हेल्थ इन्शुरन्स -शब्दांचे मराठी अर्थ -Common Health Insurance Terms Marathi

हेल्थ इन्शुरन्स  शब्दांचे मराठीत अर्थ – Common Health Insurance Terms Marathi

आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी  विकत घेता असतो ,आपल्याला हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून एक पॉलिसी डॉक्युमेंट दिले जाते .त्या डॉक्युमेंट मध्ये कव्हरेज -विमा संरक्षण ची माहिती असते.तसेच त्यांच्या नियम आणि अटी असतात त्यात लिहलेल्या असतात .

तुम्हाला त्या डॉक्युमेंट मधील सर्व मुद्दे समजणे गरजेचे आहे.हेल्थ इन्शुरन्स मधील काही मुद्दे समजायला थोडे अवघड असतात,आपण या लेखात हेल्थ इन्शुरन्स मधील A to Z शब्दांचे मराठी अर्थ पाहणार आहोत.

या लेखात देणारी माहिती च उद्देश्य हा  शास्त्रीय व्याख्या देणे नसून सामान्य माणसांना आरोग्य विमा घेताना वाचनात येणार्‍या सर्व शब्दांचा अर्थ समजून  -Health Insurance Glossary Marathi विम्यातील बारकावे लक्ष्यात यावे हा आहे

 

Accumulation period म्हणजे काय ?

हा तो कालावधी असतो ज्यात तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स (आरोग्य विमा घेतल्यानंतर काही कालावधीपर्यंत कोणतेही कव्हरेज(विमा सरक्षण ) मिळत नाही (अपघात केस व्यतिरिक्त ) . Accumulation period हा पॉलिसी  घेतल्यापासून 30 व्या दिवसापर्यंत असतो..

Acute care – जी चिकित्सा सेवा पॉलिसी धारकला मिळते त्याला Acute care म्हणतात.

Agent – एजंट हा मध्यस्थी चे काम करतो.तो विमा पॉलिसी देणारा आणि विमा पॉलिसी  घेणारा यातील दुवा असतो.तुम्हाला जर पॉलिसी  घेताना काही अडचण वाटली तर,तुम्ही तुमच्या एजंट ला विचारू शकता.एजंट तुम्हाला पॉलिसी  मधील फायद्याबदल सांगतो.तुमचा पॉलिसी  फॉर्म योग्य भरलाय की नाही याची पडताळणी देखील एजंट करतो.

Age limit – प्रत्येक आरोग्य विमा न्यूनतम आणि अधिकतम वयासाठी असते.पॉलिसी धारक निर्धारित वयाच्या आत येतात,तेच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी  घेऊ शकतात.

Area covered – तुमची आरोग्य विमा पॉलिसी तुम्हाला मर्यादित क्षेत्रात कव्हरेज- विमा सरक्षण देत असते .काही विमा पॉलिसी  तुम्हाला फक्त भारतातच उपचार घेण्याचे कव्हरेज देतात.तर काही आरोग्य विमा पॉलिसी  तुम्हाला बाहेरच्या देशात उपचार घेण्याची परवानगी देतात.

Ambulance cover म्हणजे काय ?

 काही आरोग्य विमा पॉलिसी तुम्हाला रुग्णवाहिके (अंबुलन्स) चे कव्हरेज देते.समज तुमच्या पॉलिसी  मध्ये अंबुलन्स कव्हरेज नसेल तर तुम्हाला अंबुलन्स चा खर्च स्वतःच्या खिश्यातून भरावा लागतो.

Ayush- आयुष विमा पॉलिसी मध्ये तुम्हाला आयुर्वेदिक उपचाराचे कव्हरेज मिळते.आज आयुष विमा घेण्याकडे लोकांचा जास्त कल वाढत आहे लोक  आयुष विमा पॉलिसी  विकत घेताना दिसतं आहेत .

