक व्याजाचा असा प्रकार आहे ज्यात एका निश्चित कालावधीसाठी एक फिक्स व्याजाचे अमाऊंट आकारले जात असते.

Compound Interest :

Compound Interest मध्ये फिक्स व्याजाचे अमाऊंट आकारले जात नाही हे अमाऊंट दरवर्षी वाढत जाते.

जेव्हा मुळ रक्कमेत त्याचे विशिष्ट कालावधीनंतर आकारले जाणारे चक्रवाढ व्याज अँड केले जात असते.तेव्हा त्याला Compounding Interest असे म्हटले जात असते.

4) Asset (संपत्ती):
Asset आपण अशा वस्तुला तसेच संपत्तीला म्हणत असतो जी आपणास भविष्यात नफा प्राप्त करून देणार असते.

Asset म्हणजे आपल्या संपत्तीचा असा भाग जो आपणास काहीतरी रिटर्न प्राप्त करून देत असतो.

यात भाडयाने दिलेले एखादे घर कार इत्यादी Passive Income देत असलेल्या वस्तुंचा समावेश होतो.

5) Liabilities(दायित्व) :

Liabilities म्हणजे आपल्या संपत्तीमधील असा भाग ज्यामुळे आपल्या खिशात पैसे येत नसतात उलट आपल्या खिशातुन पैसे जात असतात.

यात कर्ज,होम डेकोरेशनचा खर्च,कार मेंटेनंसचा तसेच पेट्रोल डिझेलचा खर्च इत्यादींचा समावेश होतो.

6) Net worth :
नेट वर्थ म्हणजेच एखाद्या कंपनीचा भांडवलाचा एकुण खर्च,त्यांनी बिझनेससाठी घेतलेले कर्ज इत्यादी खर्च वजा करून जी रक्कम कंपनीकडे शेवटी इन्कमच्या स्वरुपात शिल्लक उरत असते त्यालाच त्या कंपनीचे नेटवर्थ म्हटले जाते.

See also  हिंदु ग्रोथ रेट म्हणजे काय? | Hindu Growth Rate Meaning In Marathi

7) Money Market Account :

मनी मार्केट अकाऊंट हे एक Checking आणि Hybrid Saving Account असते.ज्यात आपल्याला Ordinary Saving Account पेक्षा जास्त व्याज प्राप्त होत असते.

असे अकाऊंट राखण्यासाठी आपल्या खात्यात अधिक रक्कम शिल्लक असणे गरजेचे असते.

8) Capital Gain/Loss(भांडवलामधील नफा तोटा):
Capital Gain म्हणजे आपण जी रक्कम एखाद्या व्यवसायात उद्योगात गुंतवत असतो किंवा शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून जमा करत असतो तसेच गुंतवत असतो आणि नंतर त्या शेअर्सची विक्री करून त्यातुन Profit प्राप्त करत असतो त्याला Capital Gain म्हटले जाते.

Capital Loss म्हणजे आपण जी रक्कम एखाद्या व्यवसायात उद्योगात गुंतवत असतो किंवा शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून जमा करत असतो तसेच गुंतवत असतो आणि नंतर त्या शेअर्सची विक्री करून देखील आपणास त्यातुन पुरेसा Profit प्राप्त होत नसतो Loss होत असतो.त्याला Capital Loss म्हटले जाते.

9) Fixed Interest Rate(निश्चित व्याजदर) :
Fix Interest Rate हा ठाराविक मुदतीचा कालावधी संपेपर्यत फिक्स राहत असतो.यात व्याजदर हे फिक्स असते.

फिक्स इंटररेस्ट रेट असलेल्या कर्जात आपणास एक फिक्स व्याजदर भरावे लागते.

10) Variable Interest Rate(बदलत जाणारे व्याज दर) :

हे एक कालांतराने सतत बदलत जाणारे व्याजदर असते.यात व्याजदर हे वाढत तसेच कमी देखील होत राहत असते.म्हणजेच यात सतत चेंजेस होत राहत असतात.

व्हँरीएबल इंटररेस्ट रेट असलेल्या कर्जात आपणास एक फिक्स व्याजदर भरावे लागत नसते.

11) Loan(कर्ज) :
Loan ही एक रक्कम असते जी एखाद्या बँकेकडून आपणास काही फी आणि चार्जेस आकारून एखाद्या उद्योग व्यवसायासाठी शिक्षणासाठी, घर घेण्यासाठी ,बांधण्यासाठी विशिष्ट कालावधीकरीता दिली जात असते.

12) Collateral Loan :
Collateral Loan हा कर्जाचा असा प्रकार आहे ज्यात आपणास कर्ज घेत असताना काही सुरक्षा म्हणुन घराचे प्राँपर्टीचे कागदपत्र जमीनीचे कागदपत्र किंवा आपल्या इतर मौल्यवान वस्तुंचे कागदपत्र देखील जमा करावी लागत असते.

अशा प्रकारच्या कर्जामध्ये होम लोन,बिझनेस लोन,गोल्ड लोन इत्यादींचा समावेश होत असतो.