B

Beneficiary – म्हणजे पॉलिसी लाभार्थी

C

Cancer insurance – कॅन्सर इन्शुरन्स तेव्हा लागू पडतो, जेव्हा की एखाद्याला कॅन्सर झाल्याचे निदान होते .ह्या कव्हरेज चा फायदा कॅन्सर आजाराच्या उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी होते.तुम्ही कॅन्सर इन्शुरन्स ला खरेदी करू शकता.

See also  प्रोटीन पावडर विषयी माहीती - Protein powder information in Marathi

Claim म्हणजे काय ?

दावा – हा तो लाभ आहे जेव्हा तुम्ही दवाखाण्यात उपचार घेत असता आणि तुमच्या उपचाराचा खर्च जो झाला असेल तो तुमी विमा पॉलिसी घेतलेल्या कंपनी कडे दावा करू शकतो

Claim settlement – दावा निवाडा – ही उपचार दरम्यान झालेला खर्च परत मिळवण्याची किंवा क्लेम प्राप्त करणारी प्रक्रिया आहे.ह्यामध्ये तुम्ही स्वतः दवाखान्याचा खर्च भरून नंतर विमा पॉलिसी  कंपनीला सेटलमेंट वरून लाभ प्राप्त करू शकता किंवा तुमची कंपनी तुम्ही दवाखान्यात असताना कॅशलेस पेयमेंट सरल दवाखान्याला करते.

Claim settlement Ratio म्हणजे काय ?

विमा पॉलिसी घेण्यापूर्वी तुम्हाला Claim settlement Ratio जाणून घेणे गरजेचे आहे.- दावा निवाडा प्रमाण – किती विमाधारका नि कंपनिकडे उपचारचा खर्च मागितला आणि किती लोकांना दिला गेला आणि किती लोकांचा विमा खर्चा च अर्ज फेटाला गेला याच हे प्रमाण असते

Certificate of insurance – कोणतीही विमा पॉलिसी खरेदी केल्यानंतर त्याचे तुम्हाला एक प्रमाणपत्र भेटते.प्रत्येक पॉलिसी  चे वेगवेगळे नियम या सर्टिफिकेट वर असतात.तुम्ही विमा प्रमानपत्रावरील नियम व अटी ध्यान देऊन वाचणे गरजेचे आहे.

Co payment म्हणजे काय

– को पेयमेंट मध्ये तुम्हाला तुमच्या खिश्यातून काही रक्कम ही उपचारा करता खर्च करावी लागते , जसे सीनियर सिटीजन विम्यात साधारण 30% हे को खर्च विमा पॉलिसी  धारकला द्यावा लागतो

Complimentary health creak-up –यामध्ये आरोग्य विमा कंपनी विमा धारकांना पॉलिसी रिन्यू केल्यानंतर एक वर्षापर्यंतचे वैद्यकीय शारीरिक तपासणी फ्री मध्ये करण्याचे कव्हरेज देते.काही योजना वैद्यकीय शारीरिक तपासणी चे कव्हरेज देतात.

Co insurance -ही एक ठराविक रक्कम आहे जी की पॉलिसी धारकांना विमा कंपनीला द्यावी लागते.सह विमा दोन प्रकारचे असतात.विमा पॉलिसी  खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला सुरवातीला मर्यादती रक्कम द्यावी लागते.

Cumulative Bonusम्हणजे काय ?

–आपण ठराविक काळात काही क्लेम नाही केला तर कंपनी तर्फे आपणास अनुदान दिल जाते , त्यात आपली विमा रकमेत थोडी वाढ करून दिली जाते

Critical illness –काही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी गंभीर आजारांविरुद्ध वैद्यकीय उपचारांचा खर्च देत नाहीत  त्या करता .तुम्ही सर्वांगीण सुरक्षेसाठी  क्रिटिकल इलनेस कव्हरेज ला लाभ घेऊ शकता.

D

Daycare Products म्हणजे काय ?

-किमिथेरपी,डायलसीस,इंजियोग्राफी हे डे केअर उपचारामध्ये येतात.मोजक्याच विमा पॉलिसी दडे केअर सेवा प्रदान करतात.

Daily Hospital cash –डेली हॉस्पिटल कॅश फायद्याच्या रुपात ओळखले जाते.ह्यामध्ये पॉलिसी धारकाला हॉस्पिटल मध्ये भरती झाल्यानंतर दर दिवशी एक मर्यदित रक्कम कंपनीकडून मिळते.पॉलिसी  घेताना ती निश्चित राशी ठरवली जाते.

Deductible –ही एक विशेष रक्कम आहे जे की पॉलिसी धारकाला दरवर्षी भरावी लागते.समजा तुमची ही रक्कम 10,000 आहे,काही केस  मध्ये तुम्हाला 10,000 पैसे पेड केल्यानंतर काही फायदे मिळतात.

 

Dependents म्हणजे काय ?

काही पॉलिसी कंपन्या फक्त पॉलिसी  धारकांना कव्हरेज प्रदान नाही करत,तर पॉलिसी धारकाच्या तिच्या / तिच्या वर अवलंबून असलेल्या  कुटुंबालाही कव्हरेज प्रदान करते.

See also  राष्ट्रीय लसीकरण दिवस २०२३ । इतिहास । महत्त्व । थीम । National Vaccination Day History And Theme In Marathi

 

Domiciliary Hospitalization – ह्यामध्ये तुम्हाला दवाखान्यात जाण्यासाठी खूप त्रास होत असेल,तर तुम्ही घरूनच उपचार घेऊ शकता.

E

Exclusion म्हणजे काय ?

वगळणे – एखादा आजार तुमची विमा कंपनी कव्हर नसेल करत त्याला एक्सकलूजन म्हणतात.विमा पॉलिसी  निवडताना exclusion व्यवस्थित चेक करूनच विमा पॉलिसी  निवडा.

Emergency care – समजा जर आपत्कालीन मेडिकल उपचाराची गरज पडली,तर ते इमर्जन्सी केअर मध्ये येते.

F

Family floater policy म्हणजे काय ?

 ह्यामध्ये कुटुंबातील एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या उपचाराचा खर्च  कव्हर केला जातो.फॅमिली फ्लोटर पॉलिसी  च्या अंतर्गत विम्यात कव्हर केलेल्या कुटुंबतील सदस्यांसाठी एक विशिष्ट रक्कम भरावी लागते.(आई वडील , मुले , आजी आजोबा व सासू सासरे )

Free look period म्हणजे काय ?

फ्री लुक पिरेड एक असा कालावधी असतो,ज्यात की पॉलिसी धारक  दुसऱ्या विमा पोलिसि देणाऱ्या कंपन्या निवडू शकतो किंवा काही बदल असतील तर निदर्शांस आणून देता येतात , किंवा आपण समाधानी नसाल तर विमा परत करू शकता  .विमा पॉलिसी  घेतल्यानंतर 15 ते 20 दिवसापर्यंत फ्री लुक पिरेड असतो.

G

Group health insurance- समूह आरोग्य विना पॉलिसी ही एखाद्या संस्थे तील किंवा कर्मचाऱ्यांसाठी असते.व्यक्तिगत पॉलिसी  रकमेपेक्षा याची रक्कम कमी असते.कारण रिस्क ही विमा पॉलिसी  घेतलेल्या समूहामध्ये वाटली जाते.

 

H

Hospitalization – यामध्ये तुम्ही दवाखान्यात भरती झाल्यानंतर चा खर्च दिला जातो.

Heath insurance tax benefits – आरोग्य विमा कर लाभ अधिनियम 1988 धारा 80D नुसार तुम्हाला कर लाभ भेटू शकतो.हा कर लाभ तुमचे वय,तुमच्या योजनेसाठी असणारे प्रीमियम,यावरती आधारित असतो.वरिष्ठ पॉलिसी धारकांना आरोग्य विमा कर लाभाचा फायदा जास्त होतो.

I

ICU room rent- ह्या मध्ये तुम्हाला ICU रुम मधील खर्च दिला जातो.काही पॉलिसी ICU मधील खर्च कव्हर करतात,तर काही पॉलिसी  ICU मधील रूम खर्च कव्हर करत नाहीत.