Income संबंधी काही Personal Finance Terms :

1) Gross Income :
2) Net Income :
3) Taxable Income:

1)Gross Income :
कोणत्याही Earning Source मधुन आपल्याला जी टोटल इन्कम प्राप्त होत असते.त्या टोटल इन्कमला Gross Income असे म्हणतात.

2) Net Income :
कोणत्याही इन्कममधुन घेतलेले कर्ज,तसेच इतर खर्च बाजुला काढुन म्हणजेच वजा करून इन्कममधील प्राँफिटची जी शिल्लक रक्कम उरत असते.तिला Net Income असे म्हणतात.

See also  आयटीआर फाईल करण्याचे फायदे कोणते असतात? ITR filing benefits in Marathi

3) Taxable Income:
Taxable Income हा एखाद्या कंपनीच्या तसेच विशिष्ट व्यक्तीच्या उत्पन्नाचा एक महत्वाचा भाग असतो.

ज्यात त्या व्यक्तीला कंपनीला आपल्या इन्कममधुन किती अमाउंट म्हणजेच टँक्स सरकारला द्यायचे आहे याची गणना केली जात असते.

Insurance शी संबंधित Personal Finance Terms –

1)Insurance Premium :
2) Contribution Plan :
3) Term Life Insurance :
4) Whole Life Insurance /Permanent Insurance :

1)Insurance Premium :
जेव्हा आपण एखादी विमा पाँलिसी काढत असतो तेव्हा त्यात आपणास काही कालावधीत एक रक्कम देखील भरणे अनिवार्य असते.तिलाच Insurance Premium असे म्हणतात.

इंशुरन्स प्रिमियम हे आपणास महिन्याने,तीन महिन्याने,वर्षभराने भरावे लागत असते.ज्याला प्रिमियम चार्ज असे म्हटले जाते.

2) Contribution Plan :
Contribution Plan म्हणजे योगदान योजना.ज्यात कर्मचारींना सेवा निवृतीसाठी(Retirement) साठी मदत करायला नियोक्त्याकडुन आँफर करण्यात आलेल्या Retirement Planning चा संदर्भ दिलेला असतो.

3) Term Life Insurance :
हा पाँलिसीचा एक असा प्रकार असतो.जो आपणास विशिष्ठ कालावधीत म्हणजेच साधारणत:10 ते 30 वर्षापर्यतचा कव्हरेज प्रदान करत असतो.

ह्या प्रकारची पाँलिसी आपणास एका विशिष्ट मुदतीत पे आऊट करण्याची हमी देत असते.

4) Whole Life Insurance /Permanant Insurance :
Whole Life Insurance ही एक पा़ँलिसी असते ही पाँलिसी विकत घेत असलेल्या पाँलिसी धारकास आयुष्यभराचे संरक्षण प्राप्त होत असते.म्हणजेच यात पाँलिसीची निश्चित मुदत दिली जात नसते.यात आपणास लाईफटाईम कव्हरेज मिळत असते.

Credit And Debit शी संबंधित महत्वाचे Terms –

1)Debt Consolidation :
2) Credit Utilization Rate :
3) Credit Score :
4) Refinancing :

1)Debt Consolidation :

Debt Consolidation म्हणजे इतर जुनी कर्ज फेडण्यासाठी आपण जे एक नवीन सिंगल लोन घेत असतो त्यालाच Debt Consolidation असे म्हणतात.

2) Credit Utilization Rate :
आपण आपल्या क्रेडिट कार्डच्या क्रेडिट मर्यादेचा वापर महिन्याभरात किती करतो?त्यालाच Credit Utilization Ratio असे म्हटले जात असते.

आपल्या क्रेडिट युटिलायझेशन रेशोचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर फार चांगला प्रभाव पडत असतो.म्हणजेच आपण आपले क्रेडिट कार्ड किती वापरतो यावर आपला क्रेडिट युटिलायझेशन रेशो अवलंबुन असतो.

3) Credit Score :
Credits Score ला सिव्हील स्कोअर असे देखील म्हटले जात असते.हा एक नंबर असतो जो बघून आपल्याला कर्ज मंजुरी देण्यात यावी किंवा नाही हे ठरवले जात असते.

सिव्हील म्हणजेच क्रेडिट स्कोअरमध्ये आपला मागील सहा महिन्यांचा Finance Report चेक केला जात असतो.

जर आपण यापुर्वी घेतलेले कर्ज वेळेवर फेडले असेल तर आपला क्रेडिट स्कोअर चांगला राहत असतो.पण याच ठिकाणी आपण आधीचे लोन वेळेवर फेडले नसेल तर आपला क्रेडिट स्कोअर खराब होत असतो ज्यामुळे आपल्याला इतर कुठलीही बँक लोन देत नसते.

4) Refinancing :
Refinancing ही एक अशी Process असते ज्यात आपल्याकडे असलेल्या वर्तमान कर्जाला आपण दुसरया कर्जाने बदलत असतो.

Refinancing चा वापर आपण अधिक Interest Rate प्राप्त करण्यासाठी प्रामुख्याने करत असतो.

1 thought on “Personal Finance – बँकिंग,इन्कम वं इन्श्युरंस क्षेत्रातली 25 म्हत्वाचे शब्द – Useful Personal Finance terms in Marathi”

Comments are closed.