 

Insurer – ज्या कंपनी कढून विमा काढला जात आहे ती

IRDAI – भारतीय विमा नियामक यांनी IRDAI ची स्थान 1999 मध्ये केली.IRDAI भारतात विमा पॉलिसी ना नियंत्रित करण्याचे काम करते.

Insured person – आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत येणाऱ्या व्यक्तीला किंवा समूहाला इन्शुरेड पर्सन म्हणतात.

Individual health insurance – आरोग्य विमा पॉलिसी  एखाद्या व्यक्तीला आपत्कालीन परिस्थिती मध्ये आरोग्य विमा देते , याला वयक्तिक आरोग्य विमा असे म्हणतात.

L

Life insurance- जीवन विमा पॉलिसी आरोग्य विमा पॉलिसी  पेक्षा फार वेगळी आहे.जीवन विमा पॉलिसी  तुमच्या मृत्यू पश्चात तुनच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च पाहते व तुमच्यावर असलेले कर्ज फेडते.

 

M

 

Maternity insurance म्हणजे काय ?

-हा विमा गर्भवती महिला किंवा तिच्या नवजात बाळासाठी असतो.ह्यामध्ये महिलेचा डिलिव्हरी खर्च,नंतर किंवा आधी तिच्या बाळाच्या खर्चाचे कव्हरेज मिळते.

N

Network hospital म्हणजे काय ?

 

 कोणताही दवाखाना जो की तुमच्या विमा कंपनीकडून कॅशलेस खर्च भरेल,त्याला नेटवर्क हॉस्पिटल म्हणतात.नेटवर्क हॉस्पिटल मध्ये तुमचा खर्च तुमची विमा कंपनी दवाखान्याचा झालेला खर्च डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये करते.

Non-network hospital – काही हॉस्पिटल्स मध्ये तुमची विमा कंपनी कॅशलेस पेमेंट करू नाही शकत,त्याला नॉन-नेटवर्क हॉस्पिटल म्हणतात.जर तुम्ही नॉन नेटवर्क मध्ये उपचार घेत आहात तर तुम्हाला कॅशलेस सुविधांचा लाभ नाही घेता येणार.

See also  उन्हाळ्यात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे? जाणून घ्या

 

No claim bonus – नो क्लेम बोनस हा पॉलिसी कंपनीकडून पॉलिसी  धारकांना दर विना दावा वर्षाला दिला जातो.,ह्याद्वारे पॉलिसी  धारक उच्च विमा राशीचा लाभ उचलू शकतात.

 

OPD म्हणजे काय ?

 बाह्य रुग्ण विभाग समजा एखादी व्यक्ती हॉस्पिटल अॅडमिट होण्या आधी एखाद्या क्लिनिक मध्ये बाह्य उपचार घेण्यासाठी जाते,तर ते OPD मध्ये येते.

P

Premium म्हणजे काय ?–

प्रीमियम राशी म्हणजे एक ठराविक रक्कम जे की तुम्हाला विशिष्ट कालावधी नंतर तुमच्या विमा कंपनीला द्यावी लागते.

 

Personal accidental policy – ही विशिष्ट अपघात योजना तेव्हाच ज्यात एखादी व्यक्तीच अपघात विमा पॉलिसी काढली जाते .

 

Policy coverage – पॉलिसी मध्ये कोणत्या गोष्टी कव्हर केल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी कव्हर (बिमा सरक्षण दिल गेल आहे )केल्या नाहीत,यासाठी हा शब्द वापरला जातो.

 

Policy period – हा तो कालावधी आहे जिथपर्यंत पॉलिसी कव्हरेज वैध असते.

 

Portability – यात आपण आरोग्य विमा योजना एका कंपनी कडून दुसरिकडे transfer करत असतात जसे आपण sim card करतो तसे

 

Pr-existing disease – जो आजार विमा पॉलिसी खरेदी करण्याचा आधीपासून असतो त्याला प्री इजिस्टिंग डिसीज म्हणतात.

 

Pre and post hospitalization coverage म्हणजे काय ?

– तुम्ही दवाखान्यात भरती होण्याच्या 30 दिवसा आधी तुमचा भागवलेला खर्च प्रि कव्हरेज मध्ये येतो आणि दवाखान्यातून घरी गेल्यापासून ते 60 दिवसापर्यंत होणारा मेडिकल खर्च पोस्ट कव्हरेज मध्ये होतो.

 

psychiatric cover – मानसिक आजारांना आरोग्य विम्यामध्ये कव्हर केले जाते.

R

Refill sum insured / Restoration म्हणजे काय ?

– यात आपण विमा केलेली रक्कम खर्च झाली तर विमा कंपनी पुन्हा काही ठराविक रकमेचा विमा , धारकला देत असते

om rent- ह्यामध्ये तुमचा हॉस्पिटलमध्ये किंवा क्लिनिक मध्ये होणारा रूम चा खर्च विमा पॉलिसी मध्ये कव्हर केला जातो.

Riders म्हणजे काय ?

जसे की आयुष कव्हर हे विमा पॉलिसी मध्ये सुरवातीपासून येत नाही. असे फायदे ज्या साठी तुम्हाला विशिष्ट रक्कम भरावी लागते.

Renewal – विमा नूतनीकरण – पॉलिसी समाप्त होण्यापूर्वी तुम्हाला जर विमा योजेंचा लाभ चालू ठेवायचा असेल ,लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पुढच्या वर्षीचे प्रीमियम घ्यावे लागते.

Reimbursement – परतफेड रक्कम – हे जाणून घेतल्याशिवाय तुम्ही विमा पॉलिसी  खरेदी करू नका..

S

Sun insured – म्हणजे विमा राशी- तुम्हाला एका वर्षांमध्ये जास्तीत जास्त किती पैसे कंपनी वैद्यकीय उपचारकरता दिली जातील हे दर्शवते.

Senior citizen health insurance – 60 वर्षापेक्षा अधिक वय आणि70 वर्षापेक्षा कमी वय असलेल्यांसाठी वेगळ्या आरोग्य विमा पॉलिसी आहेत.या पोलीसी ना वरीष्ठ माणसांच्या आवश्यकतेनुसार तयार केले आहे.

T

Terminal illness – हा असा आजार आहे की ज्याचा कोणताही इलाज नाही.शेवटच्या स्टेज वर गेलेला कॅन्सर हे ह्या आजाराचे उदाहरण आहे.

Term insurance – टर्म इन्शुरन्स ही एक जीवन विमा पॉलिसी आहे.

TPA – Third party अडमिनिस्ट्रेटर – आपण जर विमा रकमेकरता क्लेम केला तर

TPA मार्फत आपला अर्ज छाननी,पडताळणी होवून विमा रक्कम दिली जाते

 

Policy Waiting period म्हणजे काय ?

– हा अवधी पॉलिसी  खरेदी केल्यानंतर काही कालावधीनंतर असतो.पहिल्यापासून असणाऱ्या आजारांसाठी वेटिंग कालावधी 4 वर्षाचा असतो आणि बाकी वेळा हा कालावधी कमी असतो.

 

Z

Zone – आरोग्य विमा पोलीसी यांनी बेगवेगल्या उपचारांसाठी शहरांचे विभाजन केले आहे.उदाहरण,झोन A मध्ये मुंबई , दिल्ली यांसारखी मोठी शहरे आहेत.झोन B मध्ये बंगळुरू आणि कोलकाता ही शहरे येतात.

 

Personal Finance – बँकिंग,इन्कम वं इन्श्युरंस क्षेत्रातली 25 म्हत्वाचे शब्द –

 

लेखक : Post Author


SIP KNOWLEDGE

5 thoughts on “हेल्थ इन्शुरन्स -शब्दांचे मराठी अर्थ -Common Health Insurance Terms Marathi”

  1. आपण खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद

Comments are closed